मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|मार्गशीर्ष मास|
मार्गशीर्ष वद्य १४

मार्गशीर्ष वद्य १४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


जोगा परमानंदांची समाधि !

शके १२६० च्या मार्गशीर्ष व. १४ रोजीं प्रसिद्ध भगवद्‍भक्त जोगा परमानंद यानें बार्शी येथें समाधि घेतली. तेराव्या शतकात परमार्थाचे पीक सर्वत्र सोळा आणे आलेलें होतें. जोगा परमानंद तेली जातींत निर्माण झाला. परमानंद हें याच्या गुरुचे नांव आणि जोगा हे याचें स्वत:चे नांव. हा बार्शीस रहात असे. तेथें असलेल्या भगवानाच्या मंदिराकडे तो रोज गीतेंतील एक श्लोक म्हणत, नमस्कार घालीत जात असे. अंगाला खडे टोंचूं नयेत म्हणून एका भाविकानें त्याला उंची पितांबर नेसवला. त्याची काळजी खडे टोंचू नयेत म्हणून एका भाविकानें त्याला उंची पितांबर नेसवला. त्याची काळजी घेण्यासाठीं जोगा नमस्कार जपून घालूं लागला, तों देवळांत जाण्यास उशीर झाला. आरती केव्हांच होऊन गेली होती. देवाच्या भजनाच्या आड येणारा पीतांबर त्यानें फाडून टाकला ! देवाला गरिबी आवडते, श्रीमंती नाहीं. पंढरीनाथाचा प्रेमळ भक्त म्हणून जोगा प्रसिद्ध आहे. सत्संगाची त्याला अत्यंत प्रीति होती. याची उपलब्ध कविता थोडी परंतु फार प्रेमळ आहे. ‘लावण्यगुणसागर’ परमात्मा हृदयांत प्रगटल्यावर जी अवस्था होते, ती त्यानें -

"मेघश्यामे पाहतां आपोआप । डोळ्यां लागलें वडप ।
अष्टहि सात्त्विकांचे रोप । हृदयआळां उगवलें ॥
भक्तिभावें ओल्हावलें । प्रेमफळासी पैं आलें ।
नवविधा हें पिकलें । परमाब्द म्हणे जोगा ॥

या अभंगांत सांगितली आहे. जोगा परमानंदाला परमेश्वरभक्तीबरोबरच संतसंगाचीहि विशेष आवड होती. ‘रोमांच स्वरहितु खेदाबिदु डळमळितु । पाहता नेत्र उन्मीळितु’ अशी अवस्था व्हावी, अष्ट सात्विक भाव प्रगट व्हावेत आणि प्रेमभरित अंत:करणांत देव प्रगटावा, अशी यांची इच्छा होती. ‘राया विठोबाचे डिंगर प्रेमें बोधले डुल्लती’, असे संत प्रत्यक्ष ‘सच्चिदानंदाचियामूर्ति’ आहेत, संत हें ‘माझे माहे’ आहे, अशी यांची भावना असे. जोगा परमानंदांच्या काळांत सर्वत्र ‘ब्रह्मविद्येचा सुकाळु’ झाला होता. पंढरीच्या विठोबाचे भक्त सर्व जातीत निर्माण होऊन त्यांनी समाजांत सत्प्रेरणा निर्माण केली.

- ७ आँक्टोबर १३३८

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP