मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त| साधुमहाराज कंधारकर प्रमुख दत्तभक्त प्रस्तावना गोरक्षनाथ चक्रपाणी गोविंदप्रभू श्रीचक्रधर जनार्दनस्वामी एकनाथ दासोपंत मुक्तेश्वर महिपतिदास योगी किनाराम अघोरी सिद्धेश्वर महाराज निपटनिरंजन दत्तावतार दत्तस्वामी विरूपाक्षबुवा नागनाथ नारायणस्वामी साधुमहाराज कंधारकर चिदंबर दीक्षित भैरवअवधूत ज्ञानसागर दत्तनाथ उज्जयिनीकर रघुनाथभटजी नाशिककर श्रीनिरंजन रघुनाथ कृष्णेन्द्रगुरु अनंतसुत कावडीबोवा माणिकप्रभू नारायण महाराज जालवणकर विष्णुबावा ब्रह्मचारी बालमुकुंद अक्कलकोटचे स्वामी वासुदेव बळवंत फडके आळंदीचे नृसिंहसरस्वती नारायण गुरुदत्त महाराज गुरुकृष्णसरस्वती वामनराव वैद्य वामोरीकर पंतमहाराज बाळेकुंद्रीकर वासुदेवानंदसरस्वती माहुरचे विष्णुदास साईबाबा दत्तमहाराज अष्टेकर नारायणमहाराज केडगावकर रंग अवधूत गुळवणी महाराज मोतीबाबा जामदार विद्यानंद बेलापूरकर औदुंबरचे नारायणानंद स्वामी गोपाळबुवा केळकर दिगंबरबाबा वहाळकर देवगडचे किसनगिरी महाराज ताई दामले दिंडोरीचे मोरेदादा वि. ग. जोशी (दिगंबरदास) नानामहाराज तराणेकर दत्तमहाराज कवीश्वर रामकृष्ण क्षीरसागर गुरुताई सुगंधेश्वर गगनगिरी महाराज ॐ श्रीदत्त, ठाकूर महाराज आणखी काही दत्तभक्त शेगावचे गजानन महाराज दत्तभक्त - साधुमहाराज कंधारकर महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. Tags : dattasaintदत्त भक्तसंत साधुमहाराज कंधारकर Translation - भाषांतर (समाधी, सन-१८१२)मराठवाडयातील कंधारचे साधुमहाराज हे एक मोठे दत्तोपासक अठराव्या शतकात होऊन गेले. परभणी जिल्हयात पूर्णा स्टेशनजवळील कानडखेड या गावी एक अश्वलायन शाखेचा ब्राह्मण राहात असे. त्याचे नाव रामजीपंत व त्याच्या पत्नीचे नाव रमा असे होते. प्रपंच आणि परमार्थ यांत दोघांची गती चांगली होती. हरिभजनात दोघांना प्रीती होती. पण पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे उभयता कष्टी असत. काही कृपा संपादन करावी म्हणून रामजीपंत रमाबाईसह माहुरास येण्यास निघाले. मनात दत्ताचे ध्यान सतत होते. तीर्थावर स्नान करून दोघांनी दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. मनोभावे प्रार्थना करून मध्यरात्रीच्या वेळी दत्तात्रेय बटुवेषाने प्रगटले आणि त्यांनी रमाबाईस श्रीफलाचा प्रसाद दिला आणि ‘या प्रसादें होईल सुत । तो माझा परम भक्त ।’ असा आशीर्वाद दिला. ‘भजनमार्ग वाढवील । मुक्तीची गवादी घालील । मुमुक्षु पांथीक येतील । धावुनी तृप्त व्हावया ॥ एकनाथ भक्तजेठी । अवतरेल तुम्हां पोटीं ॥’ असे सांगून द्त्तप्रभू गुप्त झाले.या कृपाप्रसादेकरून रमाबाई गर्भवती होऊन तिला यथासमयी पुत्र झाला. त्याचे नाव हनुमंत ठेवण्यात आले. त्या काळास अनुसरून विद्यार्जनास प्रारंभ झाला. घराण्यातील दत्तभक्तीचा छंद त्याला लहानपणापासूनच होता. द्त्तभेटीसाठी तो उत्सुक बनला. ‘कै हें संसारबिरडें फिटेल । कैं तो स्वामी मज भेटेल । युगाहुनीया वडील । निमिषोन्निमिष मानीतसे ॥’ अशी दत्तभेटीची मनात तळमळ असताना तो आपल्या आईवडिलांची सेवा मात्र चुकत नसे. त्याच्या या सेवारत वृत्तीने दत्तप्रभू संतुष्ट झाले आणि यतिवेष धारण करून ते त्याच्या अंगणी एकदा आले. यतीने हनुमंताची विचारपूस केली आणि त्याला गोदातटाकी सिद्धेश्वर लिंगापाशी येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे हनुमंताची व दत्तात्रेयांची भेट झाली. हनुमंताने दत्तप्रभूंना साष्टांग नमस्कार करून विनविले. ‘आतां योगीवर्ये कृपावंते अनसुयात्मजे माझी माते । भावें शरण आलों तूंते । सनाथ पंथें मिरवी का?’ यतिरूपधारी दत्तात्रेयांनी त्याला कृपाशीर्वाद दिला आणि स्वरूप प्रकट केले. ‘तीन शिरें सहा कर । माथां मिरवे जटाभार । अंगीं शोभे भस्म सुंदर । काषाय वस्त्र मेखला ॥ अरिदर कमंडलू माला । त्रिशूल डमरू करीं धरिला । ऐसिया देखतां स्वरूपाला आनंदला हनुमंत ॥’ या द्त्तभेटीने हनुमंताचे जीवित कृतार्थ होऊन गेले. यानंतर हनुमंतास माहुरास जाण्याची इच्छा झाली. श्रीदत्तचरणांशी एकांत करून ‘जैसी द्त्तमूर्ती पाहिली । तैसीच ह्रदयीं आठविली.’ येथे तप करीत असतानाच शेषफणीच्या सावलीत ध्यानस्थ बसलेली याची मूर्ती जोतसिंह नृपनाथाने पाहून त्याला आपल्या नगरीत नेले. पांचाळपुराहून हनुमंत तथा साधुराज पंढरपुरास गेले. काशी, प्रयाग, गया, नागपूर, पंढरी इत्यादी क्षेत्रांच्या त्यांनी यात्रा केल्या. नामस्मरण, हरिकीर्तन भजनपूजन यांत रंगून गेलेल्या साधुमहाराजांनी संताचार्यासारखे शिष्य तयार केले. नामस्मरणाचा सुकाळ केला. अनेक जीवांचा उद्धार करून साधुमहारजांनी दत्त व विठ्ठल यांच्या ऐक्यावर आधारलेला आपला एक विशिष्ट संप्रदाय उभा केला. भास्कर-रूक्मांगद-यशवंत-हनुमंत-धुंडिराज-सीताराम-शंकरमहाराज आणि श्रीसंताचार्य बापूमहाराज-बाबूमहाराज अशी विरसणीची परंपरा साधुमहाराजांची आहे.साधुमहाराजांना नाथांचा अवतार मानतात. त्यांना दत्तदर्शनाची ओढ नेहमीच असे. असेच एकदा माहुरास जाण्यास ते निघाले. पत्नीला बरोबर घ्यावे असे त्यांना वाटले. पण ‘गर्भवती कन्या ठेवुनी घरीं । आपण कैसें जाये माहुरीं । तरी प्राणेश्वरा अवधारीं । जावें तुम्हांसी न वर्जी’ असे तिने सांगितले. साधुमहाराज शिष्यांना बरोबर घेऊन माहुरास निघाले. अरुणावतीस म्हणजे वाढवण्यास येऊन त्यांनी हरिहरात्मक परमेश्वराचे दर्शन घेतले. नंतर ते उंबरखेड म्हणजे उमरखेडास आले. तेथे त्यांना बरे वाटेनासे झाले. संताचार्यास ते म्हणाले. ‘आम्हांसी दर्शन दत्तात्रेय । देईल ऐसें दिसेना ॥’ ना पंढरी ना माहुर अशी स्थिती असताना त्यांना तेथील आईनाथांनी दृष्टांत दिला की, ‘माझिया वामभागीं । निश्चित । सखया समाधिस्थ पैं व्हावें ॥’ साधुराजांनी दत्तप्रभूंची प्रार्थना केली. पांहुरंगाला आळविले. वत्सासाठी धेनू धावत येते तसे साधुमहाराजांसाठी दत्त व पांडुरंग धावत आले. श्रीदत्तात्रेयांच्या सांगण्यावरून त्यांनी संन्यास घेतला आणि ‘चैत्र शुद्ध एकादशीस । शके सतराशे चौतीस’ या मुहूर्तावर आधुमहाराजांनी समाधी घेतली. दत्त व पांडुरंग यांची ऐक्यभावाने उपासना करणार्या साधुमहाराजांचे ओवीबद्ध चरित्र दासमारुतींनी लिहिलेले प्रसिद्ध आहे. N/A References : N/A Last Updated : January 30, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP