Dictionaries | References

बाइल

   
Script: Devanagari
See also:  बाईल

बाइल     

 स्त्री. 
पत्नी ; बायको ; लग्नाची किंवा पाटाची स्त्री . न म्हणे बाइल याला कीं ठेवा । रामकृष्ण बाई लयाला । - मोकृष्ण ३९ . ३२ .
( घाटावर ) ठेवलेली स्त्री ; रक्षा . [ बाई ] म्ह० लहानपणीं आई आई , थोरपणीं बायला बाई .
०काम  न. गृहिणीचें काम ; घरकाम ; घरधंदा .
०काम्या वि.  केवळ घरकाम किंवा बायकी काम करणारा ; त्यांत हुषार ( पुरुष ).
०खाट्या वि.  
स्त्रीलंपट ; अति संभोगी ; रंडीबाज .
बायकोमार्‍या ; ज्याच्या पुष्कळ बायका मेल्या आहेत असा . [ बाईल + खाट ]
०खाद्या वि.  बाईलखाट्या अर्थ २ पहा . [ बाईल + खाणें ]
०गांठ  स्त्री. बायकी गांठ ; सामान्य गांठ ; साधी गांठ . [ बाईल + गांठ ] पिसा वि . बाईलवेडा पहा .
०पिसें   वेड - न . अत्यंत स्त्रीलंपटता ; संभोगाबद्दल आसक्ति ; रंडीबाजपणा .
०बडगा   भिडंग - पुन . मुलेंबाळें , गुरेंढोरें , चीजवस्त इ० मोठें कुटुंब , खटलें , पसारा ( व्यापक अर्थानें ).
०बंदा   बांध्या बुध्द्या - वि . स्त्रीच्या , बायकोच्या तंत्रानें चालणारा ; स्त्रीवश ; बायकोचा गुलाम असलेला .
०बुद्धि  स्त्री. 
बायकी ज्ञान , शहाणपण , अक्कल , समजूत .
बायकी मसलत , सल्ला , बेत , विचार .
( ल . ) कोते व अपरिपक्व विचार . [ बाईल + बुद्धि ]
०बोल्या वि.  जनानी आवाजाचा ( पुरुष ). [ बाईल + बोलणें ]
०भाड्या वि.  बायकोवर पैसे किंवा नौकरी मिळविणारा . [ बाईल + भाडें ]
०भुला वि.  स्वत : च्या बायकोचा पराकाष्ठेचा शोकी ; स्त्रीलंपट ; स्त्रीवेल्हाळ . [ बाईल + भुलणें ]
०माणूस  न. 
बायकोमाणूस ; स्त्री .
भार्यासक्त किंवा रंडीबाज मनुष्य .
षंढ ; नपुंसक . - मार्‍या - वि .
बायकोचा जीव घेणारा .
बाईलखाटया अर्थ २ पहा . [ बाईल + मारणें ]
०वेड  न. बायकोचें वेड ; कामुकता ; उत्कट कामवासना . [ बाईल + वेड ]
०वेडा वि.  स्वस्त्रीलंपट ; विषयवासनेनें भुलून गेलेला ; रंडीबाज . [ बाईल + वेडा ] बायला , ल्या वि . बाइक्या पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP