Dictionaries | References

संकेश्वर

   
Script: Devanagari

संकेश्वर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A flowertree and flower.

संकेश्वर     

 पु. संकासूर पहा . राजतुरा ; एक फुलझाड व फूल . जाणें ; मिटणें ; चिरमुटणें ; अवटरणें . आपलिया संकोच विकाशा । आपणचि रुप वीरेशा । - ज्ञा १५ . ५५३ . २ अरुंदपणा ; निमूळतेपणा ; जागेची दाटी ; गर्दी ; मोकळेपणाचा अभाव ; निरुंदपणा ; ( जागा वगैरे ) प्रशस्त नसणें ; आवळपणा ( भांडयाचा ) ३ जागा मोकळी , ग्रशस्त नसल्यामुळें होणारी अडचण ; दाटी ; दाटणी . मला येथें संकोच होतो , स्वस्थ लिहवत नाहीं . ४ ( ल . ) मनावर निर्बंध घातला गेल्यामुळें विकारांची होणारी दाटी ; स्वातंत्र्याभाव ; मनमोकळेपणाचा अभाव ; मनाचा खोलपणा . ५ लज्जा , विनय , भीड , मर्यादा वगैरेमुळें वागणुकीवर पडणारा निर्बंध , दाब ; अडचणल्यासारखी वागणूक . ( क्रि० वाटणें ; होणें ). [ सं . सं + कुच् ‍ ] संकोचणें - अक्रि . १ आकुंचित होणें ; लहान होणें ; आंखडणें आणि गंगा शंभूच्या माथां । पावोनि संकोचे पार्था । - ज्ञा १६ . २०५ . २ दाब पडणें ; प्रतिबंध वाटणें ; अडचणणें . ३ मोकळेपणानें न वागणें ; दुरून असणें ; बेताबातानें असणें ; निर्बंधित वर्तन करणें . ४ भीड , मर्यादा , लज्जा यांनीं मोकळेपणा न वाटणें ; लाजणें ; संकोचन - न . आखडणें ; आकसणें ; मिटणें ; दाटणें ; कोंडणें ; अडचणणें ; कोताई ; दाटी ; चिंचोळेपणा . संकोचित - धावि . १ आंखडलेलें ; आकसलेलें ; आकुंचित ; दाटलेलें ; एकत्र आलेलें . २ अरुंद ; चिंचोळे ; आवळलेलें ; अडचणलेलें ; प्रशस्त नसलेलें ; दाटीचें . ३ निर्बंधित ; नियंत्रित ; रेखलेलें . ४ दबलेलें ; निरुध्द ; भिडस्त ; शरमिंदा ; लज्जित ; विनत . ५ ( सामान्यतः ) आशंकित ; बुचकळयांत पडलेलें ; सांशंक ; भीतिग्रस्त . संकोची - वि . भिडस्त ; लाजाळू ; मागें राहणारा ; मनमोकळा नव्हे असा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP