मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता| कृष्ण म्हणे पार्था हा आला... गाणी व कविता कृष्णाजी नारायण आठल्ये अहिराणी काव्य आम्बराई नव कवी प्रल्हाद केशव अत्रे बहिणाबाई चौधरी बालकवी कवी बांदरकर कवी बी बा.भ.बोरकर ग. दि. माडगूळकर राम गणेश गडकरी श्रीराम विठ्ठल गायकवाड गोपाळ गोडसे शाहीर हैबती अनंत काणेकर केशव दत्त केशवसुत नाट्यसंगीत श्री कृष्णदासांची कविता कुसुमाग्रज माधव ज्युलियन मध्वमुनीश्वरांची कविता मंदार मंजिरी शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर मोरोपंत नागोशीकृत सीतास्वयंवर नरहरि निरंजन माधव ग.ह.पाटील अनंत फंदी शब्द फुलोरा शाहीर प्रभाकर रघुनाथ पंडित रामजोशी श्रीरंगनाथस्वामी सगनभाऊ साने गुरूजी विनायक दामोदर सावरकर केशवस्वामींची कविता स्फुट कविता संग्रह भा. रा. तांबे वामन पंडित वेदान्त काव्यलहरी श्री विष्णुदासांची कविता शब्दाचें असे कारण । शब्दु... निघे दंडका राम कोदंडपाणी;... भरत जवळि नाहीं; मातुलगराम... कृष्ण म्हणे पार्था हा आला... भला जन्म हा तुला लाधला खु... कोठें गेले थोर पृथ्वीपती ... विठ्ठल भगवंत लेंभे सवाई दु:ख पुरे रमणीय पाह... पद प्रसन्न फुलल्या फुलां... ढगापाठीमागें ढग जमुनि हे ... सागराची बाव । पहाडाची धाव... कृष्णाजी नारायण आठल्ये धन्य ! धन्य ! आज धरा धवलर... दत्तात्रय कोंडो घाटे गणेश हरि पाटिल भवानीशंकर पंडित दा. अ. कारे शंकर बळवंत चव्हाण दिवस सुगीचे सुरू जाहले ओल... गिरीश तळहातीं शिर घेउनिया दख्खन... अरविंद धडधडा झडे चौघडा, गडावर चढ... नारायण वामन टिळक जाहली घाई सांग ना, सुचत न... कांटेरी वेलीचें जाळें रठ्... कोंडुनि नभभांडारीं पडली, ... करवंदीच्या जाळींत घोस लो... हृदयींच्या अंधारांत लाविय... मोरोपंत - कृष्ण म्हणे पार्था हा आला... मराठी शब्दसंपत्ति Tags : marathipoemकवितामराठीमोरोपंत कर्णार्जुन युद्ध Translation - भाषांतर कृष्ण म्हणे पार्था हा आला क्रोधांध कर्ण अंतकसा ॥मृत्युंजय - वरपात्रा तूं याचा न करिशील अंत कसा ॥१॥याच्या शरासि साहे ऐसा त्रि - जगांत तूंचि एक रणीं ॥वीर उदंड असति परि त्याला पार्था तुझी न ये करणी ॥२॥कर्णातें जिंकाया तूं शक्त तव प्र - ताप मी जाणें ॥झाल प्रसन्न तुज तो जो जाळी त्रिपुर एकलें बाणें ॥३॥पार्थ म्हणे कृष्णा मज जय घडतो आजि निश्चयें हा कीं ॥बा सर्व - लोक - गुरु तूं आहेसि बहु प्रसन्न हय हाकीं ॥४॥आजि पहाशील सख्या मच्छर - शकलीकृतांग कर्णातें ॥तदसृक्कण - सिक्तातें आकाशातेंहि शोण - वर्णातें ॥५॥मी त्याचें कीं माझें तो आजि करील निश्चयें हनन ॥मन न व्यग्र तुझें हो रणिं जय - मरणार्थ आमुचें जनन ॥६॥जिष्णुसि हरि ने धर्म - स्वांतींचें उद्धरावया शल्य ॥कर्ण रथासह आणी सत्वर समरांगणांत तो शल्य ॥७॥उत्साह तेज विद्या शिक्षा बळ धैर्य शौर्य दोघांचें ॥तुल्यचि ज्यापरि गंगा - यमुनांच्या पावनात्व ओघांचें ॥८॥इंद्र म्हणे कर्ण - वधें हो पार्थ स्तोत्र - पात्र अ - मरांत ॥सूर्य म्हणे पार्थ - वधें संपादू वि - जय कर्ण समरांत ॥९॥पार्थाकडील कटकें कर्णें, कर्णाकडील त्या पार्थें ॥केलीं तीव्रशरांहीं भग्नें मग्नें भयीं हत - स्वार्थें ॥१०॥वर्षति अन्योन्यावरि कर्णार्जुन ते घनावरी घनसे ॥पुरुहूत - दूत - वात - द्युमणिकरां शर - गृहांत रीघ नसे ॥११॥तों आला वध - समय द्विज - शापहि भू - मुखेंचि तो डावें ॥गिळवी रथ - चक्र म्हणे रामास्त्रा प्रेम तूंहि सोडावें ॥१२॥चक्र क्षितिनें गिळितां न स्मरतां भार्गवास्त्र रवि -जाला ॥स्पर्शे विषाद, म्हणती बळ - तेजो - नाश - हेतु कवि जाला ॥१३॥तो वृष भूमि - ग्रस्त - स्यंदन - चक्रासि उद्धरायातें ॥उतरे स्व - रथाखालें करुनि असें अ -तुल युद्ध राया तें ॥१४॥उद्धरण करूं पाहे कर्ण भुजांनीं धरूनि चक्राचें ॥परि पृथ्वी सोडीना जाणों व्रत घेतलेंचि नक्राचें ॥१५॥x-------------x------------x----------xकर्णावरि बहु कोपे पार्थ जईं तेधवां अनळ साचा ॥देह ज्वाला - माली भासे त्या रण - मखीं अनळसाचा ॥१६॥शर सोडिला रवि - सुतें धीर जनेंहि स्व - धीर यामागें ॥जो सोडिलाच नव्हता व्यसनांत कधींहि मणि जसा नागें ॥१७॥त्या खर - शर - प्रहारें विव्हळ झाला महेंद्र - सुत राया ॥जरि होता निकट कुशल मंत्री प्रभु बाण - सर्प उतराया ॥१८॥ऐसा निज - भुज - विक्रम दावुनि सर्वा भटांसि शुद्ध रणीं ॥बहु यत्न करी प्रार्थी परि धरिलें सोडिनाचि चाक रसा ॥द्विज - शाप मान्य पति - सा गुरु कर्ण न मान्य तीस चाकर - सा ॥२०॥देव म्हने पहिलें गुरु - नाम मग स्व - धनु बाण बरवें घे ॥खंडीं शिर रिपु पुनरपि जों रथ - रत्नाचिया न वर वेंघे ॥२१॥प्रभुची आज्ञा होतां पार्थं प्र - खरेषु सोडुनी त्वरित ॥रण - दक्षा स्व - वि - पक्षा करि कक्षा केतु खंडुनी ज्वरित ॥२२॥तुटला ध्वजचि न केवळ वि - जयाचा भरवंसाहि तुटला हो ! ॥सुदृढश्रुबिंदुसह तो पडला बळ धर्य - सेतु फ़ुटला हो ! ॥२३॥केतु च्छेदुनि पार्थ द्यु - मणि - सुताचे हरावया प्राण ॥जोडी गांडीव - गुणीं शत्रु - हर हरायुधा असा बाण ॥२४॥योजुनि महास्त्र - मंत्रित शर विजय म्हणे “ जरि स्व - गुरु सर्व - ॥तोषविले असतील, ज्ञान - बळाचा नसेल तिळ गर्व; ॥२५॥विधिनें जोडुनि नेलें असेल जरि कीर्तनें न तपनाशा ॥तरि या शरें वृष मरो, हरिचीच पुरो पुरो न तपनाशा ” ॥२६॥ऐसें वदोनि पार्थें ओढुनियां स - गुण - बाण कर्णांत ॥पाठविला काळें निज - दूत तसा व्हावयासि कर्णांत ॥२७॥x-----------x----------x------------x-------------x-------------xशाण - निशित - मुख - बाण प्राणभृदीढ्यार्क - सूनुच्या अमळा ॥खंडी नाळापासुनि कमळा मारुत तसा शिर:कमळा ॥२८॥साप्ताश्रु शिर वृषाचें प्रथम क्षोणी - तळीं गळालें हो ॥मग स - कुसुम - वृष्टि तनू स - धर्म - भय शत्रु - बळ पळालें हो ॥२९॥कर्ण - शरीरापासुनि तेजु निघालें दिवा - करीं शिरलें ॥गुरु - हृच्छोक - तमावरि जाणों सत्पुत्र - रत्न तें फ़िरलें ॥३०॥ऐसा केला असतां कृष्ण - कृपेनेंचि कर्ण - नाश तदा ॥पांडव पांचाळ करिती विजयाच्या वीर्य - वर्णना शतदा ॥३१॥बहु - सिंह - नाद वाद्य - धनि जय - जय - कार करिति धर्म - बळें ॥म्हणति सुधिष्ठिर तरला दुस्तर कर्णार्णवासि धर्म - बळें ॥३२॥ N/A References : N/A Last Updated : January 22, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP