मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता| धन्य ! धन्य ! आज धरा धवलर... गाणी व कविता कृष्णाजी नारायण आठल्ये अहिराणी काव्य आम्बराई नव कवी प्रल्हाद केशव अत्रे बहिणाबाई चौधरी बालकवी कवी बांदरकर कवी बी बा.भ.बोरकर ग. दि. माडगूळकर राम गणेश गडकरी श्रीराम विठ्ठल गायकवाड गोपाळ गोडसे शाहीर हैबती अनंत काणेकर केशव दत्त केशवसुत नाट्यसंगीत श्री कृष्णदासांची कविता कुसुमाग्रज माधव ज्युलियन मध्वमुनीश्वरांची कविता मंदार मंजिरी शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर मोरोपंत नागोशीकृत सीतास्वयंवर नरहरि निरंजन माधव ग.ह.पाटील अनंत फंदी शब्द फुलोरा शाहीर प्रभाकर रघुनाथ पंडित रामजोशी श्रीरंगनाथस्वामी सगनभाऊ साने गुरूजी विनायक दामोदर सावरकर केशवस्वामींची कविता स्फुट कविता संग्रह भा. रा. तांबे वामन पंडित वेदान्त काव्यलहरी श्री विष्णुदासांची कविता शब्दाचें असे कारण । शब्दु... निघे दंडका राम कोदंडपाणी;... भरत जवळि नाहीं; मातुलगराम... कृष्ण म्हणे पार्था हा आला... भला जन्म हा तुला लाधला खु... कोठें गेले थोर पृथ्वीपती ... विठ्ठल भगवंत लेंभे सवाई दु:ख पुरे रमणीय पाह... पद प्रसन्न फुलल्या फुलां... ढगापाठीमागें ढग जमुनि हे ... सागराची बाव । पहाडाची धाव... कृष्णाजी नारायण आठल्ये धन्य ! धन्य ! आज धरा धवलर... दत्तात्रय कोंडो घाटे गणेश हरि पाटिल भवानीशंकर पंडित दा. अ. कारे शंकर बळवंत चव्हाण दिवस सुगीचे सुरू जाहले ओल... गिरीश तळहातीं शिर घेउनिया दख्खन... अरविंद धडधडा झडे चौघडा, गडावर चढ... नारायण वामन टिळक जाहली घाई सांग ना, सुचत न... कांटेरी वेलीचें जाळें रठ्... कोंडुनि नभभांडारीं पडली, ... करवंदीच्या जाळींत घोस लो... हृदयींच्या अंधारांत लाविय... केशवकुमार - धन्य ! धन्य ! आज धरा धवलर... मराठी शब्दसंपत्ति Tags : marathpoemकवितामराठी हिमपतन Translation - भाषांतर धन्य ! धन्य ! आज धरा धवलरूप झाली ॥ध्रु०॥गगनांतुनि हिस न झरे, अमृताचे गळति झरे,स्वर्गंगाआज सहज धरणीवर आली ! १कौमुदींत शशि वितळे, रजतकांति कीं निथळे तेजाच्या सागरांत अवनि कीं बुडाली ? २दुग्धाचा झरत पूर, मोत्यांचा गलत चूर.खाण हिर्याची फुटली काय अंतराळीं ? ३नाचति सुरबालिका, फुटति म्हणुनि तारका ?किरणांचे कण सांडति अविरत का खालीं ? ४शुभ्र पारिजातका, बहर आज येत का ?पुष्पांचा म्हणुनि सडा पडत भोवतालीं ५धवलसृष्टि, धवल गगन, दशदिशाहि धवलवदन,प्रकट मूर्त रूपें कीं धवलता जहाली ? ६वृक्षवेलि शुभ्रपर्ण, फत्तरही स्फटिकवर्णसंगमरवरी स्वरूप सदनें हीं ल्यालीं ! ७सप्तरंग एकजीव, होति, त्यजुनि - भेदभाव,शुभ्रकांति विलसे मृत कृष्णता कपोलीं ! ८अंधकार आज मरे, नैराश्यहि सकल सरे,पुण्याची कीं पहांट म्हणुनि ही उदेली ! ९आशा, पावित्र्य, प्रेम, बांधिति हे धवल धामराहिल का सतत असें जग भविषकालीं ? १०[ ता. २५ डिसेंबर १९२७ रोजी लंडन तेथें झालेल्या अपूर्व हिमवृष्टीस उद्देशून प्रस्तुत कविता लिहिलेली आहे. ] N/A References : N/A Last Updated : January 22, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP