मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय १८ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय १८ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय १८ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढती सांगती । कृतयुगांत अन्ययुगेंही वसतो । महर्षीनों परी तीं होतीं । कृतयुगाच्या आज्ञेंत ॥१॥कृताचा मान राखिती । त्याचें भय त्यांच्या चित्तीं । जेथ आयुमर्यांदा होती । कृतयुगतुल्य सर्वांची ॥२॥पापादि आचारयुक्त । ते सर्व कृतसम होत । शापादिक नरांचे होत । सफळ कृतयुग योगानें ॥३॥पाप्यांचें वचनही होत । सुकृती लोकांसम समस्त । त्यांतला भेद एक असत । तोचि तुजला सांगतो ॥४॥अपराधयुक्त जो नर । युगाप्रमाणें तो शापभीत न थोर । त्याची परी त्रेतायुगीं संचार । अन्य तिन्हीं युगांचा ॥५॥परी त्रेतायुगांत । भयसंयुक्त सारे वसत । पापी तैसे सज्जन वसत । समान आयुयुक्त दोघे ॥६॥द्वापारांत द्वापाराच्या आज्ञेंत । अन्य तिन्ही युगें राहत । त्यायोगें कर्मज फळ होत । तदाकार महर्षींनो ॥७॥आयुरादिक द्वापार प्रमाणांत । नाना भाव त्याचे असत । तें सर्व सविस्तृत । वर्णन करणें शक्य नसे ॥८॥कलियुगांत अन्य युगांची । अंशात्मक वसती साची । अन्य युगें आज्ञा तयाची । पाळिती जाणा निःसंशय ॥९॥कर्मादि फळ कलियुगासम । आयुरादिकही कलि तुल्य मनोरम । सर्वही आसुरभाव रत अक्षम । शांतिप्रद योग अविचलित ॥१०॥पापौ जन सुकृतीजन । उभयतांस सिद्धि समान । लेशमय ती होऊन । आयुष्यही कलितुल्य ॥११॥परी जो योग वर्णिला । गणेशाचा तुम्हांला । तो चारही युगी झाला । समरूप निश्चित ॥१२॥कृतयुगांत कर्म एक फलद । त्रेतायुगांत दसपट विशद । द्वापारांत शतपट कर्म यशद । कलियुगीं सहस्त्रगुण ॥१३॥गणेशाच्या वरदानें होत । विक्रमही ऐशाच प्रमाणें फलयुक्त । ऐसी नाना प्रमाणें पुराणोक्त । पुराणांत कथिलीं असतीं ॥१४॥आतां सिद्धि कैसी प्राप्त । कलियुगीं होईल सर्वार्थदा सतत । कर्मही आचारयुत । फलद कैसें झणीं व्हावें ॥१५॥आसुर स्वभावें कलियुग । आवरण करीं सर्व जग । त्यायोगें कर्मभव फलभोग । यशयुक्त प्रभावें न होय ॥१६॥तेव्हां कर्मंसिद्धी होण्यास । प्रथम करावा गायत्री जप खास । दश सहस्त्रवेळ या संख्येस । हितेच्छूनें सर्वदा ॥१७॥हविष्यान्नाचें भोजन । एकभुक्त राहून । ब्रह्मचर्यव्रताचें पालन । सत्य भाषण करावें ॥१८॥जितेंद्रिय रहावें । पवित्र आचरण ठेवावें । द्वेषादि सर्वही त्यागावें । आणखी एक पथ्य असे ॥१९॥मनानेंही स्त्रीचिंतन । भोगास्तव न करावें स्मरण । मनीं विषय इच्छितां जाण । कर्मसिद्धी कैसी लाभे ? ॥२०॥ऐसा स्वधर्म आचरावा । गायत्री जप तदनंतर करावा । तदनंतर कृच्छ्र्व्रताचा घ्यावा । आश्रय तेणें दोष हरती ॥२१॥ऐसें सर्व कलिदोष जात । तेव्हां सिद्धी होय प्राप्त । कर्म करिती विधियुक्त । चारही युगीं क्षणसिद्धिद तैं ॥२२॥आसुरस्वभावें जें घडत । तें कर्म कलियुगांत । कैसें सिद्धिप्रद होणार अनुचित । सांगावें तुम्हीं मुनिजनहो ॥२३॥केवळ आसुर भावें केलें । जरी तें सत्कर्मही असलें । तरी हजारपट होणार भलें । आसुर स्वभाव निःसंशय ॥२४॥सुरस्वभावें वा असुरस्वभावें । जें जें कर्म करावें । तैसें तैसें फळ लाभावें । हा तर योग्य क्रम असे ॥२५॥ऐसें हें युगधर्माचें रहस्य । सांगितलें तुम्हांसी गौप्य । कलियुगीं संक्षेपें प्राप्य । कैसें तेंही सांगितलें ॥२६॥जो ऐकेल वा वाचील । अथवा हें वाचून घेईल । युगाख्यान अति विमल । दोषहीन तो नर होई ॥२७॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खण्डे धूम्रवर्णचरिते युगप्रभावकर्मसिद्धि वर्णनं नाम अष्टादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP