दत्तभक्त - प्रस्तावना
महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात.
या ठिकाणी महत्त्वाच्या दत्तभक्तांचा चरित्रात्मक निर्देश करावयाचा आहे. काही दत्तभक्तांची महती प्रथमपासून इतकी वाढलेली दिसते की, त्यांना अवतारी पुरुष म्हणूनच ओळखले जाऊ लागले. श्रीपादवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती हे इतिहास काळातले वा कलियुगातले पहिले दोन दत्तावतार असल्याने त्यांचा विस्तृत परिचय आपण यापूर्वीच करून घेतला आहे. आता येथे ज्यांच्या नावावर अनेक दत्तक्षेत्रे वा दत्तस्थाने ओळखली जातात त्यांची प्रामुख्याने ओळख करून घेऊ. त्यांच्या परंपरेत नावारूपास आलेले आणि ज्यांची वाङमयसंपदा उल्लेखनीय आहे अशांचाही निर्देश येथे करावयाचा आहे. काहींना साक्षात् दत्तापासून उपदेश वा साक्षात्काराचा लाभ झाला असेल तर काहींना दत्तावताराची परंपरा लाभलेली असेल. या प्रकरणातील चरित्रमाला मुख्यत: कालानुक्रमाने आहे. प्रमाणबद्धता राखण्याचा शक्य तो प्रयत्न केला असला तरी काही अप्रसिद्ध वा दुर्मिळ दत्तभक्तांच्या चरित्रांचा मुद्दास विस्तार केलेला आहे. सर्व दत्तभक्तांची नोंद घेणे अशक्य असले तरी आवश्यक त्या परंपरा सुटलेल्या नसाव्यात.
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2018
TOP