Dictionaries | References

मोकळ

   
Script: Devanagari

मोकळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

मोकळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A quantity lying loosely. liquidation (of a debt). Loosened state.
 ad   loosely, at large.

मोकळ

  स्त्री. 
   विस्कटलेली , निर्बंध , अस्ताव्यस्त स्थिति .
   फेड ( कर्जाची ).
   खुले किंवा विस्कळीत स्थितींतील भारे , गठ्ठे , इ०
   मोकळीक ; स्वतंत्रता ; सोडणूक ; सुटका ; मुक्तता . - क्रिवि .
   मोकळेपणें ; स्वैरपणें ; स्वतंत्रतेनें ; दाब किंवा प्रतिबंध नसतां . ( क्रि० सोडणें ; सुटणें ; फिरणें ; हिंडणें ; चरणें ).
   ( खुल्या किंवा उघड्या स्थितींत - ) पत्र , हिशोब , दस्तऐवज ; ( कायम मुक्रर किंवा निश्चित न केलेल्या स्थितींतील )- हिशोब ; स्मरणार्थ टिपण . [ सं . मुक्त ]
०चरणी वि.  मनास येईल त्याप्रमाणें चालण्यास स्वतंत्र .
   भटक्या ; उनाडक्या करणारा ;
   अस्थिर किंवा खात्रीचा , निश्चित नसलेला ( पगार , उत्पन्न इ० ).
०चरणें   क्रिवि . मोकळेपणें ; अनिरुद्ध ; स्वतंत्रपणें . मोकळचिठ्ठी स्त्री . मोकळीक देण्यासंबंधीचें पत्र ; मोकळीक चिठ्ठी पहा .
०लेख  पु. खुल्या कागदावर किंवा उघड्या कागदावर लिहिणें . याच्या उलट बंदिस्त लेख .
०वट   क्रिवि .
   खुलेपणें ; ( पेंढ्या जुडे किंवा भारे अगर गठ्ठे न बांधता ).
   बंदकरतां ; उघडें ठेवून .
   ऐसपैस ; अघळ पघळ ; प्रशस्तपणें ( मैदान किंवा विस्तीर्ण पटांगण )
   स्वैरपणें ; स्वतंत्रपणानें ( भटकणें इ० ). [ मोकळा + वत ]
०वाडी   वादी - स्त्री .
   ( प्रां . ) मोकळीक .
   स्थलत्याग .
   निराश स्थिति . सृष्टि गेली रे गेली । देवा मोकळवादी जाहलीऐशी एक टाळी पिटिली । सत्यलोकीं । - ज्ञा १ . १५७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP