Dictionaries | References न नेहटणे Script: Devanagari See also: नेहेटणे Meaning Related Words नेहटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. लक्ष लावून पहाणे ; निरखणे ; न्याहळणे . नेहटून विचारे पाहतां । - दा ८ . ८ . ५५ . [ नीट , नेटका ]अ.क्रि. १ जवळ असणे , येणे ; पाठीशी असणे ; नेटणे ; भिडणे . जै मुंगी मरण नेहटे । तै त्या भूचर पंख फुटे । - कथा ३ . ८ . ६० . २ निश्चय करणे ; जोर धरणे , करणे . हा ठायवरी । नेहटोनि ठेला अंतरी । - ज्ञा १४ . ३११ . ३ निकड लागणे ; घाई होणे ; फार जवळ जवळ येणे . घराशी घर , माणसाशी माणूस नेहटला . ५ दाबणे . माजि अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तरभागे । नेहेटिजे वरि आंगे । पेललेनी । - ज्ञा ६ . १९६ . ६ अढळ , बळकट करणे . तेथ नेहटूनि आसव । स्वये होऊनिया सावधान । - एभा २० . २०३ . ७ ( ल . ) आदळणे . तैसे उंचौनि लोटिले कामे । नेहटती क्रोधाचिये ढेमे । - ज्ञा १६ . ३४१ . [ नेटणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP