Dictionaries | References

दांडा

   
Script: Devanagari

दांडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

दांडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A thickish and shortish stick. A handle (as of a ladle &c.) A secondary beam of a house, a joist.

दांडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्याने नगारा वाजवला जातो ती टिपरी   Ex. महेश दांड्याने नगारा वाजवत आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टिपरी
Wordnet:
benঢোলকাঠি
gujચોબ
hinचोब
kanನಗಾರಿ ಬಾರಿಸುವ ಕೋಲು
kokतोणी
malപെരുമ്പറകോൽ
oriନାଗରାବଜା କାଠି
urdچوب , ڈاگا
noun  ज्यावर पक्षी बसतो तो पिंजर्‍याच्या आत लागलेला दांडा   Ex. पोपट दांड्यावर बसला आहे.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઅડ્ડા
kasدنڑٕ
malകഴ
oriପଞ୍ଜୁରିକାଠି
telపంజరంపుల్ల
noun  लाकूड किंवा धातू इत्यादीचा पातळ, लांब तुकडा जो कित्येक प्रकारच्या साधनांमध्ये पकडण्यासाठी, हलविण्यासाठी इत्यादींसाठी कामी येतो   Ex. ह्या छत्रीचा दांडा खूप लांब आहे.
HYPONYMY:
टीपरी
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanग्राहः
noun  काही विशिष्ट प्रकारच्या दागिन्यांचा असलेला बारीक, निमुळता भाग ज्याच्या आधारे तो अवयवांमध्ये अडवला, घातला जातो   Ex. ह्या कर्णफुलाचा दांडा थोडा लांब आहे.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
See : काठी

दांडा     

 पु. १ ( वेळू इ० काचा ) जाड व आंखूड तुकडा , काठी . २ ( पळी , ओगराळे , वेळणी इ० कांची हाती धरण्याची ) मूठ ; ( कुदळ , कुर्‍हाड , वाकस इ० हत्यार धरुन काम करावयाचे म्हणून त्याच्या नेढ्यांत घालतात तो ) लांकडाचा गोल दंड , काठी . ३ पाट इ० काचे पाणी जमिनीत न जिरतां वहावे म्हणून जमीनीपासून उंच बांधलेली सारणी , प्रणाली ; ( व . ) मोटेचे पाणी बागेत निरनिराळ्या ठिकाणी नेणारा पाट . ४ ( मनुष्य इ० काच्या ) पाठीचा कणा . ५ ( समुद्र , खाडी इ० कांत तारुं , गलबत यास अडथळा होण्याजोगा ) रेती , खडक इ० कांचा दंडाकार उंचवटा ; दांडी . ६ ( डोंगर , टेकडी इ० चा ) कणा ; दंड ; उंचवट्याची चिंचोळी व अरुंद रांग . ७ नाकाचा कपाळापासून शेंड्यापर्यंतचा उंच भाग . ८ ( नदीचा ) धक्का . ९ ( समुद्रांत गेलेला ) जमीनीचा लांब व चिंचोळा पट्टा . १० केळीचा घड . ११ केळीच्या पानाच्या मध्यांतून जाणारा देंठाचा लांब भाग . १२ ( नथ इ० दागिन्यांचा ) आंकडा . १३ ( जमीन , इमारत इ० कांचा ) सुळका , शेंडा . १४ माघी पौर्णिमेस होळीच्या स्थानी उभा रोवतात तो एरंडाचा सोट . १५ ( घराचा ) वांसा ; कडी ; बहाल ; तुळवंट . १६ यंत्र फिरविण्यासाठी मूठ बसविलेली काठी . - शर . १७ . ( गो . ) कुळागाराचा तुकडा . १८ ( गो . ) शूद्र स्त्रिया नाकांत लोंबता घालतात तो एक दागिना . १९ ( गो . ) चार हाताचे लांबीचे एक परिमाण . २० ( तंजा . ) भेंडाचा केलेला एक त्रिकोणाकृति अलंकारविशेष . हा अलंकार स्त्रिया लग्न इ० मंगलप्रसंगी वापरतात . २१ ( विणकाम ) तातू जोडण्यासाठी जी सांध असते तीत घालण्याचा वेळूचा एक तुकडा . २२ ( नाविक . कों . ) गलबतास बाहेरच्या अंगास कांठाखाली वीतभर अंतरावर नाळवर्‍यापर्यंत दोन्ही बाजूस ठोकतात ती लांकडाची गोल अथवा चौकोनी पट्टी . २३ ( अशिष्ट ) लिंग ; शिश्न ( विशेषतः घोड्याचे , लांब असअसणारे ). दांडी पहा . [ सं . दंड ; हिं . डांड ; डांडा ; गु . डांडो ] ( वाप्र . ) ( घराचे ) दांडेवासे मोजणे - ( एखाद्याने ) कृतघ्न होणे ; उपकारकर्त्याचे उपकार विसरुन त्याच्या नाशास प्रवृत्त होणे , नाश चिंतणे . म्ह ० दांड्याने पाणी तोडले म्हणून निराळे होत नाही = खरी , जिवलग मैत्री लोकांनी कितीहि कलागती लाविल्या तरी नाहींशी होत नाही . सामाशब्द -
०ईत वि.  दांडगा ; उर्मट ; धसकट ; आडदांड . [ दांडा ]
०पेंडा   पेंडोंळा - पु . दाट परिचय , ओळख , दांडपेंडोळा पहा .
०मेंडा  पु. शीव ; हद्द ; सीमा . दांडमेंड पहा . दांडेकरी पु . ( राजा . कु . ) ( सांकेतिक ) ( महाराच्या हातांत नेहमी काठी असते म्हणून ) महार ; ब्राह्मण सोवळ्यांत असतांना महार शब्द न उच्चारतां दांडेकरी म्हणतात . दांडेपंडित पु . शास्त्राचे अध्ययन उत्कृष्ट वादविवाद करणारा व प्रसंगविशेषी दंदादंडी , काठ्यांनी मारामारी करण्यास तयार असलेला बळकट व हुषार मनुष्य . [ दांडा + पंडित ] दांडेपाट पु . ( धरण्याकरितां ) दांडा , मूठ असलेला पाट , तिवई इ० काठीने बडवून पान्हवण्यास , दूध द्यावयास लावणे . २ ( ल . ) ( एखाद्यास ) मारुन , बडवून त्याचे मन वळविणे ; आपले म्हणणे कबूल करण्यास भाग पाडणे . ३ ( सामा . ) झोडपट्टी ; मार . [ दांडा + पान्हवणे ] दांडेपाळ स्त्री . पाणी वाहून नेण्याकरितां , तसेच शेतांत खेळविण्याकरिता उंच बांधलेला जो दांडा , त्याची पाळ , कड . [ दांडा + पाळ ] दांडेपाळ पाळे स्त्रीन . मूठ बसविलेले लांकडी पाळे . [ दांडा + पाळे ] दांडेपूर्णिमा , दांडेपुनव स्त्री . माघ शुद्ध पौर्णिमा . ह्या दिवशी होळीचा दांडा रोवतात म्हणून हे नांव . [ दांडा + पूर्णिमा , पुनव ] दांडेबोर स्त्री . बोरीची एक जात . - न . या जातीच्या बोरीचे फळ . दांडेभुसा दांडेविंड पहा . दांडेमोर पु . दांड्याने , काठीने झोडपणे ; बडविणे ; चोपणे ; मारणे ( क्रि० करणे ). [ दांडा + मार ] दांडेमोडाक न . ( कु . ) माशाची एक जात . दांडेविंड न . ( कों . ) नदीत मासे पकडावयाचे एक प्रकारचे जाळे ; याची दोन्ही टोके दोन दांड्यास बांधलेली असतात . ( हा शब्द विशेषतः रत्नागिरीकडे रुढ आहे . हर्णैच्याअ बाजूस याच अर्थी दांडेभुसा हा शब्द वापरतात ). दांडेसाळ स्त्री . अलंग ; चाळीसारखे लांबलचक घर ; चाळ ; पागा ; बराक . [ दांडा + शाला = घर ] दांडेस्वार पु . आजारांतून नुकताच उठून काठीच्याअ साहायाने हिंडूफिरुं लागलेला मनुष्य ; हिंडता फिरता रोगी . [ दांडा = काठी + स्वार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP