मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
कोंडुनि नभभांडारीं पडली, ...

बी - कोंडुनि नभभांडारीं पडली, ...

मराठी शब्दसंपत्ति


कोंडुनि नभभांडारीं पडली,
दिव्यतेज - विभवाभिनवाली,
फोडुनि नभ ती
मलीन जगती -
वर विखरुनि देईल अशी
जादू कोठें मिळेल कशी !
गाढ गूढभूगर्भीं गढलीं
बहुविधरंगी रत्नें सगळीं
विदारुनि खनि
नीरस अवनी -
ललामललिता करिल अशी
जादू कोठें मिळेल कशी !
उभ्या कड्याच्या कपारिंत
कठीण कोसे दडलेत,
त्यांस छेदुनी
पटास निर्मुनि
उघडे जन झांकिल अशी
जादू कोठें मिळेल कशी !
हृदयाच्या कातळातळीं
अक्षय जीवन घे उसळी,
पाषाणासी
भेदुनि, प्यासी
जनता ताजी करील अशी
जादून कोठें मिळेल कशी !
चिवट रूढिच्या कचाटिंत
धुरीण पडले कुचंबत,
चिरडुनि तिजला
यशोध्वजेला
दिगंतरीं रोवील अशी
जादू कोठें मिळेल कशी !

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP