|
वि. अरबस्तानासंबंधीं . ( ल . ) भाषा , घोडा , वेष , लिपि , फळफळावळ वगैरे . मंद हळु हळु चालतो । चपळ कैसा आटोपतो । अरबी फिरवणार तो । कैसा असावा । - दा १९ . ७ . १८ . ०तगादा पु. अरबी शिपायांनीं लाविलेला तगादा . हा अतिशय जुलमी व त्रासाचा असतो . यावरुन ( ल . ) अतिशय निकडीची - सक्तीची - जोराची मागणी ; मारवाडी तगादा . ०पहारा पु. अरब लोकांची चौकी . हा फार कडक व जालीम असतो त्यावरुन कडक व सख्त पहारा . ( क्रि० करणें , लावणें , मांडणें , बसवणें , लागणें , बसणें ). ०साल न. ०सन पु. अरबी वर्ष ; मृगसाल ; शूहुरसन ( सूर ); याची संख्या मांडण्याची रीत पुढीलप्रमाणें . अहदे - इहिदे १ , इसन्ने २ , सल्लास ३ , अरबा ४ , खम्मस - सिन ५ , सीत ६ , सब्बा ७ , सम्मान ८ , तिस्सा ९ , अशर १० , अहद अशर ११ ; इसन्ने अशर १२ , सल्लास अशर १३ , तिस्सा अशर १९ , अशरीन २० , सल्लासीन ३० , अरबैन ४० , तिस्सैन ९० , मया १०० , मयातैन २०० , सल्लासमया ३०० , अरबामया ४०० , तिस्सामया ९०० , मय्या व अलफ ११०० , मय्यातैन व अलफ १२०० , अशर अलफ १०००० . हे उजवीकडून डावीकडे मांडीत जातात . ठोकळ मानानें अरबी सनांत ५९९ मिळविले म्हणजे इसवी सन येतो . कागदपत्रांत हे अक्षरांनीं लिहितात . उ० इसन्ने सल्लासीन तिस्सैनमया व अलफ = २ + ३० + ९०० + १००० = १९३२ .
|