दत्तभक्त - रामकृष्ण क्षीरसागर
महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात.
(सन १९३४-१९९९)
आपल्या परिवारात हे क्षीरसागरमहाराज म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचा शिष्यपरिवार खूप मोठा आहे. क्षीरसागरांचा जन्म नगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला. यांना लहानपणापासून वैराग्य, आत्मज्ञान व ईश्वरप्राप्ती यांचा नाद होता. वयाच्या सातव्या वर्षी यांना ईश्वराचे दर्शन झाले. सालंकृत अशा पांडुरंगाने यांना दर्शन दिले. नंतर एके दिवशी दुपारी चारच्या सुमारास यांना आणखी एक साक्षात्कार झाला. आकाशातून एक दिव्य व्यक्ती त्यांच्याकडे पाहात होती. त्या व्यक्तीच्या विशाल नेत्रांनी क्षीरसागर यांचे जीवन पालटले.
नंतरच्या काळात क्षीरसागरांनी तपश्चर्या केली. यावेळी यांना श्रीनरसिंहसरस्वती यांचे मार्गदर्शन झाले. त्यांनीच यांना गाणगापूर येथे बोलावून यांच्यावर कृपा केली. क्षीरसागर यांनी नगर येथे एकास्थानी बसून पंचवीस वर्षे खडतर तपश्चर्या केली. या काळात यांनी निंदा, कुचेष्टा, अपमान, छळ शांतपणे सोसला. या काळात यांना श्रीगुरुंचे प्रसन्न दर्शन झाले आणि वेदकार्यासाठी पुढील आयुष्य खर्च करण्यासाठी श्रीगुरूंनी प्रेरणा दिली.
क्षीरसागर महाराजांनी नगर येथे सावेडी कट्टयावर श्रीदत्तनिवास स्थापन करून वेदकार्य सुरू केले. वेदांत नगर स्थापन करून वेदांचे रक्षण, संवर्धन आणि प्रसारण यांनी केले. त्यांच्या दर्शनासाठी अनेक भक्त यांच्या आश्रमात जमा होतात. शृंगेरीच्या शंकराचार्यांनी क्षीरसागर हे दत्तात्रेयांचे अवतार आहेत असे म्हटले आहे. नगर येथील यांच्या दत्तस्थानात यांचा षष्ठयाब्दीपूर्तीचा समारंभ मोठया थाटाने केला. मुंबई, पूणे, सोलपूर, औरंगाबाद, ठाणे, पनवेल. सांगली, राहुरी, अहबदाबाद इत्यादी ठिकाणांहून अनेक भक्तजन नगराला येऊन सत्यंगमंडळातून दत्तप्रभूंची सेवा निवमित करीत असतात.
असे हे क्षीरसागर महाराज दि ८ सप्टेंबर ९९ रोजी नगर येथे अनंतात विलिन झाले.
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2018
TOP