मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय ४७ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय ४७ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ४७ Translation - भाषांतर ॥ श्रीणेशाय नमः ॥ शौनक विचारी सूताप्रत । दशहरा देवी आश्विनांत । दशमी तिथीस प्रख्यात । त्या दिवशीं शमीची पूजा कां करिती ॥१॥सूत सांगती पूर्व वृत्तान्त । शंखासुरास मारून विष्णु देत । महावीर परपुरंजय विधात्याप्रत । सांगोपांग वेद सारे ॥२॥त्यास पाहून हर्षित । ब्रह्मदेव गणनायकास स्मरत । तेव्हां ते वेद गणेशाप्रत । गेले स्वजनकाकडे ॥३॥पूर्वी कपिलरूपें कर्मसिद्धयर्थ । निर्मिले होते जे पवित्र । शंख असुर पापी चोरून नेत । वेदशास्त्रे तदनंतर ॥४॥तें पाहून परम आश्चर्य । ब्रह्मा स्तवी विघ्नपा सदय । वेदांच्या निर्विघ्न लाभार्थ हतवीर्य । प्रार्थितसे महामुनीला ॥५॥तेव्हां आकाशवाणी महाअद्भुत । अवचित त्यावेळ होत । शमीचें करी पूजन एकचित्त । तरी विधे तूं विघ्नहीन ॥६॥शमी तीच गणेश वर्तत । भेद कांहीं न उभयतांत । आजच त्या शमीस विधानोक्त । पूजी तूं ब्रह्मदेवा ॥७॥तदनंतर वेदांस स्पर्श करून । करी तयांस प्रशस्त महान । ऐसा संदेश देऊन । गजाननें थांबविली आकाशवाणी ॥८॥ती ऐकून अतिर्षित । ब्रह्मा देवमुनींसहित । दिव्य शमीचें पूजन करित । नंतर स्पर्शी वेदांसी ॥९॥ज्या वेळीं ब्रह्मदेव शमी पूजित । ती तिथि आश्विन दशमी असत । सायंकाळची वेळ वर्तत । तदनंतर दशहरा तिथि झाली ॥१०॥शमीसंयुक्त ती तिथि असत । याचें रहस्य जाण सांप्रत । सर्व कार्यांत सिद्धि लाभत । जरी भावें ऐकशील ॥११॥दहा दिशांत निवसत । भयप्रद भूतें जगतांत । कर्यध्वंस ती करित । क्रूर प्रबळ अत्यंत जीं ॥१२॥दशमी ती त्यांस मारित । शमी पूजाबळें त्वरित । म्हणून दशहरा ख्यात । सर्व कार्य प्रसिद्धिस्तव ॥१३॥शमीपूजन विधि करून । सायंकाळीं तिज अवलोकून । सांगोपांग देव शुद्ध करून । विधीनें शिकविलें सर्वांसी ॥१४॥नाना कार्यें सिद्ध होतीं । दशमीस शमीपूजन करितां जगतीं । यांत संशय नसे निश्चिती । दशहरा दशदिशांत विघ्नहरा ॥१५॥आजपासून देवेशहो वार्षिक । पूजा शमीची पावक । कार्यवर्धन होण्या उपाय एक । दुःख नाशून सुख निळें ॥१६॥शमीस पूजून जें वाचित । विप्र वेद पुस्तकबद्ध विनत । तैशींच वाचिती पुराणग्रंथ । तयांसि ज्ञान होईल ॥१७॥जो दशहरा काळांत । शमीसी कधींच न पूजित । त्यास नाना विघ्नें बाधत । अंतीं जाई नरकांत ॥१८॥ऐसें बोलून स्वयं जात । ब्रह्मा वेदांसहित । स्वलोकांत । शंकरादि देवही जात । आपापल्या लोकांप्रत ॥१९॥तेव्हांपासून आश्विन मासांत । शुक्लपक्षी दशहरा ख्यात । दशमीतिथि शमीसंयुक्त । सर्वार्थांत सिद्धिदायिनी ॥२०॥म्हणून अवश्य पूजिती । शमीस या नर जगतीं । देव नागलोकही संमानिती । वेद म्हणती शिकविती जना ॥२१॥हें सर्व शमीसंभव चरित । सांगितलें तुज पुनीत । जो नर हें ऐकत वा वाचित । त्यास लाभें ईप्सत सारें ॥२२॥शौनक म्हणे सूताप्रत । हया सर्व विश्वास आधार असत । कोणता तें सांग सांप्रत । कोणी म्हणती कर्माधीन ॥२३॥कोणी म्हणती ईश्वराधीन । कोणी म्हणती यदृच्छाप्रधान । ऐशा त्रिविध भावांत सत्यज्ञान । न कळे मुनिश्वरांनाही ॥२४॥सूत म्हणे त्रिविध सांगत । मुनि ब्रह्मवेत्ते हें वृत्त । सत्यरूप असे ऐसें चित्तांत । जाणावें तूं मुनिसत्तमा ॥२५॥गणेशानें निर्मिलें हें समस्त । स्वेच्छेनें क्रीडा करण्यासर्वगत । तेथ माया असे ख्यात । सिद्धि ऐश्वर्यदायिनी ॥२६॥ऐश्वर्य मोहधरा बुद्धि प्रख्यात । मायिक जाण जगतांत । मायाभोगार्थ अत्यंत । म्हणोनि श्रमयुक्त जाहला ॥२७॥माया मायिक योगें खेळत । गणेश ब्रह्मनायक सतत । अनन्यभावपरायण वर्तत । स्वस्वभावें वर्ते सदा ॥२८॥विघ्नेशाचा प्रेरक नसत । कोणीही जाण विश्वांत । म्हणून यदूच्छेनें वर्तत । सर्व जग योगिह्रदयीं ॥२९॥आणखी ऐक विप्रेशा वृत्त । माया नाना भ्रम निर्मित । ती सर्वभावें प्रभाव न करित । जडरूप स्वयं म्हणोनी ॥३०॥तिनें मोहविता मायिक चालवित । मायेस सत्तायुत करित । माया नंतर खेळत । विविध भावांत जी रत होई ॥३१॥मायिके धरितां देवी हिंडत । विविध भावात्मिका जगांत । मायिकाच्या इच्छावश स्थित । यांत संशय कांहीं नसे ॥३२॥जेव्हां महामायेचा त्याग करित । मायिक तेव्हां ति करण्या अशक्त । जडप्रभावें कांहींही कर्म जगांत । ऐसी पराधीन ती असे ॥३३॥ईश्वराधीन भावें वर्तत । सर्वंही चराचर विश्वांत । कांहीं ध्यानमार्गपरायण सांगत । मुनिजन ऐसें आपुलें मत ॥३४॥दुसरेंही एक तुज सांगेन । माया कर्मस्वरूपिणी जान । नाना भावयुक्ता क्रीडन । नित्य करी ती त्रिविध पर ॥३५॥कर्म अकर्म विकर्मे चालवित । सर्वरूपिणी माया जगांत । स्वर्ग मुक्ति दात्री रत । त्रिविध भावांत ही माया ॥३६॥जैसें कर्म नर करित । तैसें फळ भोगील निश्चित । कर्माधीन असे हें समस्त । त्रिविध सर्व हे खरोखर ॥३७॥शुभ अशुभ जें कर्म केलें । तें निश्चित पाहिजें भोगिलें । कल्प कोटिशत झालें । तरीही कर्म नरास सोडिना ॥३८॥ऐसें देहवादी ब्राह्मण म्हणत । धारणेंत ते स्थित । ऐसें सत्य शास्त्रांत । असे निश्चित सांगितलें ॥३९॥या तिघांची एकभावना । सांगतो शौनका स्थिर करी मना । गणेश मायेनें भ्रांताना । कुयोग्यांना हें न समजें ॥४०॥मायामायिकरूपे खेळत । साक्षात गणनायक जगांत । स्वस्वभावें न अन्यपरायण असत । ईश्वर त्याच्या इच्छाधीन ॥४१॥तो गणनाथ प्रभवें मोहित । न जाणे गजानन श्रेष्ठ सर्वांत । मी श्रेष्ठ परब्रह्म वर्तत । माझ्या आधारें वतें जग ॥४२॥माझ्या इच्छेनें चालत । सर्व प्राणिमात्र संशय न यांत । जैसी गणनाथाची इच्छा असत । तैसेंच करी तो स्वेच्छेनें ॥४३॥ईश्वर तो आनंदे वर्तत । म्हणून सत्यत्वें भेद नसत । कर्मरूपा महामाया ख्यात । गणेश इच्छावश जी असे ॥४४॥ती त्याच्या आज्ञेनें वर्तत । होऊन मोहित भ्रांतिसंयुत । स्वतःस श्रेष्ठ मानित । निःसंदेह ती माया ॥४५॥माझ्या आधारें जग चालत । सकल कर्मभावें चराचर धृत । परी गणेशाची जैसी इच्छा असत । तैसें कर्म करिती प्राणी ॥४६॥चराचरात्मक हे जीव । त्या गणेशाच्या इच्छेवर भाव । तरती वा बुडती सावयव । त्रिविधरूप परी एकलक्षाश्रित ॥४७॥ऐसें बाधा विहीन । तें त्रिधा वर्तत म्हणून । मायावादीच कर्माधीन । ऐसे म्हणती तयासी ॥४८॥अद्वैतवादी समस्त । ईश्वराधीन जग मानित । योगी यदृच्छाधीन म्हणत । जग हें ऐसें त्रिविध प्रमाण ॥४९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरित त्रिविधजगदाधारनिरूपणं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP