Dictionaries | References

उलटणें

   
Script: Devanagari

उलटणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. उलटून गोष्टी सांगणें To reply saucily; to answer again;--as a servant his master. उलटून बोलणें To speak again; to repeat a thing said. 2 To reply saucily, retortingly &c.
; as तिशी-चाळशी-साठी-उलटणें g. of s.
to measure and determine loosely the quantity of grain.

उलटणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Turn over. To do over again. Dispose of; turn.
v i   Pass or turn over, turn back.

उलटणें     

स.क्रि.  
 न. ( कों . ) खळ्यावर नुकत्याच मळलेल्या धान्याचें अंदाजानें माप करण्याकरितां योजतात ती टोपली . [ उलट ]
पालथें करणें ; उलथणें ; उपडें करणें .
( वस्त्राची ) आंतील बाजू बाहेर करणें ; वळविणें ; उरफाटें करणें .
एखादी गोष्ट पुन्हां करणें ; पुनरावृत्ति , उजळणी करणें ; तपासणें . ( धान्य वगैरे पुन्हां मोजणें , लेखन तपासून पाहणें , ज्ञानाची , अभ्यासाची उजळणी करणें ).
पार पाडणें ; पुरें करणें ; संपविणें ( एखादें काम , भानगडीचा हिशोब वगैरे ). हें सारें लिहिणें पडलें आहे , हें उलटावयास मला दोन महिने पाहिजेत .
उलगडणें ; सोडविणें ; स्पष्ट करणें ; अर्थ सांगणें ( एखादा प्रश्न , कोडें , स्वप्न , भास वगैरेचा ). - अक्रि .
उलंडणें ; पालथें होणें .
मागें फिरणें ; विरुद्ध दिशेनें जाणें .
पुन्हां उचल खाणें ; पुन्हां सुरु होणें ( रोग , सांथ वगैरे ).
संपणें ; निघून जाणें ; मागें पडणें ( हंगाम , काल , वय वगैरे ). उ० तिशी , चाळिशी , साठी उलटणें . उलटून गोष्टी सांगणें - जाबसाल करणें ; उलट उत्तर करणें ; उद्धटपणें बोलणें . उलटून बोलणें -
पुन्हां बोलणें ; परत म्हणणें .
प्रत्युत्तर करणें ; उर्मटपणानें उत्तर देणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP