मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|दासविश्रामधाम| ॥समास॥ १२१ दासविश्रामधाम श्रीसद्गुरुस्तवन ॥गत॥ ९७ ॥अश्वास॥ ९८ ॥समास॥ ९९ ॥मान॥ १०० ॥प्रकरण॥ १०१ ॥प्रसंग॥ १०२ ॥सर्ग॥ १०३ ॥अध्याय॥ १०४ ॥खंड॥ १०५ ॥पटळ॥ १०६ ॥विसावा॥ १०७ ॥स्तबक॥ १०८ ॥कांड॥ १०९ ॥वर्ग॥ ११० ॥सोपान॥ १११ ॥अवधान॥ ११२ ॥वर्ग॥ ११३ ॥पटळ॥ ११४ ॥खंड॥ ११५ ॥अध्याय॥ ११६ ॥सर्ग॥ ११७ ॥प्रसंग॥ ११८ ॥प्रकरण॥ ११९ ॥मान॥ १२० ॥समास॥ १२१ ॥लळीत॥ आत्मकृत ॥समास॥ १२१ एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले. Tags : dasvishramdhammarathioviओवीदासविश्रामधाममराठी ॥समास॥ १२१ Translation - भाषांतर ॥श्रीरामसमर्थ॥॥अभंग॥ आमुचा देव येक गुरुराव । द्वैताचा तो ठाव नाहीं जेथें ॥१॥गुरुनें व्यापिलें स्छिर आणि चर । पाहा निर्विकार कोंदलासे ॥२॥रामीरामदास उभा तये ठाईं । माझे रामाबाई निराकार ॥३॥॥वोवी॥ श्रीसद्गुरुदेवा नमोनम: । जो नुरवी प्रबोधें संकल्पधर्मा । कोणाचेनि हि न करवे सीमा । मां आर्व्ह कोण महिमा वानावया ॥१॥वानिता नवाई न लगे अंत । परि भावप्रियकरु सद्गुरुनाथ । स्मरणात् दर्शनात् मुक्तिमात । साधावें स्वहित सेवाबळें ॥२॥॥पद॥ गुरुध्यान करावें । तेणेंचि तरावें ॥धृ०॥ नित्य निर्विकार ज्याचेनि बोधें । व्हावें स्वतसित्ध ॥१॥आकार विकार मां त्यासि कोठें । वस्तु घनदाट ॥२॥दृश्यभासातीत आत्मा अविनाश । होती ज्याचे दास ॥३॥॥वोवी॥ वंदिता जडतां जयाचे पाई । भेद भ्रमभ्रांती नेणती कांहीं । वस्तु च होठाती सत्सिष्य निस्पृही । ठाइंचे ठाई ते निर्विकार ॥३॥ऐसा दाता जो सद्गुरु भवहर । देवाधिदेव जो निज निराधार । जेथें द्वैताच न वाजे समीर । करुणाकर श्रीगुरुदेव ॥४॥हा साकार देवा चु्कोन भ्रमिष्ट । वदत देव देव पावती कष्ट । जयाचे द्वारीं सकळ देव मुगुट । लवती त्या प्रभूला नेणती ॥५॥ज्या ठाई जयाचा जडला भाव । कि मतवादियांनीं दाविला ठाव । तर्फ करित त्याच वानिती गौरव । स्वरुपसीमा ते नेणती ॥६॥कोंदोन सर्वी तें केवि स्वरुपसित्धी । न झेपवे कां ह्मणाल बुत्धी । तरि सबाह्य वेष्टली मृषा उपाधी । नेणवे आपणा तें केवि कळे ॥७॥निर्विकार ऐसा जो आत्माराम । जेथे न संचरे अणु हि भ्रम । ऐक्य ऐक्यत्वीं दास भक्तोत्तम । उभा संभ्रम तय ठाई ॥८॥॥श्लोक सं. ॥गुरो: कृपाप्रसादेन ब्रह्माविष्णुमहेश्वरा: । समर्था: सृष्टिकर्तार: । प्रभवो गुरुसेवया ॥१॥॥अभंग॥ धन्य जगीं जो करी गुरुसेवा । जेणें चढे हातासि निजठेवा ॥१॥गुरुकृपाप्रसादें सृष्टि कर्ते । जाले विधि हरिहर ते समर्थ ॥२॥नित्यमुक्त प्रभु ते भजकासी । रंजवीती दाऊन स्वपदासी ॥३॥गुरुसेवा प्रभाव कळे ज्याला । तो चि होय परब्रह्म पुतळा ॥४॥पुढतो पुढती तारिती तरविती । आत्मारामीं रमती रमविता ॥५॥॥श्लोक॥ आत्म०॥ विन्हासद्गुरु सत्पथु सांपडेना । दिखावो बडी तौरसेभेकबाना । पतीलेनि दीयन्नीसोम्मुंचितेमी । यमापापिगेकोल्लुवाकट्टीगुम्मी ॥१॥सखा सद्गुरुभाळला तो चि धन्य । उनोकि क्रिपा जोरि सोबख्ता वान । येमीबट्टउवट्टिकष्टालुइंता । वेडया निंदले आधि तु सौख्यस्वार्थ ॥२॥जयाचे कृपें सिष्य ते होति देव । करो बंदगी पावेगा सोहि भाव । इदीचप्पुटाघट्टि गाउं च कोंडी । बलुदोड्डनिन्ननीकंडकोंढी ॥३॥॥वोवी॥ करुनि सद्भावें श्रीगुरुस्तव । परमार्थसौख्याचें लाहिजे वैभव । थोर जनिंया सुलभ उपाव । भाट गुरुचा होईजे ॥९॥॥अभंग॥ मां पाहि दीनबंधु । दयाळा करुणासिंधु ॥१॥न कळे ते निज सोय । न सुचे कांहीं च उपाव ॥२॥कामोनेमगरोघा । करकेडारासवैगंदा ॥३॥ताळदुयंताकनी । चालुचालायाईपनी ॥४॥इन्नादरदयमाडो । मन्निसी स्वात्मा नीळुकूडो ॥५॥॥वोवी। ऐसियापरी करीत स्तवन । लाहोन श्रीगुरुपूर्ण वरदान । रामचंद्रबावा गुणनिधान । हीनदीनासी तारिले ॥१०॥मागिलाध्याईं सेवट कथा । तोषवोन बागसवारचित्ता । कोण्या विषई नुन्य न पाडिता । उत्छाव केले यथास्छित ॥११॥करुन श्रोते हो सिंहावलोकन । पुढें सद्भावें करा श्रवण । कंठीहरीपासी लीळा पावन । दाविलें गुरुनें सांगूं तें ॥१२॥भोंवती किर झाडी लागली आसे । दुष्ट जीवजंतु वागती बहु वसें । पैलाड तरुवरी ब्रह्मराक्षस । वसोन पीडितो मार्गस्छा ॥१३॥ते काननीं बेताळ करीतसे फेरी । कोणी न टिकती देउळांत रात्रीं । दृढोन द्विज येकु मनाभीतरीं । वर्जितां हटानें बैसला ॥१४॥सारुन तपनेमु निजता रात्रीं । रक्त सिंपडोन तयावरी । पीडितां कुदैवी पळाला दुरी । मुरडोन माघारीं न पाहतां ॥१५॥आणीक येकदां येक ब्राह्मणानीं । अनुष्ठान मांडता दृढ बहुत करुनि । वर्तमान मिथ्या त्या कथिला गृहानीं । बाप तुझा रे निमाला ॥१६॥देउळासन्निधीं न जाय सुतकी । हें ऐकोन गेला तो होऊन दु:खी । आणीक येक तो पुरश्चरच विखीं । जाणता पातला तप करुं ॥१७॥द्वययामशार्वरी लोटतां निजला । न कळतां द्वयकोसावरी त्याला । ठेवितां प्रभातीं उठोन दचकला । पुनरपी न आला ते ठाई ॥१८॥भ्यासूर यापरी स्छान ते ठाई । राहिले बावा रामचंद्र निस्पृही । पीडा बहुपरी होता हि हृदई । डगमगु नाहीं जयाचे ॥१९॥॥अभंग॥ पुसती श्रोत्यांनीं दृढ कां चळत । वक्ता वदे त्यात ऐका भावें ॥१॥देह चि मी वाटे जया पामराला । देहबुत्धी तयाला भ्रम बाधी ॥२॥कामनेनें होय चित्त तें व्याकुळ । संकल्पानें स्छळ सोडी धैर्य ॥३॥पराव्याकारणें तपतां किंकर । न टिके चि धीर भय वाहे ॥४॥कष्टो बहुपरी सद्गतीकारण । देव दयाघन रक्षी त्यात ॥५॥निष्कामभजनें उपाधी दे सित्धी । धन्य स्वात्मबुत्धी विरक्त तो ॥६॥॥वोवी॥ धन्य रामचंद्रबावा सज्ञानी । खेळ जयाचा सायुज्यसदनीं । आत्मसित्धीवरी साधकावणी । तप कठीण मांडिले हरीपासीं ॥२०॥अकटोविकट धरुन वेष । व्यापुनियां भूमिआकाश । भ्यासूररुपी ब्रह्मराक्षस । सन्मुखी उभा ठाकत ॥२१॥येकदां श्रीरामसमर्थ गर्जन । करितां अदृश्य जाला भीउन । दुसर्यानें जपमाळ दाविता आणुन । जेथिचा तेथ विघरला ॥२२॥अवेळीं सिंपडता आणोन तीर्थ । सान होऊन गेला पळत । उत्धारसमयो पातला तयात । दीक्षिताकृतीनें पातला ॥२३॥बाहेरील वोटयावरी निस्पृही । असतां दीपदर्शनसमई । प्रदक्षणा करुन लवला हि । मुक्त होऊन गेला तो ॥२४॥हें देखोन उद्विग्नें करितां शयन । प्रगटोन स्वप्नीं पवननंदन । सांगोन तयाचें वर्तमान । तरला तो निर्भय हो ह्मणतिला ॥२५॥तधीपासून ते स्छळीं निर्भय । मुलें लेकरें जन लोक समूह । राहो लागले बुरुजगाव । करविले कुणबावा चालिला ॥२६॥॥पद॥ दर्शन याचें नांव । ब्रह्मविद्येचा प्रभाव ॥१॥ज्याचे पाहण्याचा योगें । द्वाड तरती अनेग ॥२॥न कळे तरी काय । मुख्य भेटी सुखदाय ॥३॥ईक्षणमात्र ज्याचें । फळ वोपी आत्मत्वाचें ॥४॥॥वोवी॥ जप करिती येकदां देवापुढें । तो धरुन मोटें तें भ्यासूर रुपडें । पंचफणी प्रगटला पसरोन तोंड । गिळील काय कीं यापरी ॥२७॥टाकोन तनुममता जाले निर्भय । फुत्कार करकरो तो अदृश्य होये । आहो योग्यांनीं जो केला निश्चय । तें चिन्हें ज्या आंगीं उमटती ॥२८॥॥अभंग॥ अभयवर वोपु निर्भई तो साचा । भयभ्रम काळाचा ज्याला नाहीं ॥१॥संकल्पबाधानें भूत होती जगीं । संकल्प जो त्यागी भय काय ॥२॥जयासि नाठवे भूतांतरीं द्वेष । सर्पादिक विष बाधिना चि ॥३॥येकल्यानें मार्ग चालावा न भी च । नसतां पदार्थाच कृपणत्व ॥४॥वसीकरण करणें नलगे जनासी । जयाचे मानसीं दयाशांति ॥५॥काननीं राहाया संशयो न वाटे । चहुंकडे दाटे भासे वस्तु ॥६॥चेटकमोहनवाघादि शमती । अखंड ज्या चित्तीं रामध्यान ॥७॥मुख्य हरीउपासना असे ज्या बळकट । न पडे चि संकट त्याला कांहीं ॥८॥टाकुनि संदेह पावले विश्राम । जाले आत्माराम सोहंभावें ॥९॥॥वोवी॥ माहराज ऐसे गुरु रामचंद्र । पडो दृष्टीला नाना विकार । संपदासहित येवो कां इंद्र । हरुष विषाद नसे चि ॥२९॥येकदां जाला घटसर्पदंश । निजले निचेष्टित तीन दिवस । कृपा करुनि श्री वान्नरेश । उठोन सेवेस लाविला ॥३०॥सेउनिया निंबरसाते । तप संपादिती संतोषयुक्त । छंद बहु धरितां मज दीनाते । येकदां पाजिले स्वल्प रस ॥३१॥तेणें मज पामरा वाटलें धैर्य । वाटे मृत्याचें कायसें भये । ज्ञानवैराग्य नसतां हि कार्य । जालेंसे वाटलें जन्म सफळ ॥३२॥हें असो नवल हें स्वामीरायाचें । दाऊं देवांनीं निजरुप साचें । गच्च सेंदुराचें त्यजिलें कवच । सान चौक पाषाण देखिले ॥३३॥ते च निजमूर्ती अनादिहुन । महिमा फळप्राप्ती होय दर्शनें । आलंपल्लीचा अनंतशयन । नामग्रावपूजा होय जेवी ॥३४॥काय पुढारी करावें न कळे । नेमादि सारुन चिंतीत निजले । प्रगटोन स्वप्नीं हरीवीर बोले । दर्शनार्थ हें केले चिंता त्यजी ॥३५॥मूर्ति गच्चाची निर्मि स्वहातें । पाषाणप्रतिमा निक्षेपि आंत । वाटऊनिया कवचगच्चात । मूर्तितळी वोटा निर्मि पां ॥३६॥जागत चि होते उठिले सत्वर । साहित्य करुनि यथाप्रकारें । मूर्ति निर्मोन प्रेमें सुंदर । संतर्पण केलें ससांग ॥३७॥सदृधें ते स्छळीं सदुरुनाथ । राहोन तोषविलें हणुमंताते । येकदां चोराला दंडिलें तेथें । मार डांगाचा करुनी ॥३८॥जेणें कृपा ये पवनात्मजाते । करिताती पूजन तेवि येकचित्त । यकेकदां वाचिती दासबोधग्रंथ । संपूर्णनेमांतीं नित्यश: ॥३९॥येकदां प्रदक्षणा नमस्कार । बारासेहे नेमानें घालिती सादर । येकेकदां जप केले तारकमंत्र । नेमादि नित्येच्या सरल्यावरी ॥४०॥लक्षावधी केले येकेकदां जप । भीमरुपी स्तोत्र चि पठती साक्षप । बागस्वारांनीं व्याघ्राचे रुपें । येऊन बहुवेळीं भेटला ॥४१॥येकदां प्रदक्षणासमई स्वामीच । मन मागें पढाया हनुमत्कवच । देवांनीं आसनाजवळी सवें च । ठेविला पाहिलें येउनि ॥४२॥काय कीं कोणाच म्हणोन सन्निधी । घेऊन निजतां जो लंघिता उदधी । स्वप्नांत सांगे कीं तुज सत्बुत्धी । वोपील स्वथा म्यां करी पठण ॥४३॥अनुष्ठान नेमांतीं पूजोन पुस्तक । भीमनामसिष्याला वोपिलें देशिक । आणीक येकदां वर्तलें कौतुक । मिळाले निंदक आलोचिती ॥४४॥बैसतां बावांनीं कराया जप । खेळतो ह्मणे रे त्यांवरी सर्प । पाहुं चला हो वदत साक्षेप । माहगावाहुनि पातले ॥४५॥बैसलेत देउळीं सहजीं देशिक । दृष्टीस पडेल कां द्वंदशुक । परतोन झडकरी चालिले लोक । नमन करुनि कुंभावें ॥४६॥पातले लक्षुमीसन्निधानीं । तो अडवा पातला विषाळ फणी । जाऊं नेदी च सरराटे मारुनी । फिरों लागला भोंवता ॥४७॥घाबिरोन आले बावाजीपासी । हासिले कथितां वृतांतासी । जा भयें न धरा ह्मणतां मानसीं । स्वस्छळा मुरडोनी ॥४८॥॥अभंग॥ अतिताचा अंत पाहती ते मूर्ख । भ्रमती हो लोक भ्रमभरें ॥१॥माग थोर थोर कुचेष्ठा करुनी । पावले झकोनी गती दु:ख ॥२॥नेणवे जयाची लीळा अघटीत । मानिती प्राकृत त्यासि नर । स्वात्मानंदीं ज्याचें पडलेसें ठाण । ज्यासी योगीजन वंदिताती ॥४॥॥वोवी॥ मूळस्तंभीचा विदित विचारु । तो पातला सगर्वे सोनारगुरु । करोन तयाला यथोपचारु । बैसवितां प्रश्न केला ॥४९॥बीज आधीं कीं तरु कीं सांगा । विपटवाक्य कळलें हें भवभंगा । बीज तंव बाप रे तूं झाड आगा । अगोधर कोण कीं विचारी ॥५०॥इतुकेन लोटला पायावरी । तंव निजवाक्य बोलिले भवारी । सर्व बीजरुपिणी निर्विकारी । मूळमाया उद्भवली ॥५१॥गुणभूततरुचा मग विस्तार । तूं बीज झाड हें तुझें शरीर । मग मूलखूण दावितां साक्षात्कार । पावोन गेला वानीत ॥५२॥फकीर येक काबल आला तेथें । व्हावी च ह्मणतसे करामत । झाडीतां देहबुत्धी गेला स्तवित । सत्य सत्य ह्मणत ज्ञानें ची ॥५३॥येकदां पातला पंडीत जंगम । वाद बहु घ्यावा तयाचा संभ्रम । मेजवन्यादि पावोन उत्तम । प्रश्न बहु करितां परिहारिलें ॥५४॥सेवटीं तयानीं केला प्रश्न । आधीं हतोडा किंवा अदगण । ऐकोन बोलिले गुरुदयाघन । पाहीं पर्तोन कळेल ॥५५॥येकदांच उत्पती तीन्ही गुण । कार्यभागीं दिसले आधीं मागुन । पदार्थ आसके जे कार्याकारण । येकदांच उत्पती तीन्ही गुण । कार्यभागीं दिसले आधीं मागुन । पदार्थ आसके येक चि आला घेऊन । येकदां च होते त्यांत लीन त्रिगुण । जन्मांतीं दिसले माग पुढें ॥५७॥तंडास हतोडा आणी कूट । निर्माण येकदां मग दिसेल पष्ट । पेच हा मानि तनु भ्रमिष्ट । मूळ जाणता तो नि:संशई ॥५८॥मग द्वैतभानाची निरसतां संधी । वंदोन गेला तो स्तवित सद्बुत्धी । येकदा झटाया येतां कुबुत्धी । स्छान चि न गवसे सिणत गेला ॥५९॥आहो श्रोतेहो वाटत ऐस । जंव मारुतीराया विनविलें दास । प्रतिपाळीन ह्मणतिला सांप्रदायास । तें वाक्य साक्षी येत परंपरा ॥६०॥॥अभंग॥ धन्य मारुती कैवारी । भक्ता न विसंबे क्षणभरी ॥१॥कोणी कृत्रिम कपट । करितां वारितु संकट ॥ध्रु०॥ज्याला रामभजन । मानी प्राणाहुनि प्राण ॥२॥समर्थंस्वामीभाकें । भक्त भोगिताती सौख्य ॥३॥साह्य आत्मारामसखा । होतां नाही भवधोका ॥४॥॥वोवी॥ पुण्यवंताचें पुण्यमहिमान । सहज जयाचें घडतां दर्शन । भूतबाधा ते होती निरशन । आली प्रचिती बहुतासी ॥६१॥न सोसवता बाधे च कष्ट । सुवासिनबाई धरुनि हट । सन्निधीं वागतां निरसलें अरिष्ट । आणि बहुताचे निरसले महारोग ॥६२॥धन्य स्वामीचे साळेभोळेपण । आवडती ज्याला सर्व थोरसान । येकदां पाहिल्यावरी खूण । न विसरतां प्रीत करिती ॥६३॥आणीक येकदां जालें। विचित्र । बाबुरावनामा परवरदिगार । पशुहरण करोनि पोसितो उदर । थोरथोराही ज्याचें भये ॥६४॥बावाची आणी रयताची गुरें । कंटेगावीं असती समग्र । तो फौज घेऊनि वारंवार । येतो साधुनि दावा करु ॥६५॥त्या पळविती तोंडावरी देउनि । येकदां समयास नसती कोणी । तो येतां सन्मुखी ठाकले स्वामिंनीं । अवसान न धरितां पळाला ॥६६॥भावोन हरि साह्य असे संताला । पुनरपि तिकडे कधीं न आला । हें असो देवांनिं सेंदुर आणिला । संतर्पणसोहळा होती बहु ॥६७॥येकदां वायां चि शरीरसमंधी । कारभार मठीचा इत्छोन कुबुत्धी । गुरुघट भंगाया पाहोन संधी । माहगावा पातले आठ जण ॥६८॥रात लोटल्यावरी सवाप्रहर । घेऊन बरछ्या डाग तरवार । आहेति येकलें हा समाचार । घेऊन निघाले परि दचकले ॥६९॥घात न कीजे मध्यरात्रींत । पत्तेनें पुकारा होईल बहुत । उष:काळीं हें संपादूं कृत्य । म्हणोन निजले पीकांत ॥७०॥मारुतीरायानें केलें विचित्र । न उठती च उगवला भास्कर । तों आटोळयावरी उभेला नर । फिरवीत गोफणी अरडत ॥७१॥जागले परी नुठवे दडती । पाखरुस हाणितां गुंडे लागती । सेतकरी उतरतां होऊन क्षुधार्थी । चहुंकडे पळाले लपत भीत ॥७२॥धक्का देवांनीं बसवितां त्याला । टाकून दीधलें खोडपणाला । रक्षण बहु केला हरीनें गुरुला । पुढें अवधारा चरित्र ॥७३॥॥पद॥ देव साहकारी ज्याला । काय करिती वैरी त्याला ॥धृ.॥ घात आघात वारी । करी संरक्षीत फेरीदारी ॥१॥पुरवी मनोरथ स्वस्छ । नुरवी किमपी हेत आर्त ॥२॥भजतां सप्रेमें कामें ॥ दे स्वात्मधाम नेमें ॥३॥॥वोवी॥ येकदां बोलिला थोर वेदांती । तें ब्रह्म मायाज्योती । उत्तर दिधलें किं भलाबा सुमती । यामाजिं आहा कोण तुह्मी ॥७४॥तो वदे आत्मा परिपूर्ण आसका । आहो या हेतु पावाल धका । वादोन सेवटीं शरण देशिका । येतां निजखूण दाविलें ॥७५॥धूर्त येक आला केला प्रश्न । वस्तुरुप तें दावा निवडोन । उत्तर दिधलें कीं काया निर्माण । न होतां पूर्वि तूं जैसा ॥७६॥फकीर येक तो धरितां हव्यास । दाविलें तयाला मुद्रारहस्य । तात्काळ पावला तो संतोष । धरोन वर्मात तो गेला ॥७७॥येकदां उत्छावीं मी पामरानी । अरडोन वाढत्या मागतां चटणी । तितके चि वर्मानें येकांतस्छानीं । प्रबोधून केले स्वस्छचित्त ॥७८॥विदित होय जेणें वासना संकल्प । कायामायेचा निरसे आरोप । संसारी वर्तता होय सुखरुप । ऐसे गुरुभूप दयाळु ॥७९॥लाड चालविले कृपा करुन । न वदावें किमपी तें स्वात्मकथन । परि उल्हास न धरवें क्षमा करणें । प्रश्नांतिं कथिलें ऐका गुज ॥८०॥॥अभंग॥ ऐका ज्ञानियानो हे वर्म चांगलें । जेणें हा सफळ होय जन्म ॥१॥तुर्या पर्तऊन जाणण जाणता । लाभे नि:संगता दृष्टयासी ॥२॥दृष्टा तो दृष्टत्वीं ज्ञेप्तीसहा मुरे । अखंडित उरे अनिर्वाच्य ॥३॥वाच्यांश लक्षांश बोल भाव आर्त । यासि तो अलिप्त घनानंद ॥४॥धरितां मानसीं सद्गुरुचा प्रेम । लाहो निजवर्म स्वात्मसित्धी ॥५॥॥सद्गुरुकृपेनें सोहं फळतां आर्थ । होय अखंडित स्वय वस्तु ॥१॥ध्यानयोगबळें स्वरुप चि दाटे । स्फुरतां तेथ उठे मनमाया ॥२॥आलें गेलें वाटे सेवटीं निरसे । उरें अविनाश ससंवेद्य ॥३॥जळो देहबु धो आछादि स्वरुपा । अस्तां मार्ग सोपा दावी शून्य ॥४॥धन्य तो ज्या लाभे कमाईचें फळ । निश्चळीं निश्चळ आत्माराम ॥५॥॥सद्गुरुचा वरें पर्तोन पाहतां । देहीं च असतां वस्तु होय ॥१॥आपणाहुन दूर शरीर हें भासे । सागरी खसखस जयापरी ॥२॥वाटे तैं बैसलों ब्रह्मांडावरुत । स्वभावें चालत दिसे सर्वी ॥३॥सहजयोग आणी राजयोगसित्धि । ज्याला तो त्रिशुत्धि होय धन्य ॥३॥देउनियां विश्रामा विश्राम । दाता आत्माराम सनातन ॥५॥ ॥वोवी॥ येकदां पुसतां बाळभावें । कैसा भेटेल देवाधिदेव ॥ हासोनि बोलिले तूं चि स्वयमेव । पदार्थावेगळा हो पाहे ॥८१॥येकदां चंचळनदी गुप्त गंगा । पुसतां याचा जी अर्थ सांगा । जाणीव तुर्या मूळ ते उमगा । अर्थपरमार्थ अवघा ते ॥८२॥येकदां पुसता पुरविले लळा । पीत दीप तो कृष्ण काजळ । भूपुत्र बरु द्विधा तासिल । कारभार सकळ लिहिण्यागुणें ॥८३॥ऐशापरीनें बहुतेकाला । बोधोन दाविलें सन्मार्गाला । निंदोन बहुतांनीं अपाय योजिला । तरि ही क्षमोन नवाजिती ॥८४॥ह्मणती दुर्गुणा घडतसे निंद्य । घट किमपि हा न होय वंद्य । याचेनि प्रतापें वृत्ति ते सद्य । निर्मळ होतसे न सीणतां ॥८५॥जरी सत्य बोलिलें तरि त्यजिजे दुर्गुण । मिथ्या भाषणीं कां मानिजे सीण । एवं सर्वदा ल्यावें भूषण । शांति दयाक्षमेचें ॥८६॥स्नेहाळु ऐसा न पडे दृष्टी । मूर्ख मज ऐसा न दिसे भूतटीं । वासना सेवेची नसे चि पोटीं । वर लाहिजे हे आवडी नसे ॥८७॥खोडी करावी हा लागला छंद । काय किं वाटे ज्ञान बुद्धिवाद । द्वाडा रे ह्मणेतिलें येकदां क्रोधें । तरि ही उभेलों हट करित ॥८८॥मग बळेंचि करुणेनें घेऊन पुढें । कुर्वाळुनिया निरखिलें तोंड । दोनीच ही भोगिलों फळ रोकड । तरि ही धडबुत्धी न आली ॥८९॥॥अभंग॥ अहहा रामचंद्रा काय वदूं आतां । जन्मा आलों वृथा श्रम देऊं ॥१॥आळसी पामर थोंटा धड्डा मूर्ख । सदा विषईक आशाबत्धी ॥२॥द्वेष मनीं वसे सदां सीघ्रकोपी । निंदाखोर पापी मृषावादी ॥३॥अक्रियाच्या योगें संकटीं पडोन । रुसणें फुगणें करितसो ॥४॥काम अवघड योजुनि बैसावें । लोकासि सांगावे स्वामि नांव ॥५॥न करी ते ह्मणता हटानें ते कीजे । बडाई बोलिजे वडिलाची ॥६॥सगुण असता सेवा न घडली । भ्रांती च वाढली पुढें पुढें ॥७॥कुलक्षणें जितुकीं निवडिलीं संतें । वसती समस्त मम देही ॥८॥ऐसियाला हातीं धरुन रक्षिती । धन्य कृपामूर्ती आत्मप्रभु ॥९॥॥वोवी॥ ज्याला आवडले ऐसे पतित । कां ह्मणो नये सांग त्या समर्थ । सांगतां कैस ही त्याच चरित । ऐका हो योग्य न पाहतां ॥९०॥येकदां पूर्वी अनुष्ठान कठीण । करितां वर्जोन अशन शयन । तुष्टोन आज्ञापी पवननंदन । पुरे करी बा श्रमूं नको ॥९१॥तरि ही संतर्पणा नसे साहित्य । ह्मणोन चालविती नेमनिष्ठेत । अनकुळा लागेल दिवसगत । ह्मणोन हरिसखा भाळला ॥९२॥होऊन भैरागी पातला देव । दिसती फासोळ्या डोळ्यांत जीव । पुसतां गुरुनीं अपेक्षा भाव । तो सुचवी करानें भुकेलों ॥९३॥तंव आईता धुणीत अग्नी असे । हिरवाकंचन हुरडा कणसें । पक्का आठसेर सुमार सरस । आणोन भाजाया बैसले ॥९४॥॥अभंग॥ धन्य तो निमर्व स्थितिसंपन्नता । नाहीं ज्याला चिंताभ्रांतिभ्रम ॥१॥पुण्याची आवडी अतिताची प्रीती । सदां परमार्थी सादरता ॥२॥हेतु उपकारी ह्मणवी साधक । योग्याचा टिळक सित्धराणा ॥३॥सांप्रदाई निष्ठा संतजनीं प्रेम । भोळ्यासि सुगम दावी मार्ग ॥४॥सर्वानंद स्वयें आत्मारामधणी । जयाची करणी अत्यद्भुत ॥५॥॥वोवी॥ थोरपणाते ठाकून दुरी । हुरडा उधळोन करीं । भक्षितां तितुका हि भाविले अंतरीं । हा होय मारुती पाय धरिजे ॥९५॥हें वळखोन वेषी तो मागें उदक । आणाया ठाकिता उभें देशिक । अंतर्धान पावला कपिनायक । येरु उद्विग्न बहु जाले ॥९६॥कधीं तो स्वप्नांतरीं वायुनंदन । जालें कीं दर्शन संतर्पण । येरु विनविलें हें काय कारण । कापटय आणि स्वप्नीच ॥९७॥मग बटुब्रह्मचारीवेषें कृपेनें । लेउनिया सुंदर भूषण । प्रत्यक्ष बोलिला गुरुसेवाकारण । जाऊन मठांत रहा स्वस्छ ॥९८॥येरु विनविलें जोडुनि हात । न कर्मे जी तुह्माविण मात । हासोन बोलिला ग्रहा आतोत । कोठडींत राहीन जा आतां ॥९९॥लाहोन यापरी दिव्य वरदान । करुन ससांग संतर्पण । अपचंदसंस्छानीं राहिले येऊन । पूर्ण उदार गुरुवर्य ॥१००॥बाबुराव नामा भोळा गृहस्छ । भोवतीं असती संतमहंत । कोण गुरुअ करुं हा कळो इत्यर्थ । मारुतीसेवा मांडिला ॥१०१॥सांगतां हरीनें होऊन प्रसन्न । तो येऊन गुरुपासीं जाला पावन । धन्य गुरुराय स्छितीसंपन्न । परि भोळेपणानें वर्तती ॥२॥ते स्छिती वर्णाया योग्य मी नव्हे । तरि समर्थमुखींची आरती आहे । लिहितों तेथील पाहा अन्वय । साधुसंताला मान जे ॥३॥॥आरती॥ राव चि नाहीं तेथें कैचें राउळ । देव चि नाहीं तेथें कैचें देउळ । ठाव चि नाहीं तेथें कैचें हो मूळ । इतुके हि बोलणे मिथ्या समूळ ॥१॥जय जय जय आरत जय पुरतें जालें । पुरतें अपुरतया श्रीरामें नेलें ॥ध्रु०॥ राम चि नाही तेथें कैचा हो दास । दास चि नाहीं तेथें कैचा उदास । उदास आहे परि नाही आभास । आभास केल्या होय पूर्णत्वा नास ॥२॥माया कर्पुर आत्मादीपें प्रगटला । तेणें तेज अवघा भंबाळ जाला । तेथें रामदास दीप चि जाला । लहनाळुनिं आपेंआप निवाला ॥३॥॥वोवी॥ यावरी केवळ पुण्यपरायण । अचूक जयाचें पूर्ण वरदान । शूळ द्विजाचें हरलें ईक्षणें । न बाधी विघ्न यात्राकरा ॥१०४॥उमरगेंत उतरले मारुतीजवळी । अर्धिरात्र तैं सरोन गेली । सर्पदंश होता पैलाडस्छळीं । निस्तेज हो पडला शूद्र येक ॥५॥घूळेंकरसमंधी करिता रुदन । कथिलों गुरुदेवा वर्तमान । उतार जाल रे वदता कृपेनें । तो बैसला उठोन जाले सुखी ॥६॥कीर्तन केलें ही मुगळीगांवीं । श्रोते मिळाले विरक्त निस्पृही । आलमखानबावाचे सांप्रदाई । ज्या बावासि नागोबा उपदेशिलें ॥७॥खानजी कष्टता तो शुद्ध हृदई । नसरुदिन नागोबा भाळे गोसावी । लयलक्षयोगी जाला अनुभवी । मंडळी त्याची तैसी च ॥८॥॥पद आलमखानबावाचें ॥ योगी दग्धपटुपरी वर्तती संसारीं । असोनि निर्विकारी विरक्त रे ॥१॥साधुसंताची अगाध लीळा आकळे रे ॥धृ०॥ उदकामाजीं वसे कमळणीपत्र जैसें । जीवनीं अलित्प असे वेगळे रे ॥२॥मंडळी असे भानुअ घटीं बिंबला दिसे पूर्ण । तंव तो न लिंपे जाणा । येकला रे ॥३॥तैसा देहीं आत्मा आहे सर्वाघटीं व्यापक पाहे । व्यापोनि निराळा राहे । नातळे रे ॥४॥ऐसा बोले आलमखान । नागेशप्राप्तीची खूण । सस्वरुपीं समाधान सावध रे ॥५॥॥देणें गुरुरायाचें पावन पतिताचें ॥ध्रु०॥ अचाट अढळ बीज ब्रह्मांडीचें । निजगुज हें साचें ॥१॥निर्वाण वेदसित्धांतिचें । आत्मसुख सर्वाचें ॥२॥दर्शन घडलें गुप्तद्वाराचें । सुखदु:ख मग कैचें ॥३॥उदीत भाग्य आलमखानाचें । बोध नागेशाचा ॥४॥॥वोवी॥ आमलखनाबावाची हें सुंदर वचन । साधुसंताला बहुतरा मान्य । जयाचे आंगीं गुरुकृपालेण । गोंधळ्यादि भोवत तयाचे ॥१०९॥तोषविले त्या कर्थाप्रभावीं । डोलविलें हो साक्षित्वप्रमईं । प्रस्तावीक प्रसंगीं सर्व हि । दिसो लागली उदासी ॥११०॥करुनिया काय वणवण । हे रंगनाथपदा केलें व्याख्यान । सेवटीं कथिलें अशाश्वत लक्षण । या पदार्थावत जाणा तें ॥११॥॥लावणी॥ ऐस सजणा मनमोहना संपति पाहतां कवणाची । जाइल काया जाइल वांया उसणि आणिली पांचाची ॥१॥रावण ज्ञानी अभिमानी लंका ज्याची सोन्याची । तेहतिस कोटी बंदीं सुदले घडि घडि ख्याला हो जाची ॥२॥सूर्यवंशीं राम जन्मले केवळ माये भक्ताची । हनुमंतानें दहन केलें नगरि जाळिली पाप्याची ॥३॥दाहा अवतार ऋषिजावर वार्ता मार्कंडेयाची । चौदा कल्प उष्ण सोसिलें छ्याया नाहीं गुंफेची ॥४॥कौरव गेले पांडव गेले काय कथा आणिकाची । छपन्नकोटी यादव गेले कुडी नाहीं कृष्णाची ॥५॥सावध व्हावें भजन करावें भक्ति करावी देवाची । असो तरी गोष्टी ऐका रामीरामदासाची ॥६॥॥वोवी॥ आरत्यानंतरें पावोन मान । फिरत फिरत कलबर्गी राहिले येउन । प्रार्थितां बहुतांनीं मांडिलें कीर्तन । सर्व ही सादरें असती ॥१२॥सर्व हि रसाते करुनि गौण । रामनाम गोड हें करितां व्याख्यान । तंव विप्र येकानी केला प्रश्न । मदांध लोकाला तोषवूं ॥१३॥रुचिकर बहु जरी रामनामामृत । कां मिष्टान्नवत न वटे सकळिकात । तैं भागवतादिकी कथोन दृष्टांत । होय होय म्हणविलें सर्वामुखीं ॥१४॥तधीचा प्रश्नाला आतां अभंग । समर्थस्वामीचा सांगुनि सांग । समजाऊ ग्राहीक व्हा लागवेग । वर्तोन त्यापरी अभर होणें ॥१५॥॥अभंग॥ बैसेना तें कां हो श्रीरामीं हें मन । ऐका त्याचा गुण सांगतों मी ॥१॥कुकर्मी जन्मींचा पापाचा पर्वत । त्याचें कैसें चित्त वोळे नामीं ॥२॥रोगिया पक्वान्न आवडेना जैसें । पापीयास तसे रामनाम ॥३॥रामनामनिष्ठा बैसेना हळुवटा । करंटयासि ताठा अविद्येचा ॥४॥रामदास म्हणे सुकृतावांचोन । रामनामीं मन स्छिरावेना ॥५॥॥वोवी॥ द्रव्यलालचीची कथा ते नव्हे । किं भोंदून कथेनें पोट भरावें । वदताती अनुभवा वरप्रभावें । निरपेक्ष स्छिती ते तारक ॥१६॥मुडबळीं असतां गुरुराज भोळा । मध्वसांप्रदाई वडिया भला । सिणत समुदावासहित चालिला । आतिथ्य कोठें हि न जालें ॥१७॥बंटमुखें हे कळतां वृतांत । धावले स्वयें करुणावंत । प्रार्थोन आणिलें करविलें आतिथ्य । चौथे दिनीं गेले वानित ॥१८॥सर्व संमति ते वसे अंतरीं । परोपकाराचा हव्यास भारी । अपचंदाहून गेले दुरी । शंकराच्यार्य अवेळीं ॥१९॥रामदासी हे भागवत स्वथा । या विरक्तावरी कायसी सत्ता । ह्मणोन परभारें जात असतां । प्रार्थोनिया आणिलें ॥१२०॥समारंभादि जालें पूजन । राहिले तेथें सुखें त्रय दिन । ज्ञानध्यानाचें अद्वैत बोलणें । ऐकोन तोषला यति बहु ॥१२१॥छयाटी आणितां वोपुकारण । हासोन बोलिले विरक्त पूर्ण । हें वरदवस्त्र रंगावरी बाणणें । कवण ही वसनाच न होय जी ॥२२॥येरु बोलिले सत्य वाक्य बरवें । न पांघरा वसना मान्य द्यावें । पुस्तकासि बांधोन ठेवावें । सांगोन गेले वानित ॥२३॥बावासि पुसती भले लोक । आपण निस्पृही सांप्रदाईक । मत्तमत्तरस्छा प्रीति येक । कां करिता ह्मणतां ऐकविलें ॥२४॥पूज्यवंत होणें पूजा करणें । सुकृतावांचुन न घडे जाण । कमाईसुकृता द्यावा मान । भाव चि कारण शुत्ध क्रिया ॥१२५॥॥श्लोक॥ सं०॥भा०॥ सर्वभूतेषु य: पश्येद्भगवद्भावमात्मन: । भूतानि भगवत्यात्मन : । भूतानि भगवत्यात्मन् । भूतानि भगवत्यात्मन् एषभागवतोत्तम:॥१॥॥अभंग॥ बोले जगदात्मा भागवती धर्म । त्यांतील ध्याना आणा ॥१॥सर्वाभूतिं दया अमाईक स्छिती । लीनता ते चित्तीं असो द्यावी ॥२॥भूतिं भगवंत हरी सर्वांतरीं । आपणास उरी तेथें कैची ॥३॥आत्माराम स्वयें कोणास पिडिजे । शुत्धत्वीं वर्तिजे नि:संगानें ॥४॥॥वोवी॥ ऐस आहे पां भल्याचीं चिन्ह । स्वधर्म दया क्षमा कारण । त्याग चि करावा दुराभिमान । असो पुढारी श्रवण करा ॥२६॥आहो मी दरिद्री हीन दीन रंक । घटजन्मस्छानीं असतां मूर्ख । तेथें दयाळु सहज देशिक । आले ईक्षिलें कृपेनें ॥२७॥मारुती पूजावा हा उपजला हेतु । द्वादशाब्द लोटल्यावरी तेथें । गुरुदर्शना गेलों अकस्मात । आत्माराम नाम ठेविलें ॥२८॥कांही च नेणें मी गुरुसिष्यपण । चालवित लाडाते केलें पोषण । येक्या दिवशीं छंद घेऊन । कवन कां कराना ह्मणतिलों ॥२९॥हासोन बोलिले काय अगत्य । पुष्कळ आहे कीं समर्थकृत । यद्यपी लागला छंद बहु तूंतें । कवन करी कां आवडलें ॥१३०॥तें वचन ये समई जालें सत्य । ते काळीं कृपेनें पुरऊ आर्त । सर्वदा वदनीं जें होते स्मरत । शिवकल्याण ऐसें सप्रेमें ॥१३१॥नाम गुरुचें शिव अभिधान । गुरुचे गुरु स्वामी कल्याण । हें रामचंद्रजीचें भजनजीवन । लिहिविलें ऐका हो सादरें ॥३२॥॥पद॥ शिवकल्याण स्मरा वाचे पंच अक्षर । क्षराक्षरातीत उरलें ब्रह्मैवसार ॥धृ०॥शिव शिव वाचें स्मरतां जाला तदृप अविनाशी । शिवरुप जाल्या ठाव नाहीं पैं जीवासी । शिवरुप वर्णितां पार न कळे निगमासी । सित्धस्वरुपीं मिळोनि पावले जन्म उगमासी ॥१॥वर्णन करितां शिवरुपासी वेगळीक व्हावें । वर्ण न अवर्ण शिव रचिलें स्वभावें । वस्तु आपण भिन्न कैंचा नाहीसा भावें । वर्जुनि नामरुप अवघें शिव चि व्हावें ॥२॥करूणामृत मज देइं देवा करितां स्तव येक । करूणावचन ऐकुनि शिव तो तोषला देख । कलीकिल्मिष नासुनि दिधले अभये पैं येक । कमळावल्लभ ध्यावा हृदईं हा चि विवेक ॥३॥ल्यालों चिद्भूषणें वर्णन स्तवनचि केल्या। ल्यालों ऐसा भाव नाहीम शिवपद्मीं जडल्या । ल्याल्यावाचुनि बुधाविबुधा सर्वस्व मुकल्या ।ल्यालों गुरुभूषणें ऐसें हेत हे चुकल्या ॥४॥नम्र वोउनि ध्यान करितां तदृप तें होणें । नसे स्वरुपावाचुनि आन नास्तिक ते वचन । न वर्णवे च्यारी साहा जाले परिपूर्ण । न वदवे शिवपदी रामचंद्र निमग्न ॥५॥॥वोवी॥ क्षराक्षरातीत विचार । निजसार जें उरलें ब्रह्मैवसार । अविनाश आणि मंगळकर । तें नामार्थ आदरें श्रवण करा ॥३३॥॥अभंग॥ शिव तो मांगल्य कल्याण सत्प्राप्ती । शिवकल्याण मूर्ति गुरुराव ॥१॥क्षर सर्वभूत कूटस्छ अक्षर । तयाहुन परब्रह्मैवचि ॥२॥ब्रह्मविद ब्रह्म ध्यातां प्रेमयुक्त । नुरे हेतु मात निर्विकारीं ॥३॥ब्रह्मैवाहं अर्थ ब्रह्मैव सन्वाक्य । करावा विवेक आधि याचा ॥४॥ब्रह्मैवाइं जाणे जिरवोन जो ऊर्मी । असतां देहधामीं न संसारीं ॥५॥निजसार तेंचि स्वात्मानंदीं नांदे । ब्रह्मादिका वंद्य तो तारक ॥६॥॥वोवी॥ येकदां पूर्विचा देहसमंधी । सिष्य फार नसती कां म्हणे विनोदी । त्या बोलिले उतरउ हा भवाब्धी । तुह्मा सरियाला हा आत्मा पुरे ॥३४॥येकदा उत्छावीं त्रासूनिया । विळंब केलें कीर्तन कराया । प्रार्थितां बहुतांनीं बोलिले तया । या मुलाच्या हातीं करवीन ॥३५॥ते ह्मणतां उपासना न पडली पुढें । पाडील ह्मणतिले हें पोर मूढ । वदलेति जे ते न पडतां साकड । सत्य चि होत चालिला ॥३६॥विंचूर यल्लंबा मम कुळदेवी । तिकडे न जातां वर वदले निस्पृही । परामर्ष तुलाच करील आई । ते सत्य होतसे अद्यापी ॥३७॥काय वानूं ते अगाध लीळा । कळो न देती उदासपणाला । नमोन चालिले समाधिला । मीस करुनि भिक्षेचें ॥३८॥न कळवितां कवणा ही वर्म । त्यागुनिया अभिमान आश्रम । काननीं घत पाडूं चालिलें संभ्रमें । मी गुलाम ही होतों समागमीं ॥३९॥माघारा धाडिलें कामीं गोउन । जावोन लस्करा मिळविलें धन । संगीं होते त्या धाडिलें परतोन । उलटोन येता गंडीत ॥१४०॥नेणवे न वर्णवे जाला वृत्तांत । शोधाया चालिलों देश बहु भ्रमत । जे ते सांगती आमुचे क्षेत्रांत । प्रत्यक्ष आहेति मुलासह ॥४१॥सीणतां फिरफिरों सेवटीं स्वप्नीं । कथिलें सर्वत्रीं मी आहे भरोनी । प्रत्यक्ष तुझिया हृदई वसोनी । संरक्षीन जा आतां ॥४२॥अक्षेपाल येथें श्रोतेनो तुह्मीं । घटास पाडिले कां काननीं स्वामी । तरि सर्वानंदमुनी हे पूर्वजन्मीं । गुंतले वृधाप्यीं ग्रामगृहीं ॥४३॥मरणकाळसमई स्वकिये रडती । मोहपाशांत गोऊं पाहती । तंव हेतु उपजला उबगोन चित्तीं । व्हावा विरक्त जन्मतांचि ॥४४॥समाचार कोणा विदित न होय । तेवि महाकाननीं पडावा देह । पशुपक्षादिका संतोषमय । होईजे तनुमेवा भक्षितां ॥४५॥वाघरीसादि करो कां घात । किं दुर्मदीहातीं हो शस्त्रपात । जातकर्मपूजनीं न जडो हेत । ते अपेक्षा येथें पूर्ण जाली ॥४६॥॥अभंग॥ काय ज्ञानियासी शरीराची भ्रांती । घडो कां विपती खेद नाहीं ॥१॥नलगे तयाला उत्तम दिवस । नाहीं च हव्यास तट क्षेत्र ॥२॥प्रारब्धाआधीन केलेति घटासी । कर्माची आसोसी न धरिती ॥३॥कोठें कोण्यावस्छीं पडो तनु पुण्य । पूजन तें नुन्य न होयची ॥४॥आत्माराम सखा होय ज्याचा पूर्ण । स्वयें महिमान वाखाणितो ॥५॥॥वोवी॥ सुकृतवंताला मेलें ह्मणतां । तो दोषाधिकारी होय सर्वथा । येकदां भ्रष्टानिं गुरुसि निंदितां । मराया गेलों काननीं ॥४७॥प्रत्यक्ष बोलिले झुळुकांतरीं । त्यजी भ्रमातें विचार करी । सरागें भाला धरुन करीं । टोचितां आकाशीं छिद्र न पडे ॥४८॥स्वरुप संचलेंसे सदोदित । निंद्यवंद्य विभागु काय तेथें । इतुकेन कळली दशा अलिप्त । होय गुरुनाथ साहकारी ॥४९॥येकदां मिळाले बहुत पंडित । बोलूं न देतां निर्बुजलों तेथें । स्वप्नीं सांगितलें महावाक्य अर्थ । तेणें ते सर्व भाळले ॥१५०॥मरणभय येकदां लागोन मनीं । मुद्रा साधाया गेलों काननीं । नेत्र स्वल्प लागतां वदले कानीं । मेल्यावरी मरण काये ॥१५१॥अर्थशोध घेतां कळली खूण । जेवि बोलिले दासांनीं देहावसान । यदर्थी अभंग करा श्रवण । तुकारामानिं बोलिला ॥५२॥॥अभंग॥ तुकारामकृत मरप्रमईचा ॥(मुळांत येथें अभंगासाठी जागा सोडलेली आहे)॥वोवी॥ केलें हो बहुपरी संरक्षण । येकदां दुखण्यानें येतां मरण । स्वप्नीं कथिलें कीं आयुष्य नूतन । देऊण रक्षिण भीऊं नको ॥५३॥येकदां सर्पाचें जालें दंशण । स्मरत गुरुदेवा केलों शयन । कांहीं न बाधितां जालें शमन । हा ग्रंथ ल्याहवया आज्ञापिलें ॥५४॥गुरुआज्ञेनें बत्ध मी करिता व्यापार । संस्छाहुनि पडलों दूर । पुण्यतिथीचा राहिला विचार । मठांतरीं बखेडा यास्तव ॥५५॥मिळोन येकदां वैदीक लोक । हिणवितां जालों मनीं साशंक । प्रगटोन स्वप्नीं दयाळ देशिक । पुण्यदिवस नेमून दीधले ॥५६॥चैत्री पोर्णिमा दिवस उत्तम । ज्या दिनीं जालासे मारुती जन्म । नेमून तिथी ते चालतां नेम । भूसुरीं देखो न सकती ॥५७॥तों ईकडे संस्छानि अकस्मात । चैत्रौत्छवी उरलें साहित्य । खर्चोन संपादिलें विधानात । तो चि पुण्यदिवस नेमिला ॥५८॥संतोष वाटला सकळिकासी । काय आवडलें कीं गुरुरायासी । बोलाऊन घेतलें संस्छानासी । सेवा कराया इहपर ॥५९॥सन्न अक्रासेसत्याऐसी फसली । विळंब संवछरीं फुरसती जाली । गैबबीर होठेले काननस्छळीं । रामचंद्रबावा उदासी ॥१६०॥विदित न करीती तें गुप्तस्छान । कां परमार्थकार्या टाकून मी दीन । येईन कठीण जागीं सीणेन । यास्तव अपचंदीं थोकविलें ॥१६१॥गुप्तांतीं त्रयतप लोटल्यावरी । परमार्थ खंगला बहुत मठांतरीं । यास्तव मज दीना धरुन करीं । कार्य स्वसत्तें संपादिती ॥६२॥येकदा साहित्य न जाले करितां । तळमळीत पडलों बाधोन चिंता । देवद्वार झाडिले स्वप्नीं दाता । त्या उल्हासीं उद्भवलें वाक्य ऐका ॥१६३॥॥पद॥ काये उतराई होउ तुजला गुरुमाय ग । दीना संरक्षूं येसी लवलाह्य ग ॥धृ०॥भासे भवसिंधु तोय ग । काळ विक्राळ तोहि पादांकित होय ग ॥१॥इछाहुनि करिसी बहुविध सोय ग । वाण पडेल आतां कोण ते काय ग ॥२॥पुढती करुनी ऐसा सर्वदा साह्य ग । आत्मारामाचें नाम जगदोन्मुखीं गाय ग ॥३॥॥वोवी॥ पडो न देती किमपी साकडें । कळोन हि आह्मा नाहीं दृढ । बरळलों स्वछंदें तें वचन गोड । मानोन संता हो सांभाळा ॥६४॥सन्न बारासे हे पंचवीस फसली । धातसंवछरी संस्छानस्छळीं । चैत्रउछावा सामुग्री जाली । झोळी आधारें ससांग ॥६५॥दीधला मंडपु दीपु ठेविला । चहुंपरी यात्रेचा मेळा मिळाला । तों चौंकडोन गलबला फार चि जाला । न सावरिती कोणी कोणासी ॥६६॥बेदडे लुटोर कर्ते मरण । धुंद करित आले त्याच वाटेन । कांहीं च न सुचे अशक्तपणानें । समाधीं जवळी पडियलों ॥६७॥पाहतों तंव तेथे समाधी नाहीं । बहुत चि घाबरलों तेणें हृदईं । स्वप्नवत कथिलें तैं मी लवलाही । गेलो रे कटक फिरवावया ॥६८॥लस्कर अडवाटें फिरलें जेव्हां । हो तीच समाधी दिसली तेव्हां । कांहीं च न पाडितां गुंता गोवा । उत्छाव करुन घेतलें ॥६९॥॥श्लोक॥ आम्म०॥ नामें जयाचें श्रमताप हरी । वाक्ये जयाचे अतिसौख्यकारी । जो मेळवितो निजनिर्विकारी । श्रीरामचंद्र गुरु तो भवारी ॥१॥॥वोवी॥ आतां उत्छावपत्धती ऐका । संतसाधूला मान्यकर जे कां । मुख्य प्रिय वाटे श्रीरघुनायका । भोळे भाविका उल्हासु ॥१७०॥प्रतिपदापासुन पुनिवपरियंत । दंडक मोत्छावी सर्व विदित । पूजोनि देवाला प्रथम प्रहरांत । आरत्या कराव्या सगजरीं ॥१७१॥कल्याणस्वामीची आज्ञा प्रमाण । शिवरामस्वामींनीं सुचविलें वचन । केले ते आरत्या जितक्या सज्जन । ते सर्व ह्मणाव्या उत्छावीं ॥७२॥याहीवरी क्षेत्रज्ञ देशिक । जालेति त्याच्या ही म्हणाव्या हरिख । करुनि ऐका हो प्रेमासि अधिक । येकदांच लिहिल असे त्या ॥७३॥॥आरत्या अपचंदपत्धती ॥दासकृत॥ सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी उरवी प्रेम चरणें ॥२॥१॥॥अजरामर पन्नगधर दु:खरहिता निर्मळ येकांता । कलिमलद० ॥च॥२॥३॥॥साफल्या निजवल्या कंसल्यमाता । भूकन्या अन० ॥च०॥२॥४॥॥सत्राण उड्डाण हुंकार वदनीं । करी दंडळ भूमंडळ० ॥च०॥२॥५॥॥लवथविती विक्राळ ब्रह्मांडमाळा । विषयकंटी काळत्र० ॥च०॥२॥६॥॥सुरवरवरदाइनी मुरहरसुखसदना । परतरपरवासि० ॥च०॥२॥७॥॥अघहरणी पुष्करणी अगणितगुणखाणी । अगाधमहि० ॥च॥२॥८॥॥निर्जरवरस्मरहरधर भीमातीरवासी । पीतांबरजघनी० ॥च॥२॥९॥॥पंचानन हयवाहन सुरभूषनलीळा । खंडामंडीतदंडीत० ॥च॥२॥१०॥॥भवहरणा सुखकरुणा निजस्मरणा वरदा । तवचरणाप्रति शरणागत करुणा बीरदा । अकळे लीळाविग्रह निगमागमवादा । स्छावरजंगम जग या नातळी भेदा । जय देव जय देव जयजी कल्याणा । भावातीतानंता सहजा परिपूर्णा ॥धृ०॥हरिब्रह्मादिका न कळे पदमहिमा । विंशतिशतरसनाही नेणवे तव सीमा । कुंठित होय वाचा नाकळवे नेमा । पुरुषोत्तम तव कृपें विगळित रुपनामा ॥२॥११॥॥भूमिपती भूजापती भूपति रतिवीरा ॥च०॥२॥१२॥॥अंजनीसुत हा नयनीं निज अंजन लावी ॥च०॥२॥१३॥॥कमळावर कंस्तुभधर क्षिरसागरवासी ॥च०॥२॥१४॥॥मुगुट कीरिट कुंडल माळा विराजे ॥च०॥२॥१५॥॥कोटीच्या कोटी गगनीं उडाला ॥च०॥२॥१६॥॥करुणाकर गुणसागर गिरिवरधरदेव ॥च०॥२॥१७॥॥सुखसरिता गुणभरिता दुरिता निवारी ॥च०॥२॥१८॥॥नाना क्षेत्रपाळक चाळक सृष्टीचा ॥च०॥२॥१९॥॥भागीरथीमूळ सीतळ हिमाचळवासी॥च०॥२॥२०॥॥ब्रह्माविष्णुदेव यकत्र जाले ॥च०॥२॥२१॥॥भीम भयानकरुप अद्भुत । वज्रदेही जैसा दिसे पर्वत ॥च०॥२॥२२॥॥जयजया पूर्णकामा । जय आत्मया रामा । नवलाव आरती होती हो तुमची तुह्मा ॥धृ०॥निर्गुणी सगुण कैसे लीळा विग्रह आरंभ । अन्वयउपाधि योगें । निर्विब हे येकत्व न खंडता । अनेकत्व हे उभें । ऐसी हे थोर सत्ता । नांदिजेत स्वयंभ ॥१॥अपूर्व हे चि रीती गुरुसिष्यसंवादु । अभेद पूर्ण तो हा । महाहरुष संवादु । जाणती अनुभवी । जया सद्गुरुबोधु । रुचि हे रामदास । आपाआपणा स्वादु ॥२॥२३॥॥निर्विकार आरती॥ रावचि नाहीं तेथें०॥३॥२४॥ब्रह्माविष्णूहरादि०॥२॥२५॥॥वेदांतसंमतीचा का०॥३॥२६॥॥अविनाश ब्रह जे०॥३॥२७॥॥आरती॥ आत्मकृत॥ आरत रे आरत रे । आरत सद्गुरुस्वामि दयाळा ॥धृ०॥मंगळदायक विश्रांतीकर । दाविसि नाम चरित्र सुलिळा ॥१॥शिवराम प्रभु नाम हें जपतां वारिसी दुर्घट भेदभयाला ॥२॥हृद्गत जाणुनि भाविकलोका । वोपिसी पद पर परमार्थाला ॥३॥प्रगटुनि महिवरि सहज कृपेनें । भोगविसी हित स्वहितसोहळा ॥४॥स्वात्मान्वय निजगुहनिवासा । पावसि हीनदीन जनाला ॥५॥१॥जय जय आरत सद्गुणसांद्रा । करुणाकर गुरु श्रीरामचंद्रा ॥धृ०॥ प्रगटुनि महिवरी दाविसी लीळा । पावसी झडकरी भक्तजनाला ॥१॥बोधुनि सद्वरयुक्त प्रबोध । अहं ब्रह्मासि जिरविसी भेद ॥२॥देहिं च दाविसी सत्सुखखाणी । महिमा न वानवे थक्कित वाणी ॥३॥गाता तंव गुण भाविक प्रेम । होती तन्मय आत्माराम ॥४॥२॥॥जय जया आक्कमाये ॥ भक्ता दाविता निजसोय । उदरा आला ज्ञानराये । महिमा वर्णिला नवजाय ॥धृ०॥अनुसया दत्तजननी । कृष्णमाता नगनंदिनी । तैसि च भासे तुमची करणी । लीळा दाविले या जनीं ॥१॥विनवणी आतां येक । वोपुनि परमार्थभातुक । स्वात्मसौख्य अलोलीक । धन्य होती जेणें लोक ॥२॥३॥॥जयजया पारंपरा नारायणा श्रीवरा । आरती वोवाळीन हृदयसिंधुविहारा ॥धृ०॥विष्णु वैकुंठवासा । हंसदेव सर्वेशा । बोधवेध पूर्णब्रह्मा । सत्यलोकनिवासा ॥१॥वसिष्ठ ज्ञानदातया जय श्रीरामराया । हृत्तापशोकहर्ता जय अंजनीतनया ॥२॥रामदास दासपोषका । जय कल्याण सखा । बावा शिवरामस्वामी । रामचंद्रदेशिका ॥३॥ऐसीं हे दिव्य नामें । नित्य जपे जो नेमें । भेदभाव निरसोनिया स्वयें होय आत्माराम ॥४॥४॥॥नानादेवी येकचि देव विराजे । नानानाटकलीळा सुंदर रुप साजे ॥च०॥२॥२८॥॥वोवी॥ आरती संपतां तीर्थ देऊन । खिरापत द्यावी मग पुराण । फराळांअंतीं भजन कीर्तन । मग भोजन करावें सावकाश ॥७४॥श्रीरामजन्मकथा नवमीस । सेवटील रात्रिमाजि दशमीस । बोलिलेति जैसे समर्थदास । लळीत करावें आवडीनें ॥१७५॥चाफळेंत वर्णितां ऐकिलें मागें । आतां ही श्लोकपदादि अभंग । श्रवण करा हो लिहिलें ससांग । भूमिजांतरंग तुष्टेल ॥१७६॥ N/A References : N/A Last Updated : March 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP