॥प्रकरण॥ ११९

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


॥श्रीरामसमर्थ॥

॥पद॥ (धाटी सामर्थ्याचा गाभा ) धन्य तो साधक । वर्तेना बाधक । सारासारें येक । विचारें नेमक ॥धृ०॥
टाना टोना टाळी । ज्ञानें लावी टाळी । अविद्या कुटाळी । विवेकें उटाळी ॥१॥
अहंतेचा मोटा । वाजतां चपेटा । केला बारा वाटा । साधक तो चि मोटा ॥१॥
मन करिते चाळे । कल्पना उफाळे । तत्वें तत्व साळे । तेव्हां होती फाळे ॥३॥
संदेहाची धाडी । विवेकें विभांडी । केली काढाकाढी । प्रबोधाची वाढी ॥४॥
देहे दास्यपणें । सार्थक करणें । विचाराच्या गुणें । ब्रह्मांड ठेंगणें ॥५॥

॥वोवी॥ सर्वस्व सांगण्यामाजीं रहस्य । साधकत्वधर्मी धरिजे विश्वास । बोलिले आहेति श्रीरामदास । सधरपदान्वईं विलोका ॥१॥
जन्मा आलिया जें काय साधावें । जेणें प्रयत्नें स्वहित फावे । भोगी सद्भावें परमार्थवैभव । साधक या नांव साध्य साधी ॥२॥
तंव श्रोतेजन वदती सांगा प्रांजळ । बत्धभ्रांताला प्रपंच सुकाळ । गोड त्या वाते मारक विखफळ । तो साधकु जाला कवण्यापरी ॥३॥
पापपुण्याचा त्या नसे शोध । कर्तृत्वकरणी सर्व अबत्ध । हा संशय तयाचा करुं छेद । वक्ता उत्तर दे तेव्हां ॥४॥
हृदईं उपतिष्टतां साधुवाक्य । पालटोन सुकृती होय बत्धमूर्ख । मोक्षपद भोगूं जाला साधक । अभयवर वोपितां सज्जनांनीं ॥५॥
वचन ते जाणिजे प्रस्ताविक । नि:सार वाटे जेणें भवसुख । साधकासि वाटे बहुत हरिख । ऐकोन अर्थ तो धरा मनीं ॥६॥

॥श्लोक अष्टाक्षरी॥ रुणानबंध तो घडे । पुढें समस्त वीघडे (वगैरे श्लोक ५. तिसरा भाग स्फुट श्लोक ४७ पहा)

॥वोवी॥ एकोन यापरी होत साशंक । ह्मणाल राजे किं भाग्यवान लोक । वाण त्या न पडे किमपी सौख्य । तरी ऐका गत घडली येकयेका ॥७॥

॥अभंग॥ मृत्युलोकामाजीं कोण ते राहिले । थोराही भोगीलें विपत्यची ॥१॥
श्रीकृष्ण नाटकु देवदेव जगीं । निर्वाणप्रसंगीं जाले कैसें ॥२॥
दानवमानव देवदैत्य बळी । जाले भूमितळीं कासावीस ॥३॥
साधुसंतयोगी ऐसे चि बोलिले । नाहीच ऐकिलें ते बुडाले ॥४॥
गुरुभक्त जिंकीले सप्रेम । जाले आत्माराम निर्विकारी ॥५॥

॥पद॥ जमका अजब तडाखा रे तैं क्या लरकारे ॥धृ०॥ नवमी मरगय दशबी मरगय मरगय सहस्त्राठयांशी । तेत्तिस कोटी देवता मरगये पडे कालके फांसीं ॥१॥
परि मरे पैगंबर मरे मरगय जिंदा जोगी । जपी तपी सन्यासी मरगय मरगय बयदन रोगी ॥२॥
बडे मिजाजी कुकडे बैठे करलीया सब साजे । मार झपट जं पकर लिजावे जौं तो तिरकों बाजे ॥३॥
तीनलोकपर छेत्र बिराजे लूटे कुंजबिहारी । कहत कबीर पारखिया लुटे रयत कौन बिचारी ॥४॥

जमसे नही डरुंगा रे गुरुका भजन करुंगा रे ॥धृ०॥ और लोक कसबोंकें चाकर मै हूं हजूरकाजीं । कामक्रोधके गर्दन मारो साहेब राखो राजी ॥१॥
हंता मारुं ममता मारुं खाना जादक लाउं । मान मुरद चैकसरा राखों चित्तचेतरा ल्याउं ॥२॥
रामनामका भाला मेरा मनका मैद वराउं । भजनप्रताप हतले बर्छी सन्मुख लेकर धाऊं ॥३॥
मैं साहेबका खासा चाकर मेरा नाम कबीरा । सब संतनकूं सीस लवाऊं जोहार परखे हीरा ॥४॥

॥वोवी॥ संपदेचा तों भरंवसा नसे । भ्रमोन भ्रंशीं न व्हावें वश्य । साधून साधनें रात्रिंदिवस । सामरस्य व्हावें स्वरुपीं ॥८॥

॥अभंग पद॥ मोटे मोटे ते कष्टकष्टों गेले । काळसाह्याची गति ते न कळे सळे ॥१॥
सृष्टिकर्ता तो जनक जनक थोर । येक्या समईं जालें हो सिर घोर ॥२॥
छंद वॄंदेचा धरी तो गोविंद । शंभुअ भोगी विपदा लिंगछेदखेद ॥३॥
देवदैत्यमानवीनागादीक । चाकाटले सेवितां सुख:दुख शोक ॥४॥
स्वात्मानंदीं रमतां गुरुखूण । सदासुखी तो नेणे वणवण उण ॥५॥

॥वोवी॥ आतां जिवलगीं होतां लंपट । परि निवारण न करिती संकट । प्रपंचामाजि दिसत कीं स्पष्ट । ह्मणोन साधूंनीं वाळिलें ॥९॥

॥अभंग॥ मातापिता जन खजन कांचन । (तिसरा भाग - स्फुटओव्या १२८)

॥वोवी॥ ऐसे ऐकतां अनुभवी शब्द । रुचोन साधकु जाला सावध । भक्त हो पाहे जनीं प्रसित्ध । साधुनि साध्य ऐका कसें ॥१०॥

॥श्लोक॥ शमदमनमनानें ध्यान ध्यानीं मनानें । यमनियमजनानें पाविजे सज्जनानें । तदुपरि वरि वारी वीवरीता विचारी । रजतम दुरी सारी दास देवाधिकारी ॥१॥

॥वोवी॥ मुख्य संताची कृपा गहन । बहुतासि तारिजे स्वयें तरोन । धन्य धन्य क्रियायुक्त तें ज्ञान । कैसें लक्षण अवधारा ॥११॥

॥वोवी॥पद॥ (धाट धर्म जागो०) जाणता वैद्य भेटे । रोगव्याधी सर्व तुटे । रोकडी सप्रचिती लोका आनंद वाटे ॥धृ०॥
कर्मकांड उपासना थोर आधार जना । न्यायनीती विवंचनां । मुख्य अधिकार ज्ञाना ॥१॥
अनुताप उदासीन । तेणें होतसे ज्ञान । हरिकथा निरुपण । दास ह्मणे हें प्रमाण ॥२॥

॥वोवी॥ निवाला साधकु यापरी जनीं । दिसतो तरि बहु सीणतो साधनीं । परि स्वतसित्ध वस्तु स्वयें साधुनी । वर्ते टाकुनि पाषांड ॥१२॥
वंद्य अग्रांतीं श्रीगुरुआज्ञा । बाधक भ्रामिक कर्म करीना । स्वयें चालोनि ताराया जना । सत्पुण्यमार्गी वर्ततसे ॥१३॥
किमपी न गुंते बाधककर्मी । न वावरेचि अन्यायधर्मी । मोडून टाकी जो अहंताउर्मी । सशुत्धसर्वागीं साधक ॥१४॥

॥अभंग॥ गुरुकृपेविण न कळे हे टुक । केलें जें बाधक होत आहे ॥१॥
द्रव्य सांचलिया ये पाहे दरोडा । भाग्यपाठी पीडा बहु होय ॥२॥
व्यापाराच्या मागें कारभारीबाधा । आपदाविपदा सर्वांमध्यें ॥३॥
स्वर्गाप्रति जातां ढकलून देती । सवें चि विपत्ती सकामात ॥४॥
फळश्रुति परी इच्छा मनीं आस्था । पुढील व्यवस्छा नेणतीच ॥५॥
जन्ममृत्युपीडा हरे जेणें योग । स्वात्मानंदमार्ग तोचि शुद्ध ॥६॥

॥वोवी॥ यापरी करितां पदव्याख्यान । जन्मावरी न सरे चि लिहिणें । आणि पुरा न कथवे सद्महिमान । ऐका सद्भाव स्फुरला तो ॥१५॥

॥साधक अभंग॥ जन्मा येउनीया साधी जो स्वहीत । साधकु तो सत्य परमार्थी ॥१॥
सारगुणग्राही निष्कामी निर्मळ । दवडी ना काळ वाया इलु ॥ आपण तरोनि तारि आणिकासी । जाला सौख्यरासी धन्य जगीं ॥३॥
आत्मारामपदीं सद्भाव ज्याचा । सित्ध तो चि साचा सर्वा मान्य ॥४॥

॥धन्य॥ वोवी॥ देहपोषणेचा टाकुनि लोभ । त्यजुनि प्रतिष्ठा प्रपंचदंभ । जन्मसार्थकाचा इछी लाभ । धन्य तो साधनीं वर्ते सदा ॥१६॥

॥अमान्य॥ अभंग॥ तो धन्य साधक रत परमार्थी । हा भ्रमिष्टु भ्रांती-माजीं वर्ते ॥१॥
करुन साधन संसार संपादी । तोडीना उपाधी मी मी म्हणे ॥२॥
बाधककर्मांत सापडोनि पडे । केवि तया जोडे स्वात्मसौख्य ॥३॥

॥अबाधक॥ वोवी॥ जेणे सन्मार्गी पडे अटक । भीडईहाची न सुटे लोकिक । जे भ्रमवोन नाडी स्वर्गादि सुख । तें कर्म बाधक करीना ॥१७॥
न वर्ते जो गुंतोन भिडेंत । माईक विषईं न पडे भ्रांत । न करी अनर्थु न धरी किंत । अबाधकपण या नांव ॥१८॥

॥सारज्ञ॥ वोवी॥ सार स्वीकारी स्वरुप लक्ष । असार त्यागी नाश पूर्वपक्ष । जाला विचारें नेमकु दक्ष । येक साक्षित्वें विचक्षणु ॥१९॥
चांगक्रिया ॥ परोत्कर्षाचा न वटे विषादु । टाणाटोणेचा न धरी चंदु । न होय चेटकी चहाड द्रव्यभोंदु । खेदबाधाचा सोस नेणे ॥२०॥
॥परिश्रम॥ आत्मज्ञानें जाणोन आपणा । गाळोन टाकी जो अहंभावना । टाळी च लावी कहीं विसरेना । येरासि वदेना अल्पमती ॥२१॥

॥युक्ति॥ अविद्याकुटाळी करी खोडी । भलत्या कुपेची घालून वोढी । उटाळोन विवेकें तियेस रगडी । सत्ताप्रौढी हे साधकाची ॥२२॥
॥प्रताप॥ अहंता पापिणी लागोन पाठीं । अनुभवभावा नुघडची दृष्टी । प्रचितीस आपणामाजी लपेटी । ठकडणी मोठी हितघाती ॥२३॥
चपेटा तियेचा वाजतां मोटा । न सरतां होऊन वळी मोठा । करुन तियेला बारा वाटा । तंटेफंटयांत न गुंते ॥२४॥

॥मननिर्मळ॥ ॥अभंग॥ धन्य तो साधक सस्वरुपीं मन । करुनिया लीन नांदतसे ॥१॥
मन अनावर चहुंकडे धावे । कल्पना प्रसवे अहोदिन ॥२॥
तेणें जडे भ्रांती विखीं रमे वृत्ती । परमार्थपंथीं चालो नेदी ॥३॥
निर्धारुनि वस्तु तत्वें तत्व झाडी । कल्पना उफाडी तोडी मूळ ॥४॥

॥आत्मारामपदीं मन करी लीन । अखंडीत ध्यान साधी बळें ॥५॥

॥संदेहत्याग॥ बोधवाढी ॥अभंग॥ धन्य तो साधक कमाईचा पूत । साधुनी स्वहीत खेळे सुखी ॥१॥
संदेहाचा स्तोम येतां धाडिहाक । विभांडी विवेक सज्जूनिया ॥२॥
पाहिजे तें स्थापी नलगे तें दापी । बाध्य ते किमपी उरों नेदी ॥३॥
सुधैर्य सुश्रवणें वाढवी प्रबोधा । काशानीं ही बाधा नव्हे ऐसा ॥४॥
जाला गुरुकृपें आत्माराम स्वयें । साधनउपाय सोय रक्षी ॥५॥

॥तनुसार्थक॥ स्छीती॥ अभंग॥ युक्तिवंत मोठा साधक केवळ ।सद्गुरुदयाळ ज्या भाळला ॥१॥
देह नाशिवंत जाऊं नेदि वाया । दाश्यत्व कराया करी पुढें ॥२॥
सार्थक तनूचें करुनीया नीट । साधनाची वाट न मोडीच ॥२॥
विचाराने ज्याला ब्रह्मांड ठेंगणें । भेदभावमिन हरपलें ॥३॥

स्वात्मानंदपदीं नांदवी पुढिलासी । तया साधकासी नमोस्तुते ॥४॥

॥वोवी॥ साधकु ऐसा जो साधनीं राहे । तो चि जाणावा श्रीगुरुराय । त्याचेनि गवसे ते इतरा सोये । कृत्यकृत्य होय प्राणियासी ॥२५॥

॥श्लोक॥ जो साधकू साध्य तयासि वोळे । मोक्ष तया दृष्टिपुढेंचि खेळे । धन्ये तया मानिती साधुसंत । तो तारकू होइल विश्वख्यात ॥१॥

॥वोवी॥ सेवटील कथा मागिल्याध्याई । करुन गडादि यात्रा ही । परतोन अपचंदी राहिले निस्पृही । पुण्यतिथ जाली ऐका पुढें ॥२६॥
कंठीणहणुमंतासी जाऊन । राहिले कांहीं दिन । बाळ रामचंद्र सिष्याकारण । प्रबोधुनि ज्ञान महावाक्य ॥२६॥
योगपट दिधलें लिहोन स्वयें । धाकटे चि सिष्य तो जेवि बाळसूर्य । अवतारा आले ते साधुकार्य । वरदान घेतलें गुरुचें ॥२७॥
भक्तजन मिळाले तेथें येऊन । श्रमानें मिळतसे अन्न जीवन । यास्तव करुनि नैवेद्य पूजन । केलें कीर्तन प्रेमभरें ॥२८॥
तेणें सत्सिष्या ठसला भाव । मानिलें विसावा मज हा ठाव । ऐकाल पुढारी कथन अपूर्व । आले गुरुराय मठासी ॥२९॥
धन्य शिवाजीबावा तपस्वी । राबे ज्या सदनीं परमार्थपदवी । गृहस्थ येक भला सद्वाक्य जीवीं । धरिल कोणत ऐकिजे ॥३०॥
रामीरामदासाच कौपीन फाटक । नेऊन पूजितां भावें भाविक । दारिद्र्य आणि अगुण कळंक । जाउनि जाला तो कीर्तिवंत । चरित्रवाक्य हें धरुन हृदई । तैसा चि तद्वत हा जाणोन निस्पृही । कौपीन पूजितां नेवोन गृहीं । इहपरसौख्यासी लाधला ॥३२॥

ऐसे माहराज वैराग्य पुरुष । घटत्याग कराया जाले उदास । लोकासि वाटेल हो बाधिलें विष । परि इछामरण गुरुचा वर असे ॥३३॥
अवसान देहाचा जाणोन समीप । सिष्यवर्गादिका सद्गुरुभूप । बुत्धिवाद कथिले जे फळदृप । होय सवर्मे धरितां जीवीं ॥३४॥
कथा महंतीं विरक्तलक्षण । आणिखी नाना अभ्यास साधन । अष्टाक्षरीवही ते वोपून कृपेन । यापरी वर्तत जा ह्मणतिलें ॥३५॥
आणि कुबुत्धी ते नसावी पोटीं । विषईक प्रपंचीं न जडावी दृष्टी । पाहोन भल्याला न होईजे कष्टी । सांभाळिजे कीर्तिमहंतीला ॥३६॥

॥अभंग॥ सौख्याचा उपाये क्रियामाजीं आहे । संदेहसंशय त्यागिलिया ॥१॥
सर्वा भूतिं दया नाही गोवा माव । त्या नसे उणीव पूजामान ॥२॥
प्रपंची उदास परमार्थी हव्यास । तो पुण्यपुरुष उपकारी ॥३॥
धर्मस्थापनेला जाला अवतार । ज्याचेनि उत्धार होती जन ॥४॥
गुरुपाईं प्रेम साधनीं संभ्रम । तया आत्माराम न वीसंबे ॥५॥

॥वोव्या॥ वादभेदलौंदता न धरीजे छंद । अन्यमतस्था न करावें द्वंद । क्रमभूषणीला न कीजे विरुत्ध । गुरुबांधवा खेद देऊं नये ॥३७॥
स्थानमानाचा धरितां होडा । होईल तयाला भलतीच पीडा । आर्जव करावें लागेल द्वाडा । निस्पृहा दरोडा आशागुणें ॥३८॥
टाकून आपुला निजसत्यव्रत । दुर्बळु होईल तेणें परमार्थ । किमपि तयाला न होय ऊर्जित । केले श्रम व्यर्थ होतील ॥३९॥
ऐसें बोलिले सद्गुरुराय । जाणा श्रोतेनो यथार्थ आहे । ज्ञान बोलिलें तें वृथा जाये । करणी न करितां तैसी च ॥४०॥
याहीवरी करुनि सावध । या अध्याई लीहिलें जें प्रथमपद । व्याख्यान तयाचें करुनि विशद । मग भोळेभोळयाला ईक्षिलें ॥४१॥
पदव्याख्यान तें केलें कैस । ह्मणोन श्रोतेनो चळवाल मानस । तरि मागेंचि कथिलेसें कळेल तैस । ते विलोकूनि येथें तेचि माना ॥४२॥
सर्वी सर्वत्रा स्वहितकारण । कथिलें श्रीरामनामस्मरण । जैसा निर्मळचा ज्ञानसंपन्न । कोनेरबावाचा सिष्य भला ॥४३॥
तैलंभाष्यें रामनाममहिमा । कथिलेति पद तें ऐकऊं तुह्मा । जाऊं निर्वेधें सद्युक्तिधामा । श्रीराम नामा जाणिजे ॥४४॥

॥पद॥ पामुकूसुमोलेपडिपैवोंदी । प्रेमतोदिन्नीपेंपुशायका । पामरमुडगिनाभक्तुलगुडुको । रामरामअनवेरात्रिंबगलु । जया जया जय जय रामा ॥१॥
जयरामंट्टेजन्ममुलेदु । भय मुलेदुयमबाधलचाता । जय मुगलगुनि कुचाय वे स्मरणा । विष्णुलियमै पोय्यव मनसाजया ॥ध्रु०॥
आयुष्यामु आदुकों चामुकाय सुखंबुल्लकावलननकानेममुशायवेनित्य मुनिउपायकरामुनिभजनशायवे ॥२॥
तोमुलुवृतमुलुनुरैनानुरामकीर्तनसरीयेदिलेदु । नेममुशायवेनित्यमुनिउपायकरामुनिभजनशायवे ॥३॥
विनवेमनसाविवेकीवैतेतन उनित्यंगदुतत्वेंदेलसुको । अनुभविंपवेआत्मलोपलामननचेसीमरीमग्नतबोंदु ॥४॥
झंमनसज्जनसंगतिजेसीनम्मवेमनसानानाविधमुला । दिम्मरीतनमुनातिरगकारामुनिसोम्मैउंडवे सोहं बनचु ॥ज०॥५॥
धडियनिमुषमुनाघडियैनानुयडतेगकामरियप्पुडुमदिलो । वडियनदलपुचुनुंडितैवैनापुडमिलोबुट्टकापोय्यवेमनसा ॥जय०॥६॥
कुजनलुसंगतीसोगसुगागुडका । रजतामसगुणरागमुलणची । सुजनलुसंगतीगुडुकोरामुनि भजनशायवे प्रतिदिनमुननु ॥जय०॥७॥
आडुचुपाडुचुहरिदाससुडवैपडिपडिम्रोक्कुचुभक्तुला गुड्डको । नडिनुडिशायवेनम्रततोडनुनडिस्तेमनसानरकमुजुडउ ॥८॥
आडुचुपाडुचुहरिमुंदाराबेडुकोस्वामिनीवेदोत्धरुनि । नोडुचुकन्नुलावेडुकालागुलाअ डुचुनुंडेटिकोनोरिमनसा ॥जय)॥९॥

॥वोवी॥ ऐसें चि कळविलें नामरहस्य । तो तैलंगदेशीचा रामदास । भद्राचळीं जयाचा निवास । ऐका येखाद वाक्य त्याच ॥४४॥

॥पद॥ रामा रामा रामा रामा रामा यनुकोरे । वट्टिपाम रामुवलनायेमीलेदुरे ॥धृ०॥
कायामुनिलकाडालेदु । कलर्म बलमीनम्मारादु मायानाटाकामुदिनीमोरलुकोनीमोसापोका ॥१॥
नेटिंचीपाटिंचीचुसिननिटिमीदाबुग्गावंटी । बुटानाटाकामुदिनीतोटिजंजाटामोटकी ॥२॥
मिदीनुनुपुलिंतेका नीमेडीपंडदेमीलेदु । मिदीमिक्किलियमुनीचाताबीधालापालुगाका ॥३॥
येउपायामूनानैनाइशुभजनमेकानीहायुलेदुजीउनीकीआशापडीमोसापोका ॥४॥
संताकुटामी संसारमिंतालेदुइदुगोबुत्धी । मंतुलैतेरामादासुनीमाटावीनीमोसापोका ॥५॥

॥ अबब्बाश्रीरामानामंअत्यद्भुतामु । गोब्बुनायेभाग्यशालीकब्बुनोरामनामालिब्धी ॥धृ०॥ वक्कापारीरामायंटे ॐभुस्वाहापापामुलन्नी । मोक्किरोंडुमारुलंटेमोक्षामीनामं ॥१॥
मब्बुदुदांकोंडालावंटीमोगलुमुट्टिनपापामुलन्नी । अग्नीमिरगुडै कालुचुनुआरामानामं ॥२॥
सारामुलेनिसंसारासागरामनीचेरामनामं । घोरामैनायमदूतालाकोट्टेटिनामं ॥३॥
दग्गेराराडुमन्मथडु । दौटानुंन्नादुष्कर्ममुलु । तग्गुगामोहपाशमुलतगगोयुनामं ॥४॥
मुकंटीसतिकिशाश्वतमुमुतैदेतनं इचेनामं । यक्कुवैनावाल्मिकिरुषिकीयप्पुडनुष्ठानं ॥५॥
दिनदिनामुजिव्हाकिंपैतिमंगाउंडेरामनामं । धनकनुकावस्तुवाहबलुदयसेयुनामं ॥६॥
चेरिपंचेद्रियामुलुचारादिसेदिइरामनामं । पारोदोलुमुन्नुटुखैभवरोगंलन्नी ॥७॥
अनलुकोनलुइक्कुवौंशाअभिवृत्धिसेयुनामं । तनउनुरेंडलुंडाजेयुतारकानामं ॥८॥
कामक्रोधालोभामोहामदामत्छरमणिचेनामं । स्वामिभद्राद्रीचलसाक्षीसद्गतिनामं ॥९॥
नेमामुतोपलीकीतेनित्यमोक्षामिच्चेनामं । रामदासुनेलिनाश्रीरामानामामु ॥१०॥

॥वोवी॥ ऐसें चि भाविका कळवोन अर्थ । राहिले अपचंदीं सद्गुरुनाथ । चहुंकडोन दर्शना येताति भक्त । आज्ञाप्रमाण वर्तती ॥४५॥
धन्य स्वामीचा भावार्थ ऐसा । नेणती रामाविण आन सहसा । यास्तव कपींद्रू देऊन भर्वसा । हृदयामाजीं च वर्ततू ॥४६॥
हेतू ऐसा की सर्वदां मानसीं । जेवि भक्त होता कर्नाटकदेशीं । रामदासनामा श्रीरामासी । स्तविलें ऐका तें तद्वत ॥४७॥

॥पद॥ सखीये बाई कमलनयन राम दाखवा ॥धृ०॥ धननिळांग नळिननाभ । अनळमित्रतनयवरदसकळभूपतळनृपेंद्र मैथुळीमुखाब्ज भृंग ॥१॥
पंक्तिशतकरांशतिलक पंक्तिरथकुमारश्रेष्ठ । पंक्तिवदनवंशनाश पार्वतीशप्राणमित्र ॥२॥
निकट शरयुपुलिनिवास प्रथमपूर अयोध्याधीश । मुनिमनोज्ञराजहंस रामदासहृदयभूष ॥३॥

॥वोवी॥ आणि स्वामिचा गुरुबंधु भला । जगजीवननाम साजे जयाला । तो ह्मणे स्वामीला तुमचा आंखिला । स्तविलें रामाला ऐका कस ॥४८॥

॥पद॥ करूणालवालराम भवघ्वांत हरसुखकरणा रे ॥धृ०॥
हे मार मारतात मार्तांडकुलाभरणा रे ॥१॥
मुनिसत्वहंसकरिपुदंडक विपिनविहरणा रे ॥२॥
सुरपादपादपा मां पाहि पतितोत्धरणा रे ॥३॥
राकांतकांतका जगजीवनजनमतहरणा रे ॥४॥

॥वोवी॥ ऐसे चि श्रीरामा करिती स्तवन । तरीच समर्थु आसे प्रसन्न । लालना पुरवितु पवननंदन । क्रियासंपन्न संतसखा ॥४९॥
होऊन सद्वस्तु स्वयें परिपूर्ण । उपासना करिती आदरेण । कुळदेवादिका देती मान । स्वधर्माचरणीं नुन्य नसे ॥५०॥
भैरवतुळजाईखंडेराव । जयाचे सदनीं हे कुळदेव । तो चंपाषष्टीचा आला उत्छाव । ठेविला दीप नवरात्रिचा ॥५१॥
संग्रहीं च आसे अक्काई जननी । त्याहच्या अनुमतीं चालती ज्ञानी । मिळाले ब्राह्मण सुवासिनी । साहित्य ससांग जालेंसे ॥५२॥
तो काळ ज्या नाम अंतकबळी । दृश्य आकारा जो गिळि उगळि । तो येउनिया सद्गुरुजवळीं । वदे हस्तांजुळीं जोडोन ॥५३॥
दयाळा काळ मी अजिंक सत्य । ह्मणाल कोणाला तो संदेहियात । परि गुरुभक्ताचा मी होय अंकित । कां देहातीत ते होठाती ॥५४॥
नित्य निजरुपीं होता निश्चळ । सद्यचि जाले ते काळाचा काळ । यमांतक त्याचे वंदिति पाऊल अपघाता वेळ मग कायसी ॥५५॥
मिथ्या देहीं च निर्विकल्प पवन । वासना ईषणा ज्या नसे किंचन । यद्यपी आह्माला द्यावा मान । आज्ञाप्रमाण परम सुखदा ॥५६॥
हांसोन बोलिले ऐसे ऐकता । उत्साव हो दे नेमिला पुरता । तो वदोन तथास्तु गुप्त होता । उत्साहा अंतिं सप्तमीसी ॥५७॥
बिछयानी तकियाचा करुनि आश्रय । बैसले आसतां श्रीगुरुवर्य । वैद्य येक आला तो हात पाहे । ह्मणतीला संशय कांहीं नसे ॥५८॥
राजवैद्याचें ऐकोन बोलणें । सकळिका वाटलें समाधान । आप्त येक म्लानता स्वामिकारण । न होय सहन ममता हे ॥५९॥
कंठीहणमंताकडे तयांत । धाडिलें आणाया अंगारतीर्थ । इकडे बायाला आज्ञा त्वरित । केले नैवेद्य व्हावया ॥६०॥
देव पूजाया गेला ब्राह्मण । रामचंद्र स्वामी सुपुत्र रत्न । सन्निधीं आसतां पाहोन कृपेनें । खेळाया जाई ह्मणतिलें ॥६१॥
जन्मोन जयाला न ठावा खेळु । पैलाड ठाकले अज्ञान टाळु । तंव पातला येकांतीं सन्मुखी काळु । झीडकाऊन धीर धरी ह्मणतिलें ॥६२॥
आज्ञांकित तो गेला काळ । देखोन बाळाचें म्लान मुखकमळ । पाहोन कृपेनें घेतलें जवळ । कुर्वाळुनिया बोलिलें ॥६३॥
स्मरण आसो दे जें बोलिलें तुज । कृपा करील श्रीपवनात्मज । गुरुबंधु माझा अनुभवी निज । जगजीवनबावा ठावा तुज ॥६४॥
षोडशअब्दाचें येतां वये । जाऊन तयाचे संग्रहीं राहे । कृपा करील श्रीरामराय । होसी वरदानें पूर्णकामा ॥६५॥
सांगून यापरी जाई ह्मणतां । सन्मुखी ठाकले न होववे परता । पुन्हा छी ह्मणतीलें काळ येतां । जाला नैवेद्य संतर्पण ॥६६॥
मग मिळाले भोंवतीं आप्तमित्रवर्ग । माता मेहुणा भगिनी जग । भक्त सिष्य भाविकीं जोडून करयुग । नमोन ठाकले भक्तिवंत ॥६७॥
तो उच्चारुनिया जयराम नाम । चुटकी वाजविलें महा संभ्रम । आत्मज्योति ते स्वरुपीं संगम । जाली विराला प्राण तो ॥६८॥
कानफिरण ना ना कांतिपालट । विभ्रम घुर्घुरी ना उतरलें मुखवट । सकळिकां वाटलें तैं आश्चिर्य मोट । हातपाय काष्ट न जाले ॥६९॥
सजीवदेहाची तैसी अवयव । दिसे ध्यानस्थु महानुभाव । सन्निधीं असती ते जाणते सर्व । शोक आक्रोशा विसरले ॥७०॥

॥अभंग॥ सद्गुरु तों आधीं भवासी नासिती । सदां रमविती सस्वरुपीं ॥१॥
मायामय सर्व मिथ्या देहभान । ऐसें जेथ ज्ञान नांदतसे ॥२॥
ऐसे दातयाला करावा कां शोक । लोभक्षोभहाक कां हो द्यावी ॥३॥
उपासनासुख वीघड यागुणे । स्छितीसी वाननें प्रेमादर ॥४॥
प्रेमांबु वाहणें तन्मयता होणें । व्याकुळ नोकणें शोक नव्हे ॥५॥
यद्यपी मुमुक्षु साधकां तळमळ । ते ही ध्यानबळें धन्य होती ॥६॥
जन रडती ते आपणावरुनि । होती पुण्यखाणी प्रेमदु:खें ॥७॥
स्वात्मानंदसुखदाता पूर्णकाम । भजन सप्रेम कीजे त्याचें ॥८॥

॥वोवी॥ आतां संसारीं नेणते कर्मट । न कीजे गेल्याचें तें शोककष्ट । यदर्थी श्रुति: आणि वाक्यगोमट । ऐकोन ध्यानासि आणा हो ॥७१॥

॥श्रुति:॥ परखेदने न क्रिया भवंति॥
॥वचन॥ अन्य वृत्धा: इतिहासपुराणानि बोधयंति ॥

॥वोव्या॥ प्रपंचलुब्धकां न घडला बोध । प्रसंगीं तरी करावें सावध । परमार्थी ते निज सुखानंद । सदा ही भोगिले भोगविती ॥७२॥
हें असो संत ते सर्वदा सुखी । सहवासीक त्याचे जाणते विवेकी । दु:खभ्रांताच हरिती टुकी । त्यास क्लेश कैंचा सांगाहो ॥७३॥
कोणी वानिती संतमहिमान । कोणी विस्तारिती निजैक्यज्ञान । करुं लागले कोणी भजन । कोणी आठविलें सत्कार्य ॥७४॥
माता म्हणे बा वदूं अन्याय । तरि आधीं च कथिलासी वैराग्यधैर्य । संतसाधु ते जाले तन्मय । कांहीच नाठवे प्रेमळासी ॥७५॥
तो अणाजीभट्टाला कळतां वृत्तांत । पातला पूजनसामुग्रीसहित । अंतेष्टीचें करविलें साहित्य । होय पुरोहित सिष्य हि ॥७६॥
करुन  सद्‍घटा विध्युक्त पूजन । सांगत सकळिका निजवर्मखूण । सरणशय्यासी लावावें कृशान । तो शामजी सत्सिष्य पातला ॥७७॥
ह्मणती उघडोन दावा मुख । येरु वदे तो मी पादपूजक । या उभय संशई पडल अटक । तो भाळला सदुरु करणार ॥७८॥
पाय झाडितां चि पडल्या शुभा । संतोष वाटला बहु शामबाबा । पूजोन पदाला आणितां शोभा । पुढील कार्यासि उरकविलें ॥७९॥
सत्सिष्य पुत्र हि रामचंद्र । पुरोहितादि मिळोन भूसुर । त्याहातीं करविलें क्रिया समग्र । समाधिस्थ जाले अपचंदग्रामीं । पाहती सदैवीं प्रत्यक्ष ॥८१॥

॥श्लोक॥ सोळासे अडताळ वछर शके तैं पराभाउनामें । शुद्ध सप्तमि मार्गसीर्ष दिवसा मंदवारीं दुयमिं सर्वासी गुज बोलुनी मग सुखें चिंतूनि रामनामें । सिवदाता तनु त्यागुनी निजगतीं जाहले पूर्ण ब्रह्मे ॥१॥

॥अभंग॥ ऐका स्वामिचा पुण्यदिवस । शके सोळासे अडताळीस ॥१॥
नाम पराभव वछर । दिवसा द्वययाम शनिवार ॥२॥
शुद्धसप्तमी मार्गसीर्ष । सन्न आक्रासे छेत्तिस ॥३॥
गजर उत्साब करुनी । प्रेमें जयराम स्मरुनि ॥४॥
मान्य सिवरामस्वामी धन्य । स्वयें परब्रह्मीं जाले लीन ॥५॥
सांभाळिती भाविक लोका । ज्याचा आत्माराम सखा ॥६॥

॥वोवी॥ प्रत्यक्ष त्या दिवसीं स्वामीरायांनीं । सातारगडीं प्रगटले जाउनी । सत्सिष्य दादाला वृतांत सांगुनी । अंतरधान पावले ॥८२॥
त्यांनीं हरकार्‍या जोडीसवें । धाडिला इनाम दक्षणाद्रव्य । लिहिलें मठच्यांनीं वर्तमान सर्व । मानिलें आश्चिर्य भक्तजन ॥८३॥
अस्ती धाडाया भागीरथीसी । नेमिला येक तो गृहस्थासी । तो वदे निभांवणी होय कैसी । येरु युक्तीतें साधिले ॥८४॥
देऊन झोंळी काठी वसन । आणीक खर्चाया यथेष्ठ धन । धाडितां गेला तो निर्भयमन । सांप्रदाई मिळाला कार्यातीं ॥८५॥
आणीक ऐका हो नवलचरित । कलबरगेंत होता सूर्योपंत । त्या कवेश्वराला कळलां वृतांत । अपचंदाप्रती पातला ॥८६॥
तो भक्तिवान ह्मणविला असे सिष्य । परंतुअ न जाला तया उपदेश । कारण कवनाचा धरुन हव्यास । लिहोन स्वामीला दाखविता ॥८७॥
स्वामिराज वदले बहुत सरस । परि अंतर पडलें असे क्रमास । न घेतली आज्ञा ना उपदेश । यास्तव विस्तार न जाला ॥८८॥
असोन पढियंता भाव विशेष । यास्तव न दिल्हे क्रमोपदेश । परंतु तयाचें निर्मळ मानस । सादर सेवेसी सर्वाहुनी ॥८९॥
तेणें प्रबोधु करिती गुरुवर । प्रत्ययज्ञानी तो जाला सुंदर । परि लभ्य येक नाहीं तारकमंत्र । कैसा ही निश्चई पुरुष तो ॥९०॥
पातला नदीचें करुनि स्नान । समाधिनेमाचें जें होत स्थान । बैसला ते ठाई लोटले त्रय दिन । गुरुदयाघन पावला ॥९१॥
प्रत्यक्ष प्रगटला श्रीगुरुनाथ । अनुग्रह केलें यथाविध्युक्त । मग होऊन सिष्य तो सप्रेमभरित । अष्टक वदलासे श्रवण करा ॥९२॥

॥अष्टक॥ जो दयानिधि महासुखदाता । जो अतर्क्य निगमागमवेत्ता । पाववी स्मरण चिन्मयधामा । जाइजे शरण त्या शिवरामा ॥१॥
ठेवितां पदयुगांबुज माथा । वारितो सदय तो भववेथा । देतसे भजन निर्मळ प्रेमा । जा०॥२॥
नित्यनूतन निरंजन व्यक्ती । सत्य हे हरिहरात्मकमूर्ती । सद्गुरु परमपावननामा । जा०॥३॥
सांप्रदाय अति उत्तम देखा । भाविका भजन देत आवांका । टाकुनी सकळ नैश्वर्यकामां  जा०॥४॥
सत्य क्षेत्र गुरुची तनु कासी । विश्वनाथ गुरुक्षेत्रनिवासी । मंत्र तारक कथी गुरुनामा  जा०॥५॥
धन्य नाम गुरु तारकनौका । पारणें भवनदी हरि शोका । दे अगम्य पद वारुनि येमा  जा०॥६॥
दीनबंधु करुणार्णव कैसा । तोडितो स्मरणिं हा भवफांसा । जन्ममृत्य निरसी जगदात्मा  जा०॥७॥
आपुलें स्वपद देऊन गोवी । रामरुप अवघें जन दावी । चित्प्रकाश उगवी रवि व्योमा  जा०॥८॥
भावें स्मरे वदनि सद्गुरुअष्टकासी । त्याला घडे सहज तत्पदवास कासी । कर्णी भरी स्वगुज तारकमंत्रनाम । श्रीरामनाम जपतो कवि सूर्य प्रेम ॥९॥

॥वोवी॥ ऐसा कृपाळु सद्गुरुनाथ पुरविती भक्ताचे मनोरथ । कीर्तन करणारा ज्योतिपंत । कळतां वृत्तांत पातला ॥९३॥
योगी असला रुसला हें पद । भरणासह अर्थ तो केला विशद । येऊं लागती सिष्य भक्तवृंद । करिती पूजन समाधिच ॥९४॥
करविती नैवेद्यसंतर्पण । समाध बांधाया वोपिती धन । जाहागीर चौथाई ऐवज मिळोन । केलें गुरुस्थान विश्राम ॥९५॥
अक्काई आयादि चीमाबाई । भोळेपण नांदे जीयाच्या हृदई । दासकल्याणगुरुगोसावी । पश्चिमेस आहेति भाउन ॥९६॥
तिकडे चि करविलें समाधिसुख । अंतर्भाव त्याचा हा सत्सिष्यटिळक । महागुरुकडे जाला सन्मुख । साहित्य करविलें समाधिसुख अंतर्भाव त्याचा हा सत्सिष्यटिळक । महागुरुकडे जाला सन्मुख । साहित्य करविलें ससांग ॥९७॥
भिजवोन तीर्थात चिदाभस्म । गुरुहातिंची जपमाळ उत्तम । स्थापोन त्यावरी श्रीरामनाम । अंकित समाधि संस्थापिलें ॥९८॥
न पडे विध्युक्ती व्यंग अणुमात्र । पुण्यतिथ उत्साह जाला सगजरें । हरिदासादि गेले पावोन आदर । चाले अद्यापी तो दंडक ॥९९॥
ताकपीठाचा जेथें सुकाळ । अन्नदानविषई द्वार मोकळ । होती उत्सावी उदार केवळ । महिमा वाखाणिती भले भले ॥१००॥
ऐसा अस्ता हा थेट मार्ग शुत्ध । अविचारजनाला वाटे विषाद । न दिसे चि नुन्यता करितां शोध । तरि अपवादावरि ऊठती ॥१०१॥
नस्तीच येक खबर उठवावी । निंदा कुचेष्टा स्वयें करावी । भोळे भल्याला पाडावें गोवीं । हा नष्टभ्रष्टाचा स्वभाव ॥२॥
गृहस्थ घटाला पुरविलें ह्मणती । हडें निक्षेपिल्या आहेत वदती । शवासी पूजिलें तीर्थ सेविती । ब्राह्मणास न पुसती विधी नसे ॥३॥
त्यांत सिष्ट ते जाणते जन । जे सर्वप्रमयीं वागते निपुण । छी छी वदती हें असत्य भाषण । सर्वज्ञ ते ऐसे कां करिती ॥४॥
तरि हि निंदका वाटे हुरहुर । येकदां कर्नाटकप्रांतासि विप्र । गेले ते ठाई तपस्वी थोर । नारायणदेव असती ॥५॥
गुरुपुत्र तयाचा धुरीण थोर । बैसले असती पाहत शास्त्र । तो द्विजांनीं काढिला समाचार । अपचंद स्वामीचा आरोपित ॥६॥
नारायणदेव तो गुरुभक्त नि:सीम । गुरुबंधु गुरुमार्गी होय परम । कां करिसी रे ह्मणतिलें निंदाकर्म । जाणसी सांग पां काय कीती ॥७॥
ज्ञानध्यानयोगीं जया हव्यास । घडला जयाला महावाक्यउपदेश । पुरीता जाळिता त्याचा घटास । नसे चि दोष ना विटाळ ॥८॥
जो भक्तास पूजाया पसरिलें चरण । रडतां बायांनीं फिरविलें वदन । केवि वदिजे हो शव घतो ह्मणोन । चरणतीर्थ सेवितां निंद्य काय ॥९॥
लवती तनु अस्ती जे प्राणेविण । पुरिता पूजिता काय अनुमान । मुख्य नवल तो गुरुमहिमान । कैसा ही असो निंदो नये ॥११०॥
उपासना व्हावी कीं सिष्यजनांत । पूजोन सेवाया प्रसादतीर्थ । व्हावया समाधी सित्ध गुरुत्व । केलें तें सत्य देवास ही ॥११॥
निंदिती जनानीं तो होय स्वभाव । पावोन प्रचिती मग धरिती भाव । समाधीपुढें पसरोन पल्लव । फळदान मागती नवसिती ॥१२॥
प्रागदूरी आसे आमुच स्थळ । नसे विध्युक्तीं नुन्य अळुमाळ । तरि ही द्वेषिती निंदिती खटयाळ । पूर्वापार गत हें चि असे ॥१३॥
बोलतां यापरी ब्रह्मण्यापुढें । वार्ता विस्तारली तेणें चहुंकडे । किमपी नुघडती निंदकी तोंडें । न कळे ह्मणती सद्महिमा ॥१४॥
शिवाजीबावाचा सिष्य रामचंद्र । जाणोन विश्वासी महंत थोर । भाविलें देवांनीं सत्य मम मित्र । सानकूळ करिती प्रीतीनें ॥१५॥
ऐसा सत्सिष्यु अधिकारियांत । देखों न सकती जे वसते मठांत । कपट कुयुक्ती खटपटी यांत । पडोन येऊं न देती ॥१६॥
गुरुरायें कथिली जे स्वहितबुधी । विसरोन बहु जाले आशा बत्धी । मग कोण काढितो परमार्थशुत्धी । अवघेचि वदती श्रेष्ठ आह्मी ॥१७॥
परि रामचंद्रजी अवतारपुरुष । वय ही होआल पंचदशवरुष । परमार्थयोगाचा लागोन अध्यास । जाले उदास सर्वस्वी ॥१८॥
कोणास पाहिजे महंती मठ । कासया व्हावी हे थोरीव खटपट । चिंतोन यापरी धरिले वाट । येतां स्मरणासी गुरुवाक्य ॥१९॥

॥अभंग॥ परमार्थलाभेविण जे थोरीव । केले भ्रम वाव जाणावे ते ॥१॥
लोकालोक साध्य प्रपंच हो नीट । येवो राज्यपट फळो सित्धी ॥२॥
विद्या बहु सीको पावो बहु मान । वस्य होवो जन राहो जनीं ॥३॥
आत्मारामकृपें परमार्थसित्धि । होय धन्य तधी ह्मणती संत ॥४॥

॥वोवी॥ उपजतां च उदरीं गुरुचा माल । पूर्वजन्मींचा योगी च केवळ । प्रस्तुत साधाया बोध पर्वकाळ । सर्वानंद अवतारी चालिले ॥१२०॥
जगन्नाथबावापासीं येऊन । ठाकतां सद्भावें करुनि नमन । वदले बावांनीं आल कारण । संपादोन जाई राहीं पा ॥२१॥
सिवरामस्वामी मम गुरुबंधु । केला कृपेनें जो तुला बोधु । तो पुरे उत्धारकार्यसंपादु । परि निमित्य घातल मजवरी ॥२२॥
येथें धाडाया हें चि कारण । निर्बळ ज्ञान तें सेवेविण । ऐसें ऐकतां करुनि नमन । संपादीत सेवा राहिले ॥२३॥
धन्य तो जगजीवनस्वामी । धुरीण निस्पृही निजनिष्कामी । करिती महंती जिरवोन ऊर्मी । सर्वमान्य चालणें जयाचें ॥२४॥
यास्तव गुरुवर्यु असती प्रसन्न । न विसंबे ज्याला पवननंदन । वंद्य होय जयाचें सरस कवन । कीर्तन गाणें सुंदर ॥२५॥

॥अष्टपदी॥ अष्टपदी उच्चारा राम पतीतपावना । आत्मारामस्मरण भावें वारी यातना । अखंड चित्तीं चिंतन आल्या उन्मनि या मना । आनंदाचे रंगीं ठाव नाही अनुमाना ॥धृ०॥
राम राम उफराट पावे वाल्मिक उत्धारा । राम राम ध्यातसे प्रचित जाली शंकरा । राजवेशे दाविला सूर्येवंशी साजिरा । राजात्धिराज अवतरला या जगदोत्धारा ॥१॥
मागुनि विश्वामित्र राया ऋषिच्या कामा । मारुनि बळिया राक्षस सित्धी पावली होमा । मार्गी सिळा करुनी बाळा धाडी निजधामा । माहाविक्रम प्रणुनी सीता आले आश्रमा ॥२॥
पट्ट रामराज्या कैके केला विक्षेप । परदेसी वनवासी करणें लागलें तप । परेश फणिवर सीतादेवी लावण्यरुप । पंचवटके येउनि रावण हारी पापरुप ॥३॥
तीलागी उभय नाना वनें धुंडिती । तीव्र विरहनलें वाटे मानसीं खंती । तिहीं गुणापरता जो कवणा नेणवे गती । तीर्था वंदी कार्याकारण शिवें हे युक्ती ॥४॥
तये आठवी फिरतां पंपासरा येत । तात्काळ सेनेसी भेटे सुग्रिवहनुमंत । तये चि समयीं रामें केला वाळी नि:पात । तरुपाणीसी राघव जेथें रुषिमुखपर्वत ॥५॥
पाठविलें हनुमंता सीताशुत्धि स्वरुपा । पाहोनि भीम माता मोडी वना पादपा । पाडुनि बळिये राक्षस मारुनि लंकेच्या पडपा । पावत वार्ता भीम सांगे अयोध्याभूपा ॥६॥
वहिला सिंधू तरोन शीळा सुवेळाठाव । वधिला रावण सहपरिवार विजई राघव । वधूसि अंकीं घेउनि स्थानीं स्थापीले देव । वचना खरें करुनि आले अयोध्या सर्व ॥७॥
नाना सोहळे रामराजा स्वानंदघना । नागर चौघे बंधू माता सुख जालें जना । नायेकसहित गौरव केला बोळविलें शेना । नाना मोहत्साव जाले आनंद त्रिभुवना ॥८॥
नाहीं संशय पाहतां रामदासाचा दासा । कृपाळु कल्याणस्वामी भावें कोवसा । येशकीर्तिप्रतापमहिमा प्रत्ययो ऐसा । पूर्ण वर दीधला रामस्वामिये दासा ॥९॥

॥वोवी॥ पण घालितां कीर्तनीं भावें । स्तंभांतून आला सिळा नारसिंव्ह । चरित्रें असती ऐसी अभिनव । अवधी नसे हो वानावया ॥१२८॥
महंती करण्याची थोर हातवटी । नुन्यता कांहीं न पडे मठीं । बंधानेची ऐकोन गोष्टी । साहु सरदार वचकती ॥१२९॥
सर्वापरीनें असोन संपदा । अमर्याद चाली नसे कदा । सर्वदा ज्या सदनीं वैराग्यधंदा । फितुरफंदात नेणती ॥१३०॥
माघवद्यनौमी पुण्यतिथीला । दक्षणाखाले मठमाल वोपिला । तीर्थाटणा करुन येतां वर्षाला । संपदा सांचली तैसी च ॥१३१॥
आशाढ शुत्ध त्रयोदश दिनीं । ससांग गुरुची पुण्यतिथ करुनी । दक्षणाखाले संपदा वोपुनी । नैराशधर्मा अवलंबिलें ॥३२॥
गुरुदत्त झोळी तुंबा काठी । दासबोधग्रंथ कौपीन छयाटी । शांति विरक्ति लागोन पाठी । गुरुस्थानादियात्रेसी चालिले ॥३३॥
फिरुन येतां भरली संपती । जाणोन या अर्थी सीणतो मारुती । अनुभवीत राहिले स्वस्थचित्तीं । भक्तसिष्य जाले प्रबुत्ध ॥३४॥
बाळकांडलीळा केलें विरचित । आख्यान पदादि केलें बहुत । संतुष्ट पावले सद्रुरुनाथ । कीर्तिप्रताप ऐकुनी ॥३५॥
दासबोधग्रंथीं जे उत्तमगुण । जयाचे देहीं विलसती पूर्ण । थोर ब्रह्मवेत्ते जाले कृपेनें । अबाधितज्ञान जयाचें ॥३६॥
कडे सोन्याचीं करवोन दोन । ठेवविले सन्मुखीं पाहों कारण । सकळास कळविलें मनिंची खूण । संशई न पडा हो ह्मणतिलें ॥३७॥
असेल मम देहीं जो कां अवगुण । तो उच्चारुन कडे हें न्या उचलोन । किमपी न मिळती शोधिता दुर्गुण । स्वर्णवीरकंकण कोण उचली ॥३८॥
हे असो धन्य तो महापुरुष । बहुत बहुजीनसी असती सिष्य । रामचंद्र तेथ यावयास । कारण ऐका हो पूर्वीच ॥३९॥
अश्वमेध करितां चापपाणी । विलोकूं पातले राजे ऋषि मुनि । धन्य जयाची अद्भुतकरणी । न समाय गगनीं उल्हास ॥१४०॥
घेऊन संगी लवाकुशासी । सभेसी पातला वाल्मिकऋषी । हरुष बहु वाटला सकळिकासी । सन्मानुनिया बैसविले ॥४१॥
जो श्रीरामभक्तीचा पातला मुगुटमणी । श्रीरामलीळेचा ज्या ध्यास अनुदिनीं । भुमिजापुत्राला प्रेमेंकरुनी । सिकविलें असे रामायण ॥४२॥
तंव ऋषिगुरुरायें आज्ञा करितां । मुलास वाटली संतोषता । नमोन सद्भावें गाऊं लागता । कर्मधर्म कवणा ही नाठवे ॥४३॥
येकवट जालीं अवघ्यांची मनें । ह्मणती ऐशाचें दुर्लभ दर्शन । ऋषिगणा वाटे ज्याचेनि भूषण । धन्य व्याली ते मायबाई ॥४४॥
तंव भरथरायासि आला प्रेम । न धाय लक्षितां वदनपद्म । भावितु ऐसे बाळका उत्तम । हृदयसद्मांतरीं ठेवावें ॥४५॥

लालन बोलनें करीत सदा । करवावे या हाती सत्कार्यधंदा । प्रार्थुनि श्रीरामसच्चिदानंदा । पुत्ररत्न ऐसें पावावे ॥४६॥
वळखोन ऐसा तो प्रेमोल्हास । हांसोन बोलिले श्रीवान्नरेश । व्हाल हो तीघे ही निस्पृही पुरुष । पुरवील अपेक्षा श्रीरामें ॥४७॥
फळास आलें होतें वरदान । भरथराज जाला श्रीकल्याण । मागें कथिलें हें चरित्र महिमान । कारण दासाचा सिष्य कां ॥४८॥
शिवरामस्वामि तो अंश लवाचा । प्रताप ऐकिला कीं मागें त्याचा । जगन्नाथबावा अंश कुशाचा । गुरुभक्त दोघे ही नि:सीम ॥४९॥
यापरी ह्मणविलें धन्य धर्मपुत्र । आणीक ऐका याचें च चरित्र । भरथभक्त भाळला जया प्रकार । देखोन लेकरें योग्यता ॥५०॥
सर्वानंदमुनी थोर प्रतापी । तन्मय होठेला मुलाच्या रुपीं । विसर न पडे चि मानसा किमपी । भावितु होईन पुत्र याचा ॥५१॥
थोरीव मज नलगे वृत्धविशेख । शुश्रुषा सद्भावें करुनि हरिख । बोधभाव हृदईचा अलोलिक । सेवीन सत्सौख्य बाल्यभावें ॥५२॥
तो फळला या समई संकल्प हेतु । शिवाजिबावाचा जाला सुतु । मग जगज्जीवनाचा होऊन अंकितु । सेवा संपादिता पुत्रभावें ॥५३॥
कसोन पाहतां नानापरीनें । दृढतर जयाच न होय नुन्य । ह्मणाल श्रोतेनो येविषीं कथन । कोण्यापुराणीं आधार ॥५४॥
कलयुगीं कासया अवतार घेती । तोंडजबानी काईसी प्रचिती । आहो भल्यानो संशय यदर्थी । न माना भाव फळलासें ॥५५॥
मारुती तो रामीरामदास । कल्याणस्वामी भरथजी अंश । गाईलें संतांनीं विदित तुह्मास । यावरी ऐसें जालें हो ॥५६॥
वंशावळी पुरुषा वानाया पुढें । न सूचता भावनीं पडलें सांकडें । तंव अंतरात्मा जो भीम बळाढय । सुचविल तैस लिहिल असे ॥५७॥
तधीहून या युगीं असे हणुमंत । या सांप्रदायाचा अभिमानी सत्य । त्या पुराणपुरुषासी हे असे मात । संशयो किंचित न धरावा ॥५८॥
ह्मणाल जाले जे ते रामदासी । कां कळविलें नाहीं कोण कोण अंशीं । अहो असतील ते सर्वी आधार त्यासी । शोधितां ऐसेंचि निघेल ॥५९॥
भक्तलोक अवतरु असे हरिआज्ञा । वानिले संतांनीं चरित्रीं जाणा । आठरा पद्म ते श्रीरामसेना । आले येतील जन्मासी ॥१६०॥
परी प्रस्तुत पडलें काम जितुक । तेवढें च कळाया जालों आर्जिक । भक्ताभिमानी श्रीकपिनायक । पुरविला हेतु ऐका पुढें ॥६१॥
रामचंद्रस्वामी गुणनिधान । बैसले स्वामीचे चुरित चरण । तों दातयांनीं रचोन कवन । मूळ विसरुन शोधिता ॥६२॥
स्मरण देता चि तुष्टले भवहर । मग सवाई येक रचिले त्यावर । उर्जीत हो ऐसा वोपिले वर । कसवटीला न भागता ॥६३॥
चुकविता पेचु सेवा सांगणी । अंतर न पाडी किमपी सद्गुणी । बळधैर्य विलोकुं येकदां स्वामिनीं । धरुन आणा रे ह्मणतिलें ॥६४॥
विरक्त दात्याची आज्ञा निष्टंक । धराया धावले सिष्यजन सेवक । बिफरता सरकले खाऊनि दचक । तंव रामचंद्रांनीं विनविलें ॥६५॥
जी दयाळा तुमची आज्ञा प्रमाण । स्वयमेव बाहतां जवळी येईन । पाहिजे मग कीजे लालन कीं ताडण । अन्यत्र कोण तो धरणारा ॥६६॥
अमर्यादा न व्हावी स्वामीपुढें । ह्मणोन चालिले वेसीकडे । कैवारी जाले रजपूत बलाढय । कां हित कथिलें होतें यास्तव ॥६७॥
हें ऐकोन स्वामिंनीं व्यापक प्रयत्न । ये ऐसा पूर्जा धाडितां कृपेनें । आले कर जोडिले करुनि नमन । तंव सर्वज्ञ हो ऐसा वर वोपिलें ॥६८॥
सर्वज्ञ राजया भर्वसा जाला । कार्यभाग याचेनि होईल भला । तरि ही योजिती बिकट कार्याला । तो आणिला भृत्यांनीं वृतांतु ॥६९॥
मराया पडलासे विरक्त सिष्य । गांव तयाचा चोवीस कोस । धाडितां बोलिले मस्तकु उघडिला नयन । परि वासना गुंतली असे कठिण । दावितु लोटक सिंकाळीचा ॥७१॥
वदनांत घालितां तें तूप काढून । जयराम ह्मणतिला गेला प्राण । करुन सार्थक आले परतोन । सरंजामवोझें घेउनी ॥७२॥
करिती शतपाउलें स्वामिरायें । उघडोन ठेविलें साहित्य सर्व हें । अरे पाहिजे तें घेई म्हणतां सदयें । येरु विनविल ऐका कस ॥७३॥
हें आणिलों आज्ञा नव्हति यास्तव । नातरि जाळितों त्यासवें सर्व । मग वर्तमान कळवितां जाले अघव । वृत्ति लीन जाली तेधवां ॥७४॥
वाडवेळा उघडोन नयन । अंतसमयो येईल कैसा वचन । वदले स्वामिंनीं सावधान । होऊन वर्तावें साधकीं ॥७५॥

॥अभंग॥ अंतकाळीं व्हावें सावधान नीट । कष्टाहुन कष्ट तो समये ॥१॥
मरणाच्या संधी विस्मृती कारण । यातना दारूण होय तेव्हां ॥२॥
वासना प्रबळे पदार्थ शोधीत । आठवे समस्त तो प्रपंच ॥३॥
असतां नसतां जवळीं सुहृद । वाटे बहु खेद अंतर्यामीं ॥४॥
यालागीं अधीं च निजाच साधन । साधीजे कृपेनें आत्माराम ॥५॥

॥वोवी॥ असो हें सर्वत्रा बोलाऊन । घ्या ह्मणतिलें पाहिजे ते उचलोन । देवपूजादि पाक रोख कीर्तन । सरंजाम उचलिलें सर्व ही ॥७६॥
देखोन ते वेळीं निर्मळ मन । रामचंद्रा रे तूं ह्मणतिलें धन्य । येक अब्दवरी तुष्टतुष्टोन । वेळोवेळीं वरदान वोपिलें ॥७७॥
येकदां बैसला चुरीत चरण । तव दात्यांनीं निरखिलें वदन । तो प्रत्यक्ष शिवाजीस्वामिप्रमाण । दिसतां उठोन बैसले ॥७८॥
नेवोन ते वेळीं येकांत ठाई । बोलिले आतां बा स्वस्थळा जाई । उदासवृत्तांनें करीत राही । महंती तेथील गुरुकृपें ॥७९॥
तुम्हां गुरुसिष्यामाजि अभेद । अधिक करावा काय अनुवाद । समर्थस्वामीचा हा पूर्ण प्रसाद । सहजसमाधिमाजि वर्त ॥१८०॥
आत्मस्थिती हे दुर्लभ जगीं । जे इछिती भोगिती महायोगी । हे वर्म सर्वदा हि अंतरंगीं । ठेऊन विहर पां मुक्त आहसी ॥८१॥
जतन असो दे अंतर्ध्यान । स्वरुपस्थितीची हें खूण । ऐसें वदले तें करा श्रवण । वलखाया चिन्ह अभंगीं ॥८२॥

॥पद॥ गुरुकृपा लाहून होई कृतार्थ । तारक याविण नाहीं सुपंथ ॥धृ॥ संशय कांहिं च नाणि सुचित्ता । ब्रह्मविद्वह्म हे श्रुतिशासनता ॥१॥
निजगुजगौप्य हे ठसतां मानसिं । त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि ॥२॥
तनुमनधन धन अर्पुनि पाई । आत्माराम चि होऊनि राहीं ॥३॥

॥महावाक्य॥ सोहं हंस: अहं ब्रह्म ॥

॥गीता॥ श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ञानाद्धयानं विशिष्यते ॥१॥
योंत:सुखोंतरारामस्तथांतर्ज्यो०॥२॥
केशव स्वामीच अभंग कडवे-ब्रह्म होउन ब्रह्मीं खे०॥

॥दोहा॥ आत्म०॥ गुरुनायके बोध भया जब पूरनब्रह्म वो होवे । उनके पगपर मन राखे तो सोही पद पावे ॥१॥
सहजस्थितीका कर्म ज्यानकर । होना पुरन अराम । रामनाम और रामउपासक । कीजे उपासधर्म ॥२॥

॥वोवी॥ ऐसियापरी बिंबवोन वर्म । कृपावंत ते समई जाले परम । योगमुद्रा हि अनेक धर्म । कळविलें होउं नि:संशई ॥८३॥
मनोरथ यापरी होतां पूर्ण । उभेले सन्मुखी प्रणाम करुन । मग वोपून सभेंत वस्त्रमानभूषण । बोळवितां आले गुरुस्थानीं ॥८४॥
तपोबळाच सुकृतप्रतापें । शौर्यपणाच दावितां दर्प । किं साहकारी सत्याच फळद्रूप । गुरुकृपें कीं भाळला मारुती ॥८५॥
तरी च गुरुस्थानीं लाभली महंती । परि देखो न सकते द्वेष करिती । उपदेश स्वामीचा न जाला ह्मणती । जगन्नाथबावाचा शागिर्द ॥८६॥
पुसोन घेतला हो आयाबायास । भट्टबावांनीं केला उपदेश । धीटथोटपण धरिला सोस । भेडसाउं प्रबळला आंगबळें ॥८७॥
मायबापबांधवा केला आश्रय । विदित चि नसे या क्रमसांप्रदाय । मठाधिकार तो यास काय होय । ह्मणोन खेळीं माजविलें ॥८८॥
विघ्न करकरुं भागले नष्ट । टळोन गेली ते सर्व अरिष्ट । धन्य स्वामिरावो थोर येकनिष्ट । वोपिलें गुरुपट संतांनीं ॥८९॥
करिती विध्युक्त तरि महंती । परि सर्वदां ज्याची उदासवृत्ती । चालो उपासना यथापत्धती । बंदोबस्त नीट करुनिया ॥१९०॥
आज्ञापितां सद्गुरुनाथ । दासबोध मेखळा वीणा साहित्य । घेऊन स्वारी सिष्यवर्गात । तीर्थक्षेत्र पाहत चालिले ॥१९१॥
तडवळीं आणि सलगरांत । जगन्नाथ स्वामीचे असती महंत । भेटोन तयाला बोलोन हितमित । पावोन आदरें चालिले ॥९२॥
इष्टमित्रसाधुभक्तमुक्तसुखी । नवीन खुणाचे पूर्वील वोळखी । भेटती तयाला अनुग्रह विखीं । प्रार्थितां आदरु कीर्तनीं रंग । माजवोन सर्वा केले सुखी ॥१९४॥

॥अभंग॥ प्रथम नमन संत साधु जन ॥च०॥५॥
॥संसाराचें दु:ख बहुसाल होतें ॥च०॥५॥

॥वोवी॥ पंढरपुरा आले तेथून । संपादोनिया यात्राविधान । संतसाधूचें घेऊनि दर्शन । मानविलें कीर्तनीं देवभक्ता ॥९५॥

॥अभंग॥ भीमातीरवासिनीनीवासी । उभा पुंडलीकापासी ॥१॥
तेथें मानसें गुंतलें । माझें चित्त सहजीं विगुंतलें ॥२॥
पुरीं पंढरीनायक । चित्तचैतन्यव्यापक ॥३॥
रामदासी विषय वोरंगले । कैसें श्रीरंगीं रंगलें ॥४॥

॥अभंग॥ देवभक्ता भेटी जाली । शृष्टी आनंदे कोंदली ॥धृ०॥
आजि आनंद आनंद । पाहता राम परमानंद ॥१॥
रामीरामदास ह्मणे । अनुभवाचिये खूण ॥२॥

॥अभंग॥ पंचभूत पंढरपूरी । आत्मा विठ्ठल श्रीहरी ॥१॥
पंचवर्ण पांडुरंग । अंतरंगीं निजरंग ॥२॥
ज्ञानभीमा चंद्रभागा । प्रेमपुंडलीक संगा ॥३॥
भक्तिशांतिश्रीरुक्मीणी । सदानंदीं वामांगिणी ॥४॥
तुका ह्मणे सर्वाभूती । पाहती पांडुरंगमूर्ती ॥५॥

॥अभंग॥ देह देवालयो जाला । आंत मूर्ती श्रीविठला ॥१॥
अंत:करण वीटेवरी । उभा विठले श्रीहरी ॥२॥
तुका ह्मणे गुरुकृपें । जाला पांडुरंगस्वरुप ॥३॥

॥वेदसंख्या देह चारी । च्यारी देह तुं श्रीहरी ॥१॥
चारी ठाई चारी देव । पांचवा तो पंढरीराव ॥२॥
तुका ह्मणे गुरुखूण । दाखविला बाबाजीन ॥३॥

॥वोवी॥ मग कृष्णातटाकीं इनामांत अवदाहुन गेले राहिले तेथ । माहुलीवरुन कर्मीत पंथ । सज्जनगडासी पातले ॥९६॥
देखोन शुत्ध भावार्थ । प्रसन्न जाले हो दाससमर्थ । राहिले ते स्थळीं संतोषभरित । पुढील चरित्र अवधारा ॥९७॥
सज्जनगडस्वामी कृपावंत । पाजविती सदयें करूणामृत । गुरुकृपें तयाच वानितां चरित । जालों सनाथ विनऊं तुह्मा ॥१९८॥

॥अभंग॥ समर्थकृपेचा घेतां वरलाभु । जालों मी चि शंभु त्रिपुरारी ॥१॥
विवेकप्रळय करुन सेवटीं । दावीन या सृष्टी वस्तुमये ॥२॥
कायामायावीण होऊन उदास । समस्थानीं वास निर्विकल्प ॥३॥
भोळा तरि भोळा गुरुभक्तांलागी । होईन सरागी कुटिळांत ॥४॥
मी ब्रह्मकपाळीं प्रचितीची भीक । सेवोनिया सौख्य दाऊं सर्व ॥५॥
चढलीसे थोर लीळानिशा धुंद । लागलासे छंद आत्मारामी ॥६॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम सुंदर । गंगातटीचें सुरम्य क्षेत्र । स्वात्मसुखदाता भक्तपरिवार । सहित सर्वदा नांदतु ॥१९९॥
इतिश्री श्रीरामकृपा । तारकपरमार्थ सोपा । साधकलक्षण । साधुवाक्य । शिवाजीबावाचरित्र । समाधीपरियंत । सिष्य तरले । जगन्नाथस्वामीचरित्ररहस्य । रामचंद्रगुरु स्वामीसेवा करुन महंत जाले । विस्तार । सज्जनगडास आले । प्रकरण । येकशेहे येक्कोणीस ॥११९॥
जय जय राम ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP