|
अ.क्रि. शब्द करणे ; नादणे ; आवाज काढणे . चर्चेचा विषय होणे ; प्रसिद्ध होणे . लागणे ; विषय होणे ( थंडी , हींव ). माथां वाजती घाये । - एरुस्व ८ . ४१ . शिवशिवणे ; आवाज करुं लागणे ( दांत ). वाजतां दातोरी । काई आइकिजेना । - शिशु ९५१ . वाहणे ; सुरु होणे ( वारा ). वाजतिया वायूते जरी होकारी । - ज्ञा ९ . १२५ . अहंकुवावो वाजतां थोरु । अवघाचि खवळे भवसागरु । - एभा २ . ९५ . आदळणे ; चिकटणे ; बाधणे ; उद्भवणे ; परी पाखंडता अंगी वाजे । - एभा २० . ४८ . बाळ म्हणोनि धरितां व्याळ । अनर्थ वाजे रोकडा । - मुआदि ३१ . १०० ; १६ . १० . ( राजा . ) चिरकणे ; पिंजणे ( वांसा , कळक वगैरे ). ( घड्याळ ) ठोके पडणे ; घटिका , तास भरणे . आठ वाजले . [ सं . वद ; प्रा . वज्ज ; हिं . बजना ; सं . वाशृ - शब्दे . वाश्यते - वास्सए - वासे - वाजे . - भाअ १८३३ ] बारा वाजणे - घटिका पूर्ण भरणे ; नाशाची वेळ येणे ; नाश होणे . ०गाजणे गर्जना , गडगडाट , कडकडाट इ० होणे . गाजावाजा प्रसिद्धि ; बोभाटा , बभ्रा होणे . ०गाजत क्रिवि . वाद्यांचा आवाज करीत ; गजराने ; थाटामाटाने ; डामडौलाने ( क्रि० जाणे ; येणे - मिरवणूक वगैरे ). वाजता वि . आवाज करणारा ; खणखणीत . वाजता नारळ पु . पाणी असलेला , आवाज करणारा नारळ गोटा नव्हे तो . वाजता पुडा वाजते पूड पुन . जिकडून थाप मारावयाची ती मृदंगाची बाजू ; डग्ग्याची नव्हे ती . वाजती घंटी स्त्री . ( ल . ) फार बोलकी , वटवट करणारी व्यक्ति . वाजते गाळ न . एक मुलींचा खेळ . - मखेपु ३४१ . वाजते फूल न . एक मुलींचा खेळ . - मखेपु ३४० . वाजते वारे , वाजत वारा पुन . संकट ; आपत्ति ; त्रास . उभयतांस मी वाजते वारे । - अफला १ . ४ . तुम्हावरी वाजतवार येथौनि धरिजैल । - सूत्रपाठ १०४ .
|