॥लळीत॥ आत्मकृत

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


(मुळांत येथें आत्माराममहाराजकृत लळीत दिलें आहे.)

॥वोवी॥ प्रसाद वाटावा आरती होतां । विडे मान वोपिजे मग मानस्छा । उपहाराची वारुनि चिंता । कीर्तनासी प्रारंभिजे ॥७७॥
वान्नरकाला वदताती लोक । वान्नर निरोपु कीर्तनकौतुक । आणिके ठाई चालविजे दंडक । सांप्रदाय नेमक उत्छावीं ॥७८॥
पाहणारे ते येताती पाहती । ऐकुनि कोणी तोषती चित्तीं । खूण आपणा ही कळाया श्रोतीं । प्रांजळ लिहिलें तें श्रवणकरा ॥७९॥

॥ग्रंथ वान्नरकाला॥ आत्मकृत॥
(मुळांत येथें आत्माराममहाराजकृत वानरकाला दिलेला आहे.)

॥वोवी॥ हे कथा करुनि सांजपरियंत । मग स्वामिदेवाचा ओढावा रथ । बाणतीर्थी होऊनि सुस्नात । प्रसाद द्यावा सकळासी ॥८०॥
सगजरें मिरवत येऊनि । देव शोभवावा सिंहासनीं । पारणें करुनि दुसरे दिनीं । साहित्यामाजि असावें ॥८१॥
चतुर्दशीला कीर्तन संतर्पण ॥८२॥
प्रतिपदापासुनि मोकळिक । राहो जावो येवोत भक्तलोक । लळितयुक्त पुण्यतिथ्याहि दंडक । एवं संपादन स्वहित कीजे ॥८३॥
सुचविली लीळा हे सादृश्य मात्र । धन्य संत तें क्षेत्र पवित्र । येकदां येउनि कवेश्वर । बोलिला अभंग ऐका तो ॥८४॥

॥अभंग॥ कलीं अपचंदग्राम । कासीसमान उत्तम ॥१॥
किती वानूं तीर्थोदकी । कीर्ति अमृताची फीकी ॥२॥
कुक्षामाजीं होय शांती । कॄटस्छेसी नांदती संती ॥३॥
केली वस्ती निजधाम । कैलासीचा शिवराम ॥४॥
कोटी संताचिया इंद्र । कंसल्येचा रामचंद्र ॥५॥
कं नाही वरद भारी । काव्यदेव पटवारी ॥६॥

॥वोवी॥ ऐस आहे पां तें स्वहित स्छान । तरीच बहुतासी रंजलीं मनें । आह्मी हि वानऊं करूणावचन । तें मानोन पावा आनंद ॥८५॥

॥पद॥ पाहुं चला हो पाहुं चला । आपचंदक्षेत्राला । झडकरी ॥धृ०॥
भेटुं गुरुरायाला । वाहुं कीर्तनीं या सुमनाला । झडकरी ॥१॥
भोगुं प्रसादसोहळा । नाणुं दृष्टीसि काळाला । झडकरी ॥२॥
सेऊं स्वात्मफळाला । तारुं भाविक भक्तजनाला । झडकरी ॥३॥

॥वोवी॥ या अपचंदमहिमा पाहूं जातां । प्रसन्न जाले हो समर्थदाता । अभिमान लागला भूमिजाकांता । स्वसांप्रदाई ह्मणोनी ॥८६॥
समर्थाच्या पडलों पदरीं । विश्वास हि नसतां अंतरीं । नाम मात्र तें घेत वैखरीं । वदतसों तारा । तरा हो ॥८७॥
समर्थापासून येथें परियंत । लीळा हे ह्मणतिलों मन:पुरत । परि जयाची चर्या अपूर्व अघटित । न वर्णवे येकमुख ॥८८॥
पुराण नव्हे का साक्षित्व देऊं । शास्त्र नव्हे कीं आधारे दाऊं । वेद कीं संमत श्रृति लिहूं । कीं मूळग्रंथ नाहीं कीं टीका करुं ॥८९॥
यद्यपी जयाचा निर्मळ भाव । जो तिरस्कार तंटेचा पुसिला ठाव । वेदशास्त्रपुराणीं सारार्थ सर्व । रहस्य लीळेंत देखती ॥१९०॥
वेदशास्त्रादि महात्म्ये पुराणें । जे प्रवर्तले करऊं सांगूनि साधन । ते साधोन साध्य चि होठेलेपूर्ण । ते जेथून निर्माण तें चि हें ॥१९१॥
जें ऐकिलें स्फुरलें सत्यसें वाटलें । वदलें भल्यांनीं संती गाइलें । बाळभावें तें हें कथन कथिलें । एवं फळलाभीं द्या दृष्टी ॥९२॥
जरि सत्य मिथ्या हि बोलिलो येथें । तरि सत्य कथन तें निज चि सत्य । मृषा भाक हि सदुरु समर्थ । आचरोन यथार्थ करितील ॥९३॥
शतकोटि भविष्य जो सत्यकर्ता । तो श्रीरामरुप चि समर्थदाता । बाळभाष्य किमपी न करी वृथा । दावितील तरु सान वाक्य बीजीं ॥९४॥
सित्ध सित्ध जो भक्ताभिमानी । लीळा बहु दाविले जन्मापासुनी । तराया सुचविली हे सार निवडुनी । माना साधा हो समर्थकृपा ॥९५॥
धन्य हा समर्थसांप्रदाय । होऊं अवगत पत्धती सर्व । ग्रंथ श्रवण करा क्रमसार नाव । परमार्थवैभव भोगाल ॥१९६॥

॥ग्रंथ क्रमसार ॥ आत्मकृत॥
(मुळांत येथें आत्माराममहाराजकृत क्रमसार ग्रंथ दिला आहे.)

॥वोवी॥ आतां सद्‍वृंदभल्याचा भाव । वंशावळीं गुरुची घ्यावीं नावें । तरी च लाहिजे परमार्थवैभव । तरि नमूं सर्वातें भावबळें ॥१९६॥

॥श्लोक॥ अज अव्यया निर्गुणा पूर्णकामा । जगज्जीवना नित्य कल्याणधामा । परेशा पदातीत वासा हृदब्जी । नमो आदिनारायणा सद्गुरुजी ॥१॥
नमो व्यापक सर्वभूतांतरस्छा । नमो दुष्टसंहारका दोषहर्ता । जगत्पाळका बोधका दिव्यबोधु । नमो सद्गुरुविष्णुजी दीनबंधु ॥२॥
निजानंद निर्द्वंद नित्यापरेसी । सचिन्मात्र सर्वैक्यता सर्वसाक्षी । दृढें चिंति त्या दाविसी दिव्य ठेवा । नमो सद्गुरुनाथश्रीहंसदेवा ॥३॥
नमो वेदवंद्या सुखानंद आद्या । नमो दिव्यरुपा महारोगवैद्या । नमो सर्वकर्ता सुमार्गादि लीळा । नमो देशिका श्रीविधाता कृपाळा ॥४॥
सदा सर्व कोंदाटुनि जें अलिप्त । बहु बोलती नेणवे काय कीं तें । अभिन्नत्व चि दाविसी बोधुनिया । नमो श्रीवशिष्ठा मुनीवर्यराया ॥५॥
शिवहृदय आरामा व्यापका मूळकंदु । विमळ अचळलीळा सत्य कारूण्यसिंधु । निरुपम निजबोधा चिद्धनानंद ब्रह्मा । नमन गुरुवरा रे जानकीनाथरामा ॥६॥
नेत्रांजने लाउनिया कृपेनें । केलेति नाही च भवादि भेणें । श्रीअंजनेया गुरुराजस्वामी । भावाविणें भाविन ऐक्यता मी ॥७॥
हे स्वामी त्रिगुणातिता गुरुवरा कामादिवैरीहरा । सारासारविचार बोधुनि जना वोपिसी दिव्य थारा । भक्तिज्ञानविरक्तिवैभवविभो द्वैतनाशा परेशा । ब्रह्मानंदा परमसुखकरा नमन श्रीरामदासा ॥८॥
ठेऊनि करकंज मस्तकीं निज दाविसी सत्स्वरुपा । पावोनी गुजगौप्य नांदति सुखें नेणती पापतापा । नामाधारी तरती बहुजन तारिती जडजीवातें । श्रीकल्याणगुरुवरा तुज नमों तूं चि अनाथ नाथा ॥९॥
ब्रह्माविष्णुमहेष देव अवघे त्वद्रुपीं सौख्य घेती । जे पाईं जडती भवाब्धि तरती तन्मयाकार होती । हे सच्चिद्धन करूणालय हरी पूर्ण सद्बोध लीळा । श्रीस्वामी शिवरामजी तुज नमो दीनबंधु दयाळा ॥१०॥
जननिजनकइष्टमित्रगोत्रादि सर्व । स्वहित हितगुजार्थ मंत्रबोधादि देव । तुजविण अनु कांहीं मी न जाणे स्छितीला । नमन तव पदासी रामचंद्रा दयाळा ॥११॥
श्रीनारायणविष्णुहंसविधिजी श्रीवशिष्टाऋषेशा । श्रीरामा करूणाकर पवनुजा योगिश्रीश्रीरामदासा । श्रीकल्याणशिवाजी सद्गुरुसखा दातया रामचंद्रा । भावें श्रीपद वंदिता पडली कीं ऐक्यता स्वात्ममुद्रा ॥१२॥

आदिनारायण विष्णुहंस । विधिवसिष्ठ रामभीमदास । कल्याणस्वामी शिवरामेश । रामचंद्रसह गुरवेनम: ॥१॥
॥वोवी॥ आतां विज्ञाप्ती माझी समस्ता । रामदाससांप्रदाई योग्य नस्ता । श्रृतिशास्त्र आधार कांहीं न पाहतां । मन माने कथा वानिली हे ॥९७॥
युक्तिभक्तीयोगादि प्रतापवैभव । नसतांचि सांगतों रामदास नांव । यद्यपी ग्रंथ हा ऐको भाव । रामदासी जे ते धरितील ॥९८॥
ऐसें भल्यांनीं न ह्मणावें । रामदासी च असती सर्व । यद्यपी सुचेना तरि भजोन पाहवें । ऐका यदर्थी दासवाक्य ॥१९९॥

॥अभंग॥ जो जो भजनासी लागला । तो तो रामदास जाला ॥१॥
दासपण रामीं वाव । रामपणा कैंचा ठाव ॥धृ०॥
आदि करुनी तीन्हीं देव । सकळ आहे भक्तीभाव । रामीं राम तोही दास । भेद नाहीं त्या आम्हांस ॥३॥
रामदास्य करुनि पाहे । सर्वसृष्टि चालताहे ॥४॥
प्राणीमात्र रामदास । रामदासी हा विश्वास ॥५॥

॥वोवी॥ विश्वासापाठी साह्य देवराव । विश्वासें फळती कार्य तें सर्व । तरि दासवरदवचनी धरितां भाव । आत्माराम भाळेला ॥२००॥
दासविश्रामधाम सुगम । सप्ताक्षरी हा मंत्र उत्तम । अर्थावर्तन नीरसोन भ्रम । स्वात्मसुधाम पाविजे ॥२०१॥

॥आरती॥ जय जय आरतें हे निजसोये । दासविश्रामधाम श्रवणोपाये ॥धृ०॥
ठसतां मानसीं गुजगुह्यार्थ । होये सुकाळु वर परमार्थ ॥१॥
चरिया सर्व हि आवगत होतां । किमपी न बाधे भवभयेचिंता ॥२॥
होईल इछीतफळजप्राती । लाभेल अपैस शांतिविश्रांति ॥३॥
ध्यान जया जडे सर्वदा अंतरी । आत्मारामप्रभु होये कैवारी ॥४॥

॥वोवी॥ कायावाचा मनइंद्रियें । परमार्थ साधनीं धरिती सोये । विधरुनि सर्व हि मायामय । होय तन्मय निजरुपीं ॥२०२॥

॥अभंग॥ समर्थकृपेनें जालों परब्रह्म । मायामयभ्रम तेथें कैंचा ॥१॥
नाहिं स्छानमान पाहणें ना बोलणें । तो मी तें हें खूण कोण सांगे ॥२॥
उमठोन असे वस्तुमाजिं सर्व । म्हण्हणें हा भाव ऐलिकडे ॥३॥
नाहीं पंचायेत निवाडाया तेथें । नुरे हेतुमात जये ठाईं । ठाव ना धरणें त्यागुनिया जाणें । आत्मा परिपूर्ण अनिर्वाच्य ॥५॥

॥इतिश्री श्रीरामकृपा । तारकपरमार्थ सोपा । वंशावळी स्तवनोन्नाम । समास ॥१२१॥
॥श्रीराम जयराम समर्थ ॥

॥समाप्त॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP