श्रीसद्गुरुस्तवन

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


पद

जे अक्रोध महानुभाव ।
योगवैराग्यछत्रपतिराव ।
ज्याच्या मतें हा बद्धमोक्ष वाव ।
ज्यासी श्रुति म्हणती गुरुराव ॥१॥

रे सखया सज्जन दुर्लभ ।
ज्यासी बोलिजे सिद्ध स्वयंभ ।
जे भाविकासी अति दुर्लभ ।
ज्याच्या दर्शनें अपार पुण्यलाभ ॥ध्रु०॥

भक्ति विलसती इंद्रियानंदें ।
शांतिक्षमेसी सुटलीं दोंदें ।
भूतकृपा सर्वत्र सम नांदे ।
जन संतुष्ट कीर्तिमकरंदे ॥२॥

दृश्य पदार्थ निर्लोभ ज्यासी ।
जे दानशूर निजवस्तूसी ।
थापें मारिलें भयशोकासी ।
कृपाकल्याण दीन जनासी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP