Dictionaries | References

सरासरी गुडघ्याइतकें पाणी

   
Script: Devanagari

सरासरी गुडघ्याइतकें पाणी

   सरसकट पहा. नदीच्या एकंदर पात्राची ठिकठिकाणची खोली पाहून जी सरासरी काढली तीपाणी गुडघ्याइतकें आहेअशी आली. पण यावरुन नदींतून सहज चालत जातां येईल असें मात्र नाहीं. [ नदींत ‘ सरासरी गुडघाभर पाणीअसें ऐकून एकजण, नदीपार होणें अगदीं सोंपें आहे असें समजून पाण्यांतून जाऊं लागला. तेव्हां त्याला कांहीं ठिकाणीं पाणी बरेंच खोल लागलें व तो बुडाला. सरासरी काढण्याची रीत त्याला माहीत नसल्यानें त्याला वाटलें सर्वत्र पाणी गुडघाभरच असेल !]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP