आषाढ शुद्ध १३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


पापाचें घोर प्रायश्चित्त !

शके १८३१ च्या आषाढ शु. १३ रोजीं हिंदुस्थानांतील प्रसिध्द क्रान्तिकारक मदनलाल धिंग्रा यानीं इंडिया आँफिसचे राजकीय ए. डी. सी. सर विल्यम कर्झन वायली यांचा खून केला !
धिंग्रा यांचें घराणें पंजाबांतील हिन्दु क्षत्रियाचें होय. इंग्लंडमध्यें आल्यावर याचे मन क्रान्तिवादाकडे झुकूं लागलें. ‘नँशनल इंडियन असोसिएशन’ या संस्थेचा वार्षिक समारंभ आषाढ शु. १३ रोजीं रात्रीम ‘इंपीरियल इन्स्टिटयूट’ च्या जहांगीर हाँलमध्यें होता. आठ वाजण्याच्या सुमारास मदनलाल या ठिकाणी आले. हाँलमध्यें प्रवेश मिळण्याची व्यवस्था करुन ते आंत शिरले. नऊ - साडेनरू वाजण्याच्या सुमारास सर्व निमंत्रित मंडळी जमा झाली. साडेदहाच्या सुमारास कर्झन वायली व त्यांच्या पत्नी समारंभस्थानीं येऊन पोंचलीं. मदनलालजींना आपणाशीं कांहीं बोलावयाचें आहे असें समजून वायलीसाहेब त्यांचेजवळ गेले. क्षणार्धात आपल्याजवळचें पिस्तुल काढून मदनलालनीं पहिला बार उडविला. लागूपाठ दुसरी, तिसरी व चौथी गोळी झाडण्यांत आल्यामुळें वायली गतप्राण होऊन जमिनीवर पडले. डाँ. लालकाका मदनलालांच्या पांचव्या गोळीला बळी पडला, आणि शेवटची गोळी स्वत:वर उडवून घेण्यासाठीं मदनलाल सिध्द झाले तों सर लेस्ली प्रोबिन यांच्या प्रयत्नामुळें मदनलालांना हें कृत्य करणें शक्य झालें नाहीं.
कोर्टातील चौकशीच्या वेळीं केलेल्या वक्तव्यांत मदनलालजी म्हणाले, “जर्मनांनीं इंग्लंड देश पादाक्रांत केल्यास त्या आक्रमणाविरुध्द लढणारा इंग्रज जर देशभक्त ठरणार असेल तर मी इंग्रजाविरुध्द केलेला झगडा अधिकच न्याय्य व देशाभिमानाचा आहे. गेल्या पन्नास वर्षात आठ कोटी हिंदी लोकांचे खून झाले, या खुनांचें पाप इंग्रजांच्या डोक्यावर बसतें असें माझें मत आहे... इंग्रजांनीं हिंन्दुस्थान देश आक्रमून राहूं नये. आपल्या पावन मायभूमीला दूषित करणार्‍या इंग्रजाला हिंदी लोकांनीं मारणें ही गोष्ट संपूर्णपणें समर्थनीय आहे.” मदनलाल यांच्या या वक्तव्याबद्दल सर्वत्र मोठी खळबळ उडाली.
१ जुलै १९०९

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP