मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|भगवद्गीतास्तोत्र| अध्याय दुसरा भगवद्गीतास्तोत्र नमन अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा भगवद्गीतास्तोत्र - अध्याय दुसरा तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhanggitamarathisanttukaramअभंगगीतातुक्राराममराठीसंत अध्याय दुसरा Translation - भाषांतर ॥७२८२॥श्री गुरुव्यासाचा शिष्या सद्विद्येचा । धृतराष्ट्र खेदाचा तोषदानी ॥१॥बोले राया देव उघड अपूर्व । तरीं हे वैभव भोक्ता होसी ॥२॥कृपेनें व्यापीला सांडित अश्रुला । येथें पार्थ भ्याला विषादानें ॥३॥मग मधुरिपू शांतवी अमूपू । शांत व्हावें वपू तुका ह्मणे ॥४॥॥७२८३॥बोले भगवान योग्या जो निधान । कसें कश्मलपण तुज आलें ॥१॥उदेलें विषमीं न लागे सत्कर्मी । जेणें राहावें धार्मी अकीर्तीच्या ॥२॥जोडी नरकासी हे दिसे आह्मासी । त्यागी बुद्धि ऐसी तुका ह्मणे ॥३॥॥७२८४॥पार्था षंढ होणें नको लाजिर्वाणें । तुज पूर्णपणें बाधक जें ॥१॥द्वाड हे कल्पना तूज हे साजेना । तुछ त्यागी रणालागीं । ऊठ ॥२॥लंडीपण परंतपा हे त्यागी पां । मार्ग धरी सोपा वडीलांचा ॥३॥तुका ह्मणे देवो बोलतां सद्भावो । वदे महा बाहो पुढें ऐका ॥४॥॥७२८५॥कैसा भीष्मद्रोणा भांडो जगजीवना । ज्यांसी बोलवेना विपरीत ॥१॥त्यांसी बाणवरी वर्षोनि समरीं । पाडों धरेवरी घडे कैसें ॥२॥तुका ह्मणे माया जीवीं झोंबलीया । विसरला क्रिया कौरवांच्या ॥३॥॥७२८६॥न मारीं गाया वडिलां गुरुतें । भिक्षा खाणें मातें श्रेय वाटे ॥१॥द्रव्यलाभें घात करावा या लोकीं । जेणें सर्वा मुखीं निंद्य व्हावें ॥२॥यांच्या रक्तें भोग माखुनी भोगावे । भक्षी मांसासवें मद्य जैसें ॥३॥नको रे दयाळा घालुं या अकर्मी । सुखी तूझे नामीं तुका म्हणे ॥४॥॥७२८७॥आह्मी जिंकूं बरें तेंच आम्हा देवा । किंवा मेल्या जीवा मोक्षपद ॥१॥दोन्ही मार्ग त्यानें जरी मारुं यांस । तथापी प्राणास चिरंजीव ॥२॥वांचों बहू काळ वंशवृद्धि करुं । न इच्छूं वेव्हारु तुका ह्मणे ॥३॥॥७२८८॥या धर्माच्या श्रमें बुद्धि मूढ झालों । तुज शरण आलों जगदीशा ॥१॥श्रीरंगा कल्याण ज्या माजी असेल । तोचि वदें बोल आदराचा ॥२॥स्वामी सद्गुरु हो शिष्या मी तुमचा । धारक शिक्षेचा तुका ह्मणे ॥३॥॥७२८९॥न तें दिसे कांहीं मम शोकनाशक । जो शोक शोषक इंद्रियांसी ॥१॥समृद्धि राज्याची त्रिदशेंद्र लक्ष्मी । पावेन तरीं मी सुखी नव्हे ॥२॥तुका दास विनवी अगा पुरुषोत्तमा । बोलतों तें क्षमा अपराध ॥३॥॥७२९०॥संजय ह्मणे राया हृषीकेशाप्रती । केली हे विनंती गुडाकेशें ॥१॥शेवटीं वचन बोले हें चि पार्थ । युद्ध आत्मस्वार्थ न करीं मी ॥२॥गोविंदाचें पदीं ठेविला मस्तक । जन्माचें सार्थक तुका ह्मणे ॥३॥॥७२९१॥त्यातें हृषीकेश हांसोनी बोलिला । विस्मय दाटला अभ्यंतरीं ॥१॥विषाद जाणोनी कळवळिला हरी । बोलेंची उद्धरी संशयातें ॥२॥सैन्यद्वयामाजी संवादती दोघे । तुका ह्मणे जगा तारावया ॥३॥॥७२९२॥मेघगंभीररवें बोले रमानाथ । अयोग्य हा पंथ शोक दीसे ॥१॥आह्मी जें बोलावें तें तंव राहिलें । पांडित्य निघालें तुह्मापून ॥२॥पांडित्य बोलसी शोकही करिसी । परि गा नेणसी निजहित ॥३॥मेल्या जीत्या माजी शोका नेदी चित्त । तो मान्य पंडित तुका ह्मणे ॥४॥॥७२९३॥कधीं कोणे काळीं न होतों जी आह्मी । येथें कधीं तुह्मी नसाल कीं ॥१॥हे राजे ह्या सेना ऐसे आप्त वर्ग । नव्हता प्रसंग समराचा ॥२॥पुढें नाश झाल्या कोणीच उरेना । सृष्टी हे रचना जाय क्षया ॥३॥तुका ह्मणे देव अनादि सांगतो । नित्यची वर्णितो खळची हा ॥३॥॥७२९४॥जीवास शरीरीं जैसें बाळपण । सवेंची तारुण्य अवस्था हे ॥१॥पुढें तैसे वृद्ध गळें देहशक्ती । पुढें मृत्यु प्राप्ती ठेविलीसे ॥२॥पुन्हा यम जाची पुन्हा जन्मा येणे । हें घडें रीतीनें अचुक कीं ॥३॥तैसी देहांतर प्राप्ति ओळखावी । मोहेना पदवी धैर्ये तुका ॥४॥॥७२९५॥ऐके आतां पार्था सुखदु:ख दोन । देती विषयपान कर्णा जेव्हां ॥१॥याचिलागीं नाश उत्पत्ती सोसावी । भारता ऐकावी नीती माझी ॥२॥तुका ह्मणे देवो एक गूज सांगें । जेणें साधु अंगें पावे खूणा ॥३॥॥७२९६॥पैंगा नदेतील व्यथा । जया पुरुषा समर्था ॥१॥सम भावना आरंभा । उत्तम नरीं पुरुषर्षभा ॥२॥दु:खीं एक भावो । तोच मोक्षपुरीं रावो ॥३॥आणिक सांगणें तें कांहीं । तुका वदे उरलें नाहीं ॥४॥॥७२९७॥असद्देहन जो नित्य । जीव सन्नतो अनित्य ॥१॥दोहींचें तत्व या दोंत । ब्रह्म देख तत्वज्ञानें ॥२॥तुका करितो प्रार्थना । झणी ह्मणाल उमजेना ॥३॥॥७२९८॥नाशारहित जाणा तेंची । जग व्यापी सत्ता त्याची ॥१॥वार्त्ता तयाची कोणाला । नसे ठाऊकी जनाला ॥२॥त्याचा नाश या जीवानें । नव्हे कोटी ही साधनें ॥३॥मग शोक अविनाशाचा । तुका ह्मणे मिथ्या वाचा ॥४॥॥७२९९॥देह नाशवंत पुरे । जीव ज्ञानसा चोखा रे ॥१॥अंश ब्रह्मीचा तो नित्य । नव्हे कधीं ही असत्य ॥२॥अविनाशी अप्रमेय । जाणुनि युद्ध करी स्वयें ॥३॥तुका ह्मणे हा विकल्प । धरिल्या बाधील गा पाप ॥४॥॥७३००॥भेदवादी यांचें मत ॥ मारी ह्मणती ते नेमांत ॥१॥चार्वाकाचें ज्ञान खोटें । मेले ह्मणती अवचटे ॥२॥परी नेणती दोघेही । न तो मारी ह्मणे कांहीं ॥३॥तुका विनवितो संतां । चित्त देणें अपूर्वता ॥४॥॥७३०१॥नव्हे जन्मची जयासी ॥ तया मृत्यु केवीं ग्रासी ॥१॥कधीं देहाचे संगती ॥ नेणे येणेजाण्याप्रती ॥२॥देहासंगे असतां नाहीं ॥ हेंचि त्याचें नवल पाही ॥३॥अज नित्य शाश्वत तो ॥ देहें दृश्यें गवसेना तो ॥४॥मारितां ही मारवेना ॥ तुका ह्मणे या पुराणा ॥५॥॥७३०२॥पूर्वोक्त याच्या लक्षणा । पुरुष जाणे विचक्षणा ॥१॥येर्हवीं या प्रकृतीला ॥ मारी कोण वेगळाला ॥२॥मारितो कैसा आतां ॥ तुका विनवीतो श्रोतां ॥३॥॥७३०३॥वस्त्रें जुनी त्यागुनियां ॥ नवीं घेणें पांघरावया ॥१॥शरीराचे तेच भावें ॥ येथें चैतन्यें वागावें ॥२॥जीर्ण देह त्यागे दुजा । तुका ह्मणे याच काजा ॥३॥॥७३०४॥याला न तोडिती शस्त्रें । वन्ही जाळीना शिखाग्रें ॥१॥न पाणी बुडवी यासी । वायु न उडवी बळेंसी ॥२॥शुष्क वातें अणुगर्भू । हा तो नित्यच स्वयंभू ॥३॥सत्तामात्रें या निराळा । तुका म्हणे धन्य कळा ॥४॥॥७३०५॥छेदावया न हा योग्य । यत्न अग्रीचा अयोग्य ॥१॥नसे सुकला हा कधीं । भिजला नाहीं काय बाधी ॥२॥स्थाणुपरी स्थिर सवीं । नित्याचळ भरली उर्वी ॥३॥अचंचळ रुप ज्याचें । तुकया ध्यान लागे त्याचें ॥४॥॥७३०६॥ज्यासी आकारचि नाहीं । त्याचें चिंतन तें कायी ॥१॥जेथें द्वैत हें शीरेना । निर्विकार हेंचि जाणा ॥२॥त्या कारणें यासि असे । शोक न धरी मानसें ॥३॥केला शोक फळ काय । तुका ह्मणे वायां जाय ॥४॥॥७३०७॥आतां देहासवें होतो । जरी मरतो मानिशी ॥१॥तरी तुज महाबाहो । शोकग्रहो नसावा ॥२॥सर्व जाण तयांच्या राया । पाहे हृदयां शोधोनी ॥३॥तुका ह्मणे कृपावंता । दास चिंता तुज आहे ॥४॥॥७३०८॥जन्मा आलिया मरण । टाळी कोण अर्जुना ॥१॥मृत्युपाठि लागे जन्म । कोण नेम ढांसळी ॥२॥परिहारा जे विरहित नेदी चित्त त्या शोकीं ॥३॥तुका ह्मणे जे अयोग्य । होय भोग्य कोठोनी ॥४॥॥७३०९॥भूतजाति आदि एक । प्रकाशक अव्यक्त ॥१॥मध्य व्यक्त याचा भाव । जो स्वभाव मृगजळीं ॥२॥लय अव्यक्तीं नेमिला । खेद आला तुज कैसा ॥३॥उगी त्या चित्त वेदना । तुकया ध्याना ते नये ॥४॥॥७३१०॥कोणी पाहती आश्चर्ये । निज धर्मे साटोपें ॥१॥कोणी आश्चर्यातें बोले । निके भले मन देती ॥२॥कोणी आश्चर्यया ऐके । वार्ता पिके मोक्षाची ॥३॥कोणी नेणती ऐकुनी । ऐसी काहणी ह्मणे तुका ॥४॥॥७३११॥देहधारी न हा बद्ध । जो अबद्ध यमासी ॥१॥सर्व देहांत भारता । पूर्ण सत्ता चिन्मय ॥२॥भूतें तरीं नाशवंत । खेद करीत कशाचा ॥३॥नव्हेसि अर्जूना तूं योग्य । भवअरोग्य तुकया ॥४॥॥७३१२॥स्वधर्म पाहोनि कृपा । आली बापा ये वेळे ॥१॥तीर हें योग्य नव्हे दया । पतनीं काया घालील ॥२॥धर्मयुद्धारे वांचुनीं । श्रेय ये स्थानीं दिसेना ॥३॥क्षत्रियाचे क्षात्र धर्म । तुका वर्मेनिवेदी ॥४॥॥७३१३॥अर्जिल्याविण झालें हें । पुरत्या पाहे दृष्टीनें ॥१॥द्वार उघडे स्वर्गाचें । भाग्य साचें म्हणोनी ॥२॥सुखी निर्भय तें ऐसें । क्षत्रिय हर्षे रणांगणीं ॥३॥लाभ म्हणे तुकयाला । हाच आला जन्माचा ॥४॥॥७३१४॥आतां याच धर्मयुद्धीं । दृढ बुद्धि सोडिली ॥१॥न भांडेन म्हणोनियां । छंद वांयां घेतला ॥२॥तरी सत्कीर्ति जाउनी । निंदा जनीं पावसी ॥३॥तुका म्हणे आनंदती । पाप हातीं धरलिया ॥४॥॥७३१५॥तुझी अपकीर्त्ती लोक । हे चंद्रार्क वाणीती ॥१॥पुरुष जो कीर्त्तिमान्य । त्या अमान्य हे गोष्टी ॥२॥मरण बरें एक वेळां । परी जिव्हाळा हा खोटा ॥३॥तुका ह्मणे येथें निंद्य । तेथें वंद्य होईना ॥४॥॥७३१६॥भयें गेला रे पळाला । पार्थ भ्याला आह्मासी ॥१॥हांसतील महारथी । अर्थ स्वार्था नाडू हा ॥२॥महारथी नाम तुझें । सांडेल वोझें ब्रीदाचें ॥३॥तुका याच पंथें मान्य । घेसी अन्य लाघव ॥४॥॥७३१७॥बोलों न येती ते बोल । शस्त्रें खोल भेदिती ॥१॥बहु रिपु पार्थ तुज । देती लाज मनस्वी ॥२॥प्रताप तो निखंडूनी । विटंबणी चाळीती ॥३॥दु:ख कोणत्या परतें । जें तुकयातें सुख दे ॥४॥॥७३१८॥मेल्या येथें स्वर्गवास । हा तो मोडिला उल्हास ॥आला वांटा स्वकर्मास । तो कोणास भंगेना ॥१॥नाहीं तरी भुजातेजें । जिंकिलिया कुरुराजे ॥ भूमंडळीचें भोगीजे । सर्व सुख नित्यानी ॥२॥ययालागीं शोक त्यागी । उठे धैर्य बळें अंगीं ॥झुंझाचिये सेलभागी । अधिकारी तूं होई ॥३॥तुका ह्मणे भूमिभार । उतरावा हा निर्धार ॥यास्तव अनुभवसार । देवो त्यास निवेदी ॥४॥॥७३१९॥प्रीति धरिल्या जें पावे । सुख तेथें गा संभवे ॥विषय वियोगीं हे लावे । दु:खार्णव लहरी ॥१॥दोहीं समबुद्धी धरी । लाभालाभ तपासरी ॥ मग तूं सुखें युद्ध करी । पाप माथां आदळेना ॥२॥निर्विकल्प तो नि:संगु । नि:संगीच अनुभवु ॥तुका ह्मणे चांगू । निजमोक्ष आतुडे ॥३॥॥७३२०॥बोलिलों येथें अर्जुना । सांख्य बुद्धी हेची जाणा ॥सर्वाविशी तूं देखणा । हित घेई आपुलें ॥१॥योगीं बुद्धि धनुर्धरा । जींत बहुतसे विचारा ॥त्यांत देइ कर्णद्वारा । जें स्वहित सर्वाचें ॥२॥अहो प्रत्यक्ष कर्मयोगें । योगीं रचा अंतरंगें ॥धुवंग ने घेणें जग । तारावया बुद्धी तें ॥३॥आतां तिच्या संगतीनें । कर्मबंधें मुक्त होणें ॥तुका ह्मणे सावधपणें । बुद्धिवंतें ऐकावीं ॥४॥॥७३२१॥विघ्नें छळितां पूर्ण । दिसो येतें येथें गौण ॥मिथ्या प्रत्यवायपण । नास्तिकत्वें उडेल ॥१॥महा भयातेंही नाशी । भुतां जेविं देवलसी ॥कीजे स्वल्प ईश्वरासीं । अर्पिल्याचीं हें फळ ॥२॥तुका ह्मणे दीनानाथ । हीन दीन पाहुनि पार्थ ॥दया करोनि परमार्थ । हातीं त्याच्या देतसे ॥३॥॥७३२२॥निश्चयाची ऐक बुद्धी । जे का वारक उपाधी ॥यया मार्गामधीं । ऐक कुरुनंदना ॥१॥बहु शाखा भवरुखा । छाया शीतळ स्वात्मिका ॥जे ते अनंत कामुका । बुजवणि जाहाली ॥२॥तुका म्हणे बुद्धियोगें । साधक तरती निजांगें ॥कोणी कुबुद्धी कुसंगें । प्राणीमात्र बुडाले ॥३॥॥७३२३॥मूढ उद्बोधनीं प्रीती । वेदीं गर्जिन्नल्या श्रुती ॥साधन योगाच्या हातीं । स्वर्ग फूल अर्पीती ॥१॥चाळवले बहु गेले । मुखीं फळ तें मानिलें ॥ते वेदवादीं रतले । नाहीं पाहिले अनुभव ॥२॥स्वर्गा परतें नाहीं सुख । ऐसे पावले मूढ देख ॥तुका देवापासीं सुख । अक्षयाचें मागत ॥३॥॥७३२४॥थोरा कर्मे साधे धनें । जन साधिती साधनें ॥नावेक होत्या मार्गानें । द्विज वृंदे चालिलीं ॥१॥भोग भोग्य गती अशा । मत्स्य लुब्ध गळा मिषा ॥स्वर्ग पर पैं दुराशा । जन्म कर्म फळद्रूप ॥२॥तुका ह्मणे वास नेला । भोग गोडी अशेषाला ॥सुख जाय मग शोकाला । प्राप्त होणें अखंड ॥३॥॥७३२५॥भोगाभ्यासें भाग्य दिसे । सक्त होई मानसें ॥जैसें सकामासी पिसे । पैं नारीचें लागलें ॥१॥हरिली कामनेनें बुद्धि । उरों नेदी आत्मशुद्धि ॥हिवें पिडला तो कधीं । प्रावरणासि सोडिना ॥२॥मग समता समाधींत । बुद्धि घालूं नेदी हात ॥तुका म्हणे प्रेत । काय जाणें अमृता ॥३॥॥७३२६॥कामिक चित्ताचें रंजन । वेद बोलिला वचन ॥परी विषय ते सान । मानिता चि पोससी ॥१॥पार्था निष्काम होय तूं । माझें वाक्य धरुनी तूं ॥जैसा निर्द्वद्व निश्चितू । नित्य सत्व न सोडी ॥२॥आत्मवेत्ता होऊनियां । त्यागी कल्पनीक माया ॥तुका म्हणे काया । काळ जैसा सांडवी ॥३॥॥७३२७॥स्वल्पोदकीं जें जें कार्य पैं उपजे । तें तेंच निपजे डोहामाजी ॥१॥वेदक्रिया काम्य उद्भवे नियम्य । तें तें घडे साम्य ब्रम्हबोधीं ॥२॥ब्रम्हीं जो ब्रम्हज्ञ सुखी तो सर्वज्ञ । तुका म्हणे प्राज्ञ पुढें ऐका ॥३॥॥७३२८॥अधिकार कर्मी तूं तें आहे पार्था । परी न सर्वथा फळीं त्याच्या ॥१॥कंटाळुन जरी त्याग कर्मी धरी । ते या धरेवरी अयोग्य कीं ॥२॥झणी फळ आशा धरीसी वीरेशा । तुका म्हणे नाशा कारण हें ॥३॥॥७३२९॥सिद्धि गेले कर्म तरी ना संभ्रम । आणि उपोपरम जाचूं नेदी ॥१॥ऐसें करी चित्त कर्म आचरत । फळीं त्याचा हेत न ठेवूनी ॥२॥योगस्थ करावें समत्वीं भरावें । तुका म्हणे व्हावें जीवन्मुक्त ॥३॥॥७३३०॥बुद्धि योगाहून कर्म योग सान । धनंजया ज्ञान बुझें ऐसें ॥१॥पाहे रक्षक या बुद्धि कुरुराया । तुच्छ कर्मे तूं या टाकी फळें ॥२॥प्रकृतीवांचूनी भांबावले ज्ञानी । तुका म्हणे ज्यांनीं आटाआटी ॥३॥॥७३३१॥जितां पापपुण्य नाशी बुद्धिगुणें । ज्याची पैं अगण्य सद्वासना ॥१॥ह्मणोनी पांडवा बुद्धियोगघ्यावा । कर्मी अनुभवा कुशळत्वें ॥२॥येणे मार्गे जाणें कर्मासी तोडणें । आनंद भोगणे ह्मणे तुका ॥३॥॥७३३२॥शास्त्रज्ञ जे बुद्धीयुक्त पैं विशुद्धी । कर्मफळ विधी सोडूनियां ॥१॥प्रपंचबंधन विवेकें तोडून । पावती निर्वाण निर्दोषीक ॥२॥तुका ह्मणे देव ज्ञानाचा अनुभव । सुगम हे ठेव साधकाची ॥३॥॥७३३३॥ अज्ञान मोहमय व्याप्त चित्त स्वयें । तेव्हां तेज पाहे तेच बुद्धि ॥१॥मग श्रुताश्रुत भोगाची प्रतीत । झाल्या प्राप्त होत वैराग्य तें ॥२॥तुका ह्मणे प्राण पश्चात्तापाविण । न देखे निर्गुण वैराग्य तें ॥३॥॥७३३४॥फळांच्या श्रवणें बुद्धि शिणे । तेणें मेळवणें निरंतर ॥१॥ते शुद्ध व्हावया समाधी आलीया । जेव्हां कां विसांया बुद्धि येते ॥२॥तेव्हां तूं पावसी माझिया योगासी । देव अर्जुनासी ऐसें बोले ॥३॥ऐकावया चित्त एकाग्र मारुत । तुका ह्मणे मात धन्य झाली ॥४॥॥७३३५॥बोले पांडुपुत्र देवासी उत्तर । सांगा कोण नर स्थितप्रज्ञ ॥१॥जो कां समाधिस्थ सर्वदा नेमस्त । केशवा प्रशस्त बोलावे जी ॥२॥वागतो या जगीं कैसा हो प्रसंगीं । तुका ह्मणे उगी निगी कैसी ॥३॥॥७३३६॥अगा ये अर्जुना सावधान मना । जेणें या कामना टाकियेल्या ॥१॥स्वरुपीं मानस तोषलें सुरस । निधी पायाळास तयारीतीं ॥२॥स्थितप्रज्ञ तोची ह्मणूं सव्यसाची । समाधी जयाची अखंडीत ॥३॥आनंदे भरीत सर्वकाळ चित्त । तुका ह्मणे स्थितप्रज्ञ ऐसा ॥४॥॥७३३७॥न दु:ख मानसीं उद्विग्न होईना । सुखेंही वांछीना श्रम सोसे ॥१॥आस्था न धरीच आसोनीयां आनी । कामक्रोध मनीं भयातीत ॥२॥स्थितबुद्धि मूनी तयास ह्मणावें ॥ तुका म्हणे पावे महासुख ॥३॥७३३८॥सर्वा देहीं प्राण समान त्यापरी । नाठवें अंतरी गुण दोष ॥१॥बर्यावाईटाचा घे तूं अनुभव । होऊं नेदी जीव कासावीस ॥२॥मुखें उच्चारीता तोचि प्रज्ञावंत । प्रतिष्ठा पावत म्हणे तुका ॥३॥॥७३३९॥कूर्म जैसा भावरोधी शरीराचा । तैसा इंद्रियांचा मेळू धरी ॥१॥अवरोनि असे ऐसा जो योगीया । प्रज्ञा त्याची तया प्रतिष्ठीत ॥२॥पर्वकाळीं दान सुकृत दात्याचें । तैसें प्रपंचाचे तुका मानी ॥३॥॥७३४०॥योगी वीतरागी त्याचें एक मन ॥ भोग नसतां जाण वासना हे ॥१॥जरी आसे तरी ब्रम्हात्म दर्शनीं । मुक्त येथें ज्ञानीं होऊं सरती ॥२॥तुका म्हणे मन झालीया निश्चळ । तेंचि तें केवल परब्रम्ह ॥३॥॥७३४१॥आत्मज्ञानी नर जो पूर्ण प्रयत्नी । कौंतेया जी ध्यानीं माझ्यारुपीं ॥१॥परि इंद्रियांसी विसांवला जरी । तरी ते अघोरीं घालतील ॥२॥तुका ह्मणे मन इंद्रीयां स्वाधीन । म्हणोनि साधन विघ्न पावे ॥३॥॥७३४२॥तया मनालागीं आवरोनि आसे । युक्तराज तसे मत्पर जे ॥१॥इंद्रियेंहि वश ज्याला पैं असती । त्याची प्रतिष्ठित प्रज्ञा होय ॥२॥तुका म्हणे येथें कुसंग नसावा । तेणेंचि पावावा निज मोक्ष ॥३॥॥७३४३॥चिंती विषयांला उपजे वासना । भोग हा पुरेना विषयाचा ॥१॥तो या कामालागी उत्पन्न करितो । काम तो निर्मितो क्रोधरुपा ॥२॥तुका म्हणे बीजापासुनी अंकुर । होती हा विस्तार येच परी ॥३॥॥७३४४॥क्रोधें देहात्मता बुद्धि हे उपजे । मोहें कवळी जे अंत:कर्ण ॥१॥तेथुनियां आत्मस्मृतिभ्रंश जाण । स्मृतिभ्रंशें जाण बुद्धिनाश ॥२॥मग तेथुनियां पूर्ववतमूढ । होतसे सदृढ म्हणे तुका ॥३॥॥७३४५॥रागद्वेषावीण इंद्रियें स्वाधीन । तरी तेणें मन सोडवेना । घेतसे विषय परि विशुद्धात्मा ।प्रसादीं महिमा पावेल तो ॥२॥हरिहरां मन झालें जें अर्पण । तुका ह्मणे पूर्ण प्रसाद तो ॥३॥॥७३४६॥प्रसादें याचिया सर्व दु:खा नाश । पावे अविनाश महा सुख ॥१॥प्रसन्न ते बुद्धी चित्ताची आयती । पावे तो महंती प्रतिष्ठेची ॥२॥शीघ्र तया सर्व लाभे महा लाभ । तुका ह्मणे स्तंभ सुकृताचा ॥३॥॥७३४७॥अयुक्त तो त्याला नसे बुद्धि पार्था । ध्यानाचिया पंथा जावों नेणें ॥१॥ध्यान नाहीं तेथें शांति ही वसेना । सुख आठवेना अशांतासी ॥२॥तळमळी चित्त कैंचे त्याचें हीत । तुका ह्मणे अंत सद्विद्येसी ॥३॥॥७३४८॥इंद्रियें वर्ततां जे कां । मना देती मोकळिका ॥१॥तयाचि रे मग बुद्धी । हरोनि नेत देहशुद्धी ॥२॥वारा लागलीया नाव । पावो नेणें पैल ठाव ॥३॥तुका ह्मणे साधकानें । बोध मानीजे सुखानें ॥४॥॥७३४९॥तस्मात इंद्रियें । सर्व ज्याची मनोमयें ॥१॥विषया पासोनी । जो बैसला आटोपोनी ॥२॥महाबाहो प्रज्ञा त्याची । महिमा पावे प्रतिष्ठेची ॥३॥तुका ह्मणे आतां । लाभ घेणें सावध श्रोता ॥४॥॥७३५०॥ब्रह्मीं लीन त्याची राती । जेथें लोक हे वागती ॥१॥जागा जेथें साधु राहे । तेथें लोक झोंपी जाये ॥२॥विषयीं सावध जन । तेथें याचें भ्रांत मन ॥३॥तुका विनवी थोडिये । सुख जोडणें जोडिये ॥४॥॥७३५१॥नाना उदक श्रव । पाहे उदकाचा ठाव ॥१॥तरि मर्यादा न सांडी । पृथ्वी राखीतो कोरडी ॥२॥तैसे भोग भोगी सारे । मस्त नोहे अविचारें ॥३॥निष्कामाचें पावे फळ । जरी कुटुंबी केवळ ॥४॥शांति बाणे त्याचे अंगीं । शिव वेष्टित भुजंगी ॥५॥अविषम ते पदवी । तुकया समची भोगावी ॥६॥॥७३५२॥सर्व भोग विषयाचे । सुख थुंकूनी कामाचे ॥१॥भोग भोगी निस्पृहाचे । आत्मानंद पदवीचे ॥२॥परि मी आणी माझें । दोनी नातळती वोझें ॥३॥ज्ञानी शांतिस पावतो । तुका ह्मणे मम गुरु तो ॥४॥॥७३५३॥हे तो ब्रह्मींची राहाटी । पाहे पार्था ज्ञानदिठीं ॥१॥इचें घर पावलिया । मोह शिवेना हृदया ॥२॥अंत झाला इच्या संगीं । सायुज्यास पावे अंगीं ॥३॥तुका म्हणे वाट । केली सुलभ हे नीट ॥४॥ N/A References : N/A Last Updated : June 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP