Dictionaries | References

दाटणे

   
Script: Devanagari

दाटणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खडसावणे

दाटणे     

अ.क्रि.  १ ( द्रव पदार्थ इ० ) गट्ट ; दाट होणे ; ( तांदूळ , साबुदाणा इ० शिजतांना ) घन , दाट होणे ; आवळणे . २ ( लहान भांड्यांत भात , साबुदाणा इ० शिजतांना ) अडचणणे ; अडचणल्यामुळे टणक होणे . ३ गर्दी , चेपाचेप होणे ; चिमटणे ; खेटणे . दैत्यां दानवांचिआ लोथां । दाटला वसुंधरेचा माथा । - शिशु १४७ . - ज्ञा ९ . २१६ . तेयापासोनि पातके जेतुली । संसारा लोकासी घडली । ती येतुकी दाटली । तुझ्या अंगी । - ख्रिपु २ . ४९ . १३३ . ४ ( अंगरखा इ० अंगाला ) तंग , घट्ट , आवळ होणे ; चिकटून बसणे ; ( लहान जागेत मोठा पदार्थ समाविष्ट झाल्यामुळे तो त्या जागेत ) गच्च बसणे ; अडचणणे . ह्या छिद्रात ही खुंटी दाटते . ५ भाराने दडपले , दाबले जाणे . तरी सांगे कां न दाटिजे । धनुर्धरा । - ज्ञा ३ . १७७ . ६ भिणे . जरी चोरां सभा दाटे । अथवा मीना गळु घोटे । - ज्ञा ७ . ९४ . ७ . ( ल . ) ( आनंद , राग , शोक इ० भावना अनिवार झाल्याने गळा , हृदय इ० ) भरुन येणे ; दद्गदित होणे ; कोंडला जाणे . प्रेम - शोक दाटणे . कंठ दाटणे . ८ ( गर्व इ० काने ) फुगणे ; ताठणे ; भरणे ; चढणे . जे होते बळवंत आपण असो ऐशा मदे दाटले । - मोकृष्ण ५८ . २५ . ९ भरुन ज्जाणे ; व्याप्त होणे ; व्यापून असणे . की ब्रह्मगोल वाटे विशिखांही दाटला तडा खातो । - मोभीष्म ६ . ४६ . १० अडकणे ; अडकून पडणे . स्थळी नावा जिया दाटिजे । जळी तयांचि जेवी तरिजे । - ज्ञा १७ . ३६६ . ११ ( व . ) भोसडणे ; खरड काढणे ; धमकावणे . १२ चिकटून बसणे . लेकुरुवे बापाते दाटिती । दादिया हलो नेदिती । - ख्रिपु २ . ४२ . ६० . - सक्रि १ ( महानु . ) पुसणे ; पुसून स्वच्छ करणे ; परिमार्जणे चंदने श्रीकर उल्लाळिले । वरि उष्णोदके प्रक्षाळिलो । सवेचि निर्मळा आंचळे दाटिले । सेवकजनी । - ऋ ८४ . २ दाबणे ; दडपणे . दाटिजो पां परि भारे । चित्त न दटे । - ज्ञा ६ . ३६९ . ३ खुपसणे ; जोराने आंत शिरकविणे . नाहे नावडोनि कांही । कामादिकांच्याचि ठायी । दाटिली जेणे डोई । आत्मचोरे । - ज्ञा १६ . ४४५ . [ दाट ; का . दट्ट , दट्टिसु ] दाटून - क्रिवि . १ मुद्दाम ; बळेच ; जाणूनबुजून ; बुद्धिपुरस्सर . २ ( ल . ) खोटेपणाने . काव्यांत दडुनि असेहि रुप येते . म्या त्याचे कांही केले नसता त्याने दाटुन कज्जा काढिला . ३ उगाच ; निष्कारण ; विनाकारण . देव म्हणे राया तूं दाटुनि धरितोसि कां विषादास । - मोभीष्म ११ . ८ . ४ ( व . ) धमकावून ; धाकदपटशाने . दाटदुपट - स्त्री . ( ना . ) धाकदपटशा . दाटबळे - क्रिवि . मुद्दाम ; बळेच ; जबरीने ; दाटून पहा . [ दाटणे + बळ ] दाटोदाटी - क्रिवि . १ बळेच ; सक्तीने ; जबरदस्तीने . रामायण लिहावयासाठी । श्रीरामे पुरविली पाठी । श्रीराम संचरोनि पोटी । दाटोदाटी लिहवित । - भारा किष्किंधा १ . ९ . २ उत्सुकतेने ; उत्कंठित होऊन . मम अधरामृताची वाटी । बळे लावितसे वोठी । जो न घे दाटोदाटी । अमृतासाठी जो न ये । - मुरंशु २४९ . ३ गर्दीने ; जोराने ; त्वरेने . लग्न लागलियापाठी । कायसी यादवांची गोष्टी । कार्य करुं दाटोदाटी । आम्ही जगजेठी असतां । - एरुस्व ६ . ३५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP