|
पु. पीक खाणारा एक किडा ; याचा रंग हिरवा व शरीर लांबट असर्ते . पु १ लांब , सरळ व जाड लांकूड ( तुळई , कडी , खांब इ० साठीं ); उंच ; सरळ झाड ; उंच केळीचा कोका . २ उंच मनोरा ; उभट जिना , दादर ; पर्वताची सरळ सोंड ; सरळ रस्ता . ३ सुमारें २० पायली धान्य भरलेलें व तोंड शिवलेलें पोतें , ४ ( ल .) आडदांड ; धश्चोट ; राकट माणूस ; फटिंग ; मूलबाळ किंवा परिवारविरहित पुरुष किंवा स्त्री . ५ ( ल .) उंच व धिप्पाड माणूस . [ सं . शौंड ? हिं . सोंटा ] ०गा र्गे --- पुन दांडर्के ; सोटा ; दंड्डका ; बडगा . ०बहिरी भैरव --- पु . गलेलठ्ठ व आडदांड माणूस ; फटिंग ; सडेसोट पुरुष . ०वाव - पु . फोंक ( झाडाचा इ० ). ०शिंग - पु सडेसोट ; अविवाहित पुरुष . ०ळणें सोटाळणें --- अक्री , गाय , म्हैस यांच्या जननेंद्रियातून शेंबडाचे लोळीसारखा स्त्राव होणें , सोटा सोंटा --- पु . १ लांबट लाकूड ( खांब , शिडाची काठी यांच्या उपयोगी ). सोटगा , सोट पहा . २ गाय ; म्हैस इ० च्या योनीतून शेंबडाचे लोळीसारखा गळणारा स्त्राव . ( क्री० गळणें , गाळणें ). सोटा - दुपट्टा --- पु प्रवासांतील वस्त्रपात्र , काठी दांडके इ० थोडसें जरुरीचे सामान . सोटे पान्हवण --- न . सोटा इ० मारुन गाय इ० पशु पान्हवण्याची क्रिया ; त्यासाठी सोडग्याचा काढलेला आवाज . सोटे दरबार --- सोटा बाळगणारा मनुष्य . सोटे सोटेपीर सोटेबारगीर सोटेभैरव सोटेसुंभ सोटेसुलतान --- पु भालदार ; चोपदार सोटेबाजी सोटेशाई --- स्त्री . काठ्याची मारामारी ; दंडुकेशाई .--- वि . आडदांड ; आडदांडपर्णे हल्ला करणारा .
|