आषाढ वद्य १२

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


“इंग्रजांनीं निघून जावें !”

शके १८६४ च्या आषाढ व. १२ या दिवशीं प्रसिध्द असा आठ आँगस्टचा ‘चले जाव’ ठराव पास झाला.
भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासांत आठ आँगस्ट या दिवसाला फारच महत्त्व आहे. १९४२ सालीं याच दिवशीं रात्रीं दहा वाजतां अखिल भारतीय काँग्रेस सभेनें सुप्रसिध्द ‘चले जाव’ चा ठराव पास केला. आदल्या दिवसापासूनच मुंबई येथें सभा सुरु झाली होती. ‘आम्ही स्वतंत्र होणार’ या आकांक्षेऐवजीं ‘आम्हीं स्वतंत्र झालों’ या बाण्याचा अवतार तेथें होत होता. हजारों लोकांची सभेस गर्दी लोटली होती. मौ. आझाद, पंडित नेहरु, म. गांधीं, इत्यादि पुढार्‍यांचीं वक्तव्यें होत होतीं. ‘मी स्वतंत आहे’ असें समजून वागा, असा आदेश म. गांधींनीं सर्वाना दिला. “करेंगे या मरेंगे’’ हा निर्वाणीचा मंत्रहि सांगितला. आणि ‘इंग्रजांनीं येथून निघून जावें’ अशा अर्थाचा ठराव आषाढ व. १२ रोजीं केला !
आणि त्याच रात्रीं अचानकपणें सर्व भारतांत धरपकड सुरु झाली. दुसर्‍या दिवशीं सकाळींच म. गांधी, महादेवभाई, देसाई, मीराबेन आणि सौ. कस्तुरबा यांना पकडून त्यांची रवानगी ‘आगाखान पँलेस’ मह्द्यें झाली. आझाद, नेहरु आदि पुढार्‍यांनाहि पकडण्यांत आलें. आणि जनता दिड्गमूढ बनली. सर्वत्र दंगली सुरु झाल्या.  सर्व देशभर क्रोध निर्माण होऊन भयंकर अत्याचार होऊं लागले. जनता व सरकार यांचा जंगी लढा सुरु झाला. सरकारी कोर्टकचेर्‍या जाळून जनता असंतोष प्रदर्शित करीत होती आणि गोळीबार, अश्रुमोचक धूर, ब्रेनगन्स, इत्यादींच्या साह्यानें सरकार तो द्डपण्याच प्रयत्न करीत होतें.
याच चवळीपासून पध्दतशीर क्रांति कशी करावी, जाळपोळ, लुटालूट करुन सरकारला त्रस्त कसें करावें, इत्यादीचें धडे भारतीय जनतेनें घेतले असले तरी तत्कालीन ब्रिटिश सरकारला कळून चुकलें कीं, भारत आतां जागा झाला आहे. याच आंदोलनामुळें सरकारला समजून आलें कीं, भारतीयांना स्वाधीनतेची भूक जबर लागलेली आहे.
- ८ आँगस्ट १९४२

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP