Dictionaries | References द दाटणी Script: Devanagari Meaning Related Words दाटणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Thickening, crowding, pressing &c. दाटणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ गर्दी ; दाटी ; रेटारेट . दाटणी जाली हो राजांगणी । - दावि ४९५ . २ विपुलता ; रेलचेल ; लयलूट . तेथ महानंदाची दाटणी । - ज्ञा १६ . १२ . ३ ( द्रवपदार्थाचा ) घट्टपणा ; दाटपणा . ४ ( कापड इ० काच्या गांठीची , गांठोड्याची बांधण्याची ) कसणी ; आंवळावयाची दोरी . ५ दडपण . - शर . ६ ( क्व . ) दाट , घट्ट होण्याची दाटण्याची क्रिया . [ दाटणे ] म्ह ० १ वरण दाटणी आणि बायको आटणी . २ ( व . ) गहूं घालावा दाटणी बायको घालावी कांचणी = गहूं कणगी इ० कांत दाटून ठेवावे व बायको जरबेत ठेवावी . सामाशब्द -०वाटणी स्त्री. गर्दी ; गर्दीची , अडचणीची , चेपाचेपीची स्थिति ; दाटीवाटी ; चेपाचेप ; खेटाखेट . दाटणीवाटणी करुं नको . दाटणीवाटणींत जाऊं नको , बसूं नको . [ दाटणी द्वि ] दाटणी वाटणी क्रिवि . एकमेकांस रेटून ; खेटून ; दाटी करुन ; दाटीवाटीने ; दाटूनदुटून ( क्रि० बसणे ; निजणे ; पडणे ; असणे ). दाटणीवाटणीने क्रिवि . खेटाखेट , चेपाचेप करुन ; दाटीने ; दाटूनदुटून ; दाटीवाटीने . दाटणीवाटणीने बसावे निजावे इ० Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP