मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ५| अध्याय ३६ खंड ५ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ खंड ५ - अध्याय ३६ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३६ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः । गृत्समद स्तुतिस्तोत्र गाऊं लागला । विघ्नराज तैं तोषला । नमन ब्रह्मरूपी देवाला नाथा ब्रह्मणस्पते तुला ॥१॥गणेशासी ज्येष्ठराजासी । ज्येष्ठपद-प्रदात्यासी । ज्येष्ठांतील ज्येष्ठरूपासी । सर्व पूज्यास तुज नमन ॥२॥कर्त्यांच्या कर्त्यांच्या कर्तृरूपासी । कवीसी कविनायकासी । कर्यांसी कर्तूदात्यासी । कविराजास तुज नमन ॥३॥जगांत अथवा ब्रह्मांत । नाना भोगकराप्रत । प्राज्ञा ब्रह्मभोक्त्या तुजप्रत । नमन असो पुनः पुनः ॥४॥सदा मोहयुता मोहकर्त्यासी । जीवासी बृहन्नाथासी । बृहस्पतीसी ब्रह्मसुखस्थासी । परमात्मस्वरूपा तुज नमन ॥५॥गृहाहितासी । सांख्यासी । बृहस्पतिमित्रा तुजसी । स्वसंवेद्यमयासी स्वानंदासी । योगधारका तुज नमन ॥६॥जीवब्रह्मांच्या संयोगासी । सत्यासी अयोगरूपासी । मनोवाणीविवर्जितासी । भद्रांच्या भद्रांच्या भद्रकासी नमन ॥७॥सत्यसत्यासी सर्वपोषकासी । सोमासी अमृतरूपीसी । सोमास सोमदात्यासी । पुष्टिनाथा तुज नमन ॥८॥सृष्टिकर्त्यासी पालकासी । हरासी त्रयीमयासी । तूर्यासी तूर्यासी तूर्यातीतासी । इंद्रादिदेवसाहय्यकरा नमन ॥९॥धर्मपालकभावासी । धर्मांधीशासी राज्यराजासी । सर्वांस राज्यदात्यासी । परेशासी तुज नमन ॥१०॥अराज्यासी संसारार्णव तारकासी । योगदात्यासी योगयोगासी । शांतिदासी सदा शांतिस्थासी । तत्पतीस नमन असो ॥११॥ऐसें भेद बहुत वेदांत । ब्रह्मयाचें असती ख्यात । त्या सर्वांच्या स्वामिरूपा तुजप्रत । ब्रहयासी माझें नमन असो ॥१२॥ब्रह्मणस्पते तुझी स्तुति । गणनाथा करण्या मन्मति । असमर्थ असे म्हणोनि मजवरती । कृपा करी प्रसन्न हो ॥१३॥ऐशी स्तुति करून नाचत । गृत्समद प्रेमविव्हल मंदिरात । हर्षोत्फुल्ल नयन तो भक्त । त्यास पाहून गणराज म्हणती ॥१४॥घनगंभीर स्वरें ते म्हणत । तुझ्या या स्तोत्रानें मी तोषित । आतां वर माग इच्छित । देईन मीं तो तुज निश्चयें ॥१५॥तूं रचिलेलें स्तोत्र । सर्वसिद्धिप्रद इहपरत्र । होईल यांत संवेह नसत । भक्तिवर्धक हें स्तोत्र ॥१६॥सर्वदा शांतिमय होऊन । तू भजशील मातें प्रसन्न । या स्तोत्र रचनेनें सुमन । ब्रह्म भूत तूं होशील ॥१७॥पुत्रपौत्रादिक धनधान्यादी । पठनें वाचनें सुहृतादी । सर्व लाभून शांतियोगादी । धन्य होईल तव जीवन ॥१८॥गणराजाचें हें वचन ऐकून । गृत्समद झाला सावधान । हर्ष उत्कट आवरून । प्रणाम करी गजाननासी ॥१९॥अडखळत बोले वचन । गणेशासी भक्तिनम्र होऊन । भक्त राजेश्वर तो प्रसन्न । धन्य माझे मातापिता ॥२०॥धन्य माझें तपजम्न । विद्या व्रतादिक अनुपम । तुझ्या अंघ्रयुगाचें दर्शन । मनोरम जाहले आज बहुपुण्यें ॥२१॥अहो गणेशान साक्षात । ब्रह्मेंद्र आज दृष्टिपथांत । मनोवाणीविहीन असत । परी प्रकटला मद्भाग्यें ॥२२॥ ऐशा तुज गणेशास पाहत । अन्य काय इच्छा मन उरेल चित्तांत । तथापि तुलाच मी वांछित । तुझ्या आज्ञेचें पालन करण्या ॥२३॥ब्राह्मणांस म्हणती ब्रह्मभूत । म्हणोनि मज ब्राह्मण करी जगांत । योगींद्रा वंदनीय जनांत । ब्रह्मांचा नाथ तूं अससी ॥२४॥तैसा मी ब्रह्मभूतांचा नाथ व्हावें । विघ्नेशा गुरूंचा गुरू भावें । योगींद्राच्या शिरीं विलसावें । ऐसें करी दयाघना ॥२५॥तुझ्या पादपद्यावरी । माझी दृढ भक्ति स्थापन करी । गाणपत्यांचा संग भूवरी । देई मज सर्वदा ॥२६॥ गाणपत्यांत विख्यात । करी मजला तूं बळवंत । गृत्समदासम गाणपत्य जगांत । कोणी नसे ऐसें करी ॥२७॥ऐसें प्रार्थून गणेशास नमित । महामुनि तो विनययुक्त । त्यास गणेश सांगत । महान भक्ति पाहून त्याची ॥२८॥गणानां त्वा य मंत्राचा जप केलास । सूक्तही तूं म्हटलेश । म्हणून प्रमुख पदास । त्या संबंधी तूं मिळवशील ॥२९॥गणानांत्वा या मंत्राचा द्रष्टा । ब्रह्मणस्पति सूक्ताचा कर्ता । ब्राह्मणेंद्र तूं वेदवेत्ता । होशील विशेषें गृत्समदा ॥३०॥यज्ञांतील ऋषि स्मरणांत । अग्रणी तूं होशील मान्यवंत । तदनंतर मम देवतेचा मुख्य अधिकृत । होशील तुजसम न कोणी ॥३१॥माझ्या भक्तांत तुझ्यासम । कोणी नसे अनुपम । अत्रि मुख्यादि विप्र मनोरम । करतील सन्मान तुझा विप्रा ॥३२॥गणानां त्वा या मंत्राचा जप करिती । परी तुझें जर स्मरण न ठेविती । तर त्यांचा जप फलहीन जगतीं । होईल हे सुनिश्चित ॥३३॥शिव विष्णु आदिदेवांसी । ब्राह्मण नर शेषादि असुरांसी । वंदनीय तूं सदा होसी ऐसा । वर मी देत असे ॥३४॥तुझी अवज्ञा जरी होईल । तरी क्रुद्ध होऊन धरातल । चराचर मी जाळीन चंचल । तुझिया ह्रदयीं राहीन ॥३५॥भक्तिलोलुप नित्य राहीन । तुझें चित्त माझें निवासस्थान । तूं जेथें तप केले महान । तें क्षेत्र प्रख्यात होईल ॥३६॥तें मज पुष्पकासमान । भुक्तिमुक्तिप्रद पावन । भक्ति वाढवील प्रसन्न । पुष्पक नाम म्हणोनि त्याचें ॥३७॥जें जें प्राज्ञा वांछिशी । तें तें लाभेल तुजसी । स्मरणमात्रें महाकार्यांत तुजसी । प्रत्यक्ष होऊन साहाय्य करीन ॥३८॥ऐसें बोलून अंतर्धान । ब्रह्मणस्पति पावला हृष्टमन । गुत्समद तैं खिन्नमन । तेथेंचि राहिला भक्तिभावें ॥३९॥त्यानें ब्राह्मणाच्या साहाय्यें स्थापिलें । ब्रह्मणस्पति नामक क्षेत्रभलें । गृत्समदाचें नाव सर्वमान्य झालें । ब्राह्मण महायोगी म्हणूनी ॥४०॥ब्रह्मणस्पतीचा तो भक्त । जाहला सर्वत्र प्रख्यात । ब्राह्मणवर्य त्यास पूजित । गणेशाच्या कृपाप्रसादें ॥४१॥जैसे गजाननें सांगितेलें । तैसें च सारें जाहलें । मुनीनें नित्य व्रत पाळिलें । विनायकाच्या पूजेचें ॥४२॥नियमित बाह्मपूजा करित । मानस पूजाही न विस्मरत । गुत्समद गणेशाचा श्रेष्ठ भक्त । ऐसी ख्याति सर्वत्र ॥४३॥ऐसें हें गृत्समदाचें आख्यान । कथिलें तुज सर्वसिद्धि पावन । सर्वपापहारक पुण्यकर प्रसन्न । वाचकां श्रोत्यां जनांसी ॥४४॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते गुत्समदवरप्रदानं नाम षट्त्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP