|
स.क्रि. १ ( एखादा पदार्थ हात इ० कांनी ) दडपणे ; वजन घालून दडपून ठेवणे ; चेपणे . २ धमकावणे ; दटावणे ; दपटशा देणे ; भेडसावणे . ज्याच्या अंगी खरी वीरश्री आहे त्यास प्रसंगी लोकांनी अनेक गोष्टींनी दाबिले तथापि तो राहणार नाही . ३ ( ल . ) ( एखादी गोष्ट ) गुप्त राखणे ; दडपून ठेवणे ; छपविणे . साधूंस दुसर्याचे उणे समजले असतांहि दाबितात . ४ ( गंजिफांच्या खेळांत ) दुसर्याच्या तलफेवर दाब घालणे . - शास्त्रीको . ५ गिळंकृत , गट्ट करणे ; लुबाडणे . मंडळाची त्याने पांचशे रुपयांची रक्कम दाबली . ६ ( हात दाबणे ) लांच देणे ; फितविणे . [ सं . दम म . दाब ] दाबदडप - स्त्री . धमकावणी , दटावणी , दपटशा , दंडेली इ० उपायांनी ( एखाद्याला ) दडपून टाकण्याचा तत्न . [ दाबणे + दडपणे ] दाबदुबी , दाबीदुबी , दाबदूब - स्त्री . १ दाटदपट ; धाकदपटशा ; ( एखाद्यास ) सामदामादि उपायांनी दाबून टाकणे ; दहशत . २ ( गंजिफांच्या खेळांत ) एकाची तलफ दुसर्याने दाबावी अशा संकेताने गंजिफा खेळण्याचा एक प्रकार . [ दाबणे द्वि . ] दाबदाब - दाबी - स्त्री . १ ( कागदाचा , कापसाचा गठ्ठा , गांठ इ० ) दाबण्याची , दडपून बांधण्याची , आंवळण्याची क्रिया . २ ( जमीन , गच्ची इ० ) ठोकण्याची , चोपण्याची , पिटून टणक करण्याची क्रिया . ३ ( एखादी गोष्ट ) गुप्त राखण्याची , छपविण्याची , दडपून ठेवण्याची क्रिया . ४ धमकावणी ; धाकदपटशा ; दटावणी . ५ दाबांत , धाकांत ठेवणे . ६ ( दुसर्याचे पैसे इ० ) गिळंकृत करणे ; लुबाडणे . [ दाबणे द्वि . ] न. ( गो . ) दारुच्या उपयोगी पडणारे एक प्रकारचे मातीचे भांडे .
|