आषाढ वद्य ११

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


आषाढ व. ११
प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म !

शके १७८३ च्या आषाढ व. ११ रोजीं बंगालमधील महान्‍ संशोधक, रसायनशास्त्रज्ञ व देशभक्त सर प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म झाला.
कलकत्ता येथें वास्तव व रसायनशास्त्राचें शिक्षण संपूर्ण करुन गिलख्रिस्त या शिष्यवृत्तीच्या लाभामुळें हे सन १८८२ मध्यें इंग्लंडला गेले. तेथें रसायनशास्त्राचे डी. एस्‍ सी. झाल्यानंतर एडिंबरो येथील केमिकल सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून यांना निवडण्यांत आलें. इंग्लंडमध्यें असतांना ‘बंडापूर्वीचा व नंतरचा हिंदुस्थान’ या विषयावरील चढाओढींत मान्य झालेला यांचा निबंध जप्त झाला. व इंडियन एज्युकेशनल सर्व्हिसला हे अयोग्य ठरले.  भारतांत परत आल्यानंतर कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी सर्व्हिसला हे अयोग्य ठरले. भारतांत परत असतांना सन १८९६ मध्यें मर्क्युरस नायट्राइट या काम्पाउंडचा शोध यांनीं लावला. सन १९०४ मध्यें बंगाल सरकारनें यांना पाश्चात्य देशांतील प्रयोगशाळा पाहण्यास पाठविलें.
इंडियन स्कूल आँफ केमिस्ट्री व इंडियन केमिकल सोसायटी या दोन महत्त्वाच्या संस्था काढून यांनीं ‘हिस्टरी आँफ हिंदु केमिस्ट्री’ या नांवाचा विख्यात ग्रंथ दोन भागांत लिहिला. रसायनाच्या अनर्व, अर्व व वास्तव या तीन शाखांपैकीं अनर्व रसायनांत संशोधन सुरु करण्याचा मान यांचाच आहे. यांच्या मर्क्युरस नायट्राइटच्या शोधामुळें शास्त्रीय जगांत मोठी खळबळ उडून या हिंदी शास्त्रज्ञाचें नांव सर्वतोमुखी झालें. बर्थेलाँट, व्हिक्टर मेयर, व्होलार्ड, रास्को, इत्यादि पाश्चात्य शास्त्रज्ञांनीं यांची मुक्तकंठांनें स्तुति केली. आपल्या पगारांतून सांठलेल्या अकरा लाख रुपयांची देणगी यांनीं कलकत्ता विद्यापीठास दिली. देशाकडे व राजकारणाकडेहि यांचें लक्ष भरपूर असे.सन १९२२ सालीं उत्तर बंगालमधील जलप्रलयाचे वेळीं सरकारला करतां आलें नाहीं तें यांनीं एका हांकेसरशीं सहा लाख रुपये जमवून केलें. ‘Life and Times of C. R. Das'; `Life and Experiences of a Bengali Chemist.' `History of Hindu Chemistry' हे यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत.
- २ आँगस्ट १८६१

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP