मार्गशीर्ष शुद्ध ८
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
मार्गशीर्ष शु. ८ च्या मार्गशीर्ष शु. ८ रोजी गव्हर्नर जनतल बेटिंग यानें सती जाणें बेकायदेशीर आहे असा कायदा जाहीर केला. भारतीय संस्कृतीमध्यें स्त्रीधर्म अति उज्जवल स्वरुपाचा आहे. परंतु कित्येक चांगल्याबरोबर वाइटाचीहि निपज होते. सती जाण्याचें मूळचे प्रयोजन उच्च भावनेचे होतें. तरी अवनतीच्या उत्तर काळांत हा प्रकार क्रूर व निंद्य बनला. "फक्त विवाहित स्त्रियाच सती जात असें नव्हे तर दासी व रक्षा या देखील आपल्या यजमानाबरोबर स्वत:स जाळून घेत. स १७२९ मध्यें कान्होजी आंग्रे मेला तेव्हां सात स्त्रिया व स. १७५५ मध्यें रघूजी भोसले मेला तेव्हां तेरा स्त्रिया जळून मेल्या. मारवाडचा अजितसिंह मृत्यू पावला तेव्हां चौसष्ट स्त्रियांचे बलिदान झाल्याचें नमूद आहे." पंजाबांतील शीख लोकांत हा प्रकार जारी होता. ‘धर्मकृत्यांत’ हात घालण्याची इच्छा सरकारची नव्हती. लाँर्ड हेस्टिग्जनें सती जाण्यास परवाना पाहिजे अशी अट घालल्यामुळें या निंद्य कृत्यास सरकार सहमत आहेसें सिद्ध होऊन लाचलुचपतीस ऊत आला. सतीची संख्याहि वाढत चालली. एकट्या बंगाल प्रांतांत १८१५ सालीं ३७८, व १८१८ साली ८३९ स्त्रिया सती गेल्या. भारतीय धर्माबद्दलचें कौतुक नष्ट होऊन त्याचें निकृष्ट स्वरुप विरोधकांपुढें प्रामुख्यानें येऊं लागलें. बेटिंग अधिकारावर येतांच त्यानें या बाबतींत लक्ष घालून मतें मागविलीं. विल्यम केरी व राममोहन राँय इत्यादींचीं अनुकूल मतें पाहून बेटिंगने मार्गशीर्ष शु. ८ सती जाणे बेकायदेशीर आहे असा कायदा करुन टाकला. पति हेंच दैवत मानून त्याच्यानंतर सर्वस्वाचा होम करणें हा भारतीय स्त्रियांचा विशेष होता. रजपूत पतिव्रतांनीं केलेले जोहार प्रसिद्धच आहेत. पतीच्या शवाबरोबर आनंदानें स्वत:ला जाळून घेणें यास लागणारें मनोधैर्य अलौकिक खरेंच, यांत दिसून येणारी निष्ठा दिव्य खरीच, परंतु कालांतरानें याहि प्रकारांत सक्तीचा अमल होऊन यांतील पावित्र्य नष्ट झाल्यासारखें झाल्यासारखें झालें होतें.
- ४ डिसेंबर १८२९
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP