ज्येष्ठ वद्य १३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
‘शिवराज - भूषण’ काव्याची समाप्ति !
शके १५९६ च्या ज्येष्ठ व. १३ रोजीं हिंदी साहित्याच्या रीतिकालांतील विख्यात राष्ट्रीय कवि भूषण यानें ‘श्रीशिवराज - भूषण’ नांवाचें काव्य समाप्त केलें.
हिदी वाड्गमयाच्या इतिहासांत भूषण कवीचें नांव आपल्या वैशिष्टयानें चमकून राहिलें आहे. रीतिकालांत राजदरबारांतील सर्व कवि शृंगारसात्मक काव्य निर्माण करीत असतांना कवि भूषण मात्र छत्रसाल राजा व श्रीशिवाजीमहाराज यांच्या पराक्रमांचीं वर्णनें गात असतांना कवि भूषण मात्र छत्रसाल राजा व श्रीशिवाजीमहाराज इत्यादि मोंगल बादशहांनीं आपलें धोरण थोडें उदारपणेच स्वीकारलेलें असल्यामुळें हिदु - मुसलमानांत एक प्रकारचा विश्वास निर्माण होत होता. परंतु औरंगजेबाच्या कडव्या धर्मवेडामुळें विव्देपाची ज्वाला पुन्हा भडकली. इस्लामी संस्कृतीच्या आक्रमणास बेडरपणे तोंड देण्यास उत्तरेस बुंदेलखंडांत राजा छत्रसाल सिध्द झाला, आणि दक्षिणेंत श्रीशिवरायांनीं हिदु राष्ट्राच्या स्थापनेचा विचार करुन त्या दिशेने आपला पराक्रम चालू ठेविला. भारतांतील या तेजस्वी पुरुषांचें शौर्य काव्यांत नमूद करणारा जागृत कवि भूषण हाच होता. ‘छत्रसालदशक’ नामक काव्यांत छत्रसालाचा पराक्रम वर्णिला आहे. आणि ‘शिवबावनी’, ‘शिवराज - भूषण’ यांतून श्रीशिवाजीचें गौरवपूर्ण स्तोत्र गाइले आहे.
महाकवि भूषण हा काश्यप गोत्री कनोजी ब्राह्मण असून याचा जन्म यमुनातीरावर त्रिविक्रमपूर या गांवीं झाला. चितामणि त्रिपाठी, मतिराम हे ग्रंथकार भूषणचेच बंधु समजले जातात. दक्षिणेत श्रीशिवरायांनीं सर्व शत्रूंना जिकून रायगडावर स्वतंत्र राजधानी स्थापन केली आहे, असे समजून उत्तरेंत राहणारा भूषण कवि शिवाजीचें दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रांत आला. आणि “त्यानें कलियुगांतील कवींनीं हिंदु धर्माचा उच्छेद करणार्या म्लेंछ राजांचीं कवनें रचून भ्रष्ट केलेल्या वाणीला पवित्र करण्याच्या हेतूनें गोब्राह्मणप्रतिपालक श्रीशिवरायांचेंच चरित्र नाना प्रकारच्या शब्दार्थालंकारांनीं सजवावें अशी बुध्दि धरली व तदनुसार पाचीन महाकवींचा काव्यरचनामार्ग त्यांच्याच कृपेनें समजावून घेऊन अलंकारमय शिवभूषण नामक शुभ ग्रंथ ज्येष्ठ व. १३ या दिवशीं समाप्त केला.”
- २१ जून १६७४
N/A
References : N/A
Last Updated : September 23, 2018
TOP