मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय ४ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय ४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ४ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ शिव कथा पुढती सांगती । अहं दैत्य माजला जगतीं । परस्त्रीलालस मूढमती । पकडिल्या त्यानें नागकन्या ॥१॥देवकन्या नरांच्या दुहिता । बलात्कारें त्या आणितां । सर्वदूषक भोगी नित्यनेमता । मद्यमांस उपभोगी ॥२॥गणेशासी विसरून । दुष्टात्मा पापकर्मपरायण । एकदां अधर्मकारक दैत्य बोले वचन । कर जोडून सभेंत ॥३॥दैत्येंद्रांनी तो प्रेरित । म्हणे महाभागा सर्व ब्रह्मांड जित । तूंच एक जगदीश तुजसम नसत । अन्य कोणीही या जगीं ॥४॥विष्णुमुख्य देव वनांत । राहिले सांप्रत भयभीत । सुर असुर शस्त्रू शत्रू असत । देव ऐसें सांगती ॥५॥हें देवेंद्र शस्त्रादींनीं न मरतील । म्हणून अमर नामें ख्यात सबल । वेदवादांत हें वचन आढळेल । यज्ञाहुती देव भक्षिती ॥६॥त्यांसी मारण्याचा उपाय । यज्ञकर्मांचा करावा क्षय । त्यायोगें देवगण उपोषित होय । क्षुधापीडित सारे मरतील ॥७॥म्हणून कर्मांचें खंडन । करावें दैत्येशा सत्वर जाऊन । पूर्वींही त्रैलोक्यराज्य जिंकून । असुर प्रबल झाले होते ॥८॥परी पुढें अमर वधिती । कालप्रभावें त्यांसी फसविती । जरी कांहीं न्यून पाहती । त्याचा लाभ घेऊनिया ॥९॥छिद्रान्वेषी देव समस्त । आपणा मारतील कदाचित । त्यांच्या विनाशार्थ त्वरित । प्रयत्न करी अहंराजेशा ॥१०॥त्या अधर्मधारकाचें वचन । ऐकून अन्य असुर आनंदून । म्हणती हें शोभन वचन । महाराज आपण मान्य करावें ॥११॥शंखादि असुर प्रशंसिती । तेव्हां अहंकार म्हणे हर्षितमती । अधर्मकारका तूं सांप्रती । योग्य सल्ला दिलास ॥१२॥आतां दैत्यहो समस्त । जावें तुम्हीं जगांत । यज्ञादि कर्में करा खंडित । राजाज्ञाही मी देतों ॥१३॥दैत्यसमूहासहित हर्षित । अधर्मधारक तेव्हां निघत । भूमीवरी कर्में खंडित । केलीं त्यानें सर्वंत्र ॥१४॥त्यायोगें हाहाकार माजला । वर्णाश्रमांचा बंध तुटला । देवालयें फोडित झाला । गणेशमूर्ती क्षेत्रस्थानें ॥१५॥सर्वत्र अंह असुरमय प्रतिमा । स्थापिल्या दैत्यनयनाभिरामा । ब्रह्मणांची करून मानखंडना । त्यांच्या हस्तें पूजविती ॥१६॥कर्मांचा प्रचर । सर्वत्र करविला अनिवार । ऐसा कर्मांचा संहार । करून भेटला असुरेश्वरासी ॥१७॥त्यासी स्वपराक्रम सांगत । असुरेद्र त्याचा सन्मान करित । त्यायोगें मानी कृपार्थ । आपणासी अधर्मासुर ॥१८॥कर्मनाश होतां वर्णसंकर होत । जन सर्व झाले दुःखयुक्त । मुनींसहित सर्व देवांप्रत । उपोषण संकट ओढवलें ॥१९॥दैत्यनाशार्थ विचार करिती । ब्रह्मा महेश खेदयुक्त अती । त्यांस अन्य मुनि देवगण सांगती । मायायुक्त आम्हीं सारे ॥२०॥त्या दुरात्म्यानें आम्हांस जिंकिलें । अहं असुरें निष्प्रभाव केलें । नानाविध मायेचे झालें । प्रभुत्व सर्वत्र प्रस्थापित ॥२१॥त्या मायेच्या अतीत असत । गणेश एकला जगांत । पंचचित्तमयी बुद्धि वर्तत । सिद्धि पंचभ्रांतिकरी ॥२२॥त्यांचा गणनायक पति । मायिक हा सिद्धिबुद्धींचा प्रीती । त्यांनी मायेची न भीती । विघ्नेश्वर सर्व श्रेष्ठ देव ॥२३॥तोचि ह्या दैत्याचें करील हनन । परी दैत्यास त्याचेंच वरदान । सांप्रत विसरला त्यास म्हणून । हितकारक हें आपणांसी ॥२४॥गणेशाचा मंत्र त्यागून । भोगविलासीं झाला निमग्न । गणेशक्षेत्रांचें भंजन । केलें असे त्या दुर्मतीनें ॥२५॥गणेशपूजन सर्व कर्मांत । करावें सर्वांनी विशेषयुक्त परी तो अहं असुर मदोन्मत्त । विसरला त्या विघ्नेश्वरा ॥२६॥म्हणून आपण समस्त । पूजूया ढुंढि भक्तियुक्त । तो त्या महा सुरासी मारील निश्चित । उपासना सारे करुंया ॥२७॥एकाक्षर मंत्राचा जप करूंया । गजानना ह्रदयीं ध्याऊंया । ऐश्या विधीनें तोषवूया । गणेशप्रभूला आपण सारे ॥२८॥श्रीशिव कथा सांगत । ब्रह्मयाचें वचन ऐकत । देव सारे अभिनंदन । करित । वाहवा उत्तम हा उपाय ॥२९॥ऐसें म्हणून ईश्वरासहित । निराहार ते व्रत आचरित । एकाक्षर विधानें भक्तियुक्त । गणेश्वरासी तोषविती ॥३०॥ऐसी शंभर वर्षें जाती । तेव्हां गणनायक प्रसन होती । त्या देव मुनीजनांपुढती । प्रकटले वर देण्यासी ॥३१॥मूषकावरी आरूढ असत । द्विरदानन ऐसा पाहत । तेव्हां देव मुनी त्वरित । हर्षभरें प्रणाम करिती सारे ॥३२॥आदरें पूजन करून । पुनः पुनः करिती वंदन । देव मुनिगण आनंदून । विघ्नेश्वराची स्तुती गाती ॥३३॥देवर्षी स्तोत्र गाती । धूम्रवर्णासी आमुची प्रणती । सर्वांसी सर्वदा सुखप्राप्ती । कृपाबळें जो देत असे ॥३४॥गणेशासि परेशासी । परात्परासी लंबोदारसी । विघ्नपतीसी । विघ्नकर्त्यासी । विघ्नहारकासी नमन असो ॥३५॥हेरंबासी अनादीसी । विशेषें ज्येष्ठराजासी । सर्वपूजिता मनोवाईविहीनासी । मनोवाणीमया नमन ॥३६॥ब्रह्मरूपासी ब्रह्म प्रकाशकासी । ब्रह्मपतीसी मंत्रनाथासी । महारूपासी देवासी । देवदेवेशरूपा नमन तुला ॥३७॥देवांसी वरदात्यासी । महोदरासी आदिपूज्यासी । सर्वांच्या मातापित्यासी । सर्वरूपासी नमन असो ॥३८॥सर्वात्म्यासी कर्मरूपासी । शूर्पकर्णासी शूरासी । वीरासी परमात्म्यासी । चतुर्भुजासी नमन असो ॥३९॥गुणेशासी धूम्रासी । गुणेशासी कर्त्यासी । हर्त्यासी तैसें भर्त्यासी । परज्ञानस्वरूपा नमन तुला ॥४०॥स्वाधीनासी महामोहदात्यासी । सर्वहर्त्यासी गजाननसी । वेदादींसही वर्णन करण्यासी । शक्ति नसे दयाळ ॥४१॥तेही जेथ धरिती मौन । तेथ आम्ही काय करूं स्तवन । जेथ वर्ण धूमराधिष्ठित । होऊन । अव्यक्तरूपा तुझ्यांत ॥४२॥धूम्रवर्णं ऐसी ख्याती । वेदांत तुझी सर्वत्र जगतीं । धन्य आम्हीं सारे जगतीं । पाहिलीं तुझीं पदकमलें ॥४३॥अव्यकत असुनी व्यक्त । झालास भक्तांस्तव सांप्रत । ऐसें स्तवन करून वंदित । मुनिदेव सारे धूम्रवर्णासी ॥४४॥त्या प्रणतांसी उठवून । धूम्रवर्ण मेघगंभीर वचन । म्हणे तुमचें हें स्तोत्र महान । सर्व सिद्धिप्रदायक ॥४५॥जो हें स्तोत्र वाचील । अथवा भक्तिभावें ऐकेल । त्यास पुत्रपौत्रादिक लाभेल । ऐहिक इष्ट सर्वस्व ॥४६॥जें जें इच्छील तें तं समस्त । स्तोत्रप्रभावें होईल प्राप्त । वर मागा सुरर्षिजनहो सांप्रत । देईन मी तपतुष्ट ॥४७॥गणेशाचें ऐकून वचन । देवर्षी करिती वंदन । अत्यंत हर्षित होऊन । म्हणती त्या देवदेवेशासी ॥४८॥जरी गजानना तूं प्रसन्न । वर देण्या प्रकटलास तोषून । तरी अहं दैत्याचें करी हनन । सर्वज्ञा हें वरदान द्या ॥४९॥तो सर्वांसी दुःख देत । कर्मखंडनी नित्य आसक्त । त्याच्या मरणें जगांत । सुख शांति नांदेल निश्चयें ॥५०॥तूं देवा मायाविहीन । तुझ्या हस्तें त्याचें हनन । होईल यांत । संदेह न म्हणून । मारावें अहं असुरा त्वरित ॥५१॥तूंच त्या असुरास । अभय पूर्वी दिलेंस । त्यायोगें सर्व जगास । अजिंक्य तो महा असुर झाला ॥५२॥आम्ही सर्वही पराजित । शरण तुजला आलों विनत । आतां रक्षण करी कृपायुक्त । दृद्धभक्ति दे तव चरणीं ॥५३॥अव्यभिचारिणी भक्ती । देई देवा आम्हांसी पवित्र मती । तरी विघ्नविहीनता निश्चिती । लाभून तव तदाचा लाभ होवो ॥५४॥ऐसें बोलून वंदन । गणेशास करिती देव मुनिजन । तथास्तु म्हणून अंतर्धान । पावला विघ्नराज धूम्रवर्णं ॥५५॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते देवमुनिवरप्रदानं नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP