॥समास॥ ९९

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


॥श्रीरामसमर्थ॥

॥पद॥ (कल्याण, धाट-बरें नर०॥) साधन हें बरवे । सकळ जनीं ॥ध्रु०॥ नामें महादोष जाती । पुढें संतांची संगति ॥१॥
नामें होय चित्तशुद्धि । नामें होय सर्वसिद्धि ॥२॥
रामदास सांगे खूण । नाम शिवाचें साधन ॥३॥

॥वोवी॥ जे साधनीं सुलभ साधन । वेगीं भवाचें होय निस्तरण । सकळ सौभाग्या होय कारण । तें रामनामभजन सत्सेवा ॥१॥
कर्मकचाटीं होतसे आट । योगपवनादि महासंकट । तीर्थक्षेत्र फिरतां अतिशयी तें कष्ट । विद्यामदें पेटे अहंकारु ॥२॥
साधका असती बहुत साधनें । सिद्धसिद्धांचे हें होय जीवन । कासया करावे नाना प्रयत्न । विश्वास नामीं न धरितां ॥३॥

॥अभंग॥ रामनामध्यानीं जाला जो तन्मय । नर ह्मणों नये तयालागीं ॥१॥
चित्तशुद्धि होय सर्व सिद्धि फळे । मोक्षश्री या वोळे झडकरी ॥२॥
महादोष जळे सज्जन वोळती । चुके अधोगति जन्ममृत्य ॥३॥
देव आत्माराम होय साहकारी । त्याचेनि संसारीं धन्य होती ॥४॥

॥वोवी॥ यास्तव आळसाला करुनि दूर । दुश्चित निंद्येला करुनि मार । सावधानपणें अहोरात्र । रामनामभजन करावें ॥४॥
गाईलें चि पुन्हा गात चि जावें । पालट न करावा यांतूनि भाव । तेणें आपुलासा होऊनि राघव । स्वरुपीं ठावे देईल ॥५॥
कळकटेना हें नामपियुख । उत्छिष्ट नव्हे हो मोक्षदायक । उगे चि भ्रमानें न पडतां ठक । भोगिजे सौख्य गाइजे ॥६॥

॥अभंग॥ गाइलें चि गावें जीवें सर्वभावें । तें चि तें ह्मणावें रात्रंदिवस ॥१॥
रात्रंदिवस नाम तें चि तें मागुतें । आवडीं स्वहित गात जावें ॥२॥
गात जावें परि वीट मानूं नये । दास ह्मणे सोय राघवाची ॥३॥

॥वोवी॥ ऐसें असतां हें सुलभ साध्य । ह्मणाल न होती कां प्राणी सावध । तरि संसारनिशाची चढोनि धुंद । विषयछंद सुटेना मरतां हि ॥७॥
त्यांत चि बडबडितां ढोंग वाक्‍गौरव । मायामय वासना दावितां लाघव । न होय सद्गति वचनकटाव । काय कायोचे स्वल्प ऐका ॥८॥

॥कोड॥ ज्याचा आधारें फिरतसे चक्र । उपजती ज्याचेनि पदार्थप्रकार । सकळिकां प्रपंची करी साजर । श्रोतेना याचा अर्थ करा ॥९॥
लपवी नरतनु नसतां प्राण । तयास ज्याचेनि होय बंधन । वैरत्व नसे हो तयालागून । शोधून पहा याचा अर्थ कसा ॥१०॥
सांभाळितां रामांनीं रावणाला । सीता निवारी घे मान्यसोहळा । नावडे चि संगु कुंभकर्णाला । पसरितों पल्लव अर्थ जाणा ॥११॥
सत्तावीसामाजील तेरावें । मुखीं येक मोडलें जें विप्र नांवें । द्वादशी तृतीयेचे ज्या पुजागौरव । या अर्थास्तव आराधा गणराया ॥१२॥
सांब नव्हे हो असोन तीननेत्र । उदरीं वसे हो बहु भिष्ट नीर । वृक्षाग्रीं असतां नव्हे वान्नर । अर्थ करा नारेळ वोपीन बहु ॥१३॥
चतुर्मुख असतां नव्हे ब्रह्म । ह्मैसारुढ होत्साता नव्हे यम । नीर आसोन नव्हे तीर्थ उत्तम । अर्थ कळेना तरी पखाल हाणा ॥१४॥
जन्म द्वादशाब्दीं नव्हे मुनी । दुधाणा नव्हे हो दूध आसोनि । वान्नरमुखवदमुख अर्थ ध्यानीं । न ये तरी ल्या हो कुचचोळी ॥१५॥
छेतीस घायेचा नव्हे द्विज आचार्य । नाम असोन तें वीर गुरु नव्हे । रस बहु भरितां चंगा न होये । वोपीन घृतडोणा अर्थ करा ॥१६॥
नरनाम टाकुनी जाली वनिता । द्विजिव्हा सर्पिणी नव्हे सर्वथा । सर्व सर्ता तिची अर्थ उमजतां । कलमास येश घडेल तुमच्या ॥१७॥
भुखणी काळज्ञ तो नव्हे ज्ञानी । अचळ नव्हे सिरीं सप्तशृंग असोनि । वैरी नव्हे हो दंपत्या विघडुनी । अर्थ न कळे तरी वर्डा कुकुटवत ॥१८॥
विश्वेश्वराचें मोक्षपुरी नांव । असोनि शूद्राला कामासी न ये । तें उकरित्या धरी तो बळराम नव्हे । करा अर्थ तो नट्टनागर ॥१९॥
षट्‍पद असोनि नव्हे भ्रमर । वाघनाम असतां नव्हे व्याघ्र । अर्थ उमजोन द्या वेगीं उत्तर । नातरी पुसा जा कोष्टीला ॥२०॥

॥दोहा॥ इंद्रबहन रविसुत पवनपुत्र भांडार । येतीन्हो ये कठौर भये कहो सखी कवन विचार ॥१॥
भीमने दिया भारत और रामायनमो हनिमंत । त्रिपुरने दीन्ही शंकर आज मोहन दीन्ही कांत ॥२॥
रामसहोदर कनकरिपु और भरथको भाय । ये तीन्हो नही तुजमे उसबीध पीय रुसाय ॥३॥
ये तीन्हो हय मुजमो येक अवगुन मै कीन्ही । जो सुत बैराटकों वो मै फेक दीन्ही ॥४॥
गजकुं जोरकर चंद कंजकुं गंगाबाप पर राख । सुन सखी ज्या मिली आपन पियासे साधली आत्मसुख ॥५॥

॥अभंग॥ सखीसंवाद ॥ कां वो सखी काये चिंता हे लागली । कृपा मंद केली खुणेनासी ॥१॥
कंजी चंद्रायण सिव्ही हस्तठाण । श्रवे कंजीवन मेघावरी ॥२॥
शार्वरीभगण शोभा कां न देती । रंभासुतकांती कां जडली ॥३॥
रावणाला कां हो नीट करीनासी । सौभाग्यवस्तूसी दूर केलें ॥४॥
शशीवाहनेची नाहीं दुहितासंगु । शेषकन्यारंगु नाहीं मुखीं ॥५॥
पांगुळला कां हो थोर नभसुन । शोभे कुंभकर्ण कां न घे चि ॥६॥
ऐका बाई न ये अष्टाक्षाचा बाप । शफरीध्वजप्रताप प्रबळला ॥७॥
शक्रारी बा वैरी सेवक जनक । खात्याचें अंतक स्वामी दावा ॥८॥
जाऊनियां सखी प्रार्थितां सप्रेमें । आला आत्माराम सुखावले ॥९॥

॥वोवी॥ यापरीं असती बहुत संज्ञ । ह्या कटावगिरीनें न होय ज्ञान । जंव अर्पोन देवाला तनुमनधन । करील भजन तैं सार्थक ॥२१॥
वृथा गवंसोन पडतां या भवीं । कष्टावें चि नलभे इहपरपदवी । प्रसन्न जरि जाली सपुष्ट गाढवी । काय संतर्पणा पुरवी घृत ॥२२॥
थोर पोहणारे कोल्हे कुतरे । पूस तयांचें धरितां दृढतरें । खळाळवोहळाचे पार नुतरे । तेवि संसार आप्तसाह्य ॥२३॥

॥श्लोक॥ विषयसुखें चि सुखावला । विषयदुखदुखें चि दुखावला । उबगला भ्रमला भ्रमें भूलला । भ्रमरहीत भला पद पावला ॥१॥

॥अभंग॥ वृथा काळ जाये संसार करितां । नव्हे सार्थकता इहपर ॥१॥
भले भले वदती संपदा देखुनी । पडती फिरुनि सर्ता भाग्य ॥२॥
सुख जालें वाटे सवें दु:ख लोटे । तूक तुटे विटे सर्व कांहीं ॥३॥
राव रंक हो कां ताप तो सुटेना । चिंता वोहटेना भांती पडे ॥४॥
स्वतंत्रता नाहीं सकळाविषईं । होत कांही बाही नावरे चि ॥५॥
परि स्वात्मानंद यांत चि सांपडे । भजन जरी घडे संतकृपें ॥६॥

॥वोवी॥ करुनि घेतलियां सार्थक चि आहे ॥ साधी संसारी भला जो सोय । नातरी वायां सिणत चि राहे । दाबरोब कायदा राखा ह्मणे ॥२४॥
हरिदासांनीं करितां कीर्तन । वैराग्यपराचें बोलतां बोलणें । रागा बहु येती यजमानपणें । अपमान करुन पिटविती ॥२५॥
शुभवारीं शार्वरीं सभागारीं । प्रस्ताविक बोलणें पडतां श्रोत्रीं । कोपास त्यावरी येऊन भारी । पिडिती किंवा धि:कारिती ॥२६॥
यमदूत ते समईं येऊनि गुप्त । घात करितां चि प्रीतिपात्रातें । अपशकुन न पाहतां करिती आकांत । न पुरे लोळाया मसणवटी ॥२७॥
ज्यास्तव रडती ते येतां स्वप्नीं । पछर मारविती द्रव्य खर्चुनी । सांगत चि जाती दुसर्‍यास काहणी । स्वहितमांगल्य न साधिती ॥२८॥
गुंतले बहुतेकीं भलते चि कर्मी । चित्त बहुतांचें वावरे अधर्मी । अकर्तव्यता जडोन ऊर्मी । करामती हव्यास धरिताती ॥२९॥
व्रत धरिल्यापासोन सेवटवरी । श्वानउपासना  दृढता जो धरी । तो पिसाळ श्वे दंशिता पीडा निवारी । उंदीर न बाधिती उपासितां ॥३०॥
नित्यपूजन पूजितां वारुळ । तो सर्पविख उतार करी  तात्काळ । व्याघ्रजप करितां सर्व हि काळ । त्यासवें क्रीडे न पीडी ॥३१॥
कितेक सिद्धिला गुद न धोवे । मसणवटींत पडावें नागवें । धिग जन्म तयाचा गुरुकृपावैभव । न लाहोन संसारामाजीं दडती ॥३२॥

॥अभंग॥ संसार करिती करणें चि आहे । जैसा काळ साह्य तैशापरीं ॥१॥
मरण सुटेना आहे कीं प्रचिती । नर्कवास अंतीं हें हि ठावा ॥२॥
तरी भ्रमभूलिमाजीं गुंडाळती । उपकारा न येती दुजयासी ॥३॥
धन्य तो सावध होऊनि तरला । स्वात्मानंदसोहळा लभ्य जया ॥४॥

॥वोवी॥ ऐसियापरीं प्रबोध करित । सज्जनगडीं राहिले समर्थ । ऐका पुढारीं वर्तला वृत्तांत । आनंदभरित होऊनि ॥३३॥
कामधेनूचें संतुष्टपण । दुभतां बहु मुखें न पडे नुन्य । लहर्‍या सिंधूच्या न होती उण्या । तैसे आनंदें हेलावती ॥३४॥
अखंड दाटती जेथें सत्सभा । झळके चौंकडे सुशांतिशोभा । अद्यापवरी ते फांकली प्रभा । भुमिजावल्लभाकृपेनें ॥३५॥
सकळांसी सदयें सन्मार्गसोय । दाविती निष्कामें रसीकराय । येकदां विप्रांचा मिळोन समुदाव । बोलती सगर्वे येकांतीं ॥३६॥
दासस्वामींनीं नृपाकारणें । भक्ति कराया निष्टंक वचन । बोलिले विप्राचें निघाले भेटीसी ॥३९॥
श्रोतेनो भूतटीं भुसुर चि देव । वर्णानां ब्राह्मणो गुरु हें गौरव । गवाऊन घेतलें मानादि वैभव । पावले रंकत्व हटें चि ॥४०॥

॥अभंग॥ श्रोता वदे देवा बहु श्रेष्ठ मान । असोनि ब्राह्मण कां निर्बळी ॥१॥
करिती नाना कष्ट न भरे चि पोट । आर्जिती निकृष्ट प्राणियासी ॥२॥
अन्ययातिमाजीं विद्या नाहीं फार । त्याचा बडिवार मोठा दिसे ॥३॥
गुरुत्व पडिलें निष्टोन कुपात्रीं । अविंधें कीं क्षेत्री राज्य नेलें ॥४॥
नाना भूतपीडा नाना ग्रहणपीडा । करिती रगडा ब्राह्मणासी ॥५॥
तप मंन्त्र वाक्य विद्या न फळे चि । वाट सुपूजेची कां रुंधली ॥६॥
वक्ता म्हणे ऐका स्वजात्या निंदिती । देखों न सकती परोत्कर्ष ॥७॥
विद्या स्वल्प असो नसो वसो फार । मी मी अहंकार न सोडिती ॥८॥
छेळीती साधूला निंदिती अन्नाला । नाणिती ध्यानाला उपकार ॥९॥
वंदिती त्याला चि भकोन निंदिती । विश्वास विरक्तिलेश नाहीं ॥१०॥
परा तळपट व्हावया इच्छिती । तेणें गुणें होती भ्रष्ट स्वयें ॥११॥
परा कथणें येक स्वयें असंतुष्ट । ज्याला त्याला कपटवादभेद ॥१२॥
चमत्कार पाहतां पाठीं च लागती । अधमा आर्जिती इलुस्तव ॥१३॥
विद्या सिकविती करिती आसीर्वाद । वर्म तें समुद कथिती नीचा ॥१४॥
भल्यासी विरोधें सुकृत नासिती । अधोगती जाती त्याच्या कोपें ॥१५॥
परधन परनारी टवाळी आवडे । सौख्य अस्ता रडे नास्तिशब्दें ॥१६॥
यासाठीं सिंतर पडले जाले दीन । हटनिग्रहानें नाडले हो ॥१७॥
जाणोनिया ज्ञानी हे गुण त्यागुनी । जाले पुण्यखाणी क्रियावंत ॥१८॥
धगधगीत पुण्यरासी ब्राह्मणातें । मान जेथेंतेथें काय उणा ॥१९॥
होय भक्तिवंता आत्माराम सखा । वंद्य तिनीलोकांमाजी तो चि ॥२०॥

॥वोवी॥ हें असो सर्वस्वीं पूज्य ब्राह्मण । हरवोन घेतला आपुला मान । न जाणोनियां संतमहिमान । समर्थांपासीं बीज केलें ॥४१॥
कापटय ऐसें हो तयांचे मनीं । विप्रयातीचा महापुरुष कोणी । ब्राह्मण न ह्मणती तयांलागुनी । पडती संशयीं गर्वानें ॥४२॥
भाविती महापुरुष मातले परम । नासाड केलें हो आमुचें कर्म । कर्म सकळांचे हें न कळोन वर्म । बळें चि निंद्येला आश्रयिती ॥४३॥
कर्म केलें हो जरी चोखट । गवसेल आपणा सर्गती वाट । कर्तृर्त्व तयाचें ह्मणाया खोटें । कारण नसतां हि चौताळती ॥४४॥
स्वयें न करिती कर्मधर्म नीट । आर्जिती अधमाला चालणें कपट । अतीत न येऊं लाविती कपाट । श्रुत्यर्थ कळविती दुजयासी ॥४५॥

॥अभंग॥ मावमैद प्रेम देखोवेखीं कर्म । नांव होऊं धर्म कामा नये ॥१॥
वेदांत पढोन सर्व ब्रह्म ह्मणणें । विखासी टेकणें लाजिर्वाणें ॥२॥
देव इंद्रादिक अग्निमाजी मुख । घालिती हरिखें अन्न सेऊं ॥३॥
टाकुनी हें सुख स्वर्गाप्रति जाणें । उछिंष्ट सेवणें कासयासी ॥४॥
ध्यातां येक्याभावें धावे रमाधव । वैकुंठासि जावें हेतु काशा ॥५॥
गुरुज्ञानसुधा वारी जन्ममृत्य । पिऊं सिळामृत कां आठव ॥६॥
ब्रह्म विचारानें सांपडे सद्भावें । मी चि श्रेष्ठ गर्व कां धरावा ॥७॥
आत्मारामपदीं असतां अनन्य । होतसे पावन सर्व सौख्य ॥८॥

॥वोवी॥ हें असो गुरुपासी येतां द्विजवर । बैसविले बहुपरीं करुनि आदर । आधीं च तयांचे जाणोनि अंतर । धर्म अधर्म प्रशांशिलें ॥४६॥
शमादि साधनीं जो असे मंडित । श्रेष्ठ तो ब्राह्मणु मान्य त्रिजगांत । नाडले बहुतांनीं क्रियाभ्रष्टत्वें । दशविध ब्राह्मण बोलती ॥४७॥
निबंध हि हि ऐलाड गोष्टी । न ये न सांगवे कळीच्या राहटी । वृथा अहंभावो धरिल्या पोटीं । ना जन्मसार्थक इहमान्य ॥४८॥
ब्राह्मण की हा चांडाळ वदती । क्रियेनें की हें होणें फजिती । हें असो नष्ट हि मान्य याति । तराया न लागे उसीर ॥४९॥
सस्वरुपाचें भांडवलकेणें । श्रुतिगृहामाजीं असे भरुन । तो भरणा ब्राह्मणीं असे स्वाधीन । नुकरितां दैन्य भाकिती ॥५०॥
मान द्या ह्मणोन कां कीजे हट । क्रिया असावी आपुली चोखट । तो सहज सर्वत्रा होय वरिष्ठ । ब्रह्मविद ब्राह्मण धन्य कीं ॥५१॥

॥अभंग॥ करा हो विचार थोराहुनि थोर । येक निर्विकार ब्रह्मनिष्ठ ॥१॥
यातिमात्र विप्र त्याच्या शताधिक । ग्रंथत्रयादीक जाणता हो ॥२॥
त्याहूनि अर्थज्ञ त्याहूनि साधक । त्याहूनि अधिक जितेंद्रिय ॥३॥
त्याहूनि तो श्रेष्ठ बोले तैसा चाले । ज्याचेनि निवाले संसारिक ॥४॥
सिद्ध योगी ऐसे येकयेकाहूनि । शताधिकगुणी गणियेले ॥५॥
सर्वांहूनि श्रेष्ठ ब्रह्माविद होय । आत्माराम स्वयें साह्य सदा ॥६॥

॥वोवी॥ शिरोश्रुतीचें जेथें राहटणें । जेथें कर्माचें होय ब्रह्मार्पण । ज्ञानाचें होत जेथें विज्ञान । तो ब्रह्मविद ब्राह्मण वरिष्ठु । ब्रह्मविद ब्राह्मण वरिष्ठु ॥५२॥
ऐसे ऐकतां विवेकगोष्टी । उल्हास उतटला सर्वांचे पोटीं । साह्येसी पातला भीमजगजेठीं । अनुग्रहपात्र होठेले ॥५३॥
देवाजीची करणी अद्भुत । कराया समर्थस्वामीअंकित । भलत्या मिसें आणोनि जनांतें । समुदायामाजीं मिळवितो ॥५४॥
जे निंदावया येती कृत्रिम । जे येती छळाया घेऊनि वर्म । ते चि फिरोन होती उत्तम । इच्छिती क्रम परमार्थ ॥५५॥
घडे जयाला निंदाअध्यास । ते चि होती हो पुण्यपुरुष । प्रसादवाक्याचा पिवोन रस । स्वानुभवपुष्टि लाधले ॥५६॥
ब्रह्ममंडळीची जाणोन आस्था । संतोष तयांला पावऊं मागुता । कल्याणसत्सिष्या बाहोन दाता । अनुभवार्थ गावया आज्ञापिलें ॥५७॥
अनुभवीक तेणें मिळाले बहुत । दुराभिमानु नावडे जयांतें । डोलों लागले उमजोन वाक्यार्थ । त्यांत स्वल्प ऐका सादरें ॥५८॥

॥अभंग॥ विवेकपंचक ॥ पूर्वी पाहतां मी कोण । धुंडी आपणा आपण ॥१॥
स्वयें आपुला उगव । जाणे तो चि महानुभाव ॥ध्रु०॥ कोण कर्म आचरलों । कैसा संसारासी आलों ॥२॥
आलें वाटे जो मुरडे । देव तयासी सांपडे ॥३॥
आली वाट ते कवण । मायेचें जें अधिष्ठान ॥४॥
रामदासाची ऊपमा । ग्राम नाहीं कैंची सीमा ॥५॥ ॥१॥

॥पांचा लक्षणीं पुरता । धन्य धन्य तो चि ज्ञाता ॥१॥
राखे गुरुपरंपरा । देव सगुण दुसरा ॥ध्रु०॥ विवेक वैराग्य सोडीना । कर्म उपासना सांडीना ॥२॥
बाह्य बोले शब्दज्ञान । अंतर्यामीं समाधान ॥३॥
रामींरामदास कवी । न्यायनीतीनें शीकवी ॥४॥ ॥२॥

॥अंतर्यामीं ब्रह्मज्ञान । बाह्य बोले शब्दज्ञान । अंतर्यामीं समाधान ॥३॥
रामींरामदास कवी । न्यायनीतीनें शीकवी ॥४॥

॥अंतर्यामीं ब्रह्मज्ञान । बाह्य सगुण भजन ॥१॥
धन्य धन्य तें चि ज्ञान । अंतर्यामीं समाधान ॥ध्रु०॥
निरुपणें अंतर्त्याग । बाह्य संपादी वैराग्य ॥२॥
रामीरामदास ह्मणे । ज्ञान स्वधर्म रक्षणें ॥३॥

॥श्लोक॥ रिझावें खिजावें भिजावें झिजावें । धरावें करावें हरावें तरावें । असों दे वसों दे नसों दे दिसों दे । ह्मणे दास दे दे वदों दे वदों दे ॥१॥

॥वोवी॥ ऐकोन यापरीं संतुष्ट पावले । मग जपतपादि क्रियानेम सारिले । सर्व हि सदन्नभोजनीं धाले । विसावोन आले कीर्तनासी ॥५९॥
वृथा न दवडिती काळ येकक्षण । सार्थकपणाचें हें चि लक्षण । सभागारीं बैसले सज्जन । कीर्तनारंभ करविलें ॥६०॥
अनंतबावा वेणु अक्काई । दत्तु महाकवी कल्याण निस्पृही । वासुदेवबावा उद्धवगोसावी । केलें घमंड कीर्तनीं ॥६१॥
मिळाले असती जे साधु सज्ञानी । देखोनि दासाचे सत्सिष्य सद्गुणी । धन्य ते ह्मणती गुणाख्य वर्णुनी । प्रसा गुरुचा हा भाविती ॥६२॥
कविराजयाचें कवनसार । ब्रह्मविद्या जे साक्षात्कार । प्रत्ययवाक्यार्था कळवितां उत्तर । होती तल्लीन सावध ॥६३॥
मग कीर्तनास उठिली बहिणाई । गुरुकर्म जडलेंसे जिच्या हृदईं । माईकत्व जिया विदित नाहीं । स्त्रीपुरुषविखादि भ्रमभ्रांति ॥६४॥
परमपुरुषपदीं जडलीसे दृष्टि । राममय भासे सकळ हि सृष्टि । प्रेमोल्हासभरणा भरोन पोटीं । बोलताम संतीं मानवलें ॥६५॥
बहु कांहीं बोलिली सक्रिया बोलणें । निर्वाणपदींचें सदैक्यध्यान । न करवें तितुकें व्याख्यावर्णन । स्वल्प येक वचन अवधारा ॥६६॥

॥अभंग॥ कीटकभृंगीन्यायें लागे जैं धारणा । तो चि येक जाणा ब्रह्मनिष्ठ ॥१॥
येर्‍हवीं ते बोल बोलती फुकाचे । काय सांगा त्याचेम शब्दज्ञान ॥२॥
चकोरचंद्रन्यायें जरी होय मन । ब्रह्म तें विज्ञान सत्य जाणा ॥३॥
बहिणी ह्मणे सिंधुलवणन्यायें भेटी । तेव्हां घडे गोष्टी ब्रह्मत्वाची ॥४॥

॥वोवी॥ ऐसियापरीं ऐकोन बोल । अनुभवीक श्रोतया येती डोल । मग आज्ञापितां दासदयाळ । वाटला योगींद्रा संतोष ॥६७॥
तो कीर्तनास उठिला केशवस्वामी । मूर्तिमंत खेळे ज्या बोध हृद्धामीं । प्रसन्न जयाला खगेंद्रगामी । असोन घरग्रामी निस्पृही ॥६८॥
थोरपणातें घातलें तळीं । संग्रहीं वागती प्रेमभावबळी । भेदभयातें करुन होळी । बेबाहा खेळती समस्थानीं ॥६९॥
लौकीकमानाची नसें चाड । सौध जयाचें थोर उकरडें । बोलणें जयाचें सधरीं रोकडें । नाहीं च ज्या भीड मायेची ॥७०॥
बहुत चि बोलिले अनुभवीक मात । येक दोन ऐका येकाग्रचित्तें । प्रियकर जे जाल्या समर्थातें । साधुसंत ते मानवले ॥७१॥
॥पद॥ मंगळधामा सद्गुरुनाथपाई । अनन्यभावें लागावें त्याचे पाईं ॥ध्रु०॥ समता देउनि ममतेचा नाश केला । भजतां त्यासी भवताप माझा गेला । रमतां चरणीं अलभ्य लाभ जाला । मीपण जाउनि आत्मा च हाता आला ॥१॥
देहबुद्धि त्यागें कल्पनासंग भंगे । ज्याचे संगे रंगली आत्मरंगे । सानुरागें निष्कामकामयोगें । भोगत्यागें समाधि लागवेगें ॥२॥
अनंतकोति ब्रह्मांड ज्याचे पोटीं । सबाह्य त्याची करुनि निजभेटी । द्वैतस्वप्न नाशिलें उठाऊठी । केशव ह्मणे कृपेची महिमा मोठी ॥३॥

॥ऐसा गुरुराज महाराज सखा माये । पूर्ण सुखी केलें येथें बहुत बोलुं काये ॥ध्रु०॥ भजनभाग्य देऊनि मोक्षपदा योग्य केलें ।
निजानंदधामा आह्मा नांदावया नेलें ॥१॥
मंत्रयंत्रकळातंत्रें नाहीं गोवियेलें । गुणातीतपदीं मानेंविण ठेवियेलें ॥२॥
स्वयंप्रकाश अविनाशमूर्ति पाहीं । केशवराजस्वामीयासी उपमा चि नाहीं ॥३॥

॥वोवी॥ वगतृत्व यापरीं करितां विशद । धन्य धन्य ह्मणती हा अनुभवसिद्धि । करुं नुरे चि ठाव प्रश्नभेद । तरी हि मी ह्मणे लाडका ॥७२॥
मग सूज्ञावंत तो थोर हरिदास । संस्कृताचें कळत रहस्य । जी स्वामीजीचा भरणा बहु असे । त्याचें हि जालें कीर्तन ॥७३॥
जो दत्तात्रयाचा वरदयुक्त । निर्मोन चालिला जो स्वतंत्र पथ । तयाचे भरणामाजील मात । ऐकोन कांहीं सुख पावा ॥७४॥

॥पद॥ (टीपरी धाट) तिनी स्थळाचे पांच बाळक आले । नागवे चि हिंडों लागले रे ॥ना०॥१॥
आइ ना बाप त्यासि कोण्ही च नाहीं । रुदना करु लागले रे ॥२॥
आपणा आपणिया जाणुनि आगळा । भांडणासी उदित जाले रे ॥३॥
पांचाचे मान पांचासी देऊनि । पाच हि समान केले रे ॥४॥
आहेत तुजमजपासीं रे । सोडितां चि मुक्त होसी रे ॥ध्रु०॥
पांचा पोराचे भाव येकवट होतां । घट चि निर्माण जालें रे ॥५॥
तया घटामाजीं आश्चिर्य देखिलें । पेरिल्याविण उगवलें रे ॥६॥
तया द्रुमावरी खग दोन्ही बैसले । पारध्यानें फास टाकिले रे ॥७॥
येकासि बंद येक मोकळा होउनि । ब्रह्मांड फोडुनि गेला रे ॥८॥
येकासि पापपुण्य़ येक कोठें नातळे । येक पाहतां अनेका रे ॥९॥
येक पां खालिल्यानें वरिल्यासि नेणुनि आंगीं । भोगुनि देह सुखावलें रे ॥१०॥
दुसर्‍यापरिस अधिक शाहाणा । जरामरणदु:ख नेणे रे ॥११॥
दिगांबराचे लागतां पाया । दोनी मिरास येक रे ॥१२॥

॥वोवी॥ मग कबीरपंथीचा उठोन धुरीण । भरविला कीर्तनीं रंग लाल पूर्ण । रामानंदचेला रामभक्त निपुण । शुकअवतारीं वचन ऐका ॥७५॥

॥पद॥ साधुकि संगत पाई । वाकी पूरन कमाई ।ध्रु०॥ साधुकी संगत गुरुकी सेवा । बनत बनत बनाआई ॥१॥
पीपा नामा और रोहिदासा । चौथी मीराबाई ॥२॥
कहत कबीरा सुन मेरे भाई । रंग सुरंग मिलाई ॥३॥

॥वोवी॥ भूषण होय जो अविंधकुळाचें । बोलणें चालणें प्रत्ययाचें । भवतापहारी नाम जयाचें । चरित्र साचें जगतारक ॥७६॥
आणिखी होते जे कीर्तनकर्ते । करीत चि होते ते कथा नित्य । तें सर्व सांगतां वाढेल ग्रंथ । ते संतनामें पुढारीं ऐकाल ॥७७॥
बोधलेबावाचा सांप्रदाई । कीर्तन करुं वांच्छा धरितां हृदईं । जाणोन माहाराज दास विदेही । आज्ञापितां तो हि उभेला ॥७८॥
प्रसन्न जयाला पंढरीनाथ । कीर्ति जयाची जगीं अद्भुत । गाइला प्रीतीनें तयाचा भक्त । प्रसादवचन अवधारा ॥७९॥
जंव माणकोबांनीं चौकी मांडुनी । सभोंवती भावें रंग भरुनी । बाहतां कृपाळु पंढरपुरधणी । पूजन घेतलें तो अभंग हा ॥८०॥

॥अभंग॥ तुझी भेटीलागीं जीव माझा तळमळी । केधवा वनमाळी येइल धरा ॥१॥
माझिया देहाचा बैसकार केला । कां रे नाहीं आला विठो माझा ॥२॥
यै गा बाप हरि माझ्या प्राणनाथा । जीव जाईल आतां काय करुं ॥३॥
येई कृपानिधी बैसे माझे घरीं । आतां नाहीं उरी संसाराची ॥४॥
बोधला ह्मणे देवा कोण माझा केवा । आतां येउनि द्यावा प्रेमपान्हा ॥५॥
॥वोवी॥ आणिखी संत ते मिनलेति फार । कीर्तन करिताती सप्रेमभरें । दासमाहाराज करुणाकर । गरिबनवाज भक्तिप्रिय ॥८१॥
ज्याचे त्यापरीं करिती आदर । ना निंदा ना ह्मणणें लाहानथोर । कथा संपविती उदयासी भास्कर । येतां गाऊनि आरती ॥८२॥
स्नानसंध्यादि सारुनि भोजन । घेऊनि विसावा वानीत महिमान । कीर्तनरंगणीं मिळती जन । दासभगवानसभोंवतीं ॥८३॥
सादर असती संत सद्भक्त । सेवेंत तिष्ठती दासाचे अंकित । आज्ञापितां खुणेनें समर्थे । वामनपंडित ऊठिला ॥८४॥
जे कीर्तनास उठती आज्ञावरुन । ते करिती स्वगुरुउपासनास्मरण । करुनि ससांग मंगलाचरण । करविती गजर भजनटाळी ॥८५॥
जें करणें चि आहे स्वभावसिद्ध । घडिघडी करावा न लागे विशद । वामनस्वामी तो संत प्रसिद्ध । विद्यावंतवृंदीं मान्य जो ॥८६॥
अनुभवीक अनुभवीं होऊं निमग्न । अद्वितीय ब्रह्माचें केलें व्याख्यान । मग लीळा रामाची वर्णोन सगुण । चरित्र दासाचें वर्णिलें ॥८७॥
पुढें उपासना दास गुरुमूर्ति । योग्य हे ह्मणे वर्णाया कीर्ति । श्लोक येक वदोन सर्वाप्रति । कळवितां गर्भार्थु सुखावले ॥८८॥

॥श्लोक॥ शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचें । वसिष्ठापरी ध्यान योगीजनाचें । कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा । नमस्कार माझा तया रामदासा ॥१॥

॥वोवी॥ ध्यानवैराग्यकवित्वलक्षण । कळवितां बहुतांची उजळलीं वदनें । मग रंगनाथस्वामी ज्ञानसंपन्न । कीर्तनासी ठाकले प्रेमभरें ॥८९॥
सांग विदित जया श्रुतिरहय्स । गुरुउपासनीं थोर उल्हास । पिवोन जयाचें वचनपीयुष । जाले स्वरुपीं अमर बहु ॥९०॥
लक्ष लावोन रामदासपाईं । देवाधिदेव हा भावोन हृदईं । आनंद खेळाया संतसमुदाई । कटबंद वदले दासावरी ॥९१॥

॥पद॥ रामदास चतुराक्षर मंत्र जप वारंवार । दुस्तरतर भवसागरतारक सचित्सुखसार ॥ध्रु०॥ च.॥४॥
॥वोवी॥ करितां पदाचें पदव्याख्यान । श्रोतेजनाचें निवालें मन । ह्मणती जन्मासी आल्या कारण । सफळ जालें हो संतकृपें ॥९२॥
वडगांवकर जयरामगोसावी । ब्रह्मानंदस्वामी मौनी निस्पृही । आणि ज्ञानदेवाचे सांप्रदाई । त्यांचें हि ऐकिलें कीर्तन ॥९३॥
सोमा सोनगुंडाभानभट । शामा दामा गवाई थेट । कथा करुनि घडघडाट । लोटांगण घातलें ॥९४॥
ह्मणाल कथा ह्या केविं येकदां च । जाल्या तरी ऐका मन श्रोतयांचें । उल्हास पावाया बहुत दिवसांचें । सांगणें आणिलें सिखरावरी ॥९५॥
निंबराजबावा पैठणकर । येकनाथवंशी धुरीण चतुर । प्रसन्न जयाला रखुमाईवर । नाथकवनाचा भरणा बहु ॥९६॥
वरदाइकाचें रसाळ कीर्तन । संतोष पावती श्रोतेजन । श्रवण करा हो येक दोन वचनें । प्रसादीक बोलणें नाथाचें ॥९७॥

॥पद॥ राम मिठा लागा । सबसुख हमे त्यागा ॥ध्रु०॥ साधन कांहीं नेणे मी जालासे अबळा । शाम विजु बैसलीसे डोळा । लोपल्या चंद्रसूर्याच्या हो कळा । तो राम माझा जीवींचा जिव्हाळा ॥१॥
प्रकाश हो दाटला दाही दिशा । पुढें मार्ग न दिसे आकाशा । खुंटली गति स्वासा हो उस्वासा । तो राम आतां पावेल हो कैसा ॥२॥
त्यासी साचा परिसा हो कारण । येका विनवी जनार्दना शरण । त्याची कृपा जरि होये परिपूर्ण । तरी च साधे साध्य हो साधनें ॥३॥

॥चिमणी रमणी मूर्ति हरीची । पाहिन बरी ये साजिरी ॥ध्रु०॥ जीवदशामय अगुष्टप्रमाण । त्यांत वोतिली मूस तिची ॥१॥
अणुरेणुऐसें वाड गगन चि । द्रष्टांत दाळ मसुरेची ॥२॥
चहुं शून्याचा माथा झळके । झगमग झगमग जोत तिची ॥३॥
येका जनार्दनीं विश्व व्यापुनी । ते जननी येकनाथाची ॥४॥

॥अभंग॥ नाभिस्थानीं ठेवा हृदयकमळीं पाहा । द्विदळी अनुभवा येक्या भावें ॥१॥
अर्धमात्रा बिंदु पाहतां प्रकार । होऊनि साचार सुखी राहा ॥२॥
प्रणव ॐकार उच्चार करितां । बिंदु चि तत्वता सर्वगत ॥३॥
सर्वगत डोळा त्रैलोक्यामाझारी । विश्वाचिया हारी डोळयामाजीं ॥४॥
दाखवावा पूर्ण स्वामी जनार्दन । नुरे येकपण तया ठाई ॥५॥

॥वोवी॥ येकनाथस्वामींचा भावार्थ चोख । मुद्रांकित नामीं गुरुशिष्यऐक्य । संतोष पावले रायरसीक । श्रोते सकळिक सुखावले ॥९८॥
तों हरिदास उठिला साबडा भाविक । सांवतामाळ्याचें कथनकौतुक । वर्णोन ह्मणतिला पद ते ऐक । भक्तिरसगोडी घ्या आदरें ॥९९॥

॥पद॥ समयासी सादर व्हावें । विठ्ठला यावें ॥ध्रु०॥ कोणे दिसीं बैसले चिंताक्रांत । कोणे दिसीं नाहीं धान्य घरांत । कोणे दिसी द्रव्याची ही मात । कोठें ठेवावें ॥१॥
कोणे दिसीं बसले हत्तीवर । कोणे दिसीं पालखी सुबेदार । कोणे दिसीं पायाचे चाकर । वाटेनें जावें ॥२॥
कोणे दिसीं येइल यम चालोन । कोणे दिसीं घेऊनि जाइल प्राण । कोणे दिसीं कपाळीं स्मशान । येकलें जावें ॥३॥
कोणे दिसीं होइल गुरुची कृपा । कोणे दिसीं चुकतील जन्मखेपा । कोणे दिसीं सावत्यामाळ्याच्या बापा । सांभाळावें ॥४॥

॥वोवी॥ करिती कथांतीं भजन आरती । नमोन ऐकमेका आळिंगिती । वाटोन प्रसादु विडे वोपिती । स्वस्थळा जाती विसांवया ॥१००॥
कर्मांत पडों नेदिती व्यंग । उपासना चालविती ससांग । उघडा च दिसे हो योगध्यानमार्ग । ज्ञानाचा रंग पसरलासे ॥१॥
देशोदेशींचे येती बहु जन । सांगती बहुविध वर्तमान । परमार्था अनकूळ होती पूर्ण । एवं श्रीरामा तुष्टविती ॥२॥
संतोषोन येकदां माहाराज गाण । करवावें ह्मणतिलें मांडेभोजन । भक्तजन सर्व ते असती सुज्ञ । लक्षिती श्रीगुरुआज्ञेसी ॥३॥
न सांगतां ते मनींचे जाणते । दूरदृष्टीनें कामकाजकर्ते । सर्वदां सेवा करुं वांछिते । भले ते वागते संकेतीं ॥४॥
गुरुराजमुखींचा ऐकोन शब्द । ससांग करविलें साहित्यसमुद । चहुंकडोन आणविलें घट्ट साय दुग्ध । शर्करा रास पडली दिसे ॥५॥
रामीरामदास कृपावंत । भोजनास बैसले समुदावसहित । जेथें न वागे पंक्तिभेदमात । निर्वैरपंथ या नांव ॥६॥

॥अभंग॥ निर्वैर आणि समान पाहणें । श्रीभगवंता प्रियकर होणें । जन्मा आल्याचें कार्य संपादणें । हें चि लक्षण जाणिजे ॥७॥
नातरी जिव्हा गुहा मोकळे । करुन विषयाचे पंकजीं लोळे । ज्ञानसुचर्चा करीत डोले । अंतरीं खेळे कापटय ॥८॥
कांहीं हो खातां भूक हरतसे । उदासपण इतरा दावितसे । गोड गोड खाऊं स्वयें पाहतसे । हें ज्ञानदेह बुत्धिबत्ध मळीण ॥९॥

॥अभंग॥ जळो थोरपण अहंभाव मद । जेथें पंक्तिभेद वर्तताहे ॥१॥
अतीता हिणोन भलतें चि वाढावें । पक्वान्न करावें सोयर्‍यासी ॥२॥
घृतादि वाटया आपणासी व्हाव्या । ब्राह्मणा नसाव्या अन्नशुद्धी ॥३॥
मित्रमेजवानी घर करी लूट । मृदु वाक्य फुकट नाहीं संता ॥४॥
दूतालागीं सांगे यमधर्मराव । नर्कामाजीम ठाव तया केला ॥५॥
मुख्य राजी नाहीं आत्माराम दाता । सार्थकाची वार्ता तेथें कैंची ॥६॥

॥श्लोक॥ (आत्मकृत) ॥ स्वदूताप्रती अंतकु सांगताहे । जेथें पंक्तिभेदु भल्या वीट होये । तयां दंडितां दोष नाहीं तुह्मांला । करा जाचणी घालुनी पाशघाला ॥१॥
परस्त्री परद्रव्य आशा जयाला । नसे नीतिन्याय मदद्रव्य प्याला । नसे भक्ति ना भाव ना संतसेवा । अतीता छळी त्यासि नीट कुटावा ॥२॥
जेथें अन्नब्रह्मासि माने न देती । नसोनी क्रिया बोलती शास्त्रयुक्ती । गुरुभक्ति ना कर्मरीती स्वधर्म । करा दंडण जोंवरी सूर्य सोम ॥३॥

॥वोवी॥ पाहा वो यमगीता कर्मविपाक । बत्धकर्मसीक्षा कळेल अस्क । प्रपंचिकाला हें कळवणें वाक्य । धन्य ते संत सर्वज्ञ ॥११०॥
तंव श्रोता पुसतसे वक्तयासी । दूषण लाविलें पंग्क्तिभेदासी । तरी विचारितां इच्छाभोजनासी । भेद अनयासीं पडतो कीं ॥११॥
तरि ऐका हो नेमी अथवा रोगी । इच्छिलें नेमिलें भुक्त त्यालागीं । देश पालटास्था पुरविजे वेगीं । देवासी अनंत भोगास्तु ॥१२॥
लेंकरासी करवावेम सकाळीं भोजन । फराळ करवावे नियमस्थाकारणें । शूद्रादिकां वोपावें सिळें अन्न । सिदोरी वोपावी मार्गक्रमु ॥१३॥
परि प्रसादवाटणीं नसावा भेद । आपण यजमानु ज्या वळीमध्यें । तेथें न करावा अनेकविध । पात्र तों अन्नासी क्षुधा ची ॥१४॥
असल्या पदार्थीं इच्छितां कांहीं । सम ह्मणावया कारण नांहीम । हें असो गुरुकृपें वर्म तें हृदईं । ठसतां क्रिया ते कळेल ॥१५॥
धन्य दयाळु दास गुरुमूर्ति । विराजले अवघ्या पाहती पंग्ती । वरिवरी शर्करादुग्ध तें वोतिती । मांडे वाढिती आणोनि ॥१६॥
समुदाव मिळाला असे भारी । तोटा मांडेचा कळतां भवारि । ह्मणतिलें जेणें तुष्टेल श्रीहरि । श्लोक ह्मणा हो गद्यघोषें ॥१७॥
करीत सप्रेमें नामस्मरण । जाणजाणोन करावें भोजन । सकळिकां समर्थ आज्ञा प्रमाण । परतोन सावध होठेले ॥१८॥
मेरुबावादि कर्नाटकर । हरिहरादि जाणते हिंदुस्थळस्वर । जंव श्लोक ह्मणूं लागले आळापें चतुर । भूमिजावर स्तब्ध होठेला ॥१९॥
कवणा हि न सुचे उचलिजे ग्रास । पोट भरावें हा नसे चि सोस । श्लोक ह्मणूं लागले भले सत्पुरुष । नामस्मरणगर्जना करविती ॥१२०॥
धन्य दासाचे सेवकजन । याविळंबीं केलें कार्यसंपादन । तृप्तिवरि मांडे वाढिती आणुन । मन धैर्या विघड न केलें ॥२१॥
मुख्य असे हो गुरुवरदान । कांही च कोठें न पडे नुन्य । संतुष्ट पावला श्रीरघुनंदन । अघटित विंदाण जयाचें ॥२२॥
मांडेभोजनाचें जालें नांव । परि व्यंजनादि पदार्थु चारी ठाव । जेवि अगांतुक मागतां हो अन्न द्यावेम । सर्व हि ते संज्ञीं आले कीं ॥२३॥
साधुसंते तें मानिलें नवल । आश्चिर्य मानिती इत्यादि सकळ । युक्तिवंत ऐसे दासदयाळ । जें भाविती तें सित्ध होतसे ॥२४॥
अवचट गुमानें वळतां वाणी । अघटित असेना कां कार्यकडसणी । साह्य हो पाहतां कोदंडपाणी । संपादी हरीनें ससांग ॥२५॥

॥अभंग॥ धन्य धन्य भक्ति ते ऐसी व्हावी । त्रैलोक्याचा वळोन ये गोसावी ॥१॥
कल्पांतीं हि न सरावा उपकार । हीनदीना सांभाळी निरंतर ॥२॥
डोलवावेम मस्तक संतसाधु । भाविकाला जे पाहतां लागे वेधु ॥३॥
पुढतीपुढतीं कार्यासि ये ते लोका । आत्मारामु सदैक्यें होय सखा ॥४॥

॥वोवी॥ मग आंचवोन विडे घेतले सकळीं । शूद्रादिक गौळी इत्यादी मंडळी । भेदभाव नसतां तृप्तता पावली । लीळा हे दिव्य दासाची ॥२६॥
आवडे जयाला कांतारसेवन । कायामायादि ज्या नसे चि भान । जो विरक्तजनांचा अधिपु पूर्ण । वानिती विदेही जयाला ॥२७॥
सयंपाकक्रिया प्रपंच करवणें । गृहमठादि देवाल्य बांधवणें । शहाणपण सिकवणें राजकारण । जाणती सर्वज्ञ सर्व सांग ॥८॥
पुढील कथनीं कथन रसाळ । कीर्तनभजनादि असे सुकाळ । पात्र न पाहतां दासदयाळ । अनुग्रह करिती सकृपें ॥२९॥

॥अभंग॥ समर्थाच्या घरीं फुलारी मी दीन । विकितोम सुमन देवभक्ता ॥१॥
औट हात देहमळीं दिव्य रोप । लाऊनियां भूप वोपिलासे ॥२॥
गगनामाजी येक उफराटा आडा । तेथील पाण्याड चोजवेना ॥३॥
मोटेंवीण पाणी सिंचे सर्वां ठायीं । पीक सर्वदां हि पिकतसे ॥४॥
जया योग्य जैसें तया तैसें फळ । सांपडे सुकाळ तो चि वाटे ॥५॥
परी निर्विकल्पतरुफळ घ्यावें । संता निवेदावें व्हावें मुक्त ॥६॥
फळ पुष्प येथील अर्पावें संभ्रमें । तेणें आत्माराम साह्य होइय ॥७॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम सुरम्य । जेथें विराजती सद्भक्तस्तोम । सबाह्य सांभाळी आत्माराम । प्रसन्नमूर्ति विराजत ॥१३०॥
इतिश्री श्रीरामकृपा । तारक परमार्थ सोपा । साधन सुलभ नाम प्रशांश । नाना चतुराईनिंदा । अभक्तिनिंदा । ब्राह्मणास प्रबोध । संतजनकीर्तन । मांडेभोजन । समास नव्याणव संपूर्ण ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP