मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|दासविश्रामधाम| ॥गत॥ ९७ दासविश्रामधाम श्रीसद्गुरुस्तवन ॥गत॥ ९७ ॥अश्वास॥ ९८ ॥समास॥ ९९ ॥मान॥ १०० ॥प्रकरण॥ १०१ ॥प्रसंग॥ १०२ ॥सर्ग॥ १०३ ॥अध्याय॥ १०४ ॥खंड॥ १०५ ॥पटळ॥ १०६ ॥विसावा॥ १०७ ॥स्तबक॥ १०८ ॥कांड॥ १०९ ॥वर्ग॥ ११० ॥सोपान॥ १११ ॥अवधान॥ ११२ ॥वर्ग॥ ११३ ॥पटळ॥ ११४ ॥खंड॥ ११५ ॥अध्याय॥ ११६ ॥सर्ग॥ ११७ ॥प्रसंग॥ ११८ ॥प्रकरण॥ ११९ ॥मान॥ १२० ॥समास॥ १२१ ॥लळीत॥ आत्मकृत ॥गत॥ ९७ एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले. Tags : dasvishramdhammarathioviओवीदासविश्रामधाममराठी ॥गत॥ ९७ Translation - भाषांतर ॥श्रीरामसमर्थ॥ ॥ पद ॥ (राग कानडी ॥ कष्ट करिताती ऐ०॥) परत रत सज्जनी० । श्रवणमननसज्जनीं०स० ॥ ध्रु०आगम नीगम संतसमागम । षडरिपु तज्जनी ॥१॥श्रवणमनननिजध्यास समाधान । साक्षात्कार उन्मनी ॥२॥दास ह्मणें जेथें तृतीय प्रत्यय । पावसी निवेदनीं ॥३॥॥वोवी॥ अरे प्राण्या रे ऐक स्वहितगोष्टी । नरदेह जोडला हा पुण्यकोटी । न गुंततां वांया खटपटीं । परतोन सावध हो झडाकरी ॥१॥भ्रामिकजनाचा धरितां पंथ । किमपि न टाकवे स्वहितार्थप्रांत । परतोन जिकडे वागती संत । येतां बहु सौख्य होईल ॥२॥शब्दज्ञानें जाली औघड वाट । काम्यनिषेधीं काटेकचाट । रेंद्या चिखुल ते वाळलेसें वाटे । बुडतां भैंदावी मागें नुरे ॥३॥दंभभान तो पाहाडफत्तर । अडदरीं वागती पाशादि तस्कर । न परततां केल्या उसीर । अविद्यापेंची अटकणें ॥४॥पर्तोन न पाहवे पर्तोनि मागें । नाडवी लुलूनें जयाचा संग । तो त्यागूनि साधु जे पूर्ण नि:संग । सहवास तयाचा आवडावा ॥५॥ऐसें न करितां भुलोनि गर्वे । गुंतोन भ्रमबुद्धीं देहसौख्यास्तव । भूषण बहु करितां मिळवोन विभव सेखीं कश्मळ कामा न ये ॥६॥नासके देहाचें शोधितां मूळ । न सांगवे मना वाटे कंटाळ । जरि कृपा करितील संतदयाळ । विदेहभूषणीं ये शोभा ॥७॥॥अभंग॥ ऐसा देह जाण तो नव्हे भूषण । याचा अभिमान कामा न ये ॥१॥ ॥वोवी॥ साधुसंतांच्या घडतां संगती । या असारामाजीं च घडेल गति । ऐसें न जाणतां जे विखीं भुलती । जुळो तयांचें धिग जिणें ॥८॥टेकूनि दुर्घट विखस्वादसुखा । नाडोन आपणु भुलविती लोका । ऐसे बहु असती न करवे संख्या । भुलवणी लेखा कोण करी ॥९॥विकारामाजील विकारकथा । हाव धरधरो न सरे सांगतां । तरी पाव देऊनि तयाच्या माथा । पर संतपद पाहावें पर्तोनि ॥१०॥तेणें शांतत्व पावेल मन । श्रीरामजीचें घडेल भजन । होईल विख कडु अमृतसमान । जेवि मृत्तिका सोने होय श्रमें ॥११॥॥श्लोक॥ ऐसे हे लोक अनेक विकारी । सज्जनसंग बहू सुखकारी । लोटत महीतरवासी । निश्चळ होत विवेकविळासीं ॥१॥दीनदयाळ रघूविर घ्यावा । अंतरहेत कदां नवजावा । लोकिकी सेयकसें ह्मणवावें । वैभव ज्ञानपदीं विलसावें ॥२॥कर्मकचाट करीत चि मेला \ नातरि भ्रष्ट अनर्गळ जाला । दोघे हि येक पदाप्रति जाती । ज्ञानरहीत सदां लत खाती ॥३॥लेटत लेट लपेट चपेटी । लाटित दाटित दाटित लाटी । काळ कराळ कलोळ करीतो । ज्ञानरहीत तयासि धरीतो ॥४॥भजतां हरिलागिं बहु आळसा । परि काळचपेट करी वळसा । सुख माइक काम न ये कळसा । मग संशय बैसेल तो गळसा ॥५॥॥वोवी॥ प्रताप साधूचा न रुचतां कानीं । ह्मणेल यापरी तरमुंड कोणी । जन हो सज्जन हो जन्मले प्राणी । मृत्युपंथासी जातील कीं ॥१२॥तरि कां करावी खटाटोपकरणी । कोणीं हो जावें करपाद झाडुनी । वक्ता वदे तैं भ्रमासि त्यागुनी । डोळे उघडूनि पहा नीट ॥१३॥जो गेला जन्मूनि न करितां कीर्ति । ज्याची न फिटली पुनरावृत्ति । हें असो बत्धाच्या अधोगतरीती । धन्य जो तरोन कीर्ति ठेवी ॥१४॥॥श्लोक॥ अभागी किती लोक भाग्यासि आले । कितीयेक ते भाग्यनिर्भाग्य जाले । कितीयेक ते सुकृतीं वाढताती । कितीयेक ते पातकीं मोडताती ॥१॥॥पद॥ धाटी दंडी ॥ किती आले येउनि गेले । भले कीर्ति चि ठेउनि गेले । येक अपकीर्तीनें ज्याले । रे रे रे रे । सेखीं अवघे चि मरोनि गेले रे ॥ध्रु०॥ जनीं संसार जाईजणा । जगीं देखता तरि कां नेणा । अंतकाळीं होईल दैन्यवाणा रे० । हित आपुलें आपण जाणा रे ॥१॥वैभवाचे डोंगर केले । कितीयेक ते सांडुनि गेले । येक आधीं च सावध जाले रे० । संतसंगतीनें निवाले रे ॥२॥येहलोकी संसार करावा । परलोक तो ही साधावा । हळुहळु ऊगवावा रे रे० । नित्यकाळ तो आठवावा रे ॥३॥दास ह्मणे सावधान । पुढें कळेना वेवधान । द्यावें निरुपणीं अवधान रे० । येर तें नाहीं साधन रे ॥४॥ ॥वोवी॥ ऐकोन यापरीं प्रसादवाणी । प्रश्न उभविला धीट श्रोत्यांनीं । सुखें संसाराहून परतोनि । राहोन सज्जनीं करावें काय ॥१५॥वक्ता वदे तैं सावध व्हावें । संसारामाजील सार निवडावें । साधुजनासी बहुत मानवावें । सेवा करुनि निष्काम ॥१६॥षडरिपूला करुनि तर्जन । श्रवणमननीं कीजे मज्जन । अहंकारातें करुनि भर्जन । आगमनिगमवाक्यसार घ्यावें ॥१७॥निजध्यास साक्षात्कार उन्मनी । तल्लीन व्हावें आत्मनिवेदनीं । तिही प्रचिती ध्याना आणुनी । जन्म सकळ कीजे सत्संगें ॥१८॥श्रोतेजन पुसती जन ही सज्जन । भासती देवा रे वर्तती समान । करामत पाहतां रुजु धरी मन । तरि तयाची निजखूण सांगिजे ॥१९॥वक्ता वदे हो ऐका सद्भावें । संतांसी वळखिताम सांपडे देव । माईकजनाचा मैंदत्व स्वभाव । नेटका दाविता हि सोंगढोंग ॥२०॥वाढऊन दाढी डोसकीं केंस । चेटकविद्येचा थोर हव्यास । भूतवीराचे साधूनि वश्य । पूजा घेतां हि संत नोहे ॥२१॥ ॥अभंग॥ जळो कुलक्षण नव्हे ते सज्जन । स्वानंदाची खूण नाहीं प्राप्त ॥१॥ आयाबायालागीं सांगतो शकून । होतसे संतान आळंगितां ॥२॥ करुनि दावितो नरा वीर्यपुष्टी । नाश करितो हटीं शापुनिया ॥३॥ बोलूनिया ज्ञान विषईं रमतो । अवगुणाचा घेतो साभिमान ॥४॥ मुख्य स्वात्मानंदी न रमे चि मन । तयासी सज्जन ह्मणो नये ॥५॥ सज्जनाची स्थिति सांगतां चि न ये । यद्यपि प्रत्ययज्ञान त्याचें ॥१॥ शांतवृत्ति सर्वांवरी सम श्रेह । बोलणें अमाय करुणावंत ॥२॥ परोत्कर्ष पाहतां संतोषती मनीं । सगुणभजनीं ध्यानीं प्रीत ॥३॥ स्वात्मानंदीं रमती न त्यागिती भक्ति । दीनासी तारिती प्रबोधूनी ॥४॥ ॥पद॥ न जुडे सत्संग ससांग । न होय तें भव भंग ॥ध्रु०॥ करितां साधन बहुकाळ । सत्संग चि त्या फळ ॥१॥जाला प्रसन्न ईश्वर । दाविल हें ची घरे ॥२॥ करितां बहु कष्ट कचाट । न लाविती सेवट ॥३॥वसतां सत्संगीं सप्रेमें । भाळे आत्माराम ॥४॥॥वोवी॥ ऐसियापरी कर्त्ते प्रबोध । दीनजनाला वोपिते पद । धन्य जयाचे प्रसन्न शब्द । करी नि:पात भवासी ॥२२॥बुद्धि सांगावया हें चि कारण । देवराव जो होऊनि प्रसन्न । वरदान दिल्हेंति कराया पावन । ह्मणोन जनासी हित कथिती ॥२३॥दासमाहाराज वैष्णवबळी । मठ करुन राहिले पर्वतमौळीं । भोंवतें मिळाले विप्रादि मंडळी । वाटे स्वानंदु अवतरला ॥२४॥वृष्टि बहु होतां श्रावणमासीं । पूर सरेना महानदीसी । स्थायीक होतां दास सौख्यरासी । वाट यात्रेची वाहतसे ॥२५॥जंव गुरुराज पातले गडावरुतें । करीए विज्ञाप्ति नृप भीतभीत । जी अन्नसंतर्पण व्हावें येथ ॥ अनकूळ दिधलेंसे श्रीरामें ॥२६॥तृप्त पावोन विप्रादिमुखें । संतुष्ट पावावें जगन्नायकें । बहुतांस हृदईं संकल्पसौख्य । लाभ घडावा गुरुपंग्तीचा ॥२७॥आज्ञा होईल तरी लक्ष भोजन । संकल्पोन कीजे संतर्पण । अपसया होयाचें काम कठीण । कांही च न पडे दातया ॥२८॥जाणोन सिष्याई भली वासना । हांसोन बोलिले श्रीगुरुराणा । भिक्षान्न आवडे जगज्जीवना । कां संकटीं पडसी काय उणें ॥२९॥येरु विनवितु संपदा सौख्य । आहे कीं देवाचें कैसें सार्थक । तरी करवीं ह्मणतिलें कांहीयेक । नुन्य न पाडितां सावधोनि ॥३०॥धरामर ते मिष्टान्नप्रियकर । दक्षणा मिळतां संतोष थोर । आणि सर्वधर्मीं यज्ञांत सार । अन्नसंतर्पण जाणीजे ॥३१॥ज्या भूसुरांचें घेवविसी तीर्थ । दक्षणा वोपिसी ज्या आपुल्या हातें । संख्या तयांची धरुनि परमित । परियंती संतोष करवीं पां ॥३२॥आणीक येक ते हुषारी ठेव । लक्षांत असूं दे मंडळी सर्व । कोण कधीं आला काय तो भाव । नुच्चारितां अवगतामाजीं ठेवीं ॥३३॥सरल्यावरी संकल्पसंतर्पण । नूतनु कोणी पातला ब्राह्मण । न मिळतां तया दक्षणाधन । असंतुष्ट हो ते न करी पां ॥३४॥भारतादिक पुराण श्रवण । घडलें असे कीं नीति संपूर्ण । तें ऐकिलें सर्व हि सार्थकीं पडोन । श्रीराम तुष्टेल तें कीजे ॥३५॥ब्राह्मण चि असती परि गरीब । तयावरी हि करुनि लोभ । भल्याहून त्याला अधिक लाभ । दावीं सुवचनें धनवस्त्रें ॥३६॥व्याहृतियुक्त गायत्री जेथें । ब्राह्मण न मानी जो कोणीं तयातें । बहु शाहणा असो कां होय पतित । न होय भगवंत साह्य तया ॥३७॥व्याहृतींत वर्ते वेद ते तीन । गायत्री होय ते सर्वा कारण । जेवि कृपणाचें न दिसे पुरिलें धन । व्यवहार न करितां मानस्थु ॥३८॥॥अभंग॥ ब्राह्मणाचा महिमा वर्णू काय । नारायणें वंदिले ज्याचे पाय ॥१॥मुखीं अखंद वेदउच्चार । चरणीं तीर्थे राहती निरंतर ॥२॥आसिरवादें स्वानंदसुख देती । शापेंकरुनी त्रैलोक्य कापवीती ॥३॥सकळांसी पूज्य हे ब्राह्मण । रामदास वंदितो त्यांचे चरण ॥४॥॥वोवी॥ ह्मणतील कोणी अवघे समान । परिश्रमंविद्या काय कारण । अहो कर्मविद्येनें जो असे निपुण । तो विशेष धनमान पावेल ॥३९॥ब्राह्मणत्वहानीचा न धरिजे भ्रम । अन्नवस्त्रपूजालागिं सर्व सम । असो नृपाला दास भक्तोत्तम । ह्मणती ऐक पां आणिक ॥४०॥प्रसादभोक्ते जे साधुसज्जन । लाडके देवाचे कर्ते पावन । रजतमार्जित ते न सिविती अन्न । धनवसनइच्छा न धरिती ॥४१॥चंचळ लक्ष्मीचा न धरिती भरवसा । स्वर्गादि सुखाची नाहींच आशा । जनामाजिं ते न गणिजे सहसा । सगळा हरि हृदईं जयांच्या ॥४२॥नेम जयाचा निश्चयात्मक । विखाहूनि कडुवट मानिती विख । मुक्ता चि ज्या दिसती सर्व हि लोक । भक्तिवंत भजक नेमिष्ट ॥४३॥संख्यामाजी त्या न गणिजे सर्वथा । आणि अन्य याती अन्न मागती त्या । परामर्ष कीजे तोषती यथा । धनवसन वोपिजे करुणेनें ॥४४॥परमिती त्याला न कीजे गणित । वाणिज्यव्यापारसमंधीं गृहस्थ । आणि आमुचे हि सिष्यवर्गातें । संख्यामाजीं न मानिजे ॥४५॥ह्मणसी वेदज्ञ शास्त्रज्ञ पंडित । वैदिक सभ्य पूज्य योग्यवंत । दक्षणा वोपावी त्या घेऊनि तीर्थ । हें हि जगदीशा मानेना ॥४६॥अळंकार ल्याली साहुकारपत्नि । गळसरी भूषिली गरिविणी । समान दोघी ते पतिसुखालागुनी । तेवि ब्रह्मण्या मानावें ॥४७॥ब्राह्मणो मम दैवतम् हें हरिवचन । पुन्हश्च ब्राह्मणान् भर हे संज्ञ । वर्णानां ब्राह्मणो गुरु: प्रमाण । भागवतादि ग्रंथीं प्रशांशिलें ॥४८॥ब्रह्मबीजाय ते नम: ह्मणोन । रुषिपुत्र सकळिका जाला मान्य । न ब्राह्मण हुते मुखें वचन । बोलिले श्रीराम धन्य ते द्विज ॥४९॥ब्राह्मणापेक्षां विद्यासंपन्न । अन्ययति दिसती ह्मणाल निपुण । हें हि ब्रह्मवीर्यसबंधें जाणणें । मोहप्रीत रतीचेनि आगळें ॥५०॥पापयोनय: बहु निके दिसती । आणि कुलहीनं च सरस्वती । ते हि जरी ब्राह्मणा मानिती । तरी च तरती सेवाबळें ॥५१॥वीर्यपुष्टीनें माततील जरी । पुढें तयाची होतसे बोहरी । वृत्तिसंसर्गादि विकारपरी । नाना प्रकारें असती ॥५२॥ धृतराष्ट्र पंडु ते अंध शुभ्ररोगी । दासीपुत्र विदुर तो महायोगी । कंस दुष्ट जन्मला अनिवार जगीं । बहु निर्णयीं असती कथा ॥५३॥रुपं रुपं प्रतिरुपो बभूव । हा वेदपुरुषाचा अभिप्राव । प्रत्ययास येईना तरी नव्हे वाव । क्रियामाजीं भेद पडतसे ॥५४॥येकाचे होती प्रकार अनेग । अध्यासवळें कीं दोषसंसर्गे । ब्रह्ममय सृष्टीमाजीं विभाग । जाले नासाडीं विटोनि ॥५५॥य: पुत्रो पितरोद्वेषी वचन । द्वेषी ब्रह्मविदोअ जन: दुर्जन । तो अन्यरेताचा ह्मणोन खूण । दाविती पंडित शास्त्रांतरीं ॥५६॥तंव ह्मणती भल्यांनीं कां हें बोलिजे । चरित्रपंथीं नीट कां न चालिजे । तो ऐका ह्मणे केवि टाळिजे । अशंका कैसी केल्यावरी ॥५७॥बत्ध मुमुक्ष साधक सित्ध । सज्जनापासीं मिळती वृंद । पाहिजे तें करुन घेती विशद । कंटाळ तयाचा न मनावा कीं ॥५८॥परंतु वक्त्याची हे हातवटी । समजाऊन जैशास तैसी गोष्टी । उत्धारक्रिया दुर्मदु सैरावैरा । प्रश्न केला हो बळें निलाजिरा । साधुसत्पुरुषा अमान्य जो ॥६०॥॥अभंग॥ जळो दुष्ट क्रिया दुर्मद आळसी । पाहतां साधूसी हास्य करी ॥१॥स्वहित तें नेणें करी अपकार । जैसे वृक व्याघ्र सर्प विंचु ॥२॥विषयावरी दृष्टि कापटयता पोटीं । ज्याला कष्टी करी निंदी ॥३॥सज्जनांत भिडे पुसे भलतें चि । प्रीति ते नीचाची सदा मनीं ॥४॥वेदाज्ञा न मानी न धरी मर्यादा । सदा पोटधंदा वाचाळता ॥५॥स्वात्मानंद नेणे तैशा पापियाला । भोगविती सोहळा निज साधु ॥६॥॥वोवी॥ पुसे कुमती तो नरक रे चोखडें । कां धांवा घेती हो कुचदुर्गाकडे । झांकझांकून लपवितां आवडे । कां लिंगासी गुह्यस्थान तें ॥६१॥धीर उदार वक्ता प्रवीण । कैसा हि करणार त्या पाहिजे प्रश्न । विखीं च गोडी ते ज्ञान दाऊन । पावन करणारा युक्तिवंत ॥६२॥कर्मसूत्रतंत्रीच्या ग्रंथाधारें । वदे आकृत्या ह्या करिती समग्र । जोखजोखूनि देवांनीं करुं बरोबर । काढकाढून माती लाविती ॥६३॥खंबीर करुन नाना घटांतें । प्रेरुन त्यांमाजीं कर्मसंचितें । जन्मविती भूवरी भोगावयातें । वोहदे दार देव ते यजमान ॥६४॥विस्तार सांगतां ग्रंथा प्रमाण । कचाट ऐकतां त्रासेल मन । कथिलेति संज्ञेनें कळो सज्जन । समाधान पडूं तें चि पुरे ॥६५॥मातीसमंधा मिळतसे माती । रुणानबंधानें सर्व हि घडती । हें असो नरनारिद्वयस्थानरीति । ऐका सृष्टीचा आरंभी ॥६६॥स्त्रीपुरुषव्यक्ति निर्मोन बरी । जोखितां आधिक ते जाली नारी । गुह्यस्थानमाती काढोन बाहेरी । पुरुषास ते स्थानीं लिंग केलें ॥६७॥तो अधिक होता कर उकरुन । नारीउरीं ते लाविले स्तन । स्वसमंधाकडे जाती भुलोन । तेणें पतन हो श्राप असे ॥६८॥अधिक मातीचा धरिताम सोस । किमपि सुटेना त्या नरकवास । हें युक्तिमत ग्रंथानें पंडितांस । विद्यावंतानें समजाविलें ॥६९॥कोणी येविषईं काढील संशय । सृष्टीक्रम सर्व हि शापमय । शापासाठीं सर्वत्रा उशाप आहे । मातीत्वशापा शमन कोण ॥७०॥मृण्मयनारित्वा उशाप हा चि । वासना त्यागावी सगट नार्यांची । आशा धरावी स्वनेमस्त्रियाची । कार्यापुरती हें शापशमन ॥७१॥सकळ देवतंत्रा शाप चि आहे । क्षोभलोभरहित ते सद्गुरुपाय । आत्मज्ञान प्रत्यई तेथ तन्मय । होऊनि सत्सौख्य भोगिजे ॥७२॥॥अभंग॥ मायासमंधांत भुलोनि माईक । विखमाखरा सुख मानिताती ॥१॥ कुचकुंभ वदती वादिताती भ्रष्ट । ह्मणती लाळ मिष्ट अधरामृत ॥२॥चर्मकुंडस्तुति करिती मूढमती । घाणी ते नेणती सर्वांगाची ॥३॥मायेनें निर्मिले भ्रमु भ्रमयंत्र । इच्छाबेडि थोर नर्कठाण ॥४॥ययापासूनिया उदासी जो नर । तो चि जगदोत्धार आत्माराम ॥५॥॥वोवी॥ ऐकोन यापरी विषयनिंदा । असह्य वाटलें तेणें बत्धा । शरण रिघोन सद्गुरुपदा । पावन होठेला तपोबळें ॥७३॥दुजा श्रोता तो जाणता निपुण । वक्तयासि पुसे करुनि नमन । स्त्रीपुरुषदेहीं तत्वें समान । कां पडतो भ्रमभेद मोहाचा ॥७४॥वक्ता वदे हो सावध होइजे । चौसिती तत्वांचा हा देह जाणिजे । स्थूळ आणि लिंगाचे शतार्ध जाणिजे । स्थानभोगगुणादि बत्तीस ॥७५॥अज्ञान ज्ञान दोन मिळोन । चौर्यासी तत्वें हे देहात्मकारण । सर्वत्रादेहीं असोन समान । नरनारीमोहकपण ऐका ॥७६॥लिंगस्थानाधिपति मदन खटयाळ । योनींत रतिसतिवास्तव्यस्थळ । समरसोन समंधीं देती सळ । देहबुधीच्या भ्रांतासी ॥७७॥भिवोन तेणें श्रोता मानसीं । सांग ह्मणताहे गति ते कैसी । अहो जोगिणी करावी वेगीं रतीसी । मदनास संन्यास दीजे ॥७८॥विरती व्हावया रति असे सित्ध । मदन प्रथमाक्षरा कीजे मध्य । तेणें परमार्थ होतसे साध्य । आणीक उपाव तो ऐसा ॥७९॥नेत्रद्वारीं उभयता असती । पैलाडस्थानीं असे विश्रांति । तरी बळें चि माघारी करुन वृत्ति । चिदाकाशीं समरसिजे ॥८०॥ ॥अभंग॥ कीजे येक्या भावें स्नाननेमजप । पापाचा संकल्प टाकुनीया ॥१॥कीजे बळत्कारें इंद्रियदमन । न पाहावें ढुंकून लालुचीसी ॥२॥उपासनामाजी असावें तत्पर । स्थूळ मस्तिभर खुंटे तेणें ॥३॥दुर्जय मनासी ध्यानें आवरावें । स्थितिवंतु व्हावें ज्ञानयोगें ॥४॥मुख्य गुरुभजनीं पावतां विश्राम । दाता आत्माराम साह्य होय ॥५॥॥वोवी॥ ऐकोन यापरी सवर्मवचन । श्रोते होठेले स्थितिसंपन्न । टाकून लीळामृतपान करवणें । गुंतलों कचाटीं क्षमा करा ॥८१॥नृपतीस सांगती गुरुगोसावी । धरामरसेवा अगत्य व्हावी । ब्राह्मणावांचूनि सौख्यता नाहीं । येणें चि संतुष्टे जगदात्मा ॥८२॥ ॥अभंग॥ ब्राह्मणाची सेवा घडावी सर्वदा । न कीजे हो निंदा अपमान ॥१॥यज्ञयगादिकीं सर्वांसी कारण । जाणिजे ब्राह्मण विधानासी ॥२॥श्रुतिस्मृतिमाजीं गीताभागवती । चिन्हीं जे असती ते चि धन्य ॥३॥याति विप्राहूनि शतशताधिक । ब्रह्मनिष्ठ ऐक जगदोद्धारी ॥४॥स्वहिताकारणें तयासी धुंडावें । इतरांसी पुजावें भावबळें ॥५॥देव आत्माराम मानितो ब्राह्मणा । कीजे आराधना सर्वांपरीं ॥६॥॥ओवी॥ सांगतां यापरीं सद्गुरुभूप । तोषोन वंदन करी नृप । साफल्य होतसे भक्तिसंकल्प । राहिले सुखरुप भूसुरादि ॥८३॥पक्वान्नलाडूघृतशर्करादि । खर्च कराया असे समृत्धि । तुष्टोन माघिला काढिती शुत्धी । कण्या ताक अंबट लाह्यपीठ ॥८४॥हें कळतां आणवोन दधि तक्र । भरल्या वांग्याची भाजी रुचिकर । कोसिंबिर्या चटण्या नाना प्रकार । वाढोन पाहिजे तें तुष्टविती ॥८५॥समर्थस्वामीघरिंचें जेवणें । कर्ते करविते सर्व भक्तिवान । मग कासया कशांत पडेल नुन्य । मुख्य जगज्जीवन साह्य जेथें ॥८६॥येक्या दिवसीं भीमतीर्थांत । मिळोन भोंवतीं साधुसंत । स्नान करुनि संतोषयुक्त । देऊनि गंगोपमा वानिती ॥८७॥मुख्य जे जळीं नाहिले भवहर । साधुसंत ते विश्वासी थोर । कां न मानिती सांगा गंगानीर । श्रीरघुवीर प्रसन्न याहेतु ॥८८॥तंव हासती द्विजांनीं आपणांत आपण । ह्मणती पहा हे बडाईवर्णन । काय सुमार कीं अवघ्यांचें मन । भेदभिन्न न करिती संतांनीं ॥८९॥मत सित्धांत तें असे येक । येकाचे सर्वांचें सिंतरवाक्य । गा हित हि नसे नुन्याधिक । पडताळती हो सर्वे चि ॥९०॥चरित्र वानिती असतां जिवंत । स्वलीळाचे स्वयें रचिती ग्रंथ । प्रेमांत गोंविती भल्यांभल्यांतें काय युक्ति असे कीं कळेना॥९१॥धन न सिऊं हा पण चि करिती । देवदातया लक्षा नाणिती । आश्रमीं भरली असे संपत्ति । उदासवृत्तीनें वर्ततां हि ॥९२॥असल्या सबाह्य नैराश जडोनि । देव कां होता यापरी रुणी । तस्मात् कामना अंत:करणीं । व्यापिली प्रार्थिती गुप्तरुप ॥९३॥कीं पूर्वजन्मींचे असतील कामिक । आइते उपजोन भोगिती सुख । किंवा पितरांनीं कष्टले अनेक । ते पुण्यांशें हे सुखावती ॥९४॥नेणवे प्रसन्न कोण दैवत । कल्पिल्यासारिखें घडत । असो येखादी लटकी मात । खरी च करुन दाविती ॥९५॥हे टाकींत साचलें थंडगार जळीं । बोट न घालवे दुपारवेळीं । बुडतां पडूं पाहे दातखिळी । गंगा भाविली वंदावया ॥९६॥शैत्यपैत्यबाधा न होय यासी । भय कोणतें हि नसे चि मानसीं । पोहती बुडबुडोन होती क्लेशी । काय साध्य असे कीं नेणवे ॥९७॥येक ह्मणे हो रानीं फिरती । जें भूत वीर दैवत तेथें असती । ते बळें चि याचे भोंवतें फिरती । सित्ध्या हि वोळती तेणें चि ॥९८॥बूटवाल्यादि विदित यासी । अकटोविकट दाविती जनासी । तें कृत्रिम चालेना ब्रह्मण्यापासीं । छुल्लक कपटासी कोण पुसतो ॥९९॥हे गंगा जरी असावें ऊष्ण जीवन । बहु मिष्ट लागावें करितां पान । मनकर्णिकेंत जे केलेति स्नान । साक्षी तयांनीं भरावी कीं ॥१००॥निंदा घडूं पाहे बोलतां अधिक । सकळिका मनींचें वर्तमान असक । दाससमर्था होतें ठाऊक । बैसोन येकांतीं बोलतां हि ॥१॥ठेवविती सत्ता सीक्षावयाला । राज्यघर प्रभू तो त्याचा चेला । प्रीत करुन साधुसज्जनाला । द्विजाला वाईट काय केलें ॥२॥कोण गोष्ट हे कासया गल्बला । कां निग्रहोन विखाचा उचलितां प्याला । दुजा वदे तैं उगा चि चला । छेळोन संतांला बहु नाडले ॥३॥बेथु त्यांतील वदे कां भ्यावें । हें कळोन कांहीं योजितील अपाव । तरि सत्वहानि करुनि जावें । निंद्येसि ठाव करुनि ॥४॥उगे चि आह्मांला देती मान । भीड नसे कीं संता समान । छेडतील तरी देऊं प्राण । नासाड करुं त्याचा धर्मासी ॥५॥दुजा म्हणे हो काय हें बोलणें । धर्मवान् प्रस्तुती ऐसा कोण । पूजिती वोपिती अन्नवस्त्रधन । नांदोन सुखरुप चेष्टा कां ॥६॥येक ह्मणे हो भावार्थ उमगा । मन हुवा तों आपुलें चंगा । काटवटींत प्रगटे त्रिवेणी गंगा । दाविलें हो भावार्थ उमगा । मन हुआ तों आपुले चंगा । काटवटींत प्रगटे त्रिवेणी गंगा । दाविलें संतांनीं सादृश्य ॥७॥भाव जयाचा जाणोनि चोख । वश्य होठाके जगन्नायक । काय त्यापुढें मानवी रंक । ह्मणोन गेले खटपटींत ॥८॥ऐकोन यापरी स्तुतियुक्त निंदा । भीमदेशिकेंद्रा न साहवे कदा । हरु विप्रांची अभक्तिबाधा । गंगा आणिली तत:क्षणीं ॥९॥कुंडकाठपरियंती गंगोदक । शुभ्रवर्ण भरलें पापतापहारक । वृत्तांत कळताम हा सत्पुरुष भाविक । धावले जनलोक स्नान करुं ॥११०॥निंदिलें ते घाबरे पडोन । लगबगा पातले करुं स्नान । न कळे संतांचें ह्मणती महिमान । पाहतो कीं लीळा सुकृतें ॥११॥चहुंकडोन संकल्प सांगती ब्राह्मण । सुस्नातो भव हें वदती वचन । भागीरथीस्नान फलदमस्तु ह्मणणें । प्रत्यम्नाय कांही न राहिला ॥१२॥तीर्थ सेऊन वोपिती दक्षणा । कोणी करिताती देवार्चना । फळें मिठाया वाटिती जना । पुराणादि जपतप होतसे ॥१३॥दानवाणांचा जाला सुकाळ । न्यावया स्वसदना सांचिती जळ । सांग संतर्पण ते दिनीं जालें । नित्यकृत संकल्प संक्षेपुनी ॥१४॥नृपादिक सद्विप्र महाजन । प्रार्थिता दासाला करुं तीर्थदर्शन । हांसोन पुसिलें मनोरथ पूर्ण । जाला कीं संकल्पीं न पडाल कीं ॥१५॥हो ह्मणतां येऊनि श्रीमोक्षपाणी । प्रार्थितां गंगेला नमन करुनि । अदृश्य जालें तें सुदिव्य पाणी । आश्चिर्य मानोनि स्तविताती ॥१६॥॥श्लोक॥ काशीक्षेत्रं तन्निवासो जान्हवी चरणोदकम् । गुरुर्वि श्वेश्वर: साक्षात्तारकम् ब्रह्म निश्चितम् ॥१॥॥वोवी॥ मग प्रेमें होसरला जयजयकार । उठिला विप्रांसी भाव साचार । होऊं योजिलें अनुग्रहपात्र । धन्य दैव थोर तयांचें ॥१७॥तंव नमोन पुसती समर्था संत । गंगा प्रगटली जी बहुता सुकृतें । निरोप दिधला किंनिमित्य । येरु हांसोनि कळविलें ॥१८॥सर्व हि जाणिजे भक्तीचें फळ । भावार्थ आपुला असावा निर्मळ । करुणा करावी श्रीरामदयाळें । व्हावें संतांचें वरदान ॥१९॥अखंड जे ठाई होतसे कथा । तेथें न ये चि भवभयवार्ता । कांही च व्यंगु न पडे सर्वथा । मूळ या सर्वा सत्संग ॥१२०॥स्पष्ट कळाया मनींचे आर्त । सकळिकां जडो शुत्ध भावार्थ । अभंगी कळविलें रहस्याअर्थ । श्रवन करा हो आदरें ॥२१॥॥अभंग॥ कथा भगवंताची सार । सकळ तीर्थांचें माहेर ॥ध्रु॥ श्वेतबंध वाराणसी । पुण्य लाभे हरिकथेसी ॥१॥गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागीरथी ॥२॥दास ह्मणे संतसंगे । सदा कथेचा प्रसंग ॥३॥॥वोवी॥ तेणें तुंबळला आल्हाद थोर । परतले करित भजनगजर । नेम भोजनादि सारुनि सत्वर । प्रारंभ करविलें कीर्तनासी ॥२२॥इकडे घमंडी होतसे कथा । तिकडे येकांती असती दाता । कल्याणस्वामी सत्शिष्य जाणता । सन्मुखी उभा कर जोडुनी ॥२३॥तंव येऊनि सन्मुखी भोळा गृहस्थ । नमोन ठाकला बहु आर्तवंत । सन्मानूनियां पुसती समर्थ । काय अपेक्षा असे पां ॥२४॥तो ह्मणे माझी कृष्णोपासना । आश्रमीं असे जी विठ्ठलस्थापना । कांही च मज कळेना भक्तिभावना । अपेक्षा मात्र उठलीसे ॥२५॥दर्शनास येती भावीक प्रेमळ । साह्य होठाकती सर्वकाळ । उत्छाव हि करिती यथानुकूळ । कीर्तनावीण शोभेना ॥२६॥कीर्तन कराया कळेल तितुकें । साहित्य नसे जी पदादि श्लोक । ऐकोन तयाचें निष्कपटवाक्य । कल्याणाकडे पाहिलें ॥२७॥सांगितलें कीं कृष्णविठ्ठलपर । पदें श्लोक अभंग वोव्या चरित्र । आणि लळिताचीं पदें सुंदर । लिहोन भरणा दे यासी ॥२८॥मग जयरामबावाला वाहूनि सज्जनें । सांगूनि भोळ्याचें वर्तमान । गोपालकालेचें साहित्य लिहून । द्यावें ह्मणतिलें करुणाकरें ॥२९॥स्वामिराजआज्ञा धरुनि हृदईं । कालाभरणाची वोपिली वही । गुरुभक्त भला तो कल्याणगोसावी । आलस्य नसे ज्या अणुमात्र ॥१३०॥लिहोन दिधलें त्वरें स्वहस्तें । कथाभरणादि पदश्लोक बहुत । कळविला ससांग त्यांतील अर्थ । ऐका हो स्वल्प तीं वरवाक्यें ॥३१॥विठ्ठलपर व्याख्या ऐकिली मागें । कृष्णलीळा हि ऐकिलेति सांग । पुनरपि ऐका हरिकाथाप्रसंग जेणें अभंगसुख प्राप्त ॥३२॥॥भूपाळी॥ उठि उठि रे गोपाळा । घेईं हृदयीं कांबळा । गाई अका हि वोढाळा । बहुता प्रकारें सांभाळी ॥ध्रु०॥अवग्या विश्वाच्या अकरा परी । या धावती सैरावैरा । तुजविणें आवराया दुजा न देखो कोणी ॥१॥तगें तें चि माहेर पेंची । मागें धूम वरकडा चि । आलीं पिके बहुतांचीं । तिनें चटें बुडविलीं ॥२॥गाय अक्रावी खडाण । ते मज नाटोपे अवढाण । येइ ठाईं स्थिरावेना । तेणें मज जाला रे सीण ॥३॥तिच्या जाणसी वर्मकळा । अचपळ अलगट तूं गोपाळा । अचाट अद्भुत तुझिया बला । देखोनि काळा पळ सुटे ॥४॥सभानायक मिळोनि । खंड केला संतजनीं । गाय थोर अवघ्याहुनी । पायापासीं ठेविली ॥५॥रामदासाचें लडिवाळ । ऐकोने धाविजे कां गोपाळ । कवतुक पाहती सकळ । राखोळी द्यावया नाहीं ॥६॥॥पद॥ (धाट-काळ विक्राळ॥) आपण करीतो करीतो आह्मावरि घालितो । आपण चुकतो चुकतो आह्मा सिकवितो । आपण भोगितो भोगितो आह्मा दटावितो । न्याय सांडुनी सांडुनी अन्याय करितों ॥१॥ऐसा नाटक नाटकु देव महाठकु । आपन येकुची येकुची येकुची अनेकु । तया वेगळा वेगळा कोण आहे लोकु । हा तों हिसेबी हिसेबी न्यायाचा विवेकु ॥ध्रु०॥शास्त्रें पुराणें पुराणें आह्माला दंडणें । ह्मणे करणें करणें माझें चि करणें । आह्मा कारणें कारणें कां बोले ठेवणें । आह्मी कर्त्ते की अकर्ते हें येक सांगणें ॥२॥कर्ता करील करील करील गो पावेल । स्वयें अकर्ता अकर्ता त्याला कैंचा बोल । विले लावीना लावीना हें येक नवल । स्वार्थ परमार्थ । तेथें कैंची वो ॥३॥नाना ग्रामस्थ ग्रामस्थ कुल्लाळ पाळिती । कांही असो वा नसो वा अखंड मागती । वेठी बेगारी बेगारी सर्वदा सांगती । तया वेगळी वेगळी तयास नाहीं गति ॥४॥दास ह्मणे रे ह्मणे रे हे तों अप्रमाण । न्यायें वर्तावें वर्तावें हें येक प्रमाण । उगी च बालटें सोसूं पाहतो कोण । मुख्य देवासी भजतां सोडा मीतूंपण ॥५॥॥पद॥ (नामामध्यें उत्तम रा०॥) सांडी सांडीं रे गोपाळा नाना मत्तें रे । तुझा पाई बुडालों चित्तवित्तें रे ॥ध्रु०॥गेली गेली प्रतिष्ठा या देहाची रे । केली केली सांडी त्या वैभवाची रे । मोकळिली लाज या लोकिकाची रे । दृढ चट तुझीये संगतीची रे ॥१॥लपसी किती देखिले तुज या देवा रे । मोकळिली लाज या लोकिकाची रे । दृढ चट तुझीये संगतीचे रे ॥१॥लपसी किती देखिले तुज या देवा रे । कलल्या आह्मा सकळ तुझ्या मावा रे । भुलवीलें तां देऊनि वैभवा रे । मायाजाळीं गोविलें सर्व जीवा रे ॥२॥चुकलों होतों परी सांपडला जवळी रे । जवळी च लपतो वनमाळी रे । पाहों जातां न दिसे येहीं डोळीं रे । देहेबुद्धी घालितो पायातळीं रे ॥३॥सगुणरुप चाळक चालवितो रे । जैसा भाव तैसा चि तेथे होतो रे । येका सिद्धीची लालुची दावी तो रे । येका पद सगुणरुप देतो रे ॥४॥येका विद्या देउनी चालवीलें रे । येका ज्ञानेंसी प्रपंची गोविल रे । येका अभिमानें संगतीं लाविले रे । येका धोका देउनी बुडवीले रे ॥५॥इतुके करणें तूंअभिमानें चि करितोसी रे । गीतेमध्यें सांगितले अर्जुनासी रे । इंद्रियचाळक मी च या मनासी रे । मीपण सांडितां मी च स्वयें होसी रे ॥६॥तूं चि सर्वांतरी मज कां ह्मणसी जीव रे । ठकिले लोक ते फावलें लाघव रे । आताम न चले मी उडिवीन गौरव रे । रामदासीं मीपण केलें वाव रे ॥७॥॥पद॥ (रामा निदान पाहसी किती॥) तुह्मी जीतें चि मरोनी पाहा । मग अमर होउनि राहा । याहिवेगळे नसोनी आहां । मग हा ही बाल साहा रे ॥१॥गडे हो सर्व संग दुरी तुह्मी करा । माझी संगती दृढ धरा । येथ तडवेल तो ची खरा । येरा पडेल लोभवसरा ॥ध्रु०॥मी बोलतों कोण्या भावें । येथें मन बहु घालावें ।आजि पाहिल्या ठाया जावें । अन्न देहेबुत्धी चट खावें ॥२॥मायायमुनेचा पैलपार । तेथें स्थळ सुरवाडिक फार । जरि मधें चि डगमगाल । तरी हे भ्रमपुरी वाहवाल ॥३॥पोहों जाणेल तो बुडि मारा । परि मुख्य तोंड गच्च धरा । वाढवेळ धरीतां थारा । तुह्मी अंतराल निजघरा ॥४॥ रामदासाचा निजगडी । तो पाववीतो पैलथडी । तो देतो विवेकसांगडी । तो मारुं देत नाही बुडी ॥५॥॥पद॥ (रामीं रंगलें मन माझा॥) खेळतो येकला बहुरुपी रे । पाहतां अत्यंत साक्षपीं रे ॥ध्रु०॥ सोंग धरितां नानापरी रे । बहुतचि कळाकुसरी रे ॥१॥दाखवी अनेक धातमाता रे । बोलतो अभिनव घाता रे ॥२॥सदा पडदे लावितसे रे । फौजा सोंगाच्या दावितसे रे ॥३॥गातो नाचतो वाजवितो रे । त्याग करितां देतो घेतो रे ॥४॥ऐसा हा भूमंडळीं थोडा रे । पाहतां तयासि नाहीं जोडा रे ॥५॥अखंड खेळतो प्रगटेना रे । पाहती उदंड तया दिसेना रे ॥६॥पाहों जातां अंत चि लागेना रे । दास ह्मणे खेळतां भागेना रे ॥७॥॥पद॥ धाटी फुट॥ वृंदावनकुंजामाजीं घननिळ पितांबरधारी । मायानटवेशें नटला स्वरुप पाहतां अविकारी । अनन्यभावें रंगलिया भोंवत्या वेष्टित व्रजनारी । मुरलीनादें हरिवेधें विसरुनि गेल्या तनु चारी ॥ध्रु०॥ सहजीं निजसदनीं वनिता येकी दधि मथन करिती । मंजुळध्वनि जो आइकिला भरला मदनमोहन चित्तीं । विगळी वसनें धावती त्या कैंची गृहसुतपतिभ्रांती । सन्मुख श्रीहरि देखुनियां ते तटस्थ होउनियां राहती ॥१॥सुरमुने किन्नर येती नारद तुंबर गीत गाती । नादें अंबर दुमदुमिलें दृढतर समरस रसवृत्ती । शिवसनकादिक महायोगी सुमनवर्षाव करिती । रास विलास निजलीळेसहित श्रीहरि न्याहळिती ॥२॥सुरंग मुरली हरिअधरीं अधरामृतरस पान करी । मंजुळ ध्वनि अति गति गमकें अळाप उमटति सप्तस्वरीं । उपांग वेणू ब्रह्मवीणे ताळमृदांग घनगजरीं । थरिकुकु थरिकुकु थरिकुकु था शाम मनोहर नृत्य करी ॥३॥स्वरुप सुंदर कृष्णाचें सार आगमनिगमाचें । स्तवितां वाचा पारुषल्या निवांत श्रुति नेति वाचे । मांडुनि ठाण त्रिभंगीचें मुनिमोहित जें नवलाचें । दर्शनमात्रें भय वारी अनन्य रामदासाचें ॥४॥॥पद॥ (निरुपम रामाबाई॥) स्वानंदयमुनातटी बोधदृमाचे तळवटीं वो । जगदीश नरनटी उभीं येकपदाचे नेटीं वो । द्वितीय पद उफराटी स्पर्शूनीया अंगुष्ठी वो । त्वंपदपटकटतटीं काखे खोउनी तत्वताटी वो । गोपाळ साउली उभी कदंबवृक्ष्यातळीं वो । परब्रह्मपुतळी भाग्यें अवतरली गोकुळीं वो ॥१॥चिदअतसीकूसुम त्याहुनि तनुतेज सुशाम वो । अति सुकुमारपणें शब्द कठीण वाटे व्योम ओ । पूर्णानंद सरोज तैसें वर्हील तें मुखपद्म वो । गोपीनयन मधुर तेथें पावती विश्राम वो ॥२॥वेणु वाहे मधुकर शब्देंवीण गाये अक्षर वो । कोंदले अंबर खेचर जाले तदाकार वो । समग्र धरणीधर तृणचर समीर आणि नीर वो । रामींरामदासीं तन्मय जालें सचराचर वो ॥३॥॥श्लोक॥ अरे उद्धवा माधवा काय केलें । हरीवीण कां व्यर्थ आयुष्य गेलें । कळेना तुला ज्ञान तुझें जळालें । तुझें प्रीतिचे सौख्य कोठें बुडालें ॥१॥अनघडा दगडा विघडा धडा । अनघडा न घडा विघडा घडा । तडमडा विधडा दुधडा धडा । कडकडा चि कडा उकडा फडा ॥१॥क्रुरा अक्रुराला दिल्हें नाम जेणें । तया पाहतां सर्व चातुर्य ऊणें । तया निर्दयाला दयाळू ह्मणावें । गुणेंवीण गूणास कैसें गुणावें ॥१॥चटकी चटका चट लाउनि जातो । आटकी झटका झट होउनि येतो । लटकी लटका ळट लंपट मा तो नटकी नटका नटकी नटसा तो ॥१॥मदे नारदें इच्छिलें गोपिकेसी । तेणें नारदी जाहली सिद्ध कैसी । कुविद्या करी अंतरीं सूख वाढे । तया रिकामा विकारी रिता कां न हारी । रिझेना भिकारी रिपू खेदकारी । रिसामाजिं सारी निघे ना गरारी । रिटासूर मारी तमारी मुरारी ॥१॥हरी तो हरी पाप संसार माया । तजा रे भजा माधवा देवराया । अरे व्यर्थ कीमर्थ प्रपंचमाया । करी तापल्या नीववी नीजछाया ॥१॥कृष्ण उदार सदां रणदार कदां रजनीं परदार असे हा । मार कुमार जनी सकुमार सकुमार पितावरि मार करी हा । कुंडल मंडल गंड युगे शशि खंड धरी हा । दंडधरावरि दंड धरी हरि चंड अखंड चिलंड दिसे हा ॥१॥चला चला रे हरि तो निघाला । मोर्चे बळें रे चढऊनि घाला । कैसा वरी हा घालील घाला । त्या संगतीनें पळणी अघाला ॥१॥गोपाळ ह्मणती घालूं हमामा । दोहूं चला रे गाइ घमामा । वळती करा रे सांगा तमामा । तोशें तनूचा करी दमामा ॥२॥धाऊनि तोडी कपि तो कठाणें । खाऊन पाहे समजे पुठाणे । बोले चि नेले अवघे वठाणें । बदरीफळाचें घेतों गठाणे ॥३॥पाहा बरेसे अर्थी तुटे रे । तुटोनि सिंकें मडकें फुटे रे । कितेक प्राणी बहु सानटे रे । धावोनि जातां मग आपटे रे ॥४॥अपूर्व जालें नव्हतां मिनीशा । जळोन गेल्या अवघ्या च मीशा । उरलीं खराटें जैशा समीशा । विद्रूप जाल्या वदनीं अमीशा ॥५॥नटें नेटकें रुपलावण्य साजे । यमुनेतिरीं रम्य राजे विराजे ॥एकूण श्लोक ८॥॥वोवी॥ ऐकोन यापरीं महत्व सुरस । श्रोतयामानसीं भरला उल्हास । कृष्णजन्माचें ऐकों रहस्य । अपेक्षवंत बहु जाले ॥३३॥यास्तव कथितसें हरिजन्मकर्म । ऐका श्रोतेनो माना संभ्रम । श्रवण सद्भावें करितां भ्रम । बाधिजेना सर्वथा ॥३४॥आत्मकृत कृष्णजन्म प्रारंभ: ॥पद॥ हरी सुखघन तर वैचित्र चरित्रेम दाउं गोकुळीं आला ॥ध्रु०॥ दुर्जनमारक सज्जनतारक ॥ वेष धरी सांवळा ॥ कपट नाटकी कवतुक करितो ॥ भुलवी बहु अवळा ॥१॥राजिवलोचन रमाविलासी ॥ राज्य करी स्वलीळा ॥ ब्रह्मादिक सुर वंदिति अनुदिनीं ॥ वानी वेद जयाला ॥२॥करुणाकारक कल्मषहारक ॥ कांही नहोनि संचला ॥ आत्मारामु अज अविनाशी ॥ नामरुपावेगळा ॥३॥॥वोवी॥ कंसादिकांची पीडा दारूण । गोरुपें धरणीसवें मुनिगण । घेऊनि विधाता रिघोन शरण । नमोन ग्लांति निवेदी ॥१॥॥अभंग॥ देवा सांभाळावें जाजावलों बहु । नाहीं उमस घेऊं ठाव कोठें ॥१॥दुर्जनाची पीदा साहवेना दारूण । भारावले तेणें सत्व नाही ॥२॥यज्ञादिक कर्म धर्म तें राहीलें । विस्मित होठेले ऋषी मुनी ॥३॥वारुनि उबारा गोविप्रा सांभाळीं । पाडावें सुकाळीं स्वात्मानंद ॥४॥॥वोवी॥ अभय देऊनि विस्मयवचनें । सहित निधितटा येऊनि द्रुहिण । स्तवितां प्रकाश तो पडला गहन । तरी हि निभले स्तवनाश्रयीं ॥२॥॥पद॥ नमो नमो जी देवराया । भक्तसहाया सखया ॥ध्रु०॥ तात मात तूं बंधु भ्राता । तव पद नेणुनि सिणलो वाया ॥१॥सगुणवेशे धरि दावी लीळा । सुखसर देऊनि कीर्ति वराया ॥२॥आत्माराम अज अविनाशा । करिं सांभाळण अपराधीयां ॥३॥ ॥वोवी॥ तंव भक्तीस्तव तेजीं निघालें वाक्य । जा स्थळा होईल सर्व ही सौख्य । अवतार घ्यावया होता नेमक । गेले स्वस्थाना वानित ॥३॥॥श्लोक॥ गोविंद गोपाळ हरे मुकुंदा । सच्चिद्धना तारक सौख्यकंदा । त्रिविक्रमा श्रीधर चक्रपाणी । हे तार्क्ष्यगामी करुणासिराणी ॥१॥॥वोवी॥ मानोन राहिले स्वस्थ सुकाळ । सुरवान्नर ते जाले गोपाळ । गोवत्स होनटले ऋषिमुनी सकळ । गाया त्या जाल्या श्रुत्या स्मृत्या ॥४॥धन्य वसुदेवदेवकीसुकृत । नंदयशोदा भक्त पुण्यवंत । धन्य गोकुळामाजीं माकांत । जन्मोन लीळा करुं इच्छिलें ॥५॥येरीकडे कंसरायभगिनी । देतां वसुदेवा देवकीनाम्नी । मिरवण्यांत जाली आकाशवाणी । रे भाचा आठवा तव काळ ॥६॥नि:पात करुं पाहे दंपत्याप्रती । देवमाता करी काकुलती । आठवा असे कीं तुझ्या हातीं । कां दु:ख देशी सर्वत्रा ॥७॥ऐकोन यापरी खळाहृदईं । करूणा उपजली कांहींबाही । दंपत्या ठेऊनि कारागृहीं । रक्षणे करावी सावध ॥८॥प्रथम पुत्र जाला सलक्षणी । तंव काकीं गार्धवीं केली ध्वनी । पिंपळवृक्षाचा गलबला ऐकुनी । जागले दुष्ट रक्षक ॥९॥सूचितां दैत्य तो येऊनि पाहे । बाळ बहु सुंदर दिसताहे । वाचो ह्मणे हा मम वैरी नव्हे । बंदिस्था वाटला संतोष ॥१०॥देखोन दैत्याचें तपपुण्य अगाध । हराया देवीं स्तवितां नारद । येऊनि खळाला कुशल शब्दें । कळविलें आठ ही आठवा ॥११॥एवं बाळहत्याचा दोष सांचोन । सुकृत सर्व ही पावावें क्षीण । त्वरें दुष्टाचें व्हावें निर्दळण । योजिलें ऐका पापरीती ॥१२॥॥अभंग॥ पाप निवडितां निवाडा होयीना । गुरुविण कळेना अलिप्तता ॥१॥गाडयाभरी किडे मारिल्याचा दोष । पक्षी येक नाश करितां घडे ॥२॥वाडाभरी करितां अंडजा हनन । पशु वधितां जाण नीच येक ॥३॥नीच पशु सहस्त्र गोहत्या ते येक । शत गोहत्या देख येक विप्रीं ॥४॥शतविप्रवधसम करितां नारीखप । शतस्त्रियांचीं पापें बालहत्या ॥५॥शतबाळ वधितां त्याचें जें दुष्कृत । बोलतां अनृत येक शब्द ॥६॥माया मृषा सत्यी सद्वस्तु कळेना । दुष्कृतगणना त्याची काई ॥७॥स्वात्मगुरुपदा भजोनि अनन्य । पावन पावन व्हावें आधीं ॥८॥॥वोवी॥ असो हें रोषें दानवेंद्रें कठीण । आसुडोन बाळाचा घेतला प्राण । ऐसे चि सहा पुत्र मारिले आपटोन । दु:ख दारूण वदवेना ॥१३॥मग देवाजीचा पूर्ण सन्मित्र । वडील भोगूं मान स्वतंत्र । सातवा गर्भी प्रगटला भूधर । तंव केलें विचित्र देवरायें ॥१४॥वसुदेवाची ज्येष्ठ पत्नी । स्वस्थानीं होती रोहिणी । तिच्या उदरीं घातलें नेऊनि । गर्भ काढूनि देवकीचा ॥१५॥गर्भचिन्हकळा देखोनी नयनीं । लोक आप्त वदती हे काय करणी । तंव अशरीरि उठिली वाणी । संशय न धरावा ह्मणोनि ॥१६॥॥पद॥ न कळे नेणवे करणी देवाजीची ॥ध्रु०॥ वेदादिक बहु सिणले वानितां । ठकले शेषादि विरंची ॥१॥दाऊनि माइक माया साच चि । लीळा दावितो बहुत चि ॥२॥आत्माराम तो अज अविनाशी । चिंता वाहतो भक्ताची ॥॥वोवी॥ सप्रेमभावें मनीं आठवा । तोडील समस्त संसारगोवा । देवाधिदेवा ह्मणती आठवा । गर्भी संभवला ह्मणोनी ॥१७॥गर्भ जिराला देखोनी पोटी । कंसासी काळजी लागली मोठीं । समजाविलें त्या साथीचे कपटी । प्रौढप्रताप वर्णोनी ॥१८॥देवादि नृपती कांपती तव भयें । दर्पे गळाला गर्भ नवल काये । स्वस्थ होठेल वदत होय होय । मग आठवा आला उदरासी ॥१९॥वधुवरापाईंच्या बेडया पाहवित । कुलुफ अर्गळादि बंद करवीत । राखणाइता वोपूनि उचित । जागा हो ह्मणे अहिर्निसीं ॥२०॥हरिमायेचा हो विचित्र खेळ । जंव समीप पातला प्रसूतकाळ । अपायकर्ते जे दुर्मद खळ । जाले निमग्न निद्रालईं ॥२१॥बंदीग्रहीं उजळला प्रकाश । मायबाप जाले समाधीवश्य । तंव षोडश अब्दाचा सगुणवेश । उभा जगदीश दैदीप्य ॥२२॥॥तव॥ तो मनमोहन सावळा । अघटित ज्याची लीळा ॥ध्रु०॥ पाहतां जयातें भ्रांति नुरे । भवभयमाया विरे ॥१॥खेळे जनमन भरोनी । लावण्याची खाणी ॥२॥ भजतां सप्रेमेम सुखधाम । भाळे आत्माराम ॥३॥॥पद॥ (हरी कल्याण॥) हरी अनंतलीळा । अभिनव कोण कळा ॥ध्रु०॥ खेचर भूचर सकळ चराचर । हेत बरा निवळा ॥१॥दास ह्मणे तो अंतरवासी । सकळ कळा विकळा ॥२॥॥वोवी॥ आपादमौळीपरियंत सुंदर । लावण्यपुतळा मनोहर । ज्यापासुनि हा सर्व विस्तार । सर्व ब्रह्मेति श्रुतिपाद्य ॥२३॥॥अभंग॥ साजिरें गोजिरें स्वरुप सुंदर । दाता मनोहर दीनबंधु ॥१॥मदनतात रमावर शिवमित्र । ब्रह्म ज्याचा पुत्र उर्वीनाथ ॥२॥क्षिराब्धीचा ठेवा वैकुंठनिधान । जीवीचें जीवन परात्पर ॥३॥मुगुटीं कोटिभानुप्रकाश गोठला । वैजयंतीमाळा पदक शोभे ॥४॥दिव्य वसन दिव्य शोभे पीतांबर । ब्रीदाचें तोडर गर्जे पाई ॥५॥दिव्य मुख दिव्य नेत्र सुभूषणी । आयुधयुक्त पाणी शोभा देती ॥६॥तळपती कुंडलें केयूरकंकण । मुद्रा शुद्धज्ञानतेज फाके ॥७॥मुखावरुनी इंदु नखावरुनी मदन । कीजे वोवाळन सहस्त्रावधी ॥८॥ज्याचा न कळे पार वेदशेषादिका । भावीकाचा सखा आत्माराम ॥९॥॥वोवी॥ मग सावध होठेले जनकजननी । पाहतां पाहण्याची न पुरे धणी । संतोष भरला तो न समाय गगनीं । शोकतापदु:ख विसरले ॥२४॥देवकी पुसे बा कोण तूं येथें । वासुदेव हरी मी बाई ग तव सुत । भक्तजनाचा पुरवीन हेत । सौख्यसुकाळ येथुनी ॥२५॥ऐसा कैसा तूं होसील पुत्र । देव चि अससी तरी दावीं विचित्र । तंव ब्रह्मांडरचनाज विकसोनि वग्त्र । दावितां जाले विस्मित ॥२६॥मग हळुं च हो देवा ह्मणे सान । तरी च साजेल सुपुत्रपण । हरी ह्मणे ऐका सांगेन खूण । कांही अनुमान करुं नका ॥२७॥गोकुळीं यशोदा प्रसवली माया । तेथें मज ठेवा सीघ्र नेऊनियां । ती मोहनीस आणोन ठेवा या ठाया । सर्व कार्य विजय होईल ॥२८॥सुचोन यापरी बापा हितगुज । बाळरुप धरिलें स्वयें यदुराजें । न कळे देवादिका जयाचें चोज । आनकदुंदुभी विस्मावला ॥२९॥दर्प कंसाचा झगटला हृदई । येवढें तरी वाचो भावी कोठें हि । गहिंवरोन स्तब्धता धरितसे आई । बापें उचलिला बाळासी ॥३०॥ढाळीत प्रेमाश्रु करीत खंती । हळु च मग बोले ऐका जी पती । धिग जन्म आमुचा वाचणें तेम किती । कैं मागुती भेटेल हरी हा ॥३१॥॥पद॥ (राग-कल्याण॥) कमळदळनयना चाल हरी ॥ध्रु०॥ सकळपाळका अंतरचाळका । कठीणता न करी ॥१॥दीनदयाळा भक्तवच्छळा । दुरिदूरी न धरीं ॥२॥रामदास ह्मणे आतां तुजविण उदास । वाटे तरी ॥३॥॥वोवी॥ तंव श्रीहरिकृपामहिमा मोठी । बंधन कांहीं च न पडे दृष्टी । हळुहळु चालितां होत बहु कष्टी । कां मागें अटाटी भोगिल्या ॥३३॥प्रजन्य पडतसे दाटला अंधार । गुप्तरुप तेथें येऊनि भूधर । फण्याश्रयाचें धरिलें छेत्र । यमुनाथडीसी पातले ॥३४॥अंतकभगिनीचें दुस्तर जळ । भोवतीं भोंवर्या वाजे खळाळ । बाळा संरक्षो देवदयाळ । ह्मणोनी महापुरीं प्रवेशला ॥३५॥स्पर्शोनि श्रीपदा होऊं धन्य । उतोनि चढत चालिली यमुना । बाळा वरिवरें उचलीत जाणा । आपण पडूं पाहे वाहणींत ॥३६॥देखोन पित्याची भावना दृढतर । ताडिता पादाग्रें जीवना श्रीधर । ईनकन्या ते तुष्टोनि थोर । द्विखंड जाली तात्काळीं ॥३७॥जेवि शुभांगी रचिला भांग । योगिया नीट तो सुषुम्नामार्ग । ज्ञानिया विदित तो तुर्या द्विभाग । एवं पातले गोकुळा ॥३८॥॥अभंग॥ ध्यातां ज्याचे पाय गवसे स्वहितसोय । सर्व सौख्य होय भक्तजना ॥१॥जपतां ज्याचें नाम आटे भवसिंधु । तन्मयता बोधु हाता चढे ॥२॥कृपामात्रे होय विश्रामा विश्राम । दाता आत्माराम दीनबंधु ॥३॥॥वोवी॥ श्रीहरिमायाकरणी अद्भुत । नसती च कोणी गोकुळीं जागृत । यशोदा हि असे निद्रिस्थ । प्रसवलें मी हें नेणवे ॥३९॥प्रवेशोनियां सद्गृहामाजीं । ठेऊनि सुखकंदा यशोदासेजीं । परतला माया लाऊन हृदाब्जीं । बंदीशाळे पातला ॥४०॥पूर्ववत जडलें अवघें बंधन । अट्टहास्यें करी तैं माया रुदन । जागले दुर्मदीं कळवितां तेणें । कंस दुर्जन धाविनला ॥४१॥वेडावलासे आठवा ह्मणतां । पुत्र कन्या कीं नोळखवे भ्रांता । आसुडोन कन्येतें आपटूं जातां । मुर्गाळोन हात उसळली ॥४२॥विद्युलतावत झमकोन गेली । तशांत मोठयानें दिधली आरोळी । भ्रष्टा तव वैरी वाढतो गोकुळीं । ऐकोन काळजी धरी बहु ॥४३॥मिळवोन दुष्टातें प्रयत्नीं पडिला । ते पुढें ऐका हो श्रीहरिलीळा । गोकुळीं मांडला उत्सावसोहळा । जागले सारिती विधान ॥४४॥प्रेमाल्हादु सकळिकापोटी । जय जय वदोनि नाचे परमेष्ठी । सुरवरीं केली सुमनवृष्टी । सुवाद्यगजरे होतसे ॥४५॥॥श्लोक॥ कृष्णाष्टमी श्रावण सौम्यवारी । वर्षेऋतु रोहिणी मध्यरात्रीं । स्वयें हरी जन्मुनि बंदीशाळीं । आला पहा गोकुळी ते चि काळीं ॥२॥॥वोवी॥ पतिपाळावया सद्भक्तजना । मारावया दुष्ट दुर्जना । भूभार फेडूं श्रीदेवराणा । गोकुळामाजी अवतरला ॥४६॥॥श्लोक॥ नभीं दुंदुभीवाद्य केला सुरांनीं । जय गर्जुनी वृष्टि केल्या फुलांनीं । येशोदामतें नंदे आनंद केला । विधी सारिले पूजुनी ब्राह्मणाला ॥३॥घरोघरीं करिति उच्छव सर्वमानें । जेथें हरी प्रगटला मग काय वाण । सर्वांसि सौख्य घडलें विधियुक्त सार । संपादिलें सकळ गर्गमुखें पवित्र ॥४॥॥वोवी॥ गौळीजनांचा भावार्थ शुत्ध । देती विप्रांनीं आसिरवाद । गर्गाचार्य ज्ञाता ब्रह्मविद । जातक भविष्य वदतसे ॥४७॥॥पद॥ ऐका वो भविष्य बाई । बाळाची थोर नवाई ॥ध्रु०॥ज्यार चोर हा होइल गाढा । चरणीं वोढुनि तारिल झाडा । लात हाणुनि मोडिल गाडा । मागें न सरे किमपि होडा । मारील किरडु बगळा घोडा । मर्दिल सर्पा उकलुनि वेढा । करुनी विचित्र ह्मणविल वेडा । गोपाळक हा होइल निधडा । दाविल बहुतां बहु चतुराई ॥१॥पाषाणाच्या पडतां वृष्टी । उचलुनि पर्वत धरील बोटीं । ज्वाळापासुनि न होय कष्टी । स्वयें स्तवाया ये परमेष्टी । कल्पिल हा तों द्वितीय सृष्टी । चोरुनि आणिल भली गोरटी । वसविल ग्रामा समुद्रबेटीं । संतति संपति मिळविल मोठी । तरतिल भाविक याचे पाईं ॥२॥अश्वाची हा करिल चाकरी । सारथि होइल सर्व विचारी । पुरविल वसना वाहतां नारी । ययासि न दिसे दुसरी सरी । पांचजणासी करील मैत्री । खपून टाकिल दुर्जन वैरी । भक्तजनाचा हो कैवारी । आत्माराम चि हा निर्धारीं । परतरपावन विलसे देही ॥३॥॥वोवी॥ जाला भक्तीचा ऐसा सुकाळ । वश्य होठेलें परब्रह्म सांवळें । नाहविती निजविती गाती प्रेमळ । निंबलोण करिती तनुमनें ॥४८॥॥पद॥ (पाळणा) ॥ जो जो जो जो रे घनशामा । मुनिजनमनविश्रामा ॥ध्रु०॥ सच्चित्सुखधामा । विश्रामा । अभिनव नामगरीमा ॥१॥कमळदळनयना । मनमोहना । पाहीं जगज्जीवना ॥२॥आत्मा अविनाशा । जगदीशा । तारक सगुणवेशा ॥३॥॥वोवी॥ किती वानावें तयांचे सुकृता । चालतां बोलतां धंदा करितां । हरिविन्हा नेणती आन सर्वथा । श्रीजगन्नाथा भाळविलें ॥४९॥॥अभंग॥ ब्रह्मादिकां न कळे ज्याचा खेळ । अजन्मु तो७॥ साकार जाला बाळ ॥१॥नामरुपा अतीत जो निष्काम । कृष्ण कृष्णा बाहतो त्याचें नाम ॥२॥ज्यासि ध्यातां संसार होये वाव । अग्निगोत्रीं उद्भवला स्वयें देव ॥३॥कर्माध्यक्ष तो जाला कर्माधीन । आत्माराम स्वसाक्ष परिपूर्ण ॥४॥॥वोवी। श्रीकृष्णजीचा लीळासंभ्रम । स्मरोन हृदईं दाटला प्रेम । अभंग वदलासे समर्थ उत्तम । श्रवण करा हो आदरें ॥५०॥॥अभंग॥ (साधुसंता मागणी) परब्रह्म अवतार भूमिवरी । प्रगटला हा गौळियाचे घरीं ॥१॥कृष्णरुप धरिलें कृष्णनाम । गोपीगोपाळाचे पूर्ण करी काम ॥२॥देवां रक्षुनि दानवा उद्धरील । ऐसें जातक सांगती ऋषीकूळ ॥३॥व्यास नारद आदरें ज्यासी गाती । त्याच्या खांदीं कांवळी काठी होती ॥४॥शशिसूर्यसम कांति ज्याची कळा । त्यासि ह्मणती सावळा आणि काळा ॥५॥गोविंदाची कृपा जालि आतां । दास ह्मणे गोविंदगूण गातां ॥६॥॥वोवी॥ स्वल्पसकतीं कथिलें कथन । श्रवण हो मानूनि गहन । सप्रेमभावें करितां भजन । आत्माराम भाळेल ॥५१॥॥इति श्रीकृष्णजन्म समाप्त:॥॥वोवी॥ ऐकोन यापरीं सुदिव्य कथन । मनासी वाटलें समाधान । ऐका पुढारी संतमहिमान । जेणें पावन होइजे ॥१३५॥॥अभंग॥ मी तों महाराजाचा देशी अफ्तीदार । धाडिलेति वरपत्रासह ॥१॥वृत्तिमाल नित्य थापटीं घालुनीया । देणें ज्याचा तया सांभाळुनी ॥२॥इंद्रियकुळासी दमावें नेमावें । गुरुराजया व्हावें रुजु तेणें ॥३॥नष्ट अहंकार गेला फौजदार । तेणें कौलपत्र हाता आलें ॥४॥कामकर्दे ते चि साळसूद जाले । साव चि होठेले परमार्थी ॥५॥तंटे फटे नाही जाला हो सुकाळ । भाळला दयाळ आत्माराम ॥६॥॥वोवी॥ दासविश्रामधाम विशाळ । तुर्यायल्लंबागिरीपीठमौळ । स्वात्मसुखदाता भक्तजनपाळ । आत्माराम नांदतु ॥१३६॥इतिश्री श्रीरामकृपा । तारक परमार्थ सोपा । सज्जनमहत्व । संसारनिंदा । लक्षभोजन । ब्राह्मणमहिमा । स्त्रीपुरुषभेद । गंगाप्रसन्न । कृष्णलीळा । कृष्णजन्म । गत्य । सत्याणव संपूर्ण ॥९७॥ N/A References : N/A Last Updated : March 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP