Dictionaries | References ख खटलें Script: Devanagari See also: खटला Meaning Related Words खटलें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : नायकीण खटलें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . १ भांडण ; तंटा ; बेबनाव ; भेद . २ जमीनजुमला ; घरदार ; गुरेंढोरें ; जिंदगीं . ३ परिवार ; इतमाम ; लवाजमा ; बाडबिछाईत ; प्रवासी सामानसुमान . ' नागोपंतानें आपलें सर्व खटलें रवाना केलें होतें .' - विक्षिप्त १ . ३० . ४ कुटुंब पत्नी ; कारभारीण . ५ उद्योग ; पोट भरण्याचा व्यापार ; व्यापार धंदा ; उदीम ' हा सराफीचा खटला आज तीन वर्षे करतो .' ' तो बारा खटले करुन पोट भरितो .' ६ त्रासदायक काम ; भानगडीचें गुंतांगुतींचें काम ; मुद्दा ; प्रकरण ; बाब ; लचांड ; देवघेवींत लडथड .' फितुराचें खटल्यांत तुं पडुं नको कारण त्यांत पुष्कळ खटले आहेत .' ७ ( कायदा ) फिर्याद ; न्याय मिळविण्याकरितां कोर्टांत चालविलेला दावा ; कज्जा . ' हायकोर्टाचें जज्ज सुद्धां त्यांचेसमोर चाललेल्या खटल्यांत इतकें लक्ष घालीत नसतील .' - नाकु ३ . १ . ( का . कटके = फिर्याद , परंपरा पद्धत ) ( वाप्र .)०ओढणें संसार व्यवस्थित चालविणे .०तुटणें संबंध सुटणें . सामाशब्द -०खोर वि. १ भांडखोर ; कज्जेदलाल . ' खटलेखोर तो मश्रुन्मुलख । ' - ऐपो २६९ . २ ( क .) कुशल ; धाडसी ; हिकमती ; योजक .०वाईक वि. कुटुबवत्सल जमीनजुमला परि वार असलेला . संसारांत गढलेला . खटलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खटला ओढणेंसंसार व्यवस्थित रीतीनें चालविणेंगृहप्रपंचाचा भार योग्यप्रकारे स्वीकारून आपली जबाबदारी पार पाडणेंसंसाराचे ओझे वाहणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP