ज्येष्ठ वद्य ६
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
भाऊसाठीं प्राणत्याग !
शके १६८३ च्या ज्येष्ठ व. ६ रोजीं थोरले बाजीराव पेशवे यांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव उर्फे नानासाहेब पेशवे यांचें निधन झालें.
त्यांचा जन्म शके १६४२ सालीं मौजे साते (नाणें मावळ ) येथें झाला. शाहूनें मिरजवर स्वारी केली तेव्हां हे प्रथमच लढाईत सामील झाले. बाळाजी बाजीरावांनीं एकवीस वर्षे राज्यकारभार केला. शाहूच्या हयातीपर्यंत त्यांनीं सुरज भेलसे, माळवा, प्रयाग, बंगाल, कर्नाटक, नेवाई, इत्यादि स्वार्या केल्या. कुकडीच्या लढाईत निजामाचा पराभव त्यानींच केला. “आम्ही गनीम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहोंत.” असे बाणेदार उद्गार काढून त्यानें निजाम व पेशवे यांचा सलोखा राखला. याच्या कारकार्दीत मराठी राज्याचा विस्तार बराच झाला. “राज्याची हद्द कृष्णेपासून तुंगभद्रेपर्यंत पुढे सरकली. पेशव्यांची सत्ता कळसास पोंचून ते आतां हिदुस्थानांत सार्वभौमसत्ता स्थापणार असा रंग दिसूं लागला.” पर्वतीवरील देवदेवेश्वराचें देवालय त्यांनींच बांधलें. त्याचप्रमाणें पर्वतीचें तळें बांधून पुणें शहराच्या पेठा त्यांनींच वसविल्या. ते उत्तम संस्कृतज्ञ, कलमबहाद्दर,धोरणी व अत्यंत हिशेबी होते. “ते कोठेंहि असले तरी सर्व ठिकाणचे व्यवहार स्वत: पहात असत. श्रीरगपट्टणास राहून दिल्लीचा व बुंदेलखंडांतून कर्नाटकचा कारभार ते पहात असत. उत्तरेकडील वर्चस्व कमी होऊं नये म्हणून त्यांनीं लागोपाठ तीन स्वार्या करुन शत्रु - मित्रांवर वर्चस्व बाबूजी नाईक, रामचंद्र शेणवी, महादोबा पुरंदरे, रघूजी भोसले, दमाजी गायकवाड, वगैरे लोक त्यांना विरोध करीत. परंतु यांनीं सर्वाना आपल्या ताब्यांत आणिले.” भाऊसाहेब पानिपताकडे गेल्यावर हे नगर येथें निजामच्या बंदोजली. त्यांचा धीर खचून ते परत फिरले. आणि एकसारखा भाऊचा ध्यास घेतला. प्रकृति क्षीण होत चालली. बंधुशोक अनावर झाला. तेव्हां हवा पालटण्यासाठीं नानासाहेब पर्वतीवर गेले. तेथेंच ज्येष्ठ व.६ रोजीं त्यांनीं “भाऊ भाऊ” करीत प्राण सोडला.
- २३ जून १७६१
------------------
ज्येष्ठ व. ६
विवेकानंद समाधिस्थ झाले !
शके १८२४ च्या ज्येष्ठ व. ६ रोजीम हिंदुधर्माचा ध्वज जगभर फडकविणारे थोर तत्त्वज्ञानी व उत्कृष्ट वक्ते स्वामी विवेकानंद यांनीं समाधि घेतली.
त्याचें मूळचें नांव नरेंद्रदत्त. कलकत्त्याजवळ सिमूलिया या गांवीं शके १७८४ सालीं त्यांचा जन्म झाला. कलकत्ता येथील ख्रिश्चन काँलेजमध्यें शिकत असतांनाच त्यांनीं भारतीय व पाश्चात्य तत्त्वज्ञानांचा अभ्यास केला. प्रथम यांचा ओढा बुध्दिवादाकडे असून ब्राह्मसमाजाकडे कल होता. तथापि, रामकृष्ण परमहंसांच्या दर्शनानें त्यांच्या मनाची तळमळ दूर होऊन ते त्यांचे शिष्य बनले. “ईश्वरसाक्षात्कार म्हणजे धर्म अशी यांनीं धर्माची व्याख्या केली. प्रथम संन्यास, नंतर सर्व धर्माविषयीं ऐक्यबुध्दि,व नंतर ईश्वरप्राप्ति असा यांचा साधनक्रम होता. रामकृष्णपरमहंस समाधिस्थ झाल्यावर सहा वर्षे ते हिंदुस्थानभर हिंडले. हिमालय व तिबेट येथेंहि कांही काळ यांनीं घालविला. नंतर मद्रासहून जपानमार्गे अमेरिकेला गेले. तेथें भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेंत विवेकानंदांनीं चांगलाच लौकिक मिळविला. आपल्या व्याख्यानांतून भारतीय तत्त्वज्ञानाचें उज्ज्वल रुप सागून त्यांनीं सर्व अमेरिका हालवून सोडली व अगणित शिष्य जोडले. त्यांचा जगप्रसिध्द ‘राजयोग’ हा ग्रंथहि याच काळांत लिहिला गेला. त्यानंतर विवेकानंद इंग्लंडला गेले. तेथें मँक्समुल्लरसारख्या पंडिताशीं परिचय होऊन भगिनी निवेदितासारख्या शिष्या त्यांना लाभल्या. हिंदुस्थानांत आल्यावर यांनीं रामकृष्ण मठाची स्थापना करुन आपल्या वेदान्ताला जनसेवेची जोड दिली. कलकत्त्याजवळ बेलूर येथें व हिमालल्यांत मायावती येथें दोन मठ स्थापून प्लेग, दुष्काळ वगैरेंत मदत करण्याची व्यवस्था त्यांनींच केली. अमेरिकेची दुसरी सफर करावी असा यांचा विचार होता. परंतु शरीर मधुमेहानें पोंखरलेलें होतें, पूर्वीचा उत्साह ओसरलेला होता, व भाषणांतील तेजहि कमी झालें होतें. तेव्हां सिलोनहून परत फिरुन लौकरच यांनीं समाधि घेतली.
रामकृष्णांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठीं यांनीं वेदान्त मठ बेलूर या संस्थेची स्थापना केली. शिवाय मायावती येथील ‘अव्दैताश्रम’ ही संस्था प्रसिध्दच आहे.
- ४ जुलै १९०२
N/A
References : N/A
Last Updated : September 20, 2018
TOP