दत्तभक्त - शेगावचे गजानन महाराज
महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात.
(प्रकट १८७८-१९१०)
गजानन महाराजांचे पूर्ववृत्त उपलब्ध नाही. दिगंबर अवस्थेत ते शेवगाव येथे एका मठाच्या बाहेर प्रकट झाले. उंच शरीरयष्टी पिळदार देह, तेजस्वी डोळे आणि अजानबाहू, असे त्यांचे दर्शन होते. सिद्धपुरुषाची सर्व लक्षणे त्यांच्या ठिकाणी होती.
दत्तप्रभू व श्रीराम ही त्यांची दैवते होती. त्यांच्या. प्रेरणेने राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तीचे राममंदिर तयार झाले. मंदिराच्या पूर्वेस महाराजांची समाधी आहे. याठिकाणी दरवर्षी त्त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव मोठया प्रमाणात होत असतो. शेगाव संस्थानाने गजानन महाराजांचे चरित्र प्रसिद्ध केले आहे. मंदिरात त्यांच्या चरित्रातील अनेक प्रसंग चित्रांमधून प्रकट झाले आहेत.
त्यांनी अनेक चमत्कार केले. त्यांचे अनेक भक्त आहेत. दासगणु यांच्या ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथाची अनेक पारायणे आजही हजारो लोक करतात. ‘गण गण गणात बोते’ हा त्यांच्या जपाचा मंत्र.
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2018
TOP