|
स्त्री. सामान्यत : इमारत ; इमला . रचना ; बांधणी ; घडण ( इमारतीची इ० ). व्यवस्थित , नियमित रचना . बंदोबस्त . सदरहू किल्ल्याची व कोटाची बंदीस्ती करुन . - मसाप २ . १४० . फाइलीच्या , कागदाच्या पुडक्यांच्या मुखपृष्ठावर अंक , खूण घालून त्यांचें अंकन , हिशेब करणें . - न . ठराविक वेतन , पगार . [ सं . बंध ; फ . बंदश ] बंदिस्त , बंदीस्त , बंदिस्थ - वि . कुडलेला ; गवंडीकामानें बंद केलेला ; बांधलेला . ह्या घरांत चार खण बंदिस्त , पांच खण मोकळे . बांधून काढलेली ; तोंडाचे जागीं गवंडीकाम असलेली ( विहीर , तळें , बंधारा ). बांधलेलें ; भोंवती भिंती घातलेलें ; तटबंदी , गवंडी कामानें सुरक्षित केलेलें ( घर , आवार , बाग , वाडगें ). ठराविक ; नियमित ; निश्चित . बंद ; निगडित ; निरुद्ध . तुरुंगांत टाकलेला ; कैद केलेला . स्त्रीसंभोगरहित ; नैष्ठिक ब्रह्मचर्य धारण करणारा . सुव्यवस्थित - रचित - नियमित - शासित ( राज्य , सैन्य संस्था ). चोख ; चांगल्या रीतीनें ठेवलेला , चालविलेला , आटोपिलेला ( हिशेब , खटलें , काम ). सुशिक्षित ; आकलित ; शासित . बंदिस्त लेख - पु . पुस्तकांतील लेख याच्या उलट मोकळा लेख . बंदिस्ती - वि . मजबूत ; भरींव ; भरभक्कम चिरेबंदी ( इमारत ). नियमित ; व्यवस्थित ; बरोबर ( वर्तन , क्रिया , काम ).
|