Dictionaries | References

कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ

   
Script: Devanagari

कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ

   कुर्‍हाडीचा दांडा हा लाकडाचा केलेला असतो व त्‍या कुर्‍हाडीने लाकूडतोड्या सर्व लाकडे तोडून टाकतो. यावरून एखादा मनुष्‍य स्‍वजनांस घातक झाल्‍यास त्‍याबद्दल ही म्‍हण योजतात.
   कुर्‍हाडीचा दांडा लाकडाचा केलेला असतो पण तोच आपल्‍या जातभाईंना-लाकडांना कापण्यास, फोडण्यास तयार होतो. (ल.) निमकहराम
   घग्‍बुडव्या
   कुलशत्रु. ‘‘त्‍या शूराच्या (धनाजीच्या) पोटी हा मंगलनिधि चंद्रसेन उत्‍पन्न झाला आणि स्‍वराज्‍याशी निमकहरामीपणा करून ‘कुर्‍हाडी०’ झाला.’’-बाजी० ‘‘जो बाटतो तो ‘कुर्‍हाडीचा०’ असे होऊन आपल्‍या जातीबांधवांना पाहिजे तसे बोलतो, नांवे ठेवितो, व त्‍यांची वर्मेकर्मे बाहेर काढतो.’’-आजोच १७२. तु०-नष्‍टनय कसा झाला दितिसुतचंदनवनांत हा बाळ। कंटकतरु, व्हायाला तच्छेदक विष्‍णुपरशुला नाळ।। -मो मंत्रभागवत ७.४५.
   कुर्‍हाड पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP