मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|दासविश्रामधाम| ॥अवधान॥ ११२ दासविश्रामधाम श्रीसद्गुरुस्तवन ॥गत॥ ९७ ॥अश्वास॥ ९८ ॥समास॥ ९९ ॥मान॥ १०० ॥प्रकरण॥ १०१ ॥प्रसंग॥ १०२ ॥सर्ग॥ १०३ ॥अध्याय॥ १०४ ॥खंड॥ १०५ ॥पटळ॥ १०६ ॥विसावा॥ १०७ ॥स्तबक॥ १०८ ॥कांड॥ १०९ ॥वर्ग॥ ११० ॥सोपान॥ १११ ॥अवधान॥ ११२ ॥वर्ग॥ ११३ ॥पटळ॥ ११४ ॥खंड॥ ११५ ॥अध्याय॥ ११६ ॥सर्ग॥ ११७ ॥प्रसंग॥ ११८ ॥प्रकरण॥ ११९ ॥मान॥ १२० ॥समास॥ १२१ ॥लळीत॥ आत्मकृत ॥अवधान॥ ११२ एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले. Tags : dasvishramdhammarathioviओवीदासविश्रामधाममराठी ॥अवधान॥ ११२ Translation - भाषांतर श्रीरामसमर्थ ॥पद॥ (धाटि वेडिया स्वामी च) ॥ आलया अंगें चि होईजे देव कोंदाटला ब्रह्मकटाव ॥धृ०॥ भवसिंधूचें जळ आटलें संसाराचें मूळ तुटलें ॥१॥निजधनाची लाधली ठेवी । रंक पावले राज्यपदवी ॥२॥आरे काळाची वेळ चुकली । आनंदाची लूट फावले ॥३॥जे मायेनें जन्म दाविला । ते मायेचा ठाव पूसिला ॥४॥रामदासीं राम भेटला । थोर संदेह हा तूटला ॥५॥॥वोवी॥ धन्य धन्य अनुभवी सज्ञान । न बोलती कांहीं प्रत्ययावीण । तरी च जाली ते लीळा पावन । वानिती महिमान भले भले ॥१॥बोलणें तयाचें त्याला चि साजे । स्छिती भूषणानें जाले सज्ज । जो कोणी जाणेल निजवाक्यगुज । भोगील साम्राज्यपद तो हि ॥२॥आंगें चि होईजे तूर्त चि देव । ऐसें सुचविलें महानुभाव । ठसतां अभ्यांतरीं अभिप्राव । पावेल विभव परमार्थ ॥३॥जो स्वयें न जाला देवराव । विभक्तपणाला उरला ठाव । मग काय कीजेल भक्तिभाव । परमार्थविभव केवि साजे ॥४॥देव देव ऐसा करितां जप । किंवा सांचुनि सुकृतांश अमुप । पाहतां दृष्टीनें सगुण रुप । तुटेना संकल्प भेदाचा ॥५॥॥अभंग॥ देवासि भजोनि नाही देव जाला । संकल्प उरला भेदाचा कीं ॥१॥अनन्य ह्मणिजे नव्हे आन आन । जीवनीं जीवन मिळे तैसे ॥२॥भवेत्कीटो यथात्वळि आर्थ पाहा । सोहंततु महावाक्यसार ॥३॥सिष्य जो गुरुचा होय तदाकार । गुरुरेव परब्रह्म वाक्य ॥४॥ज्याला कळे भाव माया वाटे माव । तो चि स्वयमेव आत्माराम ॥५॥॥वोवी॥ निर्धारुनिया पाहतां देव । मीतूंपणाला नुरे ठाव । कोंदाटूनिया ब्रह्मकटाव । तो चि तो विलसे सदोदित ॥६॥श्रोता वदे तैं सर्व देव तरी । थोरीव ठेवाव कां येकाच्या सिरीं । अहो संकल्प शून्याच्या भरोवरीं । लिंपोन भ्रमेना ह्मणोनी ॥७॥देव जो जाला गुरुकृपें आंगें । कैंच तयाला जन्ममरणवोघ । वासनामूळ तें तुटे जोग । भेदभयदाघ न लागे ॥८॥पावोन आपुलें सौख्य सौभाग्य । साम्राज्य भोगी जीव जो भणग । नये चि उगउ पुन्हा मूळ । संदेहावरी पडोन जळ । भेटे दासासी श्रीराम ॥१०॥भेटणें काशाचें बोलणें मात्र । तदाकारीं होय तदाकार । ब्रह्मविद्ब्रह्म हे श्रुतिसार उत्तर । तैसें च व्हावें हो भल्यानो ॥११॥आलया जन्माचें हें चि सार्थक । व्हावें गडयानो स्वयें अलेख । देवभक्तमूळीं आईत चि ऐक्य । सित्ध चि सित्ध हो ठाकिजे ॥१२॥ऐशापरि च अनुपम्य सुख । भोक्ते महाराज समर्थ देशिक । कृतार्थ झडकरी होऊं साधक । साध्यत्व हितमित बोलिले ॥१३॥तें विलोकासदरीं लिहिलें पद । ध्यानास आणा हो पदबंदशब्द । ऐस्यापरीनें करीत प्रबोध । राहिले समर्थ गडावरी ॥१४॥॥पद॥ जन्मा यावें तरी तरोन तारिजे । सर्वदा ही किजे सद्गुरुसेवा ॥१॥निववावे साधका वारिजे बत्धाचा धोका । मानिजे तो सखा । दाशरथी ॥२॥धरिजे भक्तिमार्ग देव व्हावें अंगें । परमार्थभाग्य संपादिजे ॥३॥क्रिया बोल शुत्ध अचूक प्रबोध । चर्या किजे वेध लागे तैसा ॥४॥आत्मारामीं स्वयें होऊनि तन्मय । जन हितोपाय होय कीजे ॥५॥॥वोवी॥ ऐसें समर्थ निजरामदास । सज्जनगडीं केले रहिवास । ऐका पुढारी कथन सुरस । अयोध्याधीश पावेल ॥१५॥बैसोन येकांतीं जिंदाफकेर । बोधिती सिष्याला धीर उदार । सभा साजिरी लाहनथोर । येकदां इकडे मिळाले ॥१६॥विदित सर्वाला प्रपंच राहटी । वाढतां वाढती ते चि ते गोष्टी । आसती तयांत कष्टी संतुष्टी । तोंडपिटी करुं लागले ॥१७॥संसाराची सांगती खटपट । आहहा ह्मणती कष्ट भष्ट मोट । कुटुंब पोसावा सुटेना पोट । ते वाट हे वाट ह्मणताती ॥१८॥अनुभवप्रांताला न्यावी मात । गरज गोव्याला काय अगत्य । लेकरापरी उठोन समस्त । भोजनठायासि पातले ॥१९॥अरोगण जालें यथास्थित । घेऊनि विसावा स्वयें समर्थ । येऊनि बैसले मंडपांत । लाहनथोर सर्व मिळाले ॥२०॥प्रपंच कळाया करुनि सावध । गणेशबावाला बाहूनि सन्नित्ध । आज्ञापिलें कीं ह्मण रे तें पद । राजास्तव कथिलें चाफळीं ॥२१॥वंदोन येरू गाणार चांगला । आस्था ऐकाया सकळिकाला । आतां श्रोतेहो तुह्मी मन घाला । प्रस्तावापद ऐकावया ॥२२॥॥पद॥ (राग काफी, धाटी, राखो रे ॥) सुखदु:खेंमिश्रित हा संसार । संवें चि होईल स्वार ॥धृ०॥ कांहीं सुखें कांहीं दु:खें होतसे । सुखदु:ख अपार ॥१॥कांहीं संपत्ती कांहीं विपत्ती । लागेचिना परपार ॥२॥कांहीं सज्जन कांहीं दुर्जन । दास ह्मणे परपार ॥३॥॥वोवी॥ जालियावरी पदाचें गाणें । स्वामीरायांनीं केलें व्याख्यान । अवलोकितां पूर्ण कृपेनें । समाधान पावले सर्व ही ॥२३॥आणीके येकदां नमन करुन । पुसती भल्यांनीं कर जोडून । उपासना न घडे आह्माकारण । कैसें तें लक्षण आहे कीं ॥२४॥उपासनेचें नांव घेतां । संतोषुनिया समर्थदाता । बळें चि बिंबया अनुभव स्वथा । आत्मोपासना कळविलें ॥२५॥॥पद॥ पद ह्मणायचें नसे कारण । सकळासि येतसे कांहीं गाणें । मुख्य अवतारी दासभगवान । तारु कृपेनें युक्ती करिती ॥२६॥ह्मणोन अष्टाक्षरी श्लोक येक । कळविलें मायेचें व्याख्यान आसक । स्वरुपाचें दावितां कौतुक । सेऊन निजसौख्य धाले भले ॥२७॥॥श्लोक अष्टा०॥ भुतें प्रमाण बाणतें । त्रिगुण गूण जाणतें । मिळोन अष्टधा भली प्रकृति ते चिबोलिली ॥१॥॥वोवी॥ येकदां श्रीरामभक्त समुदाव । मिळोनि भोगिते जे परमार्थ विभव । विनवोन पुसती सत्य दृढभाव । कोठें ठेवावा दयाळा ॥२८॥ येक देवाचें दुसर्या ठाई । मंडाण भजनाचें होत नाहीं । देव भरलेति चहुंकडे महीं । सांगती नवाई विचित्र ॥२९॥वेदपुरुषाचें कौतुक मोठें । सूक्तिअ आराधिलें देवा सगट । तेणें पुढारी न चालवे वाट । नुलंघवे भीड अल्प ही ॥३०॥अनुष्ठान येकाचें येका च देऊळीं । मांडता छेळोनि करिती रळी । देहांत आटोपिलें येकेक कमळीं । निरंजनस्थळीं कांहीं नसे ॥३१॥तरि जी सर्वत्रा वाटोन प्रमाण । होतील अवघे केंवि प्रसन्न । तें निज निश्चई कोणतें भजन । निबत्धमान सांगावें ॥३२॥ऐसियापरी ऐकोन विनवणी । निष्ठा आपुली होती जे मनीं । कळविलें सर्वत्रा कृपा करुनी । अवधारा तुह्मी प्रीतीनें ॥३३॥॥अभंग॥ निष्ठापंचक ॥ भूतभविष्याचें ज्ञान । जया अमृतभोजन ॥२॥ ए०च०४॥॥वोवी॥ हे रामोपासना सर्वाकारण । सोय सर्वदाती कारी निर्विघ्न । सर्वानीं कीजे येथ दृढ मन । आतां अवधारा चरित्र ॥३४॥आधीं च उदासी दास विरक्त । आज्ञापिलें जें श्रीराम समर्थ । ते सित्धीस पावविले साकार कृत्य । वाढविला शुत्ध क्रमासी ॥३५॥आधाराचें न देतां टेकण । मायाविषयाचें तोडुनि संधान । निवळ वाढविलें स्वरुपैक्यज्ञान । अमायिकपणें शुत्ध योग ॥३६॥अंतरीं च अंतरीं तन्मय ध्यासी । साक्षित्वें आणिलें जाणिवेसी । तेणें नि:संगता येऊनि ध्यानासी निर्विकार होठाती ॥३७॥तनुभ्रांतीचा टाकूनि संग । स्वरुपीं समरस होती आंगस्फुरणादि कल्पना उठतां तरंग । स्वरुपांबरीं देखती ॥३८॥निरसोन तेणें विघड भेदबंड । स्वतसित्धवस्तु होती अखंड । हरुनि अक्रिया वारुनि पाषांड । श्रीरामभजन प्रतिष्ठिलें ॥३९॥मानवलें तेणें श्रीरामसमर्थ । मस्तक डोलविलें संत महंत । धरुन शुत्ध परमार्थपंथ । जाले कृतार्थ सांप्रदाई ॥४०॥ जाणोन संषादलें कार्य भाग पांग । त्याग करुं पाहती तनूचा संग । पसरला चहुंकडे उदास रंग । जे जे विहरती मौन्यें ची ॥४१॥स्वामिराज वसती येकांत स्थळीं । तिकडे कोणी न जाती मंडळी । येऊनि घडिघडी कपिराज बळी । परामर्ष करितसे ॥४२॥येकदां विचित्र जालें अद्भुत । दृष्टीस न पडती कांहीं पदार्थ । गुंफा ना भिंती द्वार ना पर्वत । तरु ना तीर्थ जन विजन ॥४३॥मागून दिनेका जालें विचित्र । दृष्टीस पडला देवता भार । उल्हासोन तेणें धीर उदार । उठोन बाहेरी जव यावें ॥४४॥मस्तकास लागलें चौकटी काष्ट । टेंगूळ आलें निघातमोट । भावोन नसल्क्यानें मोकळीक वाट । कासया कष्ट येणें जाणें ॥४५॥लोकास कथिलों सावध हो ऐका । ग्रंथांतरीं जाली बुद्धिवाद टिका । विसरणें चुकणें ठकणें नका । न पावा वाखा भ्रांतीनें ॥४६॥पाहोन चाला करा विवरण । स्थूळदेहाचें सांडा साधन । नीट करित जा बैसणें उठणें । नेमकपणांत त्यागूं नका ॥४७॥कथोनजनाला विसरलो आह्मी । देह जड जाला वृत्धाप्यधर्मी । अंतर पडलें कीं सुबकता नेमीं । आतां श्रीरामीं मिळावें ॥४८॥ह्मणोन बैसले हांसत स्वछंदीं । अखंडैक्यता लागली समाधी । हें देखोन हरी जो बळाचा उदधी । कपाट लाविले दृढतर ॥४९॥कोणि भाविती आसतील आंत । वदन न राहे भजन रहित । विनोद दिसतो हा परीक्षार्थ । काय काय दृष्टीनें पाहणें आहे । भले अधिकारी जाणते उपाय । महंती करुं गेले लाडके ॥५२॥मुख्य स्वामीचें भारी वैराग्य । तेणें जनाचा आला उबग । अणुही देहाला आलस्य भोग । लागो न देती निस्पृही ॥५३॥असतां यापरी योजीत चिंतित । आक्रावारवरी राहूनि आंत । मग सावध होऊनि स्वयें समर्थ । जय राम राम ह्मणतिलें ॥५४॥मंजुळ स्वराचें ऐकतां भजन । संतोष पावले सिष्यभक्तजन । पातले बाहेरी श्रीदयाघन । कपाट स्वकरानें उघडुनी ॥५५॥देखिले सर्वांनीं प्रसन्न वदन । ब्रह्मसंपन्नता फाकली चिन्ह । भाविलें आर्त्यानीं जालों पावन । चौकडे नमन होसरले ॥५६॥येकीकडे बैसले दयाब्धी । भोवतीं मिळाले प्रियलोकमांदी । कोणी हो गिवसितां कल्पना सांदीं । प्रत्ययप्रबोधीं मुक्त करिती ॥५७॥देखोन स्वामीची निर्वाणकळा । लाघवयुक्तीची जाणोन लीळा । अनुभवपराचा जो होता मेळा । माजिं तळमळा वाटल्या ॥५८॥न बोलवे अंतरीं जालें व्याकुळ । सोडुनि जाति कीं भक्तजनपाळ । केवि आह्मासी कंठेल काळ । दुर्हावती येथुनी ॥५९॥संकल्पाचा द्विरद समुदाव । त्या विदळोन मोकळा करुं ठाव । ऊठिला गुरुशब्द कंठींरव । आश्रय करा हो श्रोतेनो ॥६०॥॥पद॥ (राग हुशेनी । धाटी सीव उदास ॥) तुह्मी आह्मी सर्व येक देहबुत्धीचा अंतीं । शब्दज्ञान येक बोलणें वाया आवघ्या विपती ॥१॥विपती मांडल्या चुकउं पा रे । आवघे जाण देहबुद्धि टाकुनि जाउं शरण रामीं रे ॥धृ०॥ नका तुह्मी दुरि धरूं येक ठाव सकळा । जेथुनि आलेति तेथें चि जाउं आपुल्या स्थळा ॥२॥परदेसी आह्मी येकट रामदास सकळ । प्रपंच संगतिचे गेले गांव ठाव ना मूळ ॥३॥पाठीं देहबुद्धि लागली रे पळोनि जावें । तंवरी देह सोडीना स्वरुप पावे ॥४॥स्वरुप पावल्या कुतरें हें पाठि लागों नेदावें ॥६॥रामदास ह्मणे चला कोण येतो तो । विळंब नका लाऊं राम वाट पाहतो ॥७॥॥वोवी॥ ऐस बोलतां अनुभव मात । वर्मास पोहचले साधुसंत । तटस्थ होठेले पाहत स्तवित । मग वरकडा पाहिलें दयाघन ॥६१॥गुप्त होतील आतां येथुन । अंगिकारु करितील मरण । अपरुप आसे हें रुप सगुण । अवसान समये दीसतो ॥६२॥ऐसा तयाचा अंतरीं भाव । जाणोन तात्काळीं सर्वज्ञराव । हराया संदेह संशय सर्व । बोलिले अनुभव ऐका कसा ॥६३॥श्रोतेनो हे सत्य भाक ऐका । भाळला जयांत सद्गुरुसखा । नसे तयाला भवादि धोका । भ्रमभाव आसका मिथ्या चि ॥६४॥उन्मनप्रांतींची पावतां खूण । चत्वार देहा चि जाले अवसान । मग नसे चि तयाला येणें जाणें । कांहीं च दृष्टांत न साजे ॥६५॥स्वल्प चि पदबंदीं आहे विस्तार । बोलिले कळाया स्वमुखें भवहर । तुह्मी ही ऐका होऊनि सादर । जेथें अणुमात्र गुंता नसे ॥६६॥॥पद॥ (धाटी, मीरासीचा) सद्गुरुच्या बोले देह्यावसना जालें । आले गेले मेल नाहीं । भ्रांती आशंका तुटली । पालटलें नाहीं कांहीं ॥१॥समसमाधी रे तुटे उपाधी रे । जीत मेलें मरोनि ज्याले । तेथें केवि समाधी रे ॥धृ०॥गुरुपणाची कथा सिष्यपणाचा माथा । आली जालें फार वोंझें । सिष्य उबगला टाकुनि पळाला नाचतो आनंद भोजें ॥२॥खुळखुळी होय ना उतटोन जाय ना माईना ये ब्रह्मांडीं । परिमाण खुंटले नभ उतटलें खुंटला वाचा उदंडीं ॥३॥लिंपण सांडण सांडुनि टाकी संगती साहा नेणें । सं० । सकळ खाय तरी न धाय ऐसें सांगणें कोण ॥४॥बोलउं गेले ते ही मेले समाधि होउनि ठेले । त्याचि माय वाट पाहे मागुती नाहीं आलें ॥५॥समाधि लाधले ते ही समाधिस सुखावले । पायाळ जाले धन रे । आकाश जाउनि भस्म उधळुनि साधिलें सित्ध साधन ॥६॥रामीरामदास पळाला । ब्रह्मचरणीं पडिला । आपाआपणा जेवी । जीतो कीं मेला कळेना कवणाला समाधी काशासी द्यावी ॥७॥॥वोवी॥ संयुक्त कृपेची ऐकतां वाणी । प्रभाव पसरला तो सर्वामनीं । पुन्हां उमजाया श्रीमोक्षपाणी । श्लोकान्वयीं कळविलें ॥६७॥॥श्लोक॥ मला जन्म नाहीं मला मृत्यु नाहीं । मला वासना हेत कांहीं च नाहीं । मला पाहतां मी च तद्रूप जालों । विवेकें विचारें चि सर्वै विरालों ॥१॥॥वोवी॥ वरदवाणीचा कळतां अर्थ । अर्थरुप होऊं पाहती आर्त । आणीक येकदां प्रकारचित्त । येकेकाच होता हे ॥६८॥भाविती स्वामी हो आमुचे भोळे । आज्ञांकिती असतां राजादिक भले । क्षेत्रपात्रादि नाहीं मिळविलें । नाहीं घेतलें देश गांव ॥६९॥साहु सभ्यांनीं आणितां द्रव्य । दृष्टी घालिती महानुभाव । केंवी चालेल उपासना विभव । केंवि चालेल भिक्षा वरी ॥७०॥कवण करील सानकूळ । कैसा आह्मां होईल सांभाळ । नेमिलें सर्वत्रा कोणत स्थळ । न पुसलों प्रांजळ कोणत ही ॥७१॥दैवत उपासना अभिमानी कोण । सांप्रदाय कोणता धैर्य लक्षण । न पुसलों आतां तो उदासीन । होऊन राहिले समर्थ ॥७२॥ऐशापरीनें बहुता हृदईं । संशयगुंडयानें केली घाई । हें जाणोनिया सर्वज्ञगोसावीए । गुंफाबाहेरी निघाले ॥७३॥विराजतां सत्सभास्थानीं । भाविकीं ठाकले जोडुन पाणी । काय निघते कीं प्रसादवाणी । ह्मणोन लक्षिती मुखाकडे ॥७४॥तंव भक्तजनाची कल्पना सरो । धैर्यभाव सकळा हृदई संचरो । सांप्रदायमंडळीं आनंद भरो । बोलिले भवहरो कविनाथ ॥७५॥॥वोवी॥ दासकृत ॥ हणुमंत आमची कुळवल्ली । राममंटपावेली गेली । श्रीरामभक्तीनें फळली । रामदासबोले या नांव ॥१॥आमुचे कुळीं हनुमंत । हनुमंत आमुचें मुख्य दैवत । तयाविण आमुचा परमार्थ । सिद्धि न पवे सर्वथा ॥२॥साह्य आम्हासी हनुमंत । आराध्यदैवत श्रीरघुनाथ । गुरु श्रीरामसमर्थ । उणें काय दासासी ॥३॥दाता येक श्रीरघुनंदन । वरकड लंडी देइल कोण । तया सांडुन आम्ही जन । कोणाप्रती मागावा ॥४॥म्हणोनी आम्ही रामदास । रामचरणीं आमुचा विश्वास । कोसळोनि पडो आकाश । आणिकाचा वास न पाहुं ॥५॥स्वरुपसांप्रदाय अयोध्या मठस्त । जानकी देवी श्रीरघुनाथ । मारुतीउपासनानेमस्त । वाढविला परमार्थ रामदासीं ॥६॥॥वोवी॥ ऐसें ऐकतां निर्धारवाक्य । नुरला कवणा हि संशयात्मक । मग भरोन उल्हासीं श्रीरामसेवक । मांडिले स्तवन मारुतीचें ॥७६॥ज्याचा ऐसा किं भक्तिप्रभाव । वाट चि पाहत असती देव । सन्निधीं वसती हरिवर्यराघव । स्मरतां चि पावायाकारणें ॥७७॥सुचवितां प्रगटोन स्तवन प्रेमळ । सादृश्य हो ठेला अंजनीबाळ । धन्य पवनात्मजु समूळ खेळ । मायामयेचा वारिता जो ॥७८॥दृष्टीस पडतां हि हरिरुप सगुण । जो प्रबोधकर्ता गुरुदयाघन । धन्य रामदास तो उल्हासमनें । हरिगुरुपदासी लक्षिलें ॥७९॥इतरा दृष्टीला दोघे ही दास । न दिसती सन्नित्ध असोन सादृश्य । ऐकती बोलणें प्रेमरहस्य । तें चि ऐका हो श्रोतेनो ॥८०॥॥पद॥ धाटि ॥ (सद्गुरु सेवि रे मना ) त्रिविधतापहारक । हे गुरुपाय । भवसिंधूसीं तारक । हे गुरुपाय ॥१॥स्वात्मसुखाचे बीज हो । हे० । ज्ञानाचें निजगुज हो ॥ए०च०॥५॥॥वोवी॥ याउपरी लेवितां दिव्य भूषण । हरि भक्तहृदई ठेला जडोन । सर्वत्राला जालें दर्शन । प्रगटतां सज्जन सादृश्य ॥८१॥क्षणक्षणा होतसे कांतिपालट । प्रताप हरिचा झळके प्रगट । तत्समयीं बोलिले वचन गोमट । कर्णपुट उघडा ऐकावया ॥८२॥॥अभंग फूट॥ वैद्या भेटला सुखदाता । रोग पालट जाला आतां ॥१॥रस वोतिला कानांत । येऊनि झोंबला नयनांत ॥२॥रस भरला सांदोसांदीं । देहीं पालट जाली बुत्धि ॥३॥दिव्य देहीं वोतिला रस । गुरु न्याहळी रामदास ॥४॥॥वोवी॥ कर्णी संचारतां हे सौरसवाणी । समाधान पावले ज्ञानी ध्यानी । ह्मणती स्वामीची अद्भुत करणी । तारक या जनीं होय पां ॥८३॥कराल श्रोतेनो प्रश्नाधारु कां वोव्यात ह्मणतिलें श्रीरामगुरु । पदांत भाव तो गुरु कपिवरु । बोलणें पडलें दोंपरीं ॥८४॥तरि ऐसा असे पां येथिल विचार । रामदास श्रीमारुती अवतार । दाविलें नाना लीळा विचित्र । मानवी वेश धरुनी ॥८५॥मारुती अंश ते गुरु श्रीराम । अवतारक्रमाचा गुरु बलभीम । गुरु उपासना दैवत सुनेम । दासासि होय राम हरी ॥८६॥आहो भाचा जावाई जाला सिष्य । नातें तें पूर्विचि सित्ध आसे । पुत्रवात्सल्य ही उपजे तयास । जाला परमार्थी निजसखा ॥८७॥श्रीशंकराचार्यादि कर्ते कवन । श्रीराम गुरु ऐसें केले स्तवन । क्रमगुरु वेगळा आसे जाण । गुरुकृपें खूण हे जाणिजे ॥८८॥वानिलें दासांनींख गुरुपायकीर्ती । भजन भक्तिपंथासि लाविती । नयनीं रघुवीर दाविती । हे गुरुपाय तारक भवहारक ॥८९॥वेगळे नव्हें कीं गुरु आणि पाय । राम चि गुरु तरी दावण काय । कां रामासि गुरु वदले हा धराल संशय । तरि जगद्गुरु आणि भीम आज्ञा ॥९०॥आणि समर्थबाप तो सुर्योपंत । त्यासि आज्ञापिलें आसे हणुमंत । गुरु ह्मणत जाई श्रीभूमिजाकांत । भजकासि नेप्र सांग हाचि ॥९१॥त्यांनीं ही गंगाधरपुत्राप्रती । हें चि निजनिष्ठा कथिली युक्ती । त्यांनी ही गुरु राम वदलेति ग्रंथीं । सुगमोपाय अवलोका ॥९२॥माहराज ही असतां पितासन्निधी । बाळपणीं कथिलीसे हेचि सुबुत्धी । कोणी न पडा हो संशयाड संधी । दंडक चि तो ऐलाड हा क्रम ॥९३॥रामदासाचा सत्शिष्य कल्याण । गुरुवंशावळी कथिलें कृपेनें । तैसें चि चरित्रीं केलें कथन । आतां पुढारी ऐका कथा ॥९४॥येकदां मिळोन शाहणे शाहणे । बोलो आरंभिलें इतरामान्य । समर्थगुरुधण्या ते युक्ती न मने । कवण्यापरीची श्रवण करा ॥९५॥म्हणती दयाळा तुह्मी सदये । चहुंकडे वाढविला सांप्रदाय । तरि येक्या यास्छळीं गुरुत्व राहे । ऐसें केलें पाहिजे ॥९६॥येथें चि सर्वत्रा व्हावा उपदेश । मानवस्त्रादि येथून त्यास । या स्थाना न येतां अधिकार पुरुष । पूजेलागीं न व्हावें ॥९७॥अथवा राहोत कोणी कोठें । परमार्थाची करोत खटपट । येथील आइनावाचूनि पीठ । संस्थानाचा न करावा ॥९८॥खालीं न यावें येतां कोणी । अधिकार परत्वें द्यावें आणुनि । ऐस केलेया बंधान होउनी । चालेल उपासना ससांग ॥९९॥किंवा आणीक असे येक युक्त । उपासनीं गुंतले जे जेथें तेथें । दूरपंथ यावया न पडेल फुरसत । तरि पडत जाईल नुन्यता ॥१००॥तरि येथून नेमावा शाहणा महंत । चहुं मुलकीं त्यांनीं असावें फिरत । सीझा करावी चुकतील त्यांत । आणावें वित्त मिळेल ते ॥१॥हें ऐकता हासले श्रीमोक्षपाणी । बोलिले प्रपंचु का जडला मनीं । श्रीरामहरीच्या आज्ञावाचुनी । कांहीं च कार्य न केलें ॥२॥ग्रंथी असे कीं आमुची च वाणी । जो शिष्य गुरुचा जाला सद्गुणी । तो गुरुच होय पुढे त्याचेनी । गुरुशिष्यत्व वाढावें ॥३॥येक्या स्छळीं गुरुत्व नेमिता । द्वैतभेद पंथु लागला आईता । नाना प्रकारीं पीडण होतां । प्रपंचाकार होय कीं ॥४॥अद्वैतियाला सुटेना लोभ । गुरुत्व पसराया मांडिलें दंभ । कोणास जाला हो परमार्थ लाभ । क्षोभ चि वाढे चहुंकडे ॥५॥सीक्षा दीक्षा गुरुपणबळें । मोक्षगुरु तो निखळ दडेल । मग ज्ञानाचें काय सार्थक जालें । मत्ताभिमानें करी बंड ॥६॥सिष्यजना कांहीं न मागाव । ग्रंथीं वचनाला केल गौरव । करुनी बंधानु नेमितां ठाव । तरणो पाव न पडे मग दृष्टीं ॥७॥जेथील तेथें नेमिला वृय । उपासना चालिजे यथान्वय । याव जाव आणोन द्याव हें । भ्रांती च कोठें न पडे चि नुन्य । क्रमापरीनें वर्ततां ॥९॥ग्रंथांतरीं कथिले गुण जे विशेष । धरुनि वर्ते जो पुण्यपुरुष । गुरुपण तेथें चि सित्ध असे । कासाविस सोस कामा नये ॥११०॥धरुनि सद्भावें बुद्धिवाद समुद । अमायीकपणें जो वर्तेल शुद्ध । तो होईल जगीं या प्रबुत्ध प्रसिद्ध । कृपा करील श्रीराम ॥११॥मठमान्य इनाम वर्षासन । या लोभें वर्ते जो धरुनि दुर्गुण । त्या सीक्षा करिल पवननंदन । या सांप्रदायाचा अभिमानी ॥१२॥तत्समयीं कृपा करुनि सज्जन । रामदास्यपणाच कथिलें लक्षण । न सांगावें तें संपूर्ण चिन्ह । कांहीं अवधारा हितास्तव ॥१३॥॥अभंग॥ रामदासी नाम सांगतां सुलभ । घडावा हा लाभ गुरुकृपें ॥१॥मुख्य जेथ नाहीं शुत्ध आत्मज्ञान । वैराग्यविहीन कामा नये ॥२॥शाक्तमुक्त क्रिया धरुनि मातला । न पोसी भक्तिला भ्रांत खोटा ॥३॥अंकित होउनि पडे येक्या ठाई । भूतदया नाहीं वांया जाय ॥४॥कीर्तन करुनि भरितसे पोट । माझा ह्मणे मठ आशाबत्धी ॥५॥गुरुबांधवांत भर्छितु दुर्गुणी । वस्त्रासि न मानी मस्तीखोर ॥६॥उदासीन नाहीं नाहीं नित्यनेम । भरीं भरे भ्रम द्वाड दुष्ट ॥७॥आश्रय धरुनी सद्गुरुणा नोकितु । घाली पेच किंतु तो दुर्मानी ॥८॥षटप्रयोगी चित्त घालुनी भ्रष्टला । विषईक जाला कुलक्षणी ॥९॥मुख्य बुद्धिवाद मनीं जो न धरी । गुंतला संसारीं नारकीं तो ॥१०॥परस्त्री परधनीं लालची हव्यास । होय तो दोषास अधिकारी ॥११॥द्रव्य मेळवितां मानी मी ह्मणोन । बोले वाक्य नुन्य मंदमती ॥१२॥ग्रंथ विकितसे धरी आशा पाश । अंतरे क्रमास भ्रष्टबुत्धी ॥१३॥कीर्ती करी मोठी वाढवी उपास्य । तारितु जनांस तो चि धन्य ॥१४॥मुख्य आत्माराम भाळला जयासी तो चि रामदासी गुरुभक्त ॥१५॥॥वोवी॥ ऐसियापरी बोलिले भवारी । ससांग विलोका ग्रंथांतरीं । क्रमसावरी जो तो धन्यसंसारीं । धन्यरामदास प्रसन्न ॥१४॥सदये सर्वत्रा करुनि ईक्षण । बोलिलें हो वर्ता सावधान । क्रियेंत न पाडा कांहीं नुन्य । करा हो पावन जगासी ॥१५॥ऐस ऐकतां प्रसाद वचन । सर्व ही होठेले समाधान । आणीक येक संशय जडोन । पुसाया भिती आपणांत ॥१६॥त्यामाजिं बोलके पांडित्य वग्क्ते । कर्मधर्माचा निर्णयकर्ते । ते नानापरीनें करुनि स्तौत्य । सहज बोलवत बोलिले ॥१७॥पुण्यवंतांच्या अस्त्या पावन । परी भूअंशाच न जाय काठिण्य । तें गंगाजीवनीं मिळवितां नेऊन । विघरोन होती तीर्थरुप ॥१८॥पारंपर्यवंशीचे होती सुखी । पदार्थ पडावे सर्व ही सार्थकीं । जी शास्त्रधर्मांत्ग मानावा कीं । लोकसंग्रहाकारण ॥१९॥मग हासोन बोलिले निस्पृही राणा । वाढवितां वाड चि आहे कल्पना । यद्यपी आह्मां करिता सूचना । तरि उपकार कवणाचा आह्मा नको ॥१२०॥साह्य येक असता रामाबाई । न गुंतलों उपकारीं कवणाचे ही । मज बरोबरीचा निधडा निस्पृही । असेल योग्य पुण्यवंत ॥२१॥तया समागमीं धाडा हडें । ऐस बोलता वचन निर्भिड । आर्थ न कळतां पाहत तोंड । उगा राहिले सर्व ही ॥२२॥पुसाया पृछा करुन पुढती । धैर्य न बैसे कोणाचे चित्तीं । नमनमोन गेले स्वस्छळाप्रती । प्रभुवर्य गेले येकांतीं ॥२३॥कोणी ह्मणती हो समर्थासम । रंगनाथस्वामी तुका जयराम । वामनस्वामी केशवनिष्काम । न सांगवे न नेती अस्ती ते ॥२४॥मग भाविलें विलोकूं लीळानवाई । उमजाल श्रोतेनो वर्णनाप्रवाही । यास यजमान श्रेयेचा कल्याणगोसावी पुढे अवधारा श्रोतेनो ॥२५॥मिळोन येकदां शाहणे सुबुत्धी । हुडका हुडक करिती समाधविधी कर्णोपकर्णी ऐकोन दयाब्धी । बैसोन येकदां शाहणे सुबुत्धी । हुडका हुडक करिती समाधविधी कर्णोपकर्णी ऐकोन दयाब्धी । बैसोन सभेंत बोलिले ॥२६॥ब्रह्मवेत्ता जो अनुभवी भला । समाध करणें नलगे त्याला । अभिमानास्तवें करिती गल्बला । तरी काय जन्माचें सार्थक ॥२७॥थडगी वोटे ते वोस पडती । सिरोन पिशाच्च लोकाझडपिती । समाध कोणाची कोणी नेणती । वावरती त्यांत प्रपंचिका ॥२८॥शूद्रादिक माहर अविंध । वडिलाचे नावीं करितां समाध । तेथ मिळोन कामीकजनवृंद । लोटांगण घालितीं ॥२९॥अनुग्रह तयाचा घेती नमोन । करविती स्मशानीं ब्रह्मभोजन । चालविती सेवा अनुष्ठान । विपरीत करणें हें कलीचें ॥३०॥ब्रह्मण्यामाजील अहंभाव । आधार होता सन्यासी नाव । वोटा केला तो विचळतां ग्राव । न पाहती तिकडे न पूजिती ॥३१॥पुण्यप्रतापी असो कां कोंठें । पूजा तयाची न होय तूट । कां वृथा करावी संवाद खटपट । न होय वोटयानें सार्थक ॥३२॥॥श्लोक॥ मेल्या वोटे बांधती आपुलाले । आले गेले लोक किती निमाले । ज्याची त्याची पालवी चालविते । वेळा येतां सर्व हीं हालवीते ॥१॥॥वोवी॥ ऐसियापरी बोलतां समर्थ । ह्मणताती जी जी हे गोष्ट सत्य । परंतु पूजनी बैसोन हेत । भक्तिवंत बोला नाद रिती ॥३३॥श्रीरघुवीरा मानलें जाणोन । भक्तजनासी वदले सज्जन । वोवरीमाजि समाधि स्थापून । वरतें देउळ करावें ॥३४॥करुनि तेथें श्रीरामस्थापना । चालवीत जावी उपासना । मग संतोष वाटला सर्वाचें मना । तंव श्रोते जन ह्मणती ऐका हो ॥३५॥वीत जावी उपासना । मग संतोष वाटला सर्वाचें मना । तंव श्रोते जन ह्मणती ऐका हो ॥३५॥समर्थाची चर्या समर्थ । जे करिती ते मान्य सर्वात । आतां अनुभवी जे असती गृहस्थ । त्यांचा विचार कैसा पां ॥३६॥वक्ता वदे तैं भक्ति सार आहे । सेवा पूजन ते खंडूं नये । यावत्कल्पांत को देह । निजवचन आहे सांबाचें ॥३७॥ते वै सन्यासिना प्रोक्तवचन । महावाक्य अनुभउ जेथें लीन । तरि ही कीजे बंडाळ विधान । सर्व मान्य पंथ धरावा ॥३८॥शवहाड राखाचें नाहीं कारण । समाधि कीजे तीर्थ स्थापुन । पादुका ठेविजे कराया पूजन । गुरुभक्तजीवन हें चि पां ॥३९॥आराधना कीजे यथानुक्रम । विघड न हे येणें आश्रमकर्म । मुख्य श्रीगुरुभक्तां साह्य श्रीराम । जें करावें तें साध्य होय ॥४०॥धरिली गुरुभक्तें जे उपासना । कां अकटोविकट अवघड होईना । चालऊन देतसे श्रीदेवराणा । परंतु चालिजे वेदमान्य ॥४१॥हें असो आतां रामदास ज्ञानी । सर्वत्रांला सूचना करुनी । माघ वद्यप्रतिपदा आरंभ करुनी । संतर्पण करविती ससांग ॥४२॥सर्वदा जेथ होतसे उत्साव । त्यामाजि नेमुनि ठेविलें नांव । बहुत मिळाला भक्तसमुदाव । साधु सज्जन पातले ॥४३॥संतुष्ट पावती सर्वही जन । अहोरात्रीं भजन कीर्तन । न बोलवें तें विस्तार करुन । कांहीं येक श्रवण कर हो ॥४४॥॥पद॥ (रागबिलावल । धाटी ऐस ध्यान स०॥) जगजीवन जगदांतरी । जगचालविता हे । सूक्ष्मस्थूळ कळीवरें सकळांतर पाहे ॥धृ॥ ज्ञानकळा ते जीवनकळां । सकळां प्रचित पाळी । देखत ऐकत बोलतें श्रवण चि निवळी ॥१॥दास ह्मणे स्मरण धरा । स्मरणें चि उत्धरा । चंचळ सांडुनि निश्चळीं दृढ निश्चयें करा ॥२॥॥पद॥ (धाटी नामामध्यें उत्तम रामनाम०॥) आत्माराम सकळा घटिं आहे रे । प्रचितीनें रोकडा सित्ध पाहे रे । आत्माविण शरीर कैचा राहे रे । तेणें विण ते कांहिं च न राहे रे ॥१॥ऐसा आहे तो विचारुन पाहे रे । पाहे पाहे पाहोनि सुख राहे रे ॥धृ०॥ च्यारी खाणी चौर्यासि लक्ष योनी रे ॥३॥जनी वनीं भुवनीं त्रिभुवनीं रे । जेथें तेथें राहे पुरोनि रे । जवळी च तो चुकला आहे मनीं रे ॥२॥आत्मादेव प्रत्यक्ष आहे रे येक रे । येक देव चालवी अनेक रे । अवतारी अवतरले ब्रह्मादिक रे । सर्व कांहीं हा तयाचा विवेक रे ॥३॥युगानुयुगें येक चि आत्मादेव रे । तेणेंविणें अवघे चि होत वाव रे । जगदांतरा आंतरें पुरवावें रे । त्याचें करणें कोणासि नव्हे ठाव रे । लटिक वाटे तरि संताला पुसावें रे ॥५॥॥वोवी॥ करुनि विस्तारु पद व्याख्यान । सेवटीं वर्णिलें सिंहासन । प्रसन्न होती श्रीराम सज्जन । येक्याभावे न ऐकतां ॥४५॥॥(पद॥ राग शंकरभरणा । धाटी दृश्य पाहा) । मुक्तमंडपातळीं रामप्रतिमा सांवळी । बैसली सभा मंडळी । दयाळा रामा रामाय नमोनम: ॥धृ॥ नमो पट्टाभिरामा नमो तारका ब्रह्मा । नमो लोकाधि विश्रामधामा । द०॥२॥नवरत्न माळ कंठीं रविकोटिप्रभा मुगुटीं । कस्तुरी तिलक लल्लाटीं दयाळा० ॥३॥नमो दशरथात्मजा नमो भरताग्रजा । नमो नमो रघुराजा दयाळा ॥४॥नमो देवाधिदेवा नमो स्वामी राघवा । नमो तारका सर्वा जीवा । दयाळा०॥५॥सन्मुख उभा दास गर्जतसे नामघोष । वैष्णवी संग निवास । दयाळा रामाय नमो नम: ॥६॥॥अभंग॥ अनाथांचा नाथ देवांचा कैवारी । सिंहासनावरी शोभतसे ॥च०॥२॥॥श्लोक॥ माथा मूगुट:कीरिटी मणगटी वीराजिती कंकणें । कर्णी कुंडल मुक्तमाळ हृदईं दिव्यांबरें भूषणें । हे मी रत्नकिळा सुरंग विमळा लावण्या नानापरी । ऐसी मूर्ति उदार धीर मिरवे सिंहासनीं साजिरी ॥१॥माथा मूगुट पीवळा वरिकिळा रत्नांचिया फांकती । भाळीं केशव पीवळें परिमळें झुंकार झेंपावती । पुष्पें चंपक बहुविधें जाई जुई सेवती । कासे अंबर पीवळा पितमणी माळा गळां डोलती ॥२॥कंठी माळ विशाळ भाळ भ्रुकुटी च्यापाकृती वेंकटा । घंटा किंकिणीं वाजटा कटतटीं धाटा पट्टा गोमटा । अंदू तोडर नेपुरें मुरडिवा वांकीं झणत्कारती । दासा ध्यान पुजाविधान चरणीं आकर्षणीं थारती ॥३॥नेत्रीं लाघव रम्य राघव उभा शामांगरंगीं नभा । रुपें मज्जन संतसज्जनसभा भक्तीसुखें सुल्लभा । सितानायक सूखदायक कदा ब्रह्मादिकां नातुडे । तो हा दुल्लभ होत सुल्लभ सदा ध्यानीं मनीं आतडे ॥४॥रामू आठवितां गुणी सगुणता विश्रामता देखतां । नेत्रीं सुंदरता विशेष पाहतां च्यापाकृती भृल्लता । रत्नीं वीमळता किळा झळकतां सामान्य विद्युल्लता । दृष्टांतें समता नये विषमता लावण्य ज्याची सत्ता ॥५॥॥वोवी॥ ऐकतां सद्भावें हें भावार्थकीर्तन । देवभक्त जाले संतुष्टमान । कथांतीं प्रसाद विडा सेउन । लक्ष न विसरतां विसावलें ॥४६॥करितां श्रोतेनो स्वल्पसंइन । वळखोन हरुषा सर्व विधान । पुढीलप्रसंगीं करा श्रवण । श्रीरघुनंदन पावेल ॥४७॥दासस्वामीचे ह्मणविल्यावरी । अवगुण सर्व ही टाकिजे दुरी । वरदपदार्थ हे धरोन दृढतरी । तरोन तारिजे जनासी ॥४८॥मानसपूजा जप ध्यान ज्ञान । महावाक्य तीर्थ प्रसाद नमन । नित्यनेम साक्षात्कार स्मरण । विश्वास गुरुस्शास्त्र उपास्यक्रम ॥४९॥गुरुकृपा सिष्यत्व सेवा भजन । जपमाळ झोळी काठी निशाण । तुंबा मेखळा स्तवन कवन । हें न विसंबतां लीळा दाविजे ॥१५०॥॥अभंग॥ मी तों समर्थाचा घरी प्रभंजन । दाऊं निरंजन चहुंकडे ॥१॥संकल्प विकल्प करुनीया दूर । देवपरात्पर दाऊं दृष्टी ॥२॥निवांत जें स्छळ दाउनि प्राजळ । भक्तिचा सुकाळ होऊं देऊं ॥३॥सोहंभावातीत दावितां विश्राम । जे ते आत्माराम व्हावें स्वथा ॥४॥॥वोवी॥ दासविश्रामधाम लकाट । मूळमायेच ऐक्याता पीठ । आत्माराम जो भक्तजनसगट । जये ठाई विसावला ॥१५१॥इतिश्रीश्रीरामकृपा । तारकपरमार्थसोपा । स्वयमेव देव । प्रपंचनिंदा आत्मापासाना रामोपासना । टेंगुळ कथा । अनुभवीं ऐक्यता जीत मरण पूर्णत्व स्थानमानउपासनाधैर्य । गुरुपादप्रशांश । थोरीव समाधिलक्षण कीर्तन स्तवन वरदगुण । कथनोनाम । समास ॥११२॥जय जय राम ॥ N/A References : N/A Last Updated : March 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP