॥कांड॥ १०९

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


श्रीरामसमर्थ

॥पद॥ (राग कामोद । धाट कारण पाहि०) भक्तीनें जगजीवन भक्तासि देतो ज्ञान । आणिक साधक नाहीं नाहीं रे ॥धृ०॥
नलगे दान पुण्य नातुडे तीर्थांटण । ज्ञान नव्हे चि भजनविण रे ॥१॥
न होतां विमळ ज्ञान । साधनें तें बंधन । नाहीं समाधान ज्ञानेंवीण रे ॥२॥
रामीरामदास ह्मणे । सज्जन बाणती खुण । येर ते शाहाणे बोलोनिया रे ॥३॥

॥वोवी॥ जन्मा आलियाचें सार्थक । जाले होतील पावन अनेक । हरुनि मायामय कौतुक । निष्कळंक होणें ज्ञानें चि ॥१॥
ज्ञानेंविण सुटकारा कांहीं । सर्वथैव घडणार नाहीं । ज्ञानेंविण सद्गती नाहीं । शोधितां बहुकाळ भूतटीं ॥२॥
हातासि न येतां ज्ञानघन । न फिटे जीवाचें मूढत्व दैन्य । सकळ पदार्थी असे व्यापून । भय दारुण जाणिजे ॥३॥
भोग भोग ह्मणो लागली मूर्ख । जाणत्यास ही हे करी ठक । भोगाचे पाठी अनेक दु:ख । नेणते भ्रमयंत्रीं पडियले ॥४॥

॥श्लोक॥ भोगें रोग जडे स्वसूख विघडे उद्वेग चिंता पडे । गर्वे गर्व झडे महत्व न चढे संताप देहा चढे । दारिद्रें चि दडे पिडा चहुंकडे आक्रंद घोषें रडे । सख्यत्व न घडे कठीण चि घडे साशंक देवाकडे ॥१॥

॥वोवी॥ जें करितां स्वहिताला होय अपाय । जें कर्तृत्व पाहतां भयग्रस्त आहे । चांग तें किमपी ह्मणों नये । अभयसोय न कळे तो काचा ॥५॥

॥अभंग॥ सर्व कांहीं करो न सुटे चि भय । सुख केवि होय नाशिवंतीं ॥१॥
वाय पाठीं काळ भोगाभागें रोग । द्रव्याचेनि योगें थोर जाच ॥२॥
तस्कर स्वापद लुटारे मारक । कांहीयेक धाक मनीं वसे ॥३॥
द्वैत जंववरी भय तंववरी । नासका संसारीं तापत्रये ॥४॥
पुण्य़ भोगावया जन्मा आला लोभी । काय उणा गर्भी सांगा श्रम ॥५॥
आत्मारामभक्तीयोगें जया ज्ञान । तो सुखसंपन्न भयातीत ॥६॥

॥वोवी॥ होता भक्तीनें देवराव सखा । नसे चि मग तया कांही धोका । आत्मज्ञान वोपितो मग निष्कळंका । भय काय दु:खमूळ तुटे ॥६॥
नाशिवंत आस्छा धरणें चि दु:ख । विस्तार भयाचा हा होय आसक । याकारणें जगन्नायक । भक्तिनें कीजे कैवारी ॥७॥
भोळानाथ तो भाळोनि तेणें । भक्तासि वोपितो गुजगोप्यज्ञ । यावेगळें अनेकपरीनें । सीणणें नलगे चि बहु साधनीं ॥८॥
समाधान नाहीं ज्ञानेंवीण । ज्ञान लभ्य होऊं भक्ती च कारण । भक्तिविन्हा जें वाचाळपण । कष्मळपणज्ञान त्या नांव ॥९॥
तीर्थक्षेत्र फिरणें व्रतदान पुण्य । करितां माइकीं वाढेल मान । परि तें जाणावें जालें बंधन । करुनि घेतला स्वइछें ॥१०॥
सज्जना असे हें वर्म ठाउक । साधनाचें तें मूळशोधक । भयतीत जें स्वानंदसुख । साधिलें भक्तिअनसरोनी ॥११॥

॥अभंग॥ जीवशिवपिंडब्रह्मांडरचना । उभारुनि पुन्हा संहारावी ॥१॥
सर्व खटपट सांडूनिया मागें । भक्तीचेनि योगें समाधान ॥२॥
वेदीं कर्मकांड बोलिलें उदंड । आटणीचे दंड आटाआटी ॥३॥
व्रततपेंदानें योगेंधुम्रपानें । नानातीर्थाटणें दास ह्मणे ॥४॥

॥वोवी॥ यापरी घडायास सहज उपदेश । अनुग्रहाचा अनुभऊं सौरस । करुणाकटाक्षी होऊं समरस । बोलती दास करूणाकर ॥१२॥
मागील प्रसंगीं संपलें कथन । प्रतापगडआई तुष्टली पूर्ण । होऊन उदासी माहाराजसज्जन । सज्जनगडाश्रमीं राहिले ॥१३॥
कथिले बहुपरी बुधिवाद शोध । कथेमाजि जो घडतो विनोद । सन्मार्गी चालावें होऊनि सावध । वेधसांदबोध बहुरीतीं ॥१४॥

॥श्लोक॥ अ०॥ गडीत औघडी असे । परीघ रीघती कसे । कजा क० ॥श्लो०५॥
॥विनाप्रचिती ते तुला । फळेल काय रे मुला ॥श्लो०॥५॥
॥धिरे धिरे ह्मणे कवि । विशेष जन्मी मानवी॥०॥श्लो०॥४॥
॥चुके बहु घडी घडी । असी कसी महंतडी ॥०॥१॥
॥बहु तहाण लागली । तनू विशेष भागली ॥०॥श्लो०॥४॥

॥वोवी॥ ऐकोन यापरी प्रज्ञावंत । वाक्यामृतकुपी ठेविलें मनांत । त्यजुनि दुश्चित आळसपणांत । साधिलें परमार्थ विवेकीं ॥१५॥
सांप्रदाई जे योग्य बहुत । पर्याटन ते गेले विरक्त । कितेकी होठेले मठीं महंत । गुरुस्छानीं गुंतले कितेकी ॥१६॥
जाले योग्य जे जगदोत्धारक । जे सद्‍गुरुवचनीं विश्वासिक । त्या परमार्थविस्तारकरु सुखें । देऊनि स्वसत्ता धाडिलें ॥१७॥
संग्रहीं राहिले भोळेभाविक । अशनार्थी अशक्त  नामधारक । त्यास ही होऊनि वरदायक । पाळिती प्रीतीनें गुरुमाउली ॥१८॥
व्याप करणारे आसती त्यांत । परि गुरुमानसीचा न कळे हेत । कार्य पडलें तें सांगावें लागत ।} परि काम काज सांगणें तेथ नसे ॥१९॥
दिनें दिनीं वाढला अधिक खर्च । अगत्य न धरिती या लौकिकाच । परमार्थ्याघरीं जाला विसंच । दुष्काळपीडा होऊनि ॥२०॥
जे स्छळीं नाहीं निष्ठुर करण । अनाथा आधार नाहीं ह्मणणें । संकटीं हात सोडून देणें । पेचुनि दवडणें कीं पंक्तिभेदु ॥२१॥
परि मानी लोकाच्या ऐशा रीती । न घेतां बळें चि देऊं धांवती । व्रयतोंड देखतां मागें सरकती । युक्त्या हुडकिती लौभ्यपणें ॥२२॥
आपण संसारीं आशाबत्धी । संतासि कथिती नैराशबुत्धी । कां न काढिजे त्यांनीं मागणें शुत्धी । सरोकती मानास्तव मदें ॥२३॥
पडतां साधूला संकटप्रसंग । जाणोनि ही पाहो लागती उग । शाबास आपणा ह्मणाया जग । स्वकाजीं उपचार करुं धावती ॥२४॥
हें आसो नृपांनीं आणावें कांहीं । दंडक कीं आज्ञा मुळीं च नाहीं । सज्जनगडयाच्या राहुं आश्रईं । लोक दुष्काळीं येताती ॥२५॥
न येचि वोढ धरिला पाउस । खडतर तापूं लागला चंडांश । विव्हळलें जगाचीं तेणें मानस । भीड विश्वास न धरिती ॥२६॥

॥अभंग॥ सद्गुरुचे कृपें श्रीरामदयेनें । वृत्ती उदासीन व्हावी सदा ॥१॥
नाहींतरी तंटे फंटे वाटे सदा । समाधान कदा नव्हे जीवा ॥२॥
दुष्काळ पडल्या होतां शैन्य धुंद । मांडतां विरुद्ध मोठे कष्ट ॥३॥
तस्कराची पीडा दुर्जन रगडा । रोगाचा रोकडा धोका वाहें ॥४॥
आत्मारामदेवा यालालीं भजावें । नाम बुडवावें विपत्याचें ॥५॥

॥वोव्या॥ दुष्काळद्वाडांनीं केली फजिती । आहे तें नाहीं तें सारिखे दिसती । साहुकार तें लपोन ठेविती । धान्य दृष्टीस न घालितां ॥२७॥
त्यांत द्वाडांनीं ह्मणती लोभ । अधिक चि व्हावा हो दुर्भिक्षक्षोभ । पुष्कळ बांधुनि घ्यावा लाभ । त्यावरी दरोडा पडताती ॥२८॥
धनमस्तीच काम चालेना । खरीदी घेतां न मिळे दाणा । दाणादाण करिती खाण्यात येईना । हिसकटिती घेती देती प्राण ॥२९॥
स्वल्प दिनांत हें मांडलें अरिष्ट । होऊं लागली बहु आटाघाट । कल्पांतावरी हे भोगितो कष्ट । ऐसें वाटलें जनासी ॥३०॥
पीक भुईचें वाळोन गेलें । बीज न मिळती घ्यावया मोल । जिकडे तिकडे आटलें जळ । तृणचारा न मिळे पशूसी ॥३१॥
वैरी च भासती सोयरे धायरे । भार चि वाटती वृत्धमहतारे । कां देवांनीं दिल्हें ह्मणति लेकरें । हे युगधर्म अक्रियाफळें वदती ॥३२॥
एवं फजिती मांडली मोठी । लोक बहु होऊं लागले कष्टी । येऊनि भल्यांनीं श्रीगुरु निकटीं । सांगतां वृत्तांतु विस्मावले ॥३३॥
ह्मणतिलें क्षोभला जगन्नायक । दुष्काळानें पिडितील लोक । धुंद मांडेल जनीं अनेक । हें होईल आधीं च कळली आसे ॥३४॥

॥श्लोक॥ अकस्मात मागें भुमीकंप जाला । नभामाजि तारेसि सेंडा निघाला । तदारभ्य भूमंडळीं धुंदि जाली । नसे न्याय ना नीती सवैं बुडाली ॥१॥

॥वोवी॥ ऐसियापरी बोलूनि त्यात । आठविलें श्रीरघुनाथात । नेत्र लाऊन होतां ध्यानस्छ । निघालें प्रसादवाक्य ऐका ॥३५॥

॥पद। कल्याण करी देवराया । जनहेत विवरी ॥ध्रु०॥ तळमळ तळमळ होत चि आहे । हे जन हातीं धरी ॥१॥
अपराधी जन चुकत गेलें । तुझा तूं चि सांवरी ॥२॥
कठीण त्यावरी कठीण जालें । आतां न दिसे उरी ॥३॥
कोठें जावें काय करावें । आरंभली बोहरी ॥४॥
दास ह्मणे आह्मी केलें पावलों । दयेसि नाहीं सरी ॥५॥

॥वोवी॥ स्तवोन यापरी जाले उदास । बहु निका ह्मणतिलें आह्मा वनवास । स्छानमानप्रतिष्ठा आस्छा पाश । जडतां विपत्य चुकेना ॥३६॥
जरि करावे सित्धिच अनसरपक्ष । मुख न दावितां पळेल दुर्भिक्ष । परि हातींचा निष्टेल कमळपत्राक्ष । कुक्षभरणार्था होय कीं ॥३७॥
तरि घटप्रारब्धा आसे संजोग । जो जो घडाव घडेल भोग । किमपी न टाकिजे विरक्तमार्ग । परमार्थी लग दिसेल ॥३८॥
कवणास ही ना ह्मणों नये । काननीं वसावें सहसमुदाव । किंवा देशांतरीं फिरत जावें । मग काय संकट आह्मासी ॥३९॥
काळदुकाळ पाया लागती । जी जी वदेल अंतकु कुमती । सानकूळ करुं धावेल सित्ध । तंव गुरुदर्शनाचा लागोन वेध । शिवाजीराजा पातला ॥४१॥
हेरमुखें हा ऐकोन वृतांतु । दचकला वदनीं न फुटे मातु । प्राणत्याग किंवा सद्गगुरुनाथ । प्रसन्न व्हावा निश्चईला ॥४२॥
पडला गुरुपुढें दंडवत । नेणो प्रेमानें जाला मूर्छित । कळवळोनिया करुणावंत । उठी बापा रे ह्मणतिलें ॥४३॥
हळूच वदला कासया उठूं । वाचोन कैसा मी काळ कंठू । दाऊनि कृपेनें मुक्तिचा घाटु । पतीतपावना क्मग जावें ॥४४॥
आतां च बुडाली नाहीं सृष्टी । श्रम अंगिकारितां कासयासाठीं । समुदाव होत आसतां कष्टी । राज्यसंपदा मग कासया ॥४५॥
जें न पडे उपासनाकामावरी । ते बाळगोन कष्टावें कासया तरी । वैराग्यभाग्याचा होईन अधिकारी । ह्मणतां प्रसन्न होठेले ॥४६॥
जाणोनस्वलपात आहे अवतार । प्रयाण आधीं च हा करणार । थोडक्यासाठीं विघडण व्यग्र । सर्वत्रा मानसा कां कीजे ॥४७॥
चिंतोन यापरी वदले हेत । सांग पा पुरऊं मनोरथात । ऐकोन जाला संतोषभरित । जयघोष केला सकळांनीं ॥४८॥
उल्हास वाटला नरवरामानसीं । माहराज सज्जनगडनिवासी । वदतील भल्यांनी माझे गुरुसी । ह्मणोन शर्करा वाटिल्या ॥४९॥
सद्‍गुरुपासीं राह्यासि जोगा । तो कारकून केला तेथें दरोगा । तेणें प्रवेशु न होय व्यंगा । सरंजाम आवघा सित्धा आसे ॥५०॥
न पडे चि नून्यता करण्यांत कांहीं । दुष्काळ धोका नसे कवणाही । तरि ही माहराज दासनिस्पृही । आशा न धरिती कवणाची ॥५१॥
स्वयें आणोन भिक्षेचें पीठे । त्रय पानगे करविती नीट । होतां येकांतीं कपिवरु प्रगट । अर्पूनि द्वय येक भक्षिती ॥५२॥
समर्थस्वामीची ऐकोन स्छिती । मानूनि नवलाहो संतोष होती । जनसज्जन ते येती जाती । ऐकती भजन कीर्तन ॥५३॥
हें आसो नृपाचा भाव देखोन । राहिले भक्तिला देऊनि मान । तंव वोपिलें याचकीं धनधान्य दान । संतर्पण करविला रायांनीं ॥५४॥
उतटोन राजयामानसीं हरिख । मारुतिराया करुनि नवस । जाहगीर लेहोन गांव येकादश । सन्मुखीं ठेविला गुरुच्या ॥५५॥
तंव हास्यवदन करुनि दास । कळलें रे ह्मणतिलें तुझें मानस । आह्मी कराया येथ निवास । नवस किं पुरला तो आसो दे ॥५६॥
सत्यभावानें केला संकल्प । होईल केव्हां ही फळद्रूप । समजाविलें तथा समर्थभूप । नैराशी स्वयें पुर्विहुनी ॥५७॥
विदेहजावाईदास विदेही । ब्रह्मचारी मित्रु तुर्यु निस्पृही । भोळावतारी ताराया विषई । भोळाच ब्रह्मांशी ब्रह्मविद ॥५८॥
तो सभामंडळीं बैसले समर्थ । मीनले भोवती बहु पुण्यवंत । नराधिप उभा जोडुनी हात । साधु सद्भक्त विराजती ॥५९॥
तंव हासोन बोलिले श्रीरामसेवक । येक्या गिरिवरी मांडल्या सौख्य । न धाले तेणें सृष्टीचें लोक । हे समबुद्धी होय काय विचारा ॥६०॥
राज्यसिद्धि सत्ता आसोन गृहीं । घाबिरे होऊन भीति निस्पृही । मां संसारिकाची अवस्छा काई । धीर त्या हृदई केवि थारे ॥६१॥
भोगीत सौख्य हें तयासमिपीं । राहणें धर्म हा नव्हे किमपी । अवस्छा तयाची न वदवे तथापी । ध्यानास आली ते अवधारा ॥६२॥

॥पद॥ (धाटी काळ विक्राळ) ॥ जन बुडाले पोटेंविण गेले ॥१ ते २०॥
(श्रीसांप्रदायिक विविध विषय, विषयांक ४४ पहा.)

॥वोवी॥ ऐसियापरी कथोन अवस्छा । म्लानवदन केलें श्रीमोक्षदाता । विपर्यास हा श्रीसीताकांता । कां पां अवडला ह्मणतिलें ॥६३॥
अनिवार जाला दु:सह काळ । देखोन जनाची कष्टक्लेषतळमळ । निस्पृही आमुचीं मुलेंबाळें । खेद पावत आसतील कीं ॥६४॥
तरि शरण रिघावें देवदेवात । प्रगटप्रतापी पावेल सत्य । सेवटविभागी पाहणें विपत्य । कासया आह्मा पाहिजे ॥६५॥
दोषगुणानें पडतो दुष्काळ । तरि अकर्म करणें जना अवडल । पापी पापचि वाढल केवळ । केलासे कळीने बेबंद ॥६६॥
तो दोष परिहार होऊं कारण । सर्वत्रा करुनी सावधान । मोठयानें श्रीरामनाम गर्जोन । दाही दिशांत अवलोकिलें ॥६७॥
प्रवेशून न कळतां सकळाहृदई । आपणांत घेतलें सर्वत्रां ही । मग करुणास्वरानें तया समई । देवाधिदेवा प्रार्थिले ॥६८॥

॥पद॥ (धाट हर० देव श्रीराम) ॥ खंडळ मंडळ सर्वभूमंडळ । लोक पडिले विकळ तूं कृपाळ ॥१॥
अन्न चि मिळेना चिंता लागली मना । धावे तूं जगजीवना रे पावना ॥२॥
ऐसा विषमकाळ जाली तळमळ । जाहले व्याकुळ तूं सर्वपाळ ॥३॥
कोणी नाहीं जनासि सांगावें कोणापासी । जाल्या दु:खाच्या रासी रे ऋषिकेसी ॥४॥
दास ह्मणे जना भजन मानेना । आतां कोणी च धावेना रे पावना ॥५॥

॥वोवी॥ ऐकोन जिव्हाळा उपकारस्तवन । भक्ताभिमानी श्रीरघुनंदन । विळंब न करितां कांहीं दिनमान । धावला पुरऊं अपेक्षित ॥६९॥
ढगमेघ उठिले चहुंकडोन । अतिवृष्टी तेवी पडला प्रजन्य । धान्य तें पसरिलें काढकाढोन । पेवांत जीवन भरतां ची ॥७०॥
मोडके उठिले बीज राहिल तें । सुकाळछाया पसरली सत्य । धान्य घ्या ह्मणती नसतां अगत्य । बदला द्या ह्मणती सुग्गीवरी ॥७१॥
लाहन पीक देखिलें भाजीपाला । मानिती मजूर्‍या नावाडियाला । सोयर्‍या उपचार सण होऊं लागला । ससांग पसरला परमार्थु ॥७२॥
काय की नेणवे ईश्वरी कृत्य । आणि जनाचें करणें विपरीत । आलें ना गेलें धनधान्यसंचित । सुकाळमाजि पडियले ॥७३॥
धन्य करणी हे समर्थस्वामीची । कीर्ती न वानवे अकळंक ज्याची । सर्वयोग्य लीळा श्रीरामाची । कृपेनें भाविला दाविलें ॥७४॥
जाणर स्वस्छळा गेले वानित । कीर्ति विस्तारली तिहीं ताळांत । सज्जनगडीं राहिले समर्थ । वोळला भक्तीनें विश्वंभर ॥७५॥
सुब्राह्मणग्रामीचा अधिकारशेष । ऐकोन दिविमुख सुकीर्तिघोष । भावी मज केव्हां भेटतील दास । केव्हां जाईन सन्निधी ॥७६॥
तो शामसुत स्वामीचा सत्शिष्य भला । तपश्वी क्षेमी भक्तिवंत भोळा । शुभ्रमणीशा प्रसन्न केला । स्वपुत्र व्हावया तपोनी ॥७७॥
मानोन भक्तिला उदरा आला । शेषाकार चि होऊन जन्मला । पूजितां मनुष्याचा आकार धरिला । प्रेमानंद नाम तयाचें ॥७८॥
तो समाधिस्छ जाल्यावरी दास । फिरत फिरत येतां दर्शनास । प्रगटोन मार्गामाजि सादृश्य । अनुग्रह करितील ऐका पुढें ॥७९॥
देशदेशांतरीं स्वामिराजसिष्य । करिती महंती वाढवोन उपास्य । कितेक निस्पृही तीर्थक्षेत्रास । पाहत फिरताती स्वेछेनें ॥८०॥
ज्या ज्या देशीं जे उत्तमपदार्थ । जे धाडितां रीझती सद्‍गुरुनाथ । आणोन देती किं धाडिती भावार्थे । असिरवाद घेती गुरुचा ॥८१॥
रामदासाची धन्य सुकीर्ती । न टाकिली हो कांहीं पत्धती । वोपून झोळीला वरकडमतस्छीं । हिसा गुरुचा मागती ॥८२॥
अर्धा चौथा दशांश शतांश । हिशोबरुजूनें द्यावा गुरुअस । कोणी मतस्छी पदार्थ सरस । शिष्या जेथील घ्यावें बळें ॥८३॥
सिष्याच घरीं श्रमकाळ दिसला । तरि सांभाळ कीजे तयाला । खात्या पित्यानीं कांहीं गुरुला । न ह्मणावा तो सावडिता ॥८४॥
हें आसो दासांनीं झोळी कांठी । देऊन उपासना लाविली पाठी । मां काय हिसेची काढिजे गोष्टी । सगळ संपूर्ण अर्पण ची ॥८५॥
न घेतां न देतां होतसे अर्पण । मुख्य मध्यस्छी श्रीरघुनंदन । जे जे मतीं जो आसती सगुण । तें सर्वसार आसती या क्रमी ॥८६॥
मुख्य गुरुदाता जगदानंद । कोठया सिष्याची घर ते समुद । सत्पूजादि वृय तो होय आनंदें । तो आपुलाच खेद मग काय तो ॥८७॥
मुख्य ऐसी कीं समर्थप्रतिज्ञा । कांहीच न मागिजे सिष्यजना । स्वसंतोष आणिती आपणा । तें बहुत मानोन आदरिजे ॥८८॥
येविषई आणिखी गुण अमोलिक । वदले आहेति प्रतिज्ञापूर्वक । ते श्रवण करा हो पुण्यवंत श्लोक । करणी वरुन नाम शोभा ॥८९॥
चालण्यांत अपल्या नसोन नीट । न पवति कीं नामानें पदवी श्रेष्ठ । बोल का किमपी नमनूनि वाईट । बघुन क्रिया ते घ्यावी हो ॥९०॥

॥श्लोक॥ भव्यरुप अतिसुंदर दीक्षा ॥१ ते १०॥ (विविध विषयांक १० पहा)

॥वोवी॥ ऐसियापरी चालिले सद्र्गुरुदयें । ह्मणोन ते जाले दाविते सोये । अनुग्रह घडतां ही गुरुत्व नये । काय सार्थक केलें तें ॥९१॥
पाहा दासाच सिष्य नाव निगे । ज्या चालणीं इतराला सन्मार्ग लागे । ज्यासि वंदिता भवभेद भंगे । नांवें तयांचीं ऐकता कीं ॥९२॥
आनंतमौन्यादि होते कर्नाटीं । तो देशीं वोतीवमूर्ति गोमटी । होताति सद्गडीं स्छापयासाठीं । सीताराममूर्त्या धाडिल्या ॥९३॥
उपकर्णसामोग्रि आणि संगी । होन्नादि द्रव्य तें खर्चायालागी । देऊनि धाडितां पातले वेगीं । सज्जनगडासी महंत ते ॥९४॥
करुन स्वामीला नमन स्तवन । दावितां प्रीतीनें मूर्त्या उघडोन । शाबास तयाला ह्मणतिलें सज्जन । आदरुन धाडिलें तयासी ॥९५॥
कराया तेथ देवस्छापना । भक्तांनीं करितां विज्ञापना । हासोन बोलिले सर्वज्ञराणा । होईल प्रतिष्ठा पुढारी ॥९६॥
प्रसादीक याच करील पूजन । तंव वरी वेष्टणा करुनि सुवसनें । येकांतस्छानी ठेवा नेऊन । पदरीं बांधून तांदूळ ॥९७॥
संकल्प घालितां विळंबावरी । संशयो भरला सकळा अंतरीं । उपासनाविषईं कधीं क्षणभरी । उसीर लाविला नाहींत ॥९८॥
चिन्ह आतां हें दिसत प्रकार । अवतारत्यागाचा दिसतो विचार । तो जाणोन संकल्पु सदयें भवहर । बोलोन गुजार्थु समजाविलें ॥९९॥
कोणी धाडिले कुबळी मेखळा । लेऊन भक्तिचा दाविले सोहळा । सूचिले प्रसादु हा पाहिजे आसला । भक्तलोकांनी पूजावया ॥१००॥
मग धाडिलें तयाला प्रसाद देऊन । सांगुं धाडिलें असिरवचन । धाडोत जे काही स्वीकारुन । पत्रेंप्रसाद पाठविती ॥१॥
सगुणलीळेचें हें दाविती चिन्ह । येरवीं जाणती सृष्टिसंपूर्ण । स्वजनासि तो सदां पाठि लागून । गुप्तरुपें सांभाळिती ॥२॥
क्रियामाजि कोणि करितां नुन्य । दर्शनास तया बोलाऊन । नाना युक्तीनें कळवोन खूण । करुन सन्मानें धाडिती ॥३॥
ऐकोन माहराज होऊन त्यागी । निघाले होते वनवासालागी । यालागि साधुसंत भक्तयोगी । गडासि पातले भेटावया ॥४॥
नमनाळिंगण जाल्यावरी । हळू च बोलती बसोन समोरी । जी दयाळा आतां सोडून हे गिरी । हिंडत बहु ठाई नवजावें ॥५॥
येरु बोलिले जाणें ना येणें । यद्यपी घट हा प्रारब्धाधीन । चळणवळण करितां रामाविण । नाहीं ह्मणतिलें ऐका कसें ॥६॥

॥अभंग॥ जेथें जावें तेथें राम समागमीं । आतां कासया मी खंती करुं ॥च०॥५॥

॥वोवी॥ ऐकोन यापरी प्रसादवचन । खुणेसी पावले केलें नमन । पावोन उपचारु आदर मान । गेले सुकीर्ती वाखाणित ॥७॥
येकदां मारुतीपासी सज्जन । बैसोन सद्भावें मांडिलें स्तवन । हे महंती रे महंती सावरुन । द्यावा सख्या रे निरोप ॥८॥
प्रेमभाव कैसा तो ऐका हो । जिव्हाळा तो हृदईं राहो । जेणें योगें तो अज्ञान ठावो । पुसोन पाविजे निजगती ॥९॥

॥पद॥ (धाट बहु रंगा रे) ॥ महिमंता रे हनुमंता । संगितज्ञानमहंता रे । धृ० ॥ बलभीमा रे गुण सीमा । सीमचि होय नि:सीमा रे ॥१॥
कळिकाळा रे विकराळा । नेत्रि भयानक ज्वाळा रे ॥२॥
हरिधामा रे गुणग्रामा । दास ह्मणे प्रिय रामा रे ॥३॥

॥वोवी॥ ऐकोन स्तौत्य हें डोलला भीम । ह्मणे कैवारी सत्य श्रीराम । बाप रे तव सत्यसंकल्पदृम । सफळीत करोन रक्षिता मी ॥११०॥
निरोप द्यावया जासी कोठें । मी च तूं तरी चालत चि वाट । गुप्तरुप करिसी यद्यपी घट । चरित्र आसेल प्रगट ची ॥११॥
श्रीराम भजनाचा होऊं सुकाळ । खेळ खेळविले तारकाख्य खेळ । भाविसील जें जें तें होईल सफळ । ऐकोन संतोष पावले ॥१२॥
पावोन सत्सांग भक्त्योपचार । हृदई लपाला नमजापुत्र । गुंफेंत बैसले येऊनि भवहर । आसती सादर भक्तजन ॥१३॥
आतां श्रोतेनो व्हा सावधान । ऐका पुढारी रसाळकथन । तरिजे तारिजे होऊनि पावन । हें महिमान संताचें ॥१४॥
हें संतचरित्रा संत चि मूळ । आधार तयाचें वाक्य रसाळ । साक्षिरुषी तो त्रैलोक्यपाळ । हेतु भक्तिचा जाणिजे ॥१५॥

॥अभंग॥ दास परब्रह्म अलक्ष भूपती । मी तों बृहस्पती त्याच्या घरीं ॥१॥
परि युक्ति नाहीं बोलावया गोड । परी तें चि थोडें बहु माना ॥२॥
नलगे कटाव सत्य बोलावया । उचीत पावाया वेळ नाहीं ॥३॥
देवदेव इंद्र आणि परिवार । होती आज्ञाधर ईशकृपें ॥४॥
स्वात्मामृतसुख सदा अनुभव । धन्य देवदेव कृपाकर ॥५॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम सुंदर । साधुसंताचें वसतें क्षेत्र । जेथें नांदतो रवाळेश्वर । भक्ताभिमानी आत्मप्रभु ॥११६॥
इतिश्री श्रीरामकृपा । तारक परमार्थ सोपा । भक्तिनें होत ज्ञान । दुकाळ चरित्र । थोरीव भक्तलोक चरित्र । कांडा येकसे हे णव ॥जयजयराम॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP