दत्तभक्त - नानामहाराज तराणेकर
महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात.
(सन १८९६-१९९३)
इंदूर, उज्जैन येथे दत्तावतारी नाना महाराज तराणेकर यांचे वास्तव्य असल्यामुळे यांचा शिष्यपरिवार तिकडे मोठा आहे. मध्यप्रदेशातील तराणे या गावी यांचा जन्म झाला. यांचे पूर्वज खानदेशांतील घाटनांदरा या गावी होते. वासुदेव भटजी जोशी (वाघे) या वैदिक ब्राह्मणाच्या कुळात तराणेकरांचा जन्म झाला. वासुदेवानंदसरस्वती यांची कृपा या घराण्यावर होती. वडिलांच्या संगतीत त्यांनी उपासना सुरू केली. गुरुचरित्राचे सप्ताह लहानपणीच केले. दत्ताचे लाडके लेकरू म्हणून लोक यांना ओळखू लागले. या मार्तंडाची दत्तप्रभूंवर मोठी निष्ठा होती. ‘हा मार्तंडनामे पुन्हा । श्रीएकनाथांचा अवतार म्हणा । ह्रदयी रमता दत्तराणा । आवडीने जयाचिया ।’ असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते.
सन १९१४ मध्ये इंदूरचे शंकरराव डाकवाले यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. परंतु संसार नीटपणे झाला नाही. पत्नीचे निधन झाल्यावर तराणेकर यांनी काशीची यात्रा केली. मथुरा, शेगाव इत्यादी तीर्थायात्रा केल्या. हे बद्रिकेदारला गेले होते. अनेक योगी लोकांची, सत्पुरुषांची यांनी दर्शने घेतली. त्यांच्यावर गुळवणीमहाराजांचा प्रभाव मोठा होता. तराणेकर यांनी अनेक ठिकाणी यज्ञ केले. यांचे वास्तव्य उत्तरार्धात इंदूर येथे होते. यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपदी परिवाराची निर्मिती झाली. त्रिपदी म्हणजे वैदिक प्रार्थना, मंत्रपाठ आणि जप यांचे विकसित रूप आहे. त्यांच्या परिवाराने या मार्गांची जोपासना केली आहे. प्रासादिकमंत्र, स्तोत्र व प्रार्थना यांना महत्त्व आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2018
TOP