मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय १४ वा स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय १४ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ९ वा - अध्याय १४ वा Translation - भाषांतर ९५निवेदिती शुक ऐकें सोमवंश । नाभीकमलस्थ प्रथम ब्रह्मा ॥१॥पुत्र त्याचा अत्रि, एकदां हर्षित । आनंदाश्रु तोच चंद्र जाणा ॥२॥ओषधि, विप्र तैं नक्षत्राधिपत्य । दिधलें तयास ब्रह्मदेवें ॥३॥जिंकूनि त्रैलोक्य राजसूययज्ञें । चंद्रें आराधिलें भगवंतासी ॥४॥पुढती गर्वानें बृहस्पतिकांता । हरुनियां नेतां विनवी गुरु ॥५॥वासुदेव म्हणे अन्यायप्रवृत्त । ऐके न सद्बोध कलह तेणें ॥६॥९६बृहस्पतिवैरी शुक्र । गुरुबंधु त्या शंकर ॥१॥देव-दैत्यांमाजी ऐसें । युद्ध होई तदा मोठें ॥२॥अंतीं ब्रह्ययाची मध्यस्ती । करितां होई ताराप्राप्ति ॥३॥तेणें चंद्राचा निषेध । करुनि थांबविलें युद्ध ॥४॥गरोदर तारा होती । ऐसें पाही बृहस्पती ॥५॥तदा वदला तो तिज । मान्य नसेल हें तुज ॥६॥तरी गर्भत्याग करीं । भय न मानीं अंतरीं ॥७॥पुत्रइच्छा मजप्रति । शाप न देईं तुजसी ॥८॥वासुदेव म्हणे तदा । तारा त्यागी निजगर्भा ॥९॥९७महा तेजस्वी तो होता एक पुत्र । पाहूनियां मोह सकलां वाटे ॥१॥बृहस्पति चंद्र म्हणती हा माझा । वाद होई मोठा तोही एक ॥२॥अंतीं सर्व मुनि पुशिती तारेतें । लज्जायुक्त चित्तें न वदेचि ती ॥३॥पुत्रही सक्रोध पुशी तैं तियेतें । म्हणे सत्यचि तें कथीं आतां ॥४॥तदा बहुतचि लज्जायुक्त तारा । न करी उच्चारा कांहींचि ते ॥५॥अंतीं ब्रह्मा पुशी बाजूसि नेऊनि । ‘चंद्राचा’ तो, वाणी वदली ऐसी ॥६॥घेऊनि तो पुत्र जाई तदा चंद्र । बुद्धिमंता बुध नाम योग्य ॥७॥इलेपासूनि त्या पुरुरवा पुत्र । म्हणे वासुदेव कथिलें पूर्वी ॥८॥९८इंद्रसभेमाजी एकदां नारदें । हर्षे वर्णियेलें बुधपुत्रा ॥१॥रुप, औदार्य तें सुस्वभाव, शौर्य । पाहूनि नारद वर्णिती त्या ॥२॥ऐकूनि उर्वशी मनीं धरी लोभ । मित्रावरुणीशाप तिजसी होता ॥३॥तेणें मनुष्यत्व प्राप्तचि तियेसी । यास्तव हे बुद्धि होई तिज ॥४॥रायासन्निध ती ठाकली येऊनि । नृपाळ मोहूनि जाई तदा ॥५॥वासुदेव म्हणे परस्परांप्रति । होतसे एकचि इच्छा दैवें ॥६॥९९उर्वशी नृपासी म्हणे तुजप्रति । पाहूनि कोणासी न पडे मोह ॥१॥ऐकूनीच आलें मी तरी त्वद्गुण । परी घे ऐकून अटी माझ्या ॥२॥पुशितां ते म्हणे, पाळिले मी दोन । मेष तत्पालन करिसी जरी ॥३॥घृतचि या लोकीं अमृत यास्तव । राहीन केवळ घृत सेवूनि ॥४॥मैथुनावांचूनि विवस्त्र मजसी । त्वां न दिसावेंचि ऐशा अटी ॥५॥मोडितां तत्क्षणीं जाईन निघूनि । अटी त्या पाळूनि रमला राव ॥६॥वासुदेव म्हणे कामपूर्तीस्तव । वेडा होई जीव ज्ञात्याचाही ॥७॥१००इंद्राप्रति स्वर्गी न दिसे उर्वशी । व्याकुळता त्यासी तदा येई ॥१॥अंतीं गंधर्वासी आणाया तिजसी । धाडी मृत्युलोकीं देवराज ॥२॥उर्वशीसवें तैं सुप्त होता राव । मेषांसी गंधर्व नेती तदा ॥३॥आक्रोश तयांचा ऐकूनि उर्वशी । निंदी नृपाळासी क्रूरशब्दें ॥४॥जागृत होऊनि तदा पुरुरवा । तैसाचि धांवला वैर्यांवरी ॥५॥सोडवूनि मेष पातला मंदिरीं । विवस्त्रचि परी होता राव ॥६॥वासुदेव म्हणे न चले उपाय । कठिण समय येतां कांहीं ॥७॥१०१जाणूनि गंधर्व पाडिती प्रकाश । उर्वशी विवस्त्र पाही नृपा ॥१॥तदा वचनाचा निवेदूनि भंग । उड्डाण नभांत केलें तिणें ॥२॥विरह तियेचा न सहे नृपासी । ‘उर्वशी’ ‘उर्वशी’ ध्यास तया ॥३॥त्याचि ध्यासें करी सर्वत्र संचार । सरस्वतीतीर पाही तदा ॥४॥उर्वशी त्या स्थानीं पाहिली तयानें । सख्यांसवें प्रेमें क्रीडा करी ॥५॥वासुदेव म्हणे पुरुरवा तदा । आर्तशब्दें ऐका वदला काय ॥६॥१०२सुहास्यवदने प्रिये, प्रियकर । तुझा हा विरहदग्ध पाहीं ॥१॥अजूनि तरी हो प्रसन्न त्याप्रति । तळमळ त्याची मत्स्यासम ॥२॥सदयपणें त्या होईं अनुरक्त । प्राण कासावीस सुंदरी, हे ॥३॥त्यागूनियां यदि जासील तूं आतां । प्राण तरी साचा न राहीचि ॥४॥भोगिलासी तूं जो चारुदेह तोचि । गृध्र वृकांप्रति भक्ष्य होई ॥५॥वासुदेव म्हणे प्रेम दयादिक । भाव वैषयिक अशुद्ध ते ॥६॥१०३नृपाळाची दीनवाणी ती ऐकूनि । अप्सरा हांसूनि वदली तया ॥१॥वीरा, स्त्रियांसम सोडिसी कां धीर । नीच मी साचार चिंतीं मनीं ॥२॥स्त्रिया मूर्तिमंत कपट या लोकीं । कोमल भासती परी क्रूर ॥३॥क्षुद्र स्वार्थास्तव पतीचेही प्राण । घेतील त्या जाण नरश्रेष्ठा ॥४॥नित्य नूतन त्या इच्छितील पति । क्षणांत मोहिती पुरुषांप्रति ॥५॥वरि वरि प्रेम दाविती नितांत । वरि वरि भास परी सर्व ॥६॥वासुदेव म्हणे यास्तव उर्वशी । म्हणे प्रीति ऐसी न धरीं मम ॥७॥१०४उर्वशीनें ऐसें कथितांही स्पष्ट । राव तिचा छंद न सोडीचि ॥१॥पाहूनि ते दया येई उर्वशीतें । म्हणे नृपा, अब्दें भेटेन मी ॥२॥गरोदरस्थिति जाणूनि तियेची । संतोषें राजाही सदनीं जाई ॥३॥योग्यकाळ जातां येई तया ठाईं । पुत्रासवें पाही उर्वशीतें ॥४॥हर्षे ती रजनी कंठिती उभय । अन्य दिनीं राव दु:ख पावे ॥५॥जाणूनि अप्सरा म्हणे गंधर्वांसी । प्रार्थी, ते तुजसी साह्य होती ॥६॥वासुदेव म्हणे प्रार्थितां गंधर्व । अग्निस्थालिपात्र नृपा देती ॥७॥१०५मोहूनि नृपाळ पात्र तें उर्वशी । मानूनि तियेसी हृदयीं धरी ॥१॥ऐसा काननांत हिंडे कांहीं दिन । स्थाली ते जाणून पुढती त्यागी ॥२॥शेवटीं आपुल्या नगरासी येई । त्रेतायुग पाहीं तदा होतें ॥३॥प्रतिरात्रीं तया स्थालीचें स्मरण । एकदां स्फुरण वेदांचें त्या ॥४॥कर्मबोधक त्या जाणूनियां श्रुति । जेथे वनामाजी त्यजिली स्थाली ॥५॥पातला त्या स्थानीं पुरुरवा मोदें । पुढती वृत्त सांगे वासुदेव ॥६॥१०६शमीमाजी तदा अश्वत्थ देखिला । अश्वत्थाच्या केल्या अरणी दोन ॥१॥उर्वशीचा लोल लाभो या इच्छेनें । निर्मिला मंथनें अग्नि तेथ ॥२॥अग्नीसी त्या मानी पुरुरवा पुत्र । हवन तयांत करितां सिद्धि ॥३॥हवनें त्या नृपें तुष्ट भगवंत - । करुनि, आनंद मानियेला ॥४॥ओंकारचि तेथ नारायण देव । लौकिकाग्नि एक वर्ण हंस ॥५॥त्रेतायुगापूर्वी व्यवस्था यापरी । पुढती जाहली व्यवस्था हे ॥६॥पुरुरवा होई कर्मप्रवर्तक । गंधर्वलोकास पुढती गेला ॥७॥वासुदेव म्हणे पुरा ध्यानमग्न । सत्वगुणें जन सत्ययुगीं ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP