मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
दिंडोरीचे मोरेदादा

दत्तभक्त - दिंडोरीचे मोरेदादा

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १९२२-१९८८)

पुणे येथील सारसबागेशेजारी स्वामी समर्थांचा एक मठ आहे. त्याच्याशी संबंधीत असलेले मोरेदादा सर्वांच्या परिचयाचे आहेत. यांचे नाव खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा असे असून त्यांचा जन्म नाशिक येथील दिंडोरी येथे झाला. त्यांना त्यांच्या मातोश्रींनी लहानाचे मोठे केले. शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती त्यांची फार लहानपणापासून झाली. वयाच्या आठव्या वर्षी कामकोटीच्या शंकराचार्यांसमोर त्यांनी रामरक्षा, विष्णुसहस्रनाम, गीता, ज्ञानेश्वरी इत्यादींचा अभ्यास केला. घरातील शेती तेच सांभाळत होते.

सन १९८४ साली त्यांचा संबंध स्वामी समर्थांचे एक शिष्य पिठले महाराज यांच्याशी आला, यांचा अनुग्रह त्यांना मिळाला. मोरे दादांनी यानंतरचे सर्व आयुष्य स्वामींच्या कार्याचा प्रचार करण्यात घालविले. अनेक ठिकाणी हिंडून त्यांनी दु:खी, पिडित लोकांना उपाय सांगून त्यांचे क्लेश दूर केले. अनेकांच्यावर संस्कार करून त्यांनी स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक विकासाची उभारणी केली. एका शुभ दिनी दिंडोरी येथे त्यांनी स्वामींच्या चरणी देह अर्पण केला.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP