॥मान॥ १००

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


॥श्रीरामसमर्थ॥

॥पद॥ (राग कल्याण) अरे मन पावन देव धरीं । अनहीत करीं ॥ध्रु०॥ नित्यानित्य विवेक करावा । बहु जन उद्धरीं ॥१॥
आत्मा कोण अनात्मा कैसा । परपार उतरीं ॥२॥
दास ह्मणे तुजा तूं चि सखा रे । हित तुझे तूं करी ॥३॥

॥वोवी॥ अरे मना तूं जाणता होसी । नकामा ते अहंता धरिसी । भलत्या उपाधि गुंडाळसी । साभिमान घेसी लटक्याचा ॥१॥
धरिसी पाशातें हटीं बळकट । घसरोन भ्रंशीं करिसी चावट । वळखिनासि कां खरें खोटें । वीट तें वीट न मानिसी ॥२॥
यापरीं करुनि घेणें अनहित । हें काय मना रे तुजला उचित । जें धरिसी तें कामा न ये किंचित । मागुता हितार्थु दुर्लभ कीं ॥३॥
कोणी न पडती स्वहितकामासी । सखा तरी तुझा तूं येक होसी  उद्धार तूं होतां बहुत जनासी । तारिसी उपकार घडेल ॥४॥
करुनि नित्यानित्यविवेक । आत्मानात्माची साधूनि वळख । सारासार शोधूनि सम्यक । पावनदेवासी धरीम दृढ ॥५॥
जया देवाला धरितां भावें । मायाविद्येचा पुसे ठाव । येरवीं लोकाचा माईक स्वभाव । भलत्यासी देव भाविती ॥६॥
देव धोंडयाचे फुटोन जांती । कुईजती विटती घटती तुटती । या नामें थोराची तैसी च गति । होती कल्पांतीं नाहीं च ॥७॥
अवतारीक ते येऊनि गेले । आकारले ते नाहीं राहिले । देव हा वाटे जो सर्वात खेळे । त्याची हि स्थितगत ऐका कसी ॥८॥

॥पद॥ (राग कानडा, धाट-कष्ट करी ते०॥) चंचळ चाळकु चमके । वे बहु धमके ॥ध्रु०॥ करित जातो गुप्त चि होतो । अनुमाना न ये तो ॥१॥
उदंड केलें विवरेना । धारणा धरेना ॥२॥
कर्तृत्व येना विवरेना । दास ह्मणे समजेना ॥३॥

॥वोवी॥ हा देव होय परी जंव परतोन । निर्गुणरुपीं होय लीन । तया देवाची संतसज्जन । सांगती खूण ते ऐका ॥९॥

॥अभंग॥ गीता भागवतीं उपदेश केला । अर्जुना दावि० ॥च०॥३॥
॥कल्पनेचा देव कल्पनेची पूजा । तेथें कोणी दुजा आड० ॥च०॥३॥

॥वोवी॥ अरे मना हा देव निज निश्चळ । धरितां पावन तूं चि होसील । भिन्न भेदाची न उरे तळमळ । पावन करिसील बहुतांसी ॥१०॥
ऐसें असतां देव निर्गुण । धर्म हा तद्रूपी असिजे अनन्य । सगुणाचें मा काय प्रयोजन । भूतांचें पूजन वृथा कीं ॥११॥
मूर्खस्य प्रतिमा देवं वचन । ज्ञानियाचा देव तो निरंजन । ज्ञानादैवतु कैवल्यं प्रमाण । तरि हें अनुमान निरसिजे ॥१२॥

॥अभंग॥ ऐका द्या हो चित्त देव तो अनंत । वेदादिक जेथ तन्मावले ॥१॥
अघटित लीळा जयाची न कळे । सर्वांतरी खेळे सर्वकर्ता ॥२॥
सगुण निर्गुण न ह्मणवें ज्याला । ध्याऊं जातां त्याला तो चि व्हावें ॥३॥
स्वात्मानंदीं मिठी पडे तदाकार । भजा निरंतर गुरुकृपें ॥४॥

॥वोवी॥ आतां बीजेचें चंद्रदर्शन । कराया दाविजे आडखूण । तेवि इत्यादिका सांगिजे साधन । तें चि निजफळ पावावया ॥१३॥
ससांग करवावें भूतपूजनादि । तीर्थाटणादि व्रत त्याग विधी । हळुहळु युक्तीनें वळूनि बुद्धी । देवदर्शनाकडे न्यावी ॥१४॥
मुद्रादि इंद्रियउपासना । कीजे मनबुद्धिआराधना । आपणांत सामाऊन आपंणा । देव चि व्हावें अभेदीं ॥१५॥
ह्मणाल साधन तें कीजे परतें । कार्य चि साधल्या तें कासया मागुतें । अहो आश्रमविधि तो संन्यासपरियंत । पालटतां देह तो चि कीं ॥१६॥
उत्तरोत्तरीं साधनता पुष्टि । कार्य साध्य जालें निज जें सेवटीं । तें साधन मोकळितां अहंता उठी । तळवटीं दर्शना गुप्त चि ॥१७॥
राहिल्यावरी स्तनपान करणें । मातोश्रीयेचें राहिलें कारण । परि दुखविलीया तियेचें मन । न कळतां हानी होतसे ॥१८॥
जड हिरण्मय ज्ञान निर्गुण । चारी देहा हें चहुंदेवपूजन । सेखीं निरंजनीम देव निरंजन । आपण चि आहे घनदाट ॥१९॥
मुख्य अहंतेचें होतां निरशन । तदुपरी कीं सर्वात्मदर्शन । तें मूळ स्फुरण लीन होऊं कारण । भजन सगुणाचें सत्सेवा ॥२०॥
श्रेष्ठपदाची सांपडूं सोय । सिर विप्रा कीजे पद शुद्ध आश्रय । किं राज्यप्राप्तवरी दोष दास्य नव्हे । बंदोबस्त ठेवितां देशाला ॥२१॥
गुरुत्वपदवी हे जया पाहिजे । करवीरप्रतापिया गुरु कीजे । मस्तक सत्सिष्यापुढें वोढिजे । हें वर्म जाणिजे अनारिसें ॥२२॥
होतां श्रीगुरुकृपावरदान । उत्धारवर्म हें बिंबेल पूर्ण । कांहीम च न वाटे त्यासी अनुमान । पीर सलक्षणी क्रिया ते मान्य ॥२३॥
न सांडिजे कहीं साधनविधि । वळोन दुर्बुद्धि ते कीजे सुबुद्धि । सद्‍बुद्धि जिरवावी ते हि स्वानंदीं । मग बुद्धीबोध बोधक असो कां ॥२४॥
स्थूळदेहातें लागलें कर्म । उपासनेचा सूक्ष्मीं संभ्रम । तुर्यावस्थीं वळखणें ब्रह्म । पैलाड प्रेम तो चि तो ॥२५॥
या तिनींत येकाला करितां विपट । स्थितिसंपन्नता पडे तूट । आपण हें नव्हे कां वाहावे कष्ट । कां हट करीन न करीन ॥२६॥
सस्वरुपीं तन्मय होऊन । सत्क्रिया कीजे यथाविधान । यास ह्मणावें अबाधित ज्ञान । होय होय वदावें तत्वविदें ॥२७॥
विचारवंता हें कळेल अस्क । पुरे हो साधका विश्वास येक । हें सर्व हि त्याला होईल ठाऊक । रामनामभजनीं रत होतां ॥२८॥
यापरीं मनाला हितगुज सांगत । या टुकीं बहुजना पावन करित । सज्जनगडीं राहिले समर्थ । मीनले संतसाधुजन ॥२९॥
अनुभव अनुभविकाप्रति बोलत । सत्सभागारीं असतां विरक्त । तों सन्मुखीं पातला येक गृहस्थ । सिष्य स्वामीचा रामबा ॥३०॥
घालूनि अकरा नमस्कार । उभा ठाकला जोडूनि कर । सांग पां ह्मणतिलें समाचार । करसंकेतीं सर्वज्ञें ॥३१॥
तो विनवितु देवा अभय द्यावें । हो कां ह्मणतिलें सद्गुरुरावें । मग सांगूं आरंभिलें जयाचें नांव । शामजी ऐसें विराजित ॥३२॥
तो सिष्य स्वामीचा भोळा भाविक । नसती च संग्रहीं सुहृदलोक । दाईजीं लाऊं पाहती कळंक । करुनि हटानें संन्यासी ॥३३॥
शामनीळाला दुर्रोगधूर । लागोन करुं पाहे कृष्णवग्त्र । त्यामाजीं समंधी गुरुक्रमद्वार । हटकपाटें निरोधूं पाहती ॥३४॥
अशक्त दुखण्यानीं घातला पेंचीं । वाट नेदी च येथें यावयाची । काकुलतमेजवानी पावोन त्याची । उपकार फेडूं पातलें ॥३५॥
घेऊनि तयाचें नमनस्तवनधन । भूषण द्याल तें पावतें करीन । स्थळ प्राप्त व्हावया गुरुपाददर्शन । अपेक्षातपें तपतसे ॥३६॥
दाईजलोक ते भाविती ऐसें । कर्मफळ खाववावें त्याचें त्यास । याचेनि फळप्राप्ति काय आह्मांस । देऊण संन्यास मोकळिजे ॥३७॥
शामजीस वाटला तेणें संशय । गुरुक्रमा विघड होऊं नये । सांपडोन सहजीं मोक्षोपाय । कां आणिखी बंधन पाहिजे ॥३८॥
पाहतां दृष्टीनें सद्गुरुदेवा । यथानुशक्ति घडतां सेवा । मुक्तत्वप्राप्ति सहज त्या जीवा । वेष पालटावा मग कासया ॥३९॥
सार्थक होयाचा क्रम चि वेगळा । वर्णाश्रमविधि न लगे त्याला । सोकूनि मिष्टान्ना गेरु नाशिला । तरि काय पदवी पावेल ॥४०॥
शंकराचार्येचा सिष्य संन्यासी । मरणांतीं झाडा घेताम त्यापासीं । सुंट निघाली जाळूनि तनूसी । मग विरक्तीसी वाखाणिलें ॥४१॥

॥गुरुगीता श्लोक॥ श्रुत्याचारविचारेण गुरुभक्ता भवंति ये । ते वै संन्यासिन: प्रोक्ता इतरे वेषधारिण: ॥१॥
॥वोवी॥ ऐसा तयाचा भाव सदृढ । हो कां न होवो पडलेति आड । आणि वैदिक ते न धरितां भीड । उपासना विघडूं पाहती ॥४२॥
तुर्यासकट जो केला गट्ट । चतुर्थाश्रम त्या वदती श्रेष्ठ । स्वरुप जयाचें असतां घनदाट । हं सोहं ह्मणाया प्रशांशिती ॥४३॥
तत्वझाडा जों केला नि:शेष । महावाक्याचें जाणोनि रहस्य । स्वरुपीं होऊनि ठेला समरस । त्या विरजाहोमकथा सांगती ॥४४॥
ऐशापरीच्या ऐकोन गोष्टी । अवतारविलें हो करुणेस पोटीं । सिष्याकडे करुन कृपादृष्टि । पुसिलें सत्पुरुषा वैदिकांसी ॥४५॥
विप्रजन तेव्हां वदती दयाळा । श्रवनमनन न घडे प्रपंचिकाला । ह्मणोन हा येक धर्मे नेम केला । तो तों विरक्त असे मुळीं ॥४६॥
जन्मापासोन सेवटवरी । प्राणी दगदला व्यर्थ संसारीं । निस्पृहता घडो येवढी तरी । आश्रमधर्म हा नेमिला ॥४७॥
वृत्धाप्यकाळीं लग्न करणें । मरणसमई संन्यास देणें । मेल्याची अपेक्षा पुरवणें । पुनर्जन्म आस्था असार्थक ॥४८॥
सत्पुरुषलोक तैं करिती हास्य । आधीं च विरक्तु कासया न्यास । रस अमृताचा सर्वांगसुरस । फोडणी देणें न लगे चि ॥४९॥
गुरुभक्त ह्मणती तैं काय हें सांकडें । कासया कोणाची धरावी भीड । भाव येक असतां दृढ । लागे मुक्ति ते पायासी ॥५०॥
उदासी वदती तैं मुक्ताचा देह । त्यासी विटंबण कामा नये । गुरुभक्ता कर्माची चाड काय । पडूं नये हो कचाटीं ॥५१॥
ज्ञानीजन वदती संन्यासलक्षण । न कळे नुमगे हो गुरुकृपेंवीण । तंव बंधु तुकयाचा कान्होबा उठोन । विनवोन सर्वत्रांप्रति बोले ॥५२॥
येकदां तुकारामासी ब्राह्मणें । पुसतां कथिलें हो संन्यासचिन्ह । उत्धार जाला तो बिंबोन खूण । करा हो श्रवण अभंग ॥५३॥

॥अभंग॥ ऐसा घेईं तूं संन्यास । करीं संकल्पाचा नाश ॥१॥
मग तूं राहीं भलते ठाईं । जनी वनीं खाटें भुई ॥२॥
तोडीं जाणीव हे गळा । मग तूं होई रे निराळा ॥३॥
अहो तुका ह्मणे नभा । होसी अणूचा हि गाभा ॥४॥

॥वोवी॥ कळतां अभंगामाजील रहस्य । भरला सकळिकांहृदईं संतोष । तंव कल्याणजीला संज्ञितां दासें । निर्धारें वग्त्रुत्व केलें बहु ॥५४॥
पद अभंगादि ह्मणोन सेवटीं । वोवी येक वदला आखुड गोमटी । ते अर्धी तुमचा हो श्रवणपुटीं । घेऊनि अर्थ विवरा हो ॥५५॥
संन्यासी ह्मणजे षड्‍न्यासी । विचारवंतु सर्व संन्यासी । हे गुरुवचनार्थु आणा ध्यानासी । मज मतिमंदा कळेल तेवढा चि ॥५६॥
करुनि ससांग विरजाहोम । पावला जगीं या संन्यासी नाम । यजनादि राहिलें तें षट्‍कर्म । सर्वत्याग यासी न ह्मणावें ॥५७॥
संन्यस्तं मया बोल हा मूळ । सर्वत्याग होत्सातां बीज तें राहिलें । अहं अंकुर असे फुटलें । स्वर्गसौख्यफळ द्यावया ॥५८॥
व्यवहारा आवरुन कृपण । धमके कळा तें सांचिलें धन । तेवि कर्माला राखिलें गिळोन । सर्वाभिमान गुप्तला ॥५९॥

॥अभंग॥ सर्व त्याग होतां संन्यास तो भला । गुंता गोंवा काय आतां ॥१॥
त्रिपदा प्रासूनिया क्रीडतां स्वानंदीं । स्वरुपी जाली बुद्धि तदाकार ॥२॥
ब्रह्माविद्या साधी ब्राह्मण तो होय । घेणें विहित आहे संन्यासत्व ॥३॥
महावाक्यशोधें आत्मा स्वयें जाला । वंदावें तयाला सर्वभावें ॥४॥

॥वोवी॥ अर्पण किंवा त्याग करणें । संन्यास तयाचें नामाभिधान । अहं मुळींचा न होतां गळण । न तुटे बंधन मंत्रसंज्ञीं ॥६०॥

॥सं.वचन॥ आत्मा मे शुध्यंताम्‍ । (आदि पदार्थ । मंत्र ।) ज्योतिरहं विरजो वियाप्मा भूयास स्वाहा ॥

॥वोवी॥ अहं ज्योति: माया हें तुर्या नांव । ते बीजीं च असे हो संसार सर्व । विचारवंत तो गुरुवर्मवैभव । लाहोन पैलाड विसावला ॥६१॥

॥अभंग॥ ज्ञान ह्मणावें तें कांही च न होनि । स्वयें चि स्वध्यानीं आत्मज्ञान ॥१॥
संसारपदार्थपरीक्षा करणें । जना वाटे ज्ञान परि तें नव्हे ॥२॥
तुर्येचे जाणणे तें ज्ञान पदार्थ । तें हे वदे मात भिन्नत्वानें ॥३॥
आत्माराम स्वयें आपणांत रमे । ज्ञानी तो परम परमहंस ॥४॥

॥वोवी॥ सर्वसंन्यासी तो मायात्यागी । षडंन्यासी बोलिजे क्रमस्थालागीं । हें असो समर्थ राजयोगी । रामवास वदले प्रसन्नमुखें
॥६२॥
 
शामजीस नलगे संन्यास घेणें । कृपा करील श्रीरघुनंदन । येईल या ठाया होईल दर्शन । विलोकील हा आनंदु ॥६३॥
ऐसा वर वदतां श्रीरामदास । सकळां मानसीं भरला उल्हास । तो गृहस्थ निघावा कळऊं रहस्य । तों शामजी च पातला सन्मुखीं ॥६४॥
जंव कृपावंत जाले इकडे समर्थ । शिष्य तो होऊनि शक्तिवंत । गडासी पातला आनंदभरित । नमोन गुरुदेवा ठाकला ॥६५॥
वानो लागले सकळ हि कीर्ति । धन्य देवसाह्य हे धन्य गुरुमूर्ति । ईक्षोन कृपेनें भाविकाप्रति । बोलते जाले ऐका कसें ॥६६॥

॥पद॥ वेडिया स्वामी च होऊनि राहे । हे उपाधि तुज न साहे रे ॥ध्रु०॥ अरे तुझा चि तूं सकळ । तरि वायाम चि कां तळमळ ॥१॥
स्वामीसेवकपण हें वाव । अभिमानासी कैंचा ठाव रे ॥२॥
अमंगळ जाणसी साचें । काय भूषण सांगसी त्याचें ॥३॥
मीपणाचें मूळ तुटावें । आनंदाचें सुख लुटावें ॥४॥
रामदास चि नाम हें फोल । तेथे कायसी लागती बोल रे ॥५॥

॥वोवी॥ ऐकोन यांपरी प्रसादवचन । तो भोळा होठेला विरक्त पूर्ण । लाऊनि स्वरुपीं अनुसंधान । लोटिला काल उदासीं ॥६७॥
जे थोरीवापेक्षां बहुत चि थोरीव । हें सद्गुरुकृपेचें त्यागूनि वैभव । मिरऊं इच्छिती संन्यास नांव । धिग ह्मणो नये काम त्यासी ॥६८॥

॥पद॥ धन्य संन्यासी तो येक । माया माईक । जाणूनि जाला जो निजीं ऐक्य । केला विवेक ॥ध्रु०॥
जाला प्रणवाचा यजमा । तुर्या लंघून । होय निराळा गुरुखून । महावस्तु पूर्ण ॥१॥
दिशाप्रावर्ण लेउनी । अवधूत होऊनी । क्रीडा करितसे निर्वाणीं । पाहतां परतोनी ॥२॥
न दिसे जयाला भवभय । कारण ना कार्य । आत्माराम चि तो स्वयें । जनीं नांदताहे ॥३॥

॥वोवी॥ स संन्यासी च योगी च ह्मणतिलें देवें । असे बहु ग्रंथीं अभिप्राव । घडोन गुरुसेवा सुकृतभावें । अभिमानीं पडिजे कां पुन्हा ॥६९॥
सर्वां प्रकारीं हा शुद्ध पंथ । रामदासाचा जाणती संत । जे सन्मार्गी इलु आघात । न पावती हो विश्वासिक ॥७०॥
हें असो श्रोतेनो आडवाल येथें । कथा कथिल्या ह्यापरीं अश्रुत । मागें कवियांनीं वर्णिल्या नाहींत । चरित्रामाजीं ह्मणोनी ॥७१॥
तरि ऐका हो सांगूं तो भावार्थ गमला । मुख्य हे जाणिजे समर्थलीळा । वर्णावें कीर्तिप्रतापयेशाला । त्यांत अनकूळा आलें तें वानिलें ॥७२॥
त्यांत शिष्य स्वामींचे जे विख्यात । जगदोद्धारक प्रतापवंत । ते सर्वत्रांप्रति असती विदित । त्यांस वानिलें चरित्रीं कवियांनीं ॥७३॥
दासदासाचे जे शिष्य विख्यात । कवि हि प्रसादी पुण्यवंत । ते ते क्रमोनि लीळा सुपंथ । प्रांतासी पावले त्वरित चि ॥७४॥
तडीतापडी जे गुंतले माग । विजयविख्याति ज्या न बैसे लाग । ते हि गुरुकृपें क्रमसौख्यभोग । भोगीत पाठीं लागले ॥७५॥
करावया गुरुप्रांत सन्निध । आठवीत थोराचे गुणानुवाद । यासवें चालिलों क्रमित पंथ मंद । समाचार घेत याचा हि ॥७६॥
जे आले असतील स्वामिराजअंकित । ते सरकारीचे धणी समस्त । दस्तावेजलीळा असो कां किंचित । वळवटा त्याचा मान्य चि ॥७७॥
उत्तम वि ख्याती जगदोद्धारक । मध्यम दिसती ते संसारिक । रुढीस न आले नामधारक । तरि हे ते वडील आमुचे ॥७८॥
अठरा पद्म तें वान्नरदळ । संख्यामाजीं कीं आलें सकळ । सर्वां सांभाळील श्रीघननीळ । स्मरिजे सर्वत्रा भक्तांनीं ॥७९॥
नाम हि जरी विदित । स्मरण करावें येक ठोकात । तैसे दासाचे शिष्य प्रगट गुप्त । आठवले त्यांसी वर्णिजे ॥८०॥
आतां वसो हें कथाप्रसंग । संतोष पावले दास भवभंग । अवतरुनि आले ताराया जग । संपादिती कृत्य तें हरिकृपें ॥८१॥
येकदां लवकरी जालें भोजन । आवडीनें ऐको कीर्तन । सभागारीं मिळाले श्रोतेजन । दास भगवान विराजले ॥८२॥
समर्थाघरीं ऐसा कायदा । आळसासी न टेकिती कोणी कदा । करिती शिष्यांनीं सर्वकाळ धंदा । सद्गुरुकडे लक्षित ॥८३॥
जेवि पांडवांनीं राजसूययागीं । मनोगत निरविलें हरिपादयुगीं । तेवि भक्त ते भलत्या प्रसंगीं । असो कां गुरुदेवा न विसरती ॥८४॥
गुंफाबाहेरी निघतां देशिक । झोळी कुबडी दासबोधपुस्तक । कौपीन पादुका साहित्य आसक । सन्निधानीं च वसविती ॥८५॥
कां विरक्त दासाचें ऐसें चालणें । चित्तास आलेया बैसती क्षणें । काननाकडे जाती उठोन । शिखरावरी वेघोन बैसती ॥८६॥
झुंड संतांची आली जाणून । ससांग व्हावया अन्नसंतर्पण । सज्जनगडीं राहिले बहु दिन । पूजन करवाया यथाविध ॥८७॥
पूजनाची तरि कां धरिती भीड । श्रीरघुवीरा हे असे आवड । कीर्तनाची करविती घमंड । मोड न होय भक्तीसी ॥८८॥
भक्तिभावनासाठीं गुंतती । परोपकाराची मोठी प्रीति । कीर्तनाची सीमा नुलंघिती । लहान थोर न ह्मणती हरिदासा ॥८९॥
सर्वत्रामनीं उल्हास हा चि । कथा ऐकावी शिवराजयाची । त्यावरी असे दया गुरुची । करितो येकांतीं भजनासी ॥९०॥
जाणोन हेतु हा सर्वज्ञ समर्थ । लक्षोन नृपाला करितां संकेत । नमोन सद्भावें गुरुरायातें । कथारंगणीं ठाकला ॥९१॥
लज्जाभयातें करुन परती । कीर्तन कराया उठतां नृपती । देहसमंधी ते आश्चिर्य करिती । उभे ठाकले सरदार ॥९२॥
बोले रायांनीं तयास नीति । समान सर्व हि येथें असती । बैसोन ऐका हो व्हा सर्व श्रोतीं । करा परमार्थी मन निश्चळ ॥९३॥
समसमान जेथें राव रंक । धन्य ह्मणती हे बैसले भाविक । धृवपदीं ठाकले जाणते गाईक । साजसाहित्य निकें असे ॥९४॥
सद्गुरुरायाचे आठवोन चरण । ससांग करोनि मंगळाचरण । नाचतु सप्रेमें करीत भजन । टाळीस्मरणगजर होतसे ॥९५॥
युक्त बहु जाणे अर्थ सांगाया । धुरीण चि कीं स्वरयुक्त गावया । लाघवी असे नटनाटय कराया । रंग भरवाया जाणतु ॥९६॥
भक्तिवैराग्यभजनप्रशांश । ज्ञानध्यानाचें कळऊन रहस्य । साधुसंतांचा महिमा विशेष । श्रीरामप्रताप वर्णिला ॥९७॥
बहुत गाइला सप्रेमयुक्त । तें सर्व बोलतां वाढेल ग्रंथ । प्रेमजात कळाया सावध चित्त । येक दोन वचन अवधारा ॥९८॥

॥पद॥ (राग कामोद, चाल । कारण पाहिजे ॥) तैसे हे सज्जन मज । वाटती परम गुज । तयापासीम माझें निजबीज रे ॥धृ०॥
सुगंध षट्‍पदवेधे । चंद्रासी चकोर बोधे । चातकासी शोधे जळधर रे ॥१॥
तयासी बोलणें घडे । श्रवणीं वचन पडे । तेणें हा निवडे समाधान रे । रामीरामदास पाहे । सगुण शोधिताहे । क्षण हि न लाहे त्याचा संग रे ॥३॥

॥श्लोक॥ श्रीराम राम राम रे । समर्थ योगधाम रे ॥श्लोक०॥५॥

॥वोवी॥ ऐकोन यापरी सप्रेम कीर्तन । संतोष पावले साधु सज्जन । आश्चिर्य मानिती सकळ हि जन । धन्य महिमान दासाचें ॥९९॥
संज्ञा मनानें करितां समर्थ । राजा होठेला सन्मुखी भृत्य । तुकारामांनीं जाणोनि हेत । नमोन ह्मणे जी सांभाळा ॥१००॥
कीर्तनास उभेला तुकाराम । सर्वत्रांसी वाटला संभ्रम । जो नामदेवाचा अवतार उत्तम । देवदेवोत्तम साह्य जया ॥१॥
संसारामाजीं जें होत जात । अभंग बोलती तयावरुत । अनुभवीक जे सद्भक्तिवंत । धृवपदी ज्याचे चौदाजण ॥२॥
अमानित्वादि जे असती सद्गुण । जयाचा देहीं विलसती पूर्ण । सम: शत्रौ च मित्रे श्रीहरिवचन । ज्याच्या रहणींत सार्थक ॥३॥
चांग जयाचें पूर्वार्जित फळ । जो देव दयाळु त्रैलोक्यपाळ । पाठी लागोन सर्व हि काळ । परमार्थ करवितो ससांग ॥४॥

॥अभंग॥ धन्य तुकाराम भला ज्याचा प्रेम । स्वयें पुरुषोत्तम मित्र जाला ॥१॥
नाहीं भवभय काम क्रोध मोह । तरुनियां स्वयें तारी जना ॥२॥
वस्तु होऊनिया सगुणीं तत्पर । भिरकाविला दूर मानामान ॥३॥
गाती संतजन जयाचिया लीळा । स्वात्मानंदसोहळा भोगावया ॥४॥

॥वोवी॥ लाचावलासे देव सनातन । सर्वदां करितो सप्रेम भजन । विठ्ठदेवाची आज्ञा प्रमाण । साधुसंतांला आराधितो ॥५॥
प्रस्तुत दासाची कृपा संपादूं । सज्जनगडाला पातला साधु । वळोन यावया जगदानंदु । कीर्तन कराया उभेले ॥६॥
कराल श्रोते हो येथ प्रश्न । येकदां च केला काय होइ कीर्तन । अहो बहुतां वेळींचें येकदां च सांगणें । घडलें हो क्षमा करावे ॥७॥
प्रथमारंभी होतां दर्शन । करुनि दासाचें नमनस्तवन । अभंग वदला तो करा श्रवण । याचक मी आलों ह्मणोनि ॥१०८॥

॥अभंग॥ देशावरासी आलों आतां । लाभ कोणता पाहुनी ॥१॥
प्रेमें चित्तीं आनंद जाला । जीव धाला दर्शनें ॥२॥
भाग्यें जाली संतभेटी । आवडे पोटीं दुणावे ॥३॥
तुका ह्मणे श्रम केला । तितुका आला फळासी ॥४॥

॥डोळे भरीयेले रुप । चित्त पायाचें संकल्प ॥१॥च०॥४॥१॥
॥भावें भावें गीत । शुद्ध करोनिया चित्त ॥१॥च०॥६॥२॥
॥घोटावीण लाळ ब्रह्मज्ञान्याहातीं । मुक्ता आत्मस्छिती सांडवीन ॥१॥च०॥५॥३॥
॥सकळालागुनि हे चि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसे ॥१॥०॥४॥४॥
॥वैष्णवाची कीर्ति गाइली पुराणीं । साही अठराजणीं चहुं वेदीं ॥१॥च०॥४॥५॥
॥विठल विठल चित्तीं । गोड लागे गात गीती वेदीं ॥१॥४॥६॥
॥कोणपासी द्यावें माप । आपेंआप हरपलें ॥१॥४॥७॥
॥माझिया मीपणा । आला यावरी उगाणा ॥१॥च०॥८॥
॥नभमय जालें जळ । येकी हरपलें सकळ ॥१॥च०॥४॥९॥
॥अणु रेणू तो थोडा । तुका आकाशा येवढा ॥१॥च०॥४॥१०॥
॥प्रेतवत जाला शरीर हा भाव । रक्षीयेला ठाव स्मशानी ॥१॥च०॥६॥११॥
॥भाग्यवंत ह्मणों तया । शरण गेले पंढरीराया ॥१॥च०॥४॥१२॥

॥वोवी॥ जंव भेटीस यावें तों अभंग वदती । मनोगत अभंगामाजीं कळविती । ज्याला त्याला आशय सुचविती । वोव्या सरळ ते ह्मणोनि ॥९॥
ते ग्रंथगर्भी लिहितां समग्र । ग्रंथ होईल तेणें विस्तार । कीर्तनीं वदले हो अभंग फार । त्यांत दोन चार श्रवण करा ॥११०॥

॥अभंग॥ राम ह्मणतां राम चि होईजे । पदीं बैसोनि पदवी घेईजे ॥च०॥४॥
॥आह्मी रामाचे राउत । शूर जुंझारे बहुत ॥च०॥४॥
॥अहो कृपावंत किती । दीन बहु आवडती ॥१॥
त्याचा भार वाहे माथा । करी योगक्षेमचिंता ॥२॥
अहो भुलों नेदी वाट । कर धरुन दावी नीट ॥३॥
घात आघात निवारी ॥ छाया पीतांबर करी ॥४॥
अहो तुका ह्मणे भाव । स्वस्था देवा राबवावें ॥५॥

॥वोवी॥ अभंगामाजील जाणोनि रहस्य । आनंदोनिया अनुभवी पुरुष । स्तुति तुकयाची करितां हरुषें । येरु तो लागे पायांसी ॥११॥
कीर्तनाचे गजरकल्लोळीं । सकळ संशयाची होतसे होळी । मग तुकाराम तो वैष्णवबळी । आरतीस मान दीधला ॥१२॥
तवं हिंदुस्थानी गवाई भाविक । उभेला गातां तोषले सकळिक । मग संतपवाडे वानोसि हरिख । संपतां केला स्वल्प ऐका ॥१३॥

॥पद॥ सोरट॥ तारो बिरिद घटे कैसें भाई जी ॥ध्रृ०॥ यात न ज्याणो पात न ज्याणो । सदनज्यात कसाई जी ॥१॥
मोंगल जोर किया नामदेवपर । मुडदी गाय जीवाया जी ॥२॥
जिस फत्तरसे मास तुलत हय । उनकी पुजा लगाया जी ॥३॥
धनाजाटको खेत जिवाया । कबीराकी छ्याव छ्याया जी ॥४॥
सेना नाऊ सासो मेघो । आयो भयहरनाहि जी ॥५॥
विखके प्याले राजाने भेज्ये । पीवत मीराबाई जी ॥६॥

॥वोवी॥ कोणीं ते स्थळीं करो कीर्तन । सेवटीं दासाचे शिष्य प्रवीण । गावोन आरती करिती संपूर्ण । मग वाटितो प्रसादु पुरोहित ॥१४॥
सर्वत्रांचें जालें कीर्तन । अभिळासूनियां तेथील मान । रे रे बाजी करित मतिहीन । बळें चि गावया उभेलों ॥१५॥
भावबळें आपुल्या शक्तिनसार । पूजन करावें ह्मनतिलें हर । करावें ह्मणोन अमुका च प्रकार । दडणें उधार होय कीं ॥१६॥
धन्य दासाची करुणास्थिती । हीनदीनाला सांभाळ करिती । मी येक त्यामाजीं दुराग्रहमती । कांहीं गाईन अवधारा ॥१७॥
सकळ अवलक्षणीं बार्गळ चाल । माझें कर्तुत्व मज वाटे चांगल । हे कांक्षा परिहारुं दासदयाळ । केलेति स्वनाम आश्रयो ॥१८॥

॥भजनपद॥ रामदास माउली दयाकर रामदास माउली ॥ रामदास माउली परात्पर रामदास माउली ॥धृ०॥
सज्जनगिरिवरी वस्ति करुनियां । भक्ति पाहत राहिली । जनीं या सद्वाटा दाविली ॥१॥
सत्पुरुषांचा मेळा मिळउनी । आस्था ते पुरविली । अवचट लीळा ख्यात केली ॥२॥
आत्मारामीं होउनि तन्मय । कीर्तिध्वजा लाविली स्मरतां समयासी पावली ॥३॥

॥अभंग॥ पालय मां दाता भवघ्वांतहर्ता । सद्गुरुसमर्था नमोस्तुते ॥१॥
पाहीं पतितोत्धरणा पापविनाशना । परतरपावना करुणासिंधु ॥२॥
मी तों हीन दीन ह्मणवितों तुझा । आतां कोण दुजा सांभाळील ॥३॥
नाहीं भक्ति युक्ति शांति दांति दृढ । नाम जालें रुढ जगामाजीं ॥४॥
जलकूलके तृण निपट निकाज । वाह पकरे लाज राखे चले ॥५॥
पछी समुद्रोकु जिद्द जो पकरी । आया वाकु हरी लज्जा राखी ॥६॥
भाटालुविनाकापिलचिते धृउडु । चुडुंडीदेऊडु स्थानीमच्चे ॥७॥
यरकालेनिवाडु नांव टीदोनुडु  कंटिकीबडडु याडास्वामी ॥८॥
फैजबक्ष फैजरसा खुदायवंदा । झुटा तोबी बंदा कदंपोष ॥९॥
चढी हये मस्ती करलियां गंदगी । दिखाया बंदगी जिंद्गी वास्ते ॥१०॥
निन्नावा नानय्या ह्यागे दयामाडो भिन्निला देकुडी उद्धारिसो ॥११॥
स्वात्मानंदा निन्ना प्रांतकमुट्टीसो स्वस्थदली माडीसो भगुतीगळु ॥१२॥

॥वोवी॥ हे चि सदारतीं नमनस्तवन । दासमहाराज जाले प्रसन्न । प्रसादवाटणीइच्छा धरुन । बैसला समूह आनंदत ॥१९॥
येकीकडे असतां गुरुराव । येक्या बाईनें निर्मळभावें । कंदद्वय आणिले अंतरीं भरिव । स्वादिष्ट मेवा भरलासे ॥१२०॥
ठेवितां भक्तीनें पुढें आणोनि । वळखोन सद्रसा श्रीमोक्षपाणीं । भविलें पडावें हे सर्वत्रावदनीं । परि मंडळी फार स्वल्प हें ॥२१॥
आलोचन ऐसा करितां निस्पृही । शांतिपुतळी ते दुसरी बाई । सरस दुग्धघटु आणोन लवलाही । सन्मुखी ठेवी नमोन ॥२२॥
कंदासी अगत्य व्हावें पय । जाणोन देवांनो केलें साह्य । मिश्र करुनियां श्रीगुरुराय । वाटिते जाले सर्वासी ॥२३॥
सन्मिश्र होऊं द्वय ते योग्य । दिसे येक चि गोडीचें आंग । जेवि दिसतां पाहतां दोनि विभाग । नारी नटेश्वर येक चि ॥२४॥
धन्य जनाचें दैव सफळ । प्रसाद वोपिले दासदयाळें । जेवि सवंगडिया श्रीगोपाळें । काला प्रसाद वाटिला ॥२५॥
तो दिव्य प्रसादु लाभला जयांसी । जे जे अपेक्षा होती मानसीं । ते पुरविलें हरीनें काम फळासी । धन्य दासाचा करमहिमा ॥२६॥
आनंद वाटला सर्वत्रांसी । ते लहरी आली हो दुर्बळामानसीं । न सुचे चि कथन वर्णावयासी । अवधान द्या हो श्रोतेनो ॥२७॥
पुढील प्रसंगी कथन सुरस । टिपर्‍या घालिती महापुरुष । तुष्टोन तेणें अयोध्याधीश । सर्वत्रांमाजीं नटेल ॥१२८॥

॥अभंग॥ समर्थाच्या घरीं मी तों लंड भांड ॥ बोलतीं उघड गुप्त तें चि ॥१॥
करीतों टवाळी ढोंग्यासी पाहुनी । कापटयकरणी हिणवितों ॥२॥
मस्करी करीतों अंतवंतफळा । न मनी च कोणाला मस्त जालों ॥३॥
सांगतों येराला मी तों क्रियाहीन । कैसे हि सज्जन सांभाळिती ॥४॥
स्वात्मानंददाता सद्गुरुसमर्थ । जे देतिल त्यांत मग्न असो ॥५॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम सुरंग । नांदतो जेथें देव मूळ लिंग । सभोंवते मिळाले भक्त अनेग । स्वात्मानंदपद पावावया ॥१२९॥
इति श्री श्रीरामकृपा । तारक परमार्थ सोपा । देवदर्शन मनप्रार्थना । संन्यासक्रम । शामचीचरित्र । तुकारामकथा । नृपकथा । प्रसादवाटणी कथनं नाम । मान शंभर ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP