मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय १५ वा स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय १५ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ९ वा - अध्याय १५ वा Translation - भाषांतर १०७आतां ऐका पुढिल वंश । अप्सरेतें पुत्रषट्क ॥१॥आयु, श्रुतायु, सत्यायु, । रय, विजय आणि जयु ॥२॥वसुमान् श्रुतायूचा । श्रुतंजय सत्यायूचा ॥३॥रयपुत्रा नाम ‘एक’ । अमित नामें जयपुत्र ॥४॥पुत्र विजयालागीं भीम । पुत्र भीमाचा कांचन ॥५॥तया होत्रक, जन्हु तया । गंगाजल चुळका जया ॥६॥पूरु, बलाक, अजक । अजकासी पुत्र कुश ॥७॥तया कुशांबु त्या गाधि । विश्वामित्र पुत्र त्यासी ॥८॥वासुदेव म्हणे वृत्त । ऐका आतां बोधप्रद ॥९॥१०८सत्यवती कन्या गाधीची विख्यात । मागे विवाहार्थ ऋचीक तीतें ॥१॥मान्य तें रायासी न होई यास्तव । वदल तो काय ऐका तदा ॥२॥सहस्त्र संख्य जो अर्पी शामकर्ण । सत्यवती जाण मुने, तया ॥३॥आशय रायाचा जाणूनि ऋचीक । प्रार्थी वरूणास अश्वांस्तव ॥४॥वरुणकृपेनें अश्व ते लाभतां । उपाय गाधीचा नुरला कांहीं ॥५॥वासुदेव म्हणे कन्या नाइलाजें । अर्पी ऋचीकातें गाधिराज ॥६॥१०९पुत्रार्थ पुढती प्रार्थितां ऋचिका । चरु तदा सिद्ध करी ॥१॥कांतेस्तव ब्रह्मतेजसमन्वित । क्षात्रबलयुक्त तन्मातेसी ॥२॥मंत्रूनि ते चरु गंगेवरी जातां । विपर्यास त्यांचा करी माता ॥३॥कन्येचा ते स्वयें, आपुला कन्येसी । अर्पूनि भक्षिती उभय चरु ॥४॥कळतां तें मुनि बोलला कांतेसी । होईल तुजसी क्रूर पुत्र ॥५॥तेंवी ब्रह्मवेत्ता शांत त्वन्मातेसी । होई निश्चयेंसी पुत्र कांते ॥६॥वासुदेव म्हणे सत्यवती खिन्न । जाहली ऐकून पतिवच ॥७॥११०प्रार्थितां मुनींसी बोलले ते तिज । पौत्र तव क्रूर होवो तरी ॥१॥पुत्र जमदग्नि जाहला तियेसी । नदी ती कौशिकी पुढती होई ॥२॥रेणूची जे कन्या ‘रेणुका’ नामक । कांता जमदग्नीस प्राप्त झाली ॥३॥वसुमना आदि पुत्र तियेप्रति । कनिष्ठ तो जगीं ख्यात राम ॥४॥विप्रसंरक्षण धर्म क्षत्रियांचा । विसरले तदा क्षत्रिय तें ॥५॥छळचि विप्रांचा मांडिला तयांनीं । वासुदेव ध्यानीं घ्यावें म्हणे ॥६॥१११ईश्वरांश राम भूमिभार हरी । शासन तो करी क्षत्रियांसी ॥१॥वृत्तांत तो आतां निवेदिती शुक । अर्जुन विख्यात हैहयकुळीं ॥२॥ईश्वरांशदत्तकृपेनें तयासी । सहस्त्र बाहूंची प्राप्ति होई ॥३॥तेणें तो अजिंक्य होई सकलांसी । वैभव संपादी त्रैलोक्याचें ॥४॥वासुदेव म्हणे ऐसा राव श्रेष्ठ । नर्मदातीरास प्राप्त झाला ॥५॥११२जलक्रीडेस्तव पात्रीं उतरुनि । सहस्त्र बाहूंनीं अडवी जळ ॥१॥त्याच दिनीं तयातीरीं दशकंठ । सेनेसवें प्राप्त झाला होता ॥२॥नर्मदेच्या तीरीं तळ त्या सैन्याचा । रावणही पूजा करी तेथें ॥३॥इतुक्यांत जल कोंडिलें जें तेणें । सैन्य दुष्टासवें बुडूनि जाई ॥४॥अपराधें तया कोपे दशकंठ । करावया युद्ध सिद्ध होई ॥५॥मर्कटासम त्या बांधूनि अर्जुन । करुनि अपमान मुक्त करी ॥६॥वासुदेव म्हणे ऐसा तो विक्रमी । अर्जुन काननीं सहज फिरे ॥७॥११३जमदग्निमुनिआश्रमासन्निध । एकदां सहज येई राव ॥१॥कामधेनुसाह्यें स्वागत तयाचें । पाहूनियां, कोपे राव मनीं ॥२॥ऐश्वर्य मुनींचें सहन न तया । पाश तैं बांधिला धेनूलागीं ॥३॥बलात्कारें तिज चालला घेऊनि । नव्हता आश्रमीं राम तदा ॥४॥येतांचि तयासी कळले हें वृत्त । होई अति क्रुद्ध तदा राम ॥५॥परशु, चापही करुनियां सज्ज । गजावरी सिंह तैसा धांवे ॥६॥वासुदेव म्हणे गांठिले अर्जुना । युद्ध तया स्थाना घोर होई ॥७॥११४येईल जें सैन्य वधी तया राम । अक्षौहिणी सैन्य सप्तदश ॥१॥मांस-रुधिराचा कर्दम त्या ठाईं । क्रोधाकुल होई अर्जुन तैं ॥२॥पंचशत चापें घेऊनियां करीं । रामावरी करी शरवृष्टि ॥३॥छेदिले ते बाण सर्वही रामानें । ताडी तैं वृक्षानें अर्जुन त्या ॥४॥वृक्ष पर्वत ते येतां अंगावरी । नवलचि करी राम तदा ॥५॥समस्तही वृक्ष तेंवी कंठनाळ । छेदूनियां काळ होई त्याचा ॥६॥वासुदेव म्हणे पुत्र तदा त्याचे । पलायन साचें करुनि गेले ॥७॥११५कामधेनु घेऊनियां येई राम । पित्यासी वंदून अर्पी तया ॥१॥वर्तमान सर्व तेंवी त्या निवेदी । ऐकूनि पित्यासी खेद वाटे ॥२॥जमदग्नि म्हणे विक्रमी तूं बाळा । नृपाळ वधिला देवरुपी ॥३॥योग्यता पातलों क्षमेनेंचि रामा । भूषण ब्राह्मणा क्षमा हेंचि ॥४॥क्षमेनेंचि ब्रह्मा उच्चपद ल्याला । त्यागूनि क्षमेला वरिलें पाप ॥५॥केवळ हत्या न, ब्रह्महत्येहूनि । नृपाळ वधूनि पाप लागे ॥६॥ईशचिंतनें तूं करीं तीर्थाटन । पापाचें क्षालन करीं तव ॥७॥वासुदेव म्हणे जमदग्नि ऐसें । प्रायश्चित्त सांगे परशुरामा ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP