मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
सागराची बाव । पहाडाची धाव...

य. न. केळकर - सागराची बाव । पहाडाची धाव...

मराठी शब्दसंपत्ति


सागराची बाव । पहाडाची धाव
थोराड बडव । सुळक्याचं ।
सूर्यांचें अभंग । माचाडाचा चाक
मुळीं कुचकूच । करीना तें ॥
दिवसाचा शुभ्र । नाडा चाकीं सर
रात्रीचा सौंदर । मळीण तो ॥
मोट्करी मौजा । रगडुनी गाई
घुमविली राई । भोंतालची ॥
वार्‍याची चपळ । बैल भीमबळ
परी चळपळ । कांपताती ॥
विजेचा आसूड । मारी फडाफड
बैल जीवापाड । ओढ घेती ॥
ओडत्याती बैल । झराझर आलं
जळाचं मोहळ । निथळत ॥
लाखो पखालींची । मेघाची वो मोट
क्षितिजाची वाट । चढों येते
धो धो घुमराई । झाली एक घाई
मोट रिती होई । कोसळतां
खोर्‍याचें थारोळ । जळ उचंबळ
नद्यांचे वहाळ । जळ उचंबळ
नद्यांचे वहाळ । खळाळती
सृष्टीच्या शेतांत । वावरांचे वाफ
वहाले आपाप । भिजोनिया ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP