Dictionaries | References

जावळी

   
Script: Devanagari

जावळी

  पु. भावंड . कृतांताचिया जावळी । - ज्ञा ११ . ३९६ . २ सोबती , शेजार . - स्त्री . बरोबरी ; सादृश्य . जावळीं , जावळिं - वि . जुळीं ; आवळींजावळीं . तयाजिचे भायेंसि दोनि लेंकुरें जावळिं जाहालि । - पंच ५ . २ .
  पु. ( जुन्नरी ) बिन शिंगाचा मेंढा .
०भावळी वि.  १ भावांच्या बायकासंबंधीं , अनेक भाऊ आपल्या बायकांसह एकत्र असतांना कोणा एकाचेंच स्वामित्व कुटुंबावर चालत नाहीं अशी परिस्थिति , व्यवहार , असल्यावेळीं वापरतात . जावळी भावळी संसार असला म्हणजे प्रपंच करितां कामास नये . २ समाईक ; सारखा ; संयुक्त ; समान ( धंदा , प्रपंच इ० गोष्टी ). ( समासांत ) जावळी भावळी - धंदा - विचार - संसार - खटलें .
०हळद  स्त्री. पिवळी आणि मऊ जातीची , मोठया जातीची हळद .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP